अंजीर खाण्याचे फायदे आणि नुकसान | Top Benefits of Anjeer in Marathi

अंजीर खाण्याचे फायदे | Benefits of Eating Anjeer in Marathi :

अंजीराचे नाव तुम्ही ऐकले असेलच, अंजीर एक स्वादिष्ट ड्राई फ्रूट आहे. ज्याला इंग्रजीत Figs असे ही म्हणतात. हे फारसे सामान्य फळासारखे नाही, जे सहजपणे उपलब्ध होईल, पण हे नक्कीच खूप जुने ग्रामीण फळ आहे. हे वर्षोनो वर्षांपासून अंजीराचे फायदे विविध प्रकारे होत आहेत. अंजीर चवदार तसेच पोषक तत्वांनी समृद्ध असतात.

Benefits of Anjeer in Marathi 1

ताजे अंजीर लवकर नष्ट होतात, त्यामुळे अंजीर जास्त काळ वापरण्यायोग्य ठेवण्यासाठी ते सुकवले जातात. वाळलेल्या अंजीरचा वापर वर्षभर करता येतो. अंजीरच्या विविध जाती आहेत, जे रंग आणि दिसायला भिन्न आहेत, परंतु पोषक घटक जवळपास एक समान आहेत. पण सुकल्यानंतर ते आरोग्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. आपण अंजीर फळ आणि ड्राय फ्रुटस म्हणून दोन्ही खाऊ शकता. म्हणून आज आम्ही तुम्हाला सुके अंजीर खाण्याचे फायदे आणि नुकसान सांगणार आहोत. जे तुम्हाला वर्षभर निरोगी राहण्यास मदत करतील.

अजून वाचा : सर्वोत्कृष्ट 5 ड्राय फ्रूट्स आणि त्यांचे फायदे | Top 5 Dry Fruits Benefits in Marathi

 

अंजीर मध्ये आढळणारे पोषक तत्वे (Nutritional and Health Benefits of Anjeer in Marathi) :

  • कॅल्शियम (Calcium)
  • पोटॅशियम (Potassium)
  • मॅग्नेशियम (Magnesium)
  • फायबर (Fiber)
  • मॅंगनीज (Manganese)
  • व्हिटॅमिन बी 6 (Vitamin B6)
  • ओमेगा 3 (Omega 3)
  • ओमेगा 6 (Omega 6)
  • फॅटी ऍसिड (Fatty Acids)

 

अंजीर खाण्याचे फायदे  (Benefits of eating Anjeer in Marathi) :

रक्तदाब (Blood Pressure) नियंत्रित ठेवतात :

जर तुम्ही नियमित अंजीर खाल्ले तर रक्तदाब नियंत्रणात ठेवता येते. अंजीरमध्ये आढळणारे फायबर आणि पोटॅशियम दोन्ही उच्च रक्तदाबाचा धोका कमी करण्यास मदत करतात. याशिवाय, अंजीरमध्ये आढळणारे ओमेगा 3 आणि ओमेगा 6 फॅटी ऍसिड देखील आढळतात, जे शरीरातील रक्तदाब नियंत्रित ठेवतात.

अजून वाचा : आहारात सोडियमचे (मिठाचे) प्रमाण कमी केल्याचे 20 फायदे

 

वजन कमी करण्यास मदत करते :

जर तुम्ही वजन कमी करू इच्छित असाल तर अंजीर तुमच्या आहारात समाविष्ट केले जाऊ शकतात. कारण अंजीरमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. हे वजन कमी करण्यासाठी पुरक असते आणि अंजीर आपल्या शरीराला चांगल्या प्रमाणात फायबर प्रदान करते. परंतू त्याचे प्रमाण सुनिश्चित करा. कारण त्यात कॅलरीज प्रमाण असते त्याचा अधिक सेवनाने वजन देखील वाढवू शकते.

अजून वाचा : वजन कमी करण्याचे घरगुती उपाय | Weight Loss Tips in Marathi

 

अशक्तपणासाठी फायदेशीर ठरते :

अंजीर हे असे फळ आहे की त्याचे सेवन केल्याने शरीरात उर्जेची कमतरता भासत नाही. अंजीरामध्ये जीवनसत्त्वे, सल्फर, क्लोरीन हे पुरेशा प्रमाणात आढळतात. ज्यामुळे शरीरात उर्जा टिकून राहते. विशेषत: उन्हाळ्यात काम करणाऱ्या लोकांसाठी ऊर्जेची गरज अधिक असते. म्हणून त्यांना अंजीर खाण्याचा सल्ला दिला जातो. उन्हाळ्यात या फळाचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते.

 

शुगर लेव्हल नियंत्रित ठेवते :

अंजीरमध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. जे आपल्या शरीरातील शुगरची पातळी नियंत्रित करते.अभ्यासात असे दिसून आले आहे की अंजीरमध्ये असलेले क्लोरोजेनिक ऍसिड साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत करू शकते. त्याचबरोबर भिजवलेले अंजीर खाल्ल्याने टाइप -२ मधुमेहामध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित राहू शकते. अंजीर खाल्ल्याने मधुमेह नियंत्रित ठेवता येते. अंजीर अर्क रक्तातील फॅटी ऍसिड आणि व्हिटॅमिन ई च्या पातळीवर नियंत्रण ठेवते, जे मधुमेहाच्या उपचारांमध्ये फायदेशीर आहे. म्हणून, मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांना अंजीर खाण्याचा सल्ला दिला जातो.

अजून वाचा : मधुमेह (Diabetes) म्हणजे काय ? त्याची कारणे, लक्षणे आणि उपाय

 

दम्यापासून संरक्षण करते :

अंजीर हे दम्यापासून संरक्षण करण्यास देखील मदत करतात. अंजीराचे सेवन शरीराच्या आतल्या म्यूकस त्वचेला ओलावा प्रदान करते आणि कफ तयार होण्याची समस्या दूर करते, ज्यामुळे दम्याच्या रुग्णाला आराम मिळतो. त्याचबरोबर अंजीर मुक्त रॅडिकल्सशी लढतात.

 

स्नायू बळकट होतात :

अंजीरमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हे मुबलक प्रमाणात असतात. जे हाडे मजबूत ठेवण्यासाठी ही सर्व पोषक तत्वे आवश्यक असल्याचे मानली जातात. म्हणून रात्री झोपताना दुधात उकळून त्याचे सेवन केल्यास त्याचा अधिक फायदा होतो. त्याचबरोबर हिमोग्लोबिनची कमतरता देखील अंजीर खाल्ल्याने पूर्ण होते.

 

अंजीर कसे खावे :

अंजीर आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे मानले जाते. अंजीरमध्ये कॅल्शियम, फायबर आणि जीवनसत्त्वे ए, बी, सी भरपूर असतात. अंजीर पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे, जे रक्तदाब आणि रक्तातील शुगर नियंत्रित करण्यास मदत करते. दुधाबरोबर अंजीर खाल्ल्याने त्याचे फायदे दुप्पट होतात. म्हणून अशा स्थितीत जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी दूध आणि अंजीरचे सेवन केले तर तुम्हाला अनेक फायदे मिळतात. रात्री झोपण्यापूर्वी एका ग्लास दुधामध्ये 2 ते 3 अंजीर टाकून खाऊ शकता. जर तुम्हाला ते दुधात टाकून खायचे नसल्यास तुम्ही गरम दुधासह 2-3 सुखे अंजीर त्याबरोबर खाऊ शकता.

 

अंजीर खाण्याचे नुकसान (Side Effect of Anjeer in Marathi) :

  • जर तुम्हाला किडनीची समस्या असेल तर तुम्ही अंजीराचे सेवन करू नका. कारण अंजीरमध्ये ऑक्सलेट नावाचा घटक असतो, त्यामुळे अंजीर खाल्ल्याने किडनी स्टोनची समस्या होऊ शकते.
  • अधिक अंजीर खाल्ल्याने कॅल्शियमची कमतरता होऊ शकते. अंजीरमधील ऑक्सलेट्स हे शरीरातील सर्व कॅल्शियम शोषून घेतात. अशा स्थितीत कॅल्शियमच्या कमतरतेमुळे अनेक रोग उद्भवण्यची शक्यता असते.
  • अंजीरच्या अतिसेवनामुळे दातदुखी, दात किडणे असे समस्या उद्भवू शकतात. अंजीरमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते आणि ही शुगर कार्बोहायड्रेट्सच्या स्वरूपात असते, ज्यामुळे दात किडणे आणि वेदना होवु शकतात.
  • उन्हाळ्याच्या हंगामात विशेषत: वाळलेल्या अंजीरांचा अधिक सेवन केल्यास अतिसार होऊ शकतो. यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, अशा स्थितीत एकावेळी अधिक अंजीर खाल्ल्याने डायरिया सारखी समस्या उद्भवू शकते. म्हणुन मुलांना अधिक प्रमाणात खाऊ देऊ नका.
  • अंजीर हे निसर्गात गरम असतात, त्यामुळे त्याच्या अधिक सेवन केल्याने रक्तस्त्राव होऊ शकतो. यामुळे काही लोकांमध्ये रेटिनल रक्तस्त्राव देखील होऊ शकतो. तसेच मासिक पाळी देखील लवकर येऊ शकते.

 

लक्षात ठेवा :

अंजीर खाण्याचे फायदे व तोटे या लेखात आम्हीं सामान्य माहिती सादर केली गेली आहे. कृपया अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा किंवा वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घ्यावा.


आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

शेयर करा: