अफिलिएट मार्केटींग म्हणजे काय | Affiliate Marketing Meaning in Marathi

हल्ली प्रत्येक जण ऑनलाईन पैसे कमण्याचे माध्यम शोधत आहे आणि ती काळाची गरज सुद्धा आहे. इंटरनेटच्या युगात जर तुम्ही तुमचा वेळ सदकर्मी लावला तर प्रत्येक जण ऑनलाईन पैसे कमवू शकतो. त्यातीलच एक नावाजलेले माध्यम म्हणजे अफिलिएट मार्केटिंग (Affiliate Marketing).

अफिलिएट मार्केटिंग (Affiliate Marketing) हा घरातून ऑनलाइन पैसे कमविण्याचा एक स्वस्त आणि अतिशय वेगवान मार्ग आहे. आपल्याला फक्त इतकेच करायचे आहे की, त्यांच्या अफिलिएट प्रोग्रॅम मध्ये सामील होऊन त्यांच्या उत्पादनांची विक्री करून त्यामागे कमिशन मिळवायचे आहे.

अफिलिएट मार्केटींग म्हणजे काय | Affiliate Marketing Meaning in Marathi

 

अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय (What is Affiliate Marketing in Marathi) :

अफिलिएट मार्केटिंग (Affiliate Marketing) हा ऑनलाइन वस्तू विक्रीचा (Online Selling) करण्याचा एक मार्ग आहे, ज्याद्वारे कंपनी आपल्या बर्‍याच प्रॉडक्टवर चांगले कमिशन देते. सर्वाधिक अफिलिएट मार्केटिंग ही अफिलिएट ब्लॉग (Affiliate Blog), वेबसाईट (Affiliate Website) आणि सोशल मीडिया (Affiliate Facebook, Pinterest etc) यांसारख्या प्लॅटफॉर्मद्वारे केले जाते. अफिलिएट मार्केटिंग करण्यासाठी आपल्याकडे अफिलिएटच्या प्रॉडक्ट्स संबधित वेबसाईट किंवा ब्लॉग असणे आवश्यक आहे.

आपल्याकडे यापैकी काही नसल्यास, आपल्याकडे सोशल मीडिया प्रोफाईल असणे आवश्यक आहे. ज्याद्वारे आपण अमेझॉन, फ्लिपकार्ट यांसारख्या अफिलिएट प्रोग्रॅम मध्ये सामिल होवुन करू शकता. अफिलिएट मार्केटिंग द्वारे पैसे कमवू शकता.

 

अफिलिएट मार्केटिंग कसे कार्य करते ?

अफिलिएट मार्केटिंग करण्यासाठी तुम्हाला आधी अफिलिएट प्रोग्राममध्ये सामील व्हावे लागेल. आपल्याला इंटरनेटवर बरेच अफिलिएट प्रोग्राम मिळतील, आपण ज्या प्रकारच्या उत्पादनाची विक्री करू इच्छिता त्या संलग्न अफिलिएट प्रोग्राममध्ये आपण सामील होऊ शकता.

यानंतर त्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या कोणत्याही वस्तूची विक्री करण्यासाठी आपल्याला त्या उत्पादनाची लिंक तयार करावी लागेल. आणि नंतर यांची ऑनलाईन जाहिरात करावी लागेल आणि जेव्हा कोणी तुमचा Visitor त्या लिंकवर क्लिक करून एखादे उत्पादन खरेदी करेल तेव्हा त्या उत्पादनामागे तुम्हाला कमिशन मिळेल.

एखाद्या विक्रेत्या कंपनीला एखादी वस्तू विक्रीसाठी प्रोत्साहन म्हणून कमिशन दिली जाते, त्याचप्रमाणे अफिलिएट मार्केटिंगला एखादा उत्पादन विक्रीसाठी त्याच्या सेलर्सना कमिशन देते. म्हणून जर आपल्याकडे कोणतेही उत्पादन विकण्याचे कौशल्य असेल तर आपल्यासाठी पैसे कमविण्याचे अफिलिएट मार्केटिंग हे एक चांगले व्यासपीठ आहे.

 

अफिलिएट मार्केटिंग द्वारे पैसे कसे कमवू शकाल (How to Make Money with Affiliate Marketing) :

हा प्रश्न सर्वांच्या मनात येतो. परंतु अफिलिएट मार्केटिंग (Affiliate Marketing) माध्यमे आणि उत्पादन यांमध्ये बरेच पर्याय उपलब्ध आहेत, आपण आपल्या आवडीनुसार आपले उत्पादन निवडू शकता आणि उत्पादन निवडल्यानंतर आपण त्या उत्पादनाची जाहिरात आपल्या वेबसाईट अथवा ब्लॉगवर करू शकता. जेव्हा कोणी एखादा आपल्या वेबसाईटवरून ते उत्पादन खरेदी करते, तेव्हा त्या उत्पादनाच्या मुळ किंमतीवर ठराविक कमिशन प्राप्त होते.

अफिलिएट मार्केटींग म्हणजे काय | Affiliate Marketing Meaning in Marathi

अफिलिएट मार्केटिंगशी संबंधित काही गोष्टी :

अफिलिएट (Affiliate) :

अफिलिएट (Affiliate) ते लोक आहेत जे कोणत्याही अफिलिएट प्रोग्राममध्ये सामील झाल्यानंतर त्यांच्या उत्पादनची विक्री करतात. ही विक्री सोशल मीडिया, वेबसाईट किंवा वैयक्तिक ब्लॉगवर देेखील केेली जाते.

 

अफिलिएट लिंक (Affiliate link) :

उदाहरणार्थ, समजा तुम्ही अमेझॉनच्या अफिलिएट प्रोग्राममध्ये संलग्नित झाला आहात आणि अमेझॉन आपल्याला त्या उत्पादनासाठी एक युनिक अफिलिएट लिंक प्रदान करते. त्याच लिंकच्या साह्याने तुम्ही त्यांच्या उत्पादनास प्रचार करू शकता. याच लिंकला अफिलिएट लिंक असे म्हणतात.

 

अफिलिएट आयडी (Affiliate ID) :

कोणत्याही Affiliate Program मध्ये सामील (Join) झाल्यानंतर, आपल्याला एक विशेष संबद्ध आयडी (Affiliate ID) दिला जातो. ज्याच्या सहायाने Affiliate कंपनी आपल्या अफिलिएट लिंकद्वारे केलेल्या Visitors Click आणि विक्रीचा (Sales Reports) तयार केला जातो.

 

अफिलिएट मार्केट प्लेस (Affiliate Market Place) :

आज अफिलिएट संबधित खुप साऱ्या कंपन्या उपलब्ध आहेत. उदा. Clickbank, Commission Junction etc. ज्या तुम्हाला वेगवेगळे प्रॉडक्ट्स आणि हेल्थ, टेक्नॉलॉजी अश्या अनेक कॅटेगरी संबंधित अफिलिएट प्रोग्राम एकाच प्लॅटफॉर्म वर उपलब्ध करून देतात. त्यास आपण अफिलिएट मार्केट प्लेस (Affiliate Market Place) असे म्हणतो.

 

पेमेंट थ्रेशोल्ड (Payment Threshold) :

प्रत्येक कंपनीची नियमावली ठरलेली असते. ठराविक रक्कम झाल्यानंतरच आपण ती रक्कम आपल्या बँक खात्यात काढून घेऊ शकता त्या आधी ती रक्कम काढून घेऊ शकणार नाही. ह्या रक्कमेलाच आपण पेमेंट थ्रेशोल्ड (Payment Threshold) असे म्हणतात.

 

पेमेंट मोड (Payment Mode) :

Payment Threshold पुर्ण झाल्यावर तुमची Affiliate Income तुमच्या बँक खात्यात ट्रान्स्फर केली जाते. त्या प्रोसेसला पेमेंट मोड असे म्हणतात. हया पद्धतीमध्ये Bank wire, Paytm, Check, PayPal etc असु शकतात.

 

अफिलिएट कमिशन (Affiliate Commission) :

प्रत्येक उत्पादना मागे त्याचे % नुसार कमिशन ठरलेले असते. उदा. मोबाईल (9%) त्यानुसारच त्या प्रॉडक्टचे विक्री (Sales) झाल्यानंतर जे पैसे भेटते. त्याला अफिलिएट कमिशन (Affiliate Commission) असे म्हणतात.

 

लिंक क्लॉकिंग (Link Clocking) :

लिंक क्लॉकिंगचा वापर प्रॉडक्टची Url Link कमी करण्यासाठी किंवा Shorts करण्यासाठी केला जातो. जेव्हा आपण कोणत्याही प्रोडक्टची लिंक तयार करतो तेव्हा ती खुप मोठी असते. कोणत्याही यूआरएल शोर्टनेरच्या (Url Shortner) मदतीने ती लिंक शॉर्ट्स करून ती वेबसाईट किंवा ब्लॉगवर ठेवणे म्हणजे लिंक क्लॉकिंग (Link Clocking) होय.

 

अफिलिएट मार्केटिंगचे फायदे :

अफिलिएट मार्केटिंग (Affiliate Marketing) चे काम सुरुवात करण्यापूर्वी त्यांचे फायदे जाणुन घेणे आवश्यक आहे. म्हणुन आम्ही Benefits of Affiliate Marketing in Marathi सांगणार आहोत.

अफिलिएट मार्केटिंगचे फायदे खालील प्रमाणे :

  • Affiliate Program मध्ये सामील होण्यासाठी तुम्हाला कोणत्याही फीस देण्याची आवश्यकता नसते. ते पुर्ण पणे निःशुल्क असते.

 

  • अफिलिएट मार्केटिंग मध्ये कोणत्याही Criteria ची आवश्यकता नसते. तुम्ही एक साथ अनेक कंपन्याच्या Affiliate Program मध्ये सामील होऊ शकता.

 

  • अफिलिएट मार्केटिंग हे असे काम आहे ते तुमच्यावर अवलंबुन आहे ते तुम्ही पार्ट टाईम सुद्धा करु शकता. त्यासाठी कोणतेही सेलिंग टार्गेट नसते.

 

  • अफिलिएट मार्केटिंग मध्ये तुम्ही प्रॉडक्टचे सेल्स करत असताना प्रॉडक्ट्सच्या मुळ किंमतीपेक्षा जास्त रक्कम घेण्याची गरज नसते. तुम्हाला ते कमिशन कंपनी देय करते त्यामुळे ग्राहकांचा त्यावर काही आक्षेप नसतो.

 

अफिलिएट मार्केटिंग करता वेळी काही लक्षात ठेवण्याच्या बाबी :
  • Affiliate Marketing मध्ये सेल्स करण्याशिवाय तुम्हाला इन्कम करण्याचा दुसरा कोणताही ऑप्शन्स नसतो.

 

  • अफिलिएट प्रॉडक्ट्स विक्री साठी तुम्हाला ब्लॉग आणि वेबसाईटची अथवा सोशल मीडिया साईटची गरज असते.

 

  • तुम्ही जे अफिलिएट प्रॉडक्ट्स विकणार आहात त्या प्रॉडक्ट्स संबंधित पुरेपूर माहिती असणे आवश्यक आहे.

 

  • जर तुमच्या ब्लॉग किंवा वेबसाईट वर ट्रॅफिक असेल तरच त्याचा फायदा होतो.

 

आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

शेयर करा: