आले खाण्याचे फायदे आणि नुकसान | Health Benefits of Ginger in Marathi

Ginger Information in Marathi :

आलेचे महत्व सर्वांना ठावूक असेलच. आपल्या दैंनदिन आहारामध्ये याचा सरास वापर केला जातो. बर्‍याच लोकप्रिय व्यंजनामध्ये आपल्या दैंनदिन जेवणामध्ये स्वाद वाढवण्यासाठी मसाल्यांमध्ये आल्याचा विशेषत: वापर केला जातो. आले शरीरात उर्जा आणि सामर्थ्य प्रदान करते, म्हणून थंडी मधे आले खाण्याचा विशेष सल्ला दिला जातो. आल्याचं वापर फक्त खाण्यासाठीच नव्हेच तर इतर कारणास्तव देखील केला जातो.

खाली आम्ही आल्याच्या फायद्यांचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. जे जर आपण नियमित सेवन करत राहिल्यास आपले आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतात.

 

आले काय आहे व त्याचे औषधी गुणधर्म (What is Ginger in Marathi) :

आले एक प्रकारचं जडी बुटी आहे. जी जमिनीमध्ये कंद मुळाच्या स्वरूपात आढळते. हिंदीमध्ये अदरक आणि इंग्रजी मध्ये गिंगर (Ginger) या नावाने ओळखले जाते. संपुर्ण जगात ह्याचा मसालेच्या स्वरुपात वापर केला जातो. आल्या मध्ये अँटी फंगल, अँटी सेप्टिक, अँटी बायोटिक, अँटी व्हायरल, अँटी इन्फ्लैमैट्री असे विशेष गुण आहेत. त्याच बरोबर विविध प्रकारचे व्हिटॅमिन आणि खनिजे देखील आहेत. जे आपल्या स्वास्थ्यासाठी खुप लाभदायक आहे. म्हणुन आल्याचं उपयोग औषधी सामग्री मध्ये देखील केला जातो.

आयुर्वेद आणि होमिओपॅथीक आणि पारंपारिक औषधांमध्ये आल्याचा उपयोग फार पूर्वीपासून केला जात आहे. यात पोटॅशियम, मॅंगनीज, तांबे आणि मॅग्नेशियम यासह बरेच पौष्टिक घटक आहेत. त्याचा फायदा घेण्यासाठी आपण आल्याच्या पाण्याचा अथवा आल्याचा चहाचा देखील समावेश करू शकता. चला तर मग जाणून घेऊया आले खाण्याचे फायदे याबद्दल.

आले खाण्याचे फायदे आणि नुकसान | Health Benefits of Ginger in Marathi

आले खाण्याचे फायदे (Benefits of Ginger in Marathi) :

पचन क्षमता सुधारते :

जठराची सूज किंवा अतिसार यासारख्या पाचन समस्यांमुळे ग्रस्त अशा लोकांसाठी आल्याची शिफारस केली जाते. हे पोट संरक्षक म्हणून देखील कार्य करते. आले आतड्यांमधील असिड रिफ्लेकशन आणि जळजळ होण्याची समस्या दूर करते, तसेच मळमळ देखील शांत करते. वास्तविक, आले हे एक नैसर्गिक प्रतिजैविक आहे, जे पोटाचे आरोग्य संतुलित करण्याचे कार्य करते, असे शरीरातले हानिकारक जीवाणू काढून टाकते, यामुळे अपचनही समस्या बरे होते. आल्यामुळे गॅस्ट्रिक असिड आणि पाचक एंजाइम्सचे समर्थन होते ज्याने पचन क्षमता सुधारते.

अजून वाचा : अ‍ॅसिडिटी आणि गॅस समस्येवर घरगुती उपचार

 

खोकला – सर्दीमध्ये उपयुक्त ठरते :

खोकला – सर्दीमध्ये खूप उपयुक्त सिद्ध होतो. आल्याचे सेवन केल्याने शरीरात गर्मी उत्पन्न होते. अश्याप्रकारच्या संसर्गजन्य आजारात हे एक नैसर्गिक उपचार मानला जाते. आल्याचा चहाचे योग्य प्रमाणात सेवन केल्याने उबदारपणा प्राप्त होतो, ज्यामुळे शरीरातून घाम आणि विषाक्त पदार्थ निघुन जातात. ज्यामुळे शरीर निरोगी राहते. आल्याचा चहा घसा खवखवणे आणि सर्दीसाठी खुप फायदेशीर असल्याचे मानले जाते.

अजून वाचा : गुळवेलचे फायदे | Top 8 Benefits of Giloy in Marathi

 

मायग्रेन :
मायग्रेनच्या समस्येने ग्रस्त लोकांसाठी आल्यापासून बनवलेल्या चहाचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. त्याचे सेवनाने मायग्रेनच्या आजारापासून बचाव करते. यासह, वेदनापासून मुक्तता मिळते.

आले खाण्याचे फायदे आणि नुकसान | Health Benefits of Ginger in Marathi

अजून वाचा : गुळ खाण्याचे फायदे आणि तोटे | Benefits of Eating Jaggery in Marathi

 

संधिवाताच्या त्रासापासून मुक्तता मिळते :

आल्यामध्ये एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात ज्यामुळे संधिवातमुळे होणाऱ्या दुखण्यापासून आराम मिळतो. संधिवात हा असा एक रोग आहे. जिथे रोगप्रतिकारक शक्ती ऐवजी ते स्नायूंना लक्ष्य करते. यामुळे ऊतींना सूज येते, ज्यामुळे वेदना होते. म्हणून आल्याच्या सेवनामुळे तुम्हाला शरीराच्या दुखण्यात आणि संधिवाताच्या त्रासापासून मुक्तता मिळते.

अजून वाचा : लवंग खाण्याचे फायदे | Benefits of eating Cloves in Marathi

 

वजन नियंत्रित होते :

आल्याचे सेवन केल्यास वजन कमी करता येते. आले खाल्याने चयापचय वाढवते आणि लठ्ठपणा कमी करते. म्हणून, ज्या लोकांना जास्त वजनाची तक्रारी आहेत त्यांनी आल्याचे सेवन सुरू करावे. आल्याचे नियमित सेवन केल्याने स्वत: चे वजन कमी होण्यास मदत होईल.

अजून वाचा : वजन कमी करण्याचे घरगुती उपाय | Weight Loss Tips in Marathi

 

निरोगी हृदयासाठी लाभदायक ठरते :

आल्याचे फायदे फक्त पाचन शक्ती आणि वजन कमी करण्यातच मर्यादित नसून ते कोलेस्ट्रॉल सामान्य राखण्याचे कार्य देखील करते. हे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी ठेवण्यास आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढण्यास मदत करते. हे हृदयाचे चांगले आरोग्य राखण्यास मदत करते.

अजून वाचा : आहारात सोडियमचे (मिठाचे) प्रमाण कमी केल्याचे 20 फायदे

 

आले खाण्याचे नुकसान (Side effects of Ginger in Marathi) :
  • जास्त मात्रा मध्ये आल्याचे सेवन केल्यास डोकेदुखी, मायग्रेन, निद्रानाश अशी समस्या उत्पन्न होवु शकते.
  • आले हे उष्णेतेचे स्रोत आहे. त्याचा अधिक सेवनाने पोटासंबधित विकार अ‍ॅसिडिटी, पोटदुखी, अतिसार देखील होवु शकते.
  • जास्त प्रमाणात आले खाल्यास तोंड येणे, ओठांना छाले पडणे, सूज येणे आणि शरीराला खाज सुटणे अश्या ॲलर्जी सारख्या समस्या उद्भवू शकतात.
  • आल्याचं अधिक सेवनाने इन्सुलिनची मात्रा वाढली जाते. ज्यामुळे शरीरातील शुगरचे लेव्हल कमी होण्यास कारणीभूत ठरते. म्हणुन मधुमेह असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेतली पाहिजे. उच्च रक्तदाब,अल्सर, पित्तामध्ये आले खाऊ नये.

 

आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

Follow Us

Follow us on Facebook Follow us on Twitter Follow us on Pinterest