चिकन रेसिपी मराठी (Chicken Recipe in Marathi) :
चिकन म्हटले की, साहजिकच तोंडाला पाणी सुटते. जर आपण मांसाहारी शौकीन असल्यास, तसेच स्वयंपाक करण्याची आवड असल्यास तर हा लेख खास आपल्या साठीच चिकन प्रेमी साठी आहे. आज आम्ही तुमच्यासाठी चिकन पासुन विविध रेसिपी बनवण्याच्या सोप्या पद्धत घेवून आलो आहोत. ज्याचा उपयोग करून आपण आपल्या घरात घर बसल्या रेस्टॉरंट सारख्या डिश बनवू शकता आणि आपल्या कुटूंबासमवेत बसून या लज्जदार पाककृतीचा आनंद घेऊ शकता.
चला तर मग बघूया, चिकन पासुन बनवलेल्या विविध चिकन रेसिपी मराठी मध्ये खालील प्रमाणे :
बटर चिकन रेसिपी (Butter Chicken Recipe) :
साहित्य :
- 1 1/2 (दीड) कप दही
- एक किलो बोनलेस चिकन
- एक चमचा लिंबाचा रस
- एक चमचा हळद
- दीड चमचा गरम मसाला
- 2 चमचा बटर चिकन मसाला
- दीड चमचे जिरे पूड
- एक चमचा मेथीची पाने
- अर्धा कप लोणी (मीठ न घालता)
- 2 कप कांद्याची पेस्ट
- एक कप टोमॅटोची पेस्ट
- 2 चमचे आले-लसूण पेस्ट
- एक कप मलई
- 3 कप चिकन स्टॉक (चिकन सूप)
- एक चमचा जिरे
- दालचिनीची पावडर
- चवीनुसार लाल तिखट
- चवीनुसार मीठ
- हिरवे धणे
- आवश्यकते नुसार तेल
बटर चिकन बनवण्याची कृती :
- एका मध्यम आकाराच्या भांड्यामध्ये दही, लिंबाचा रस, हळद, गरम मसाला पावडर, बटर चिकन मसाला आणि जिरे पूड घालुन चांगल्या प्रकारे ढवळून घ्या.
- आता दहीच्या मिश्रणात चिकनचे तुकडे घाला आणि चमच्याने ढवळून घ्या. नंतर चिकनला मॅरीनेट करण्यासाठी 2-3 तास फ्रिजमध्ये ठेवा. काही वेळानंतर गॅसवर तेल गरम करण्यासाठी पॅनमध्ये तेल ठेवा. तेल गरम झाल्यावर त्यात लोणी घाला.
- यानंतर बटर (लोणी) मध्ये जिरे आणि दालचिनी घाला आणि चांगल्या प्रकारे तळून घ्या. नंतर त्यात कांद्याची पेस्ट घालून परतून घ्या. यासाठी 10-12 मिनिटांचा कालावधी लागू शकतो.
- पेस्ट थोडीशी सोनेरी झाल्यावर आले-लसूण पेस्ट घालून परतून घ्या.
- आता ग्रेव्हीवर टोमॅटोची पेस्ट, मलई (क्रीम), लाल तिखट आणि मीठ घालून मध्यम आचेवर 8-10 मिनिटे शिजवुन घ्या.
- तेल ग्रेव्हीपासून वेगळे होण्यास सुरवात होईल मग त्यानंतर त्यात मॅरीनेटेड चिकनचे तुकडे घाला आणि 2 मिनिटे चमच्याने ढवळून एक मिश्रीत करुन घ्यावे.
- यानंतर चिकनमध्ये चिकन स्टॉक (चिकन सूप) घालावे. चिकनला झाकण न ठेवता 15 ते 20 मिनिटे मंद आचेवर उकळलून घ्या. दरम्यान चमच्याने ढवळत रहा.
- चिकन चांगले शिजल्यावर त्यात कसुरी मेथी (मेथीचे सुखी पाने) घाला आणि नंतर चिकन आणखी 2 मिनिटे धीम्या आचेवर शिजवून घ्यावे.
- अश्या प्रकारे बटर चिकन तयार आहे. आता तुम्ही राईस अथवा तुमच्या आवडीनुसार सर्व्ह करुन बटर चिकनचा आस्वाद घेवू शकता.
अजून वाचा : आहार कधी आणि कसा घ्यावा ? | Arogya Vishayak Mahiti in Marathi
चिकन बिर्याणी रेसिपी (Chicken Biryani Recipe) :
साहित्य :
- अर्धा (1/2) किलो चिकन
- अर्धा (1/2) किलो बासमती तांदूळ
- अर्धा (1/2) कप दही
- 2 ते 3 हिरव्या मिरच्या
- कोथिंबीर (धनिया)
- 2 टीस्पून लाल तिखट (आवडीनुसार)
- पुदिना
- 50 ग्रॅम लसूण पेस्ट
- लसूण 30 ग्रॅम
- 2 टीस्पून गरम मसाला
- 3 टीस्पून तेल
- चवीनुसार मीठ
- 1 लिंबू
- 6 ते 7 लवंगा
- दालचिनी
- 3 वेलची
- 3 टीस्पून देशी तूप
- 2 कांदे
- 3 चमचा दूध (आवश्यक असल्यास)
चिकन बिर्याणी बनवण्याची कृती :
- सर्व प्रथम, चिकन आणि तांदूळ पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घ्या. नंतर एका भांड्यामधे कांदा चिरुन तळून घ्या. आता त्यात लसूण आणि आल्याची पेस्ट घाला.
- आता स्वच्छ केल्याला चिकनला मीठ, तिखट, गरम मसाला, दही, आले लसूण आणि कांद्याची पेस्ट घालुन एक मिश्रीत करुन घ्या.
- नंतर त्यात लिंबाचा रस, हिरवी मिरची, तूप, धणे, पुदीना, तेल घालून चांगले ढवळून 10-20 मिनिटे तसेच ठेवावे.
- स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ 3/4 कप पाणी टाकून गॅसवर शिजण्यासाठी ठेवावे. या तांदळामध्ये लांब, वेलची, धणे पुदीना आणि लिंबाचा रस घालून मंद आचेवर शिजवून घ्यावे.
- तांदूळ (भात) चांगल्या प्रकारे शिजून घेतल्यानंतर त्यातील शिल्लक पाणी काढून टाकावे.
- नंतर एका भांड्यामध्ये मिश्रीत केलेले चिकन मंद आचेवर शिजवण्यासाठी ठेवा.
- चिकन शिजल्यानंतर त्यात तांदूळ (भात) घाला. त्यावर तेलात परतून कांदा, धणे पुदिना पाने घालुन चांगले मिसळून घ्या. (आवश्यक असल्यास त्यात दूध आणि खाद्य रंग घाला.)
- सर्व मिश्रण चांगले मिसळून घेतल्यानंतर आता या भांड्याला झाकणाने झाकून ठेवा जेणेकरून वाफ बाहेर जाणार नाही.
- शेवटी गॅस मंद आचेवर ठेवून 15-20 शिजवून घ्या.
- अश्या प्रकारे तुम्ही बनवलेली चिकन बिर्याणी तयार आहे. आता सर्व्ह करून गरमागरम चिकन बिर्याणीचा मनसोक्त आस्वाद घ्या.
अजून वाचा : सॅलड (Salad) Top 12 Benefits for Health’s in Marathi | सलाड खाण्याचे फायदे
चिकन लॉलीपॉप रेसिपी (Chicken Lolipop Recipe) :
साहित्य :
- 10-12 चिकन लेग पिस
- 4 चमचे कांदा पेस्ट
- एक चमचा लसूण पेस्ट
- एक चमचा आल्याची पेस्ट
- एक चमचा मिरची पावडर
- अर्धा चमचा चिकन मसाला
- चवीनुसार मीठ
मिश्रणासाठीचे साहित्य :
- 3 चमचा कॉर्नफ्लेअर
- 2 मोठे चमचे मैदा
- एक चिमूटभर बेकिंग सोडा
- एक चिमूटभर मीठ
- तेल
चिकन लॉलीपॉप बनवण्याची कृती :
- सर्व प्रथम, चिकनच्या लेगच्या पिसवर मीठ आणि मिरची लावुन घ्या.
- एका भांड्यात कांदा, आले, लसूण पेस्ट घालून मिक्स करा.
- आता चवीनुसार मीठ, चिकन मसाला आणि मिरची पूड घालुन मिक्स करावे.
- हे मिश्रण चिकन लेग पिसवर लावून 10-15 मिनिटे ठेवावे.
- दुसर्या भांड्यात कॉर्नफ्लोर, मैदा, बेकिंग सोडा, मीठ आणि पाणी घालून कॉर्न पेस्ट तयार करून घ्या.
- आता चिकन चांगले मॅरीनेट होण्यासाठी 5-10 मिनिटे ठेवावे.
- गॅसवर एका कढईत तेल गरम करा, नंतर त्यात चिकन लेग पिस चांगले गोल्डन ब्राऊन होई पर्यंत तळून घ्या.
- चिकन लेग पिस चांगल्या प्रकारे गोल्डन ब्राऊन रंगाचे झाल्यानंतर तेव्हा चिकन लेग पिस काढून टिश्यू पेपर प्लेटवर लावून थोड्या वेळासाठी ठेवून द्या अशा प्रकारे टिश्यू पेपरने सर्व तेल शोषून घेतल्यावर चिकन लॉलीपॉप खाण्यासाठी तयार आहेत.
तसेच चिकन लॉलीपॉप तुम्ही कांदा आणि हिरवी चटणी अथवा शेजवान सॉस बरोबर देखील सर्व्ह करू शकता.
अजून वाचा : आहारात सोडियमचे (मिठाचे) प्रमाण कमी केल्याचे 20 फायदे
चिकन टिक्का मसाला रेसिपी (Chicken Tikka Masala Recipe) :
साहित्य :
- 500 ग्रॅम चिकन
- 4 बारीक चिरलेले कांदे
- 4 बारीक चिरलेले टोमॅटो
- 2 चमचे आले-लसूण पेस्ट
- 1 चमचा लाल तिखट
- 1 चमचा हळद
- 5 काळी मिरी पावडर
- 4 वेलची
- 1 तुकडा दालचिनी
- 1 चमचा जिरे
- चवीनुसार मीठ
- 3 चमचे मोहरीचे तेल
- 1 कप पाणी
गरम मसाल्यासाठीचे साहित्य :
- 2 चमचे धणे
- 2 चमचे जिरे
- दालचिनीचा 1 तुकडा
- 1 चतुर्थांश चमचा हिंग
- 2 चमचे संपूर्ण काळी मिरी
- 2 तमालपत्र
चिकन टिक्का मसाला बनवण्याची कृती :
- सर्व प्रथम, ग्राइंडरमध्ये संपूर्ण मसाले टाकून बारीक करुन घ्यावे.
- नंतर चिकन पिस चांगले धुवून पुसून स्वच्छ करून घ्यावा.
- आता कढईत तेल घाला आणि गरम करण्यासाठी मध्यम आचेवर ठेवा. त्यानंतर तेल गरम झाल्यावर त्यात जिरे, दालचिनी आणि वेलची घालुन 10-15 सेकंद परतून घ्या.
- तसेच कांदा सोनेरी ब्राऊन होईपर्यंत परतून घ्या.
- नंतर आले-लसूण पेस्ट घालुन ब्राऊन सोनेरी झाल्यावर टोमॅटो, लाल तिखट, हळद, काळी मिरी घालून 5 मिनिटे परतवून घ्या.
- आता त्यात चिकन पिस घाला, नंतर मीठ आणि गरम मसाला घालुन 5-10 मिनिटे शिजवा.
- यानंतर, एक वाटी पाणी घाला आणि पॅनचे झाकण बंद करून चिकन मंद आचेवर 15-20 मिनिटे शिजू द्या.
- अश्या प्रकारे तुम्ही बनवलेले चिकन मसाला डिश तयार आहे. आता कोथिंबीरसह सर्व्ह करून आस्वाद घेवु शकता.
चिली चिकन रेसिपी (Chilli Chicken Recipe) :
साहित्य :
- 400-500 ग्रॅम बोनलेस चिकन
- 4 चमचा कॉर्न फ्लोर
- 1 टीस्पून काली मिर्च पाउडर
- 1 अंड
- 2 टेबल स्पून सोया सॉस
- 2 टेबल स्पून चिली सॉस
- 8-10 लसुनच्या पाकळ्या (बारीक चिरलेली)
- 8-10 हरवी मिर्ची (बारीक चिरलेली)
- 2 टेबलस्पून ग्रीन चिली सॉस
- 1 टेबलस्पून व्हिनेगर
- 2 कांदे
- 1 शिमला मिर्च
- तेल
- मीठ स्वादानुसार
चिली चिकन बनवण्याची कृती :
- सर्व प्रथम, चिकन स्वच्छ पाण्याने साफ करून घ्या.
- आता एका भांड्यात चिकन घालून मीठ, कॉर्न पीठ, मिरपूड, अंडी, सोया सॉस आणि लाल तिखट घालून चांगल्या प्रकारे ढवळून घ्या.
- चिकानला मॅरीनेट होण्यासाठी 20 मिनिटे तसेच ठेवून द्या.
- नंतर कढईत तेल घालून मध्यम आचेवर गॅसवर ठेवा.
- तेल गरम झाल्यावर चिकन पिस त्यात सोडा. चिकन पिस गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या.
- दुसर्या पॅनमध्ये थोडे तेल टाकून गॅसवर ठेवा.
- तेल गरम झाल्यावर लसूण आणि हिरव्या मिरच्या घालुन तळून घ्या.
- लसूणचा चांगल्या पद्धतीनं तेलात परतून झाल्यावर त्यात कांदा, शिमला मिरची घालून 15-20 सेकंद परतवून घ्या. नंतर त्यात चिकन पिस घाला.
- नंतर त्यात सोया सॉस, हिरवी मिरची सॉस, व्हिनेगर, मिरपूड आणि मीठ घाला.
- आता हे सर्व चांगले मिसळून 3-5 मिनिटे मंद आचेवर शिजवून घ्यावे.
- अश्या रीतीने चिली चिकन तयार आहे.
आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram