दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी | Latest Diwali Wishes in Marathi | शुभ दीपावली मराठी

दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी (Happy Diwali Wishes in Marathi) :

दिवाळी हा भारतीयांचा एक प्रमुख उत्सव आहे. या दिवशी श्री रामाने रावणाचा वध केला आणि माता सीता आणि भाऊ लक्ष्मण यांच्या समवेत लंकेतून अयोध्येत परत आले.

श्रीराम, लक्ष्मणजी आणि माता सीता अयोध्येत परतल्याच्या आनंदात दिवाळीचा हा सण साजरा केला जातो. दिवाळी हा एक असा सण आहे. जो भारत मध्येच नाही तर, इतर देशांमध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केली जाते. दरवर्षी दिवाळी उत्साह मध्ये साजरी केली जाते.

दिवाळीत ह्या सणाला दिव्यांचा सण म्हणून देखील ओळखले जाते. फटाके, खरेदी, मिठाई तसेच आपल्या रूढी आणि परंपरा लक्षात ठेवून घराची सजावट करणे आणि देवी लक्ष्मीची प्रार्थना करणे या सगळ्या गोष्टी आहेत.

दरवर्षी लोक त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांना कार्ड आणि मेसेज पाठवून दिवाळीच्या शुभेच्छा देतात. ह्यातून काही सुंदर ‘दिवाळी संदेश’ तुम्ही आपल्या प्रिय जनांना Diwali Quotes in Marathi, Diwali wishes in Marathi, Diwali Message in Marathi, Diwali Marathi WhatsApp, Diwali Marathi SMS, Marathi Diwali wishes, तुळशी विवाहाच्या शुभेच्छा, दिवाळी शुभेच्छा मराठी 2021, Diwali greetings Marathi, Diwali Shubhechha Marathi SMS करू शकता.

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा | Diwali Quotes in Marathi | Diwali Messages in Marathi | Diwali Shubhechha Marathi SMS |

 

दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी | Happy Diwali Wishes in Marathi | शुभ दीपावली :

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत,
आई जगदंब देवीच्या क्रुपेने,
तुम्हाला व तुमच्या सहपरिवाराला
दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा !


गणेशपूजा, लक्ष्मीपूजा, दीपपूजा दिवाळीला,
उधाण येवो आनंदाला, उत्साहाला, हर्षालहासाला,
वंदन करूया मनोभावे आज त्या मांगल्याला.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा


लक्ष लक्ष दिव्यांनी उजळू दे आकाश,
होऊ दे दुष्ट शक्तींचा विनाश,
मिळो सर्वांना प्रगतीच्या पाऊलवाटेचा प्रकाश,
असा साजरा होवो आपला सर्वांचा दिवाळी सण खास !!!
दिवाळीच्या तुम्हाला व तुमच्या
कुटूंबियांना हार्दिक शुभेच्छा


आज लक्ष्मीपुजन
तुम्हाला व तुमच्या परिवारास सुख,
शांती, आरोग्य, ऐश्वर्य, स्थेर्य मिळून,
भरभराट होवो..
आई महालक्ष्मीची तुमच्यावर
सदैव कृपा राहो..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !


जीवनाचे रूप आपल्या
तेजस्वी प्रकाशाने उजळवणारी दिवाळी,
खरोखरच अलौकिक असुन,
ही दिवाळी तुमच्यासाठी सुख, समाधान,
आणि वैभवाच्या दीपमाळांनी,
जीवन लखलखीत करणारी असावी.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !


आली दिवाळी उजळला देव्हारा,
अंधारात या पणत्यांचा पहारा,
प्रेमाचा संदेश मनात रुजावा,
आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !


दिवाळीची आली पहाट,
रांगोळ्यांचा केला थाट,
अभ्यंगाला मांडले पाट,
उटणी, अत्तराचा घमघमाट,
लाडू, चकल्या करंज्यांनी सजले ताट,
पणत्या दारात एकशेआठ,
आकाश दिव्यांची झगमगाट.
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !


अंगणात तुळस आणि शिखरावर कळस,
हीच आहे महाराष्ट्राची ओळख..
कपाळी कुंकु आणि डोक्यावर पदर,
हीच आहे सौभाग्याची ओळख.
माणसात जपतो माणुसकी आणि नात्यात जपतो नाती
हीच आमची ओळख.
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा !


उत्कर्षाची वाट उमटली
विरला गर्द कालचा काळोख
क्षितिजावर पहाट उगवली,
घेऊनिया नवा उत्साह सोबत.
Happy Diwali


कधी नकोय काही तुझ्याकडून,
फक्त तुझी साथ हवीय.
तुझी साथ ही दिवाळीच्या
मिठाई पेक्षा गोड आहे.
दिवाळीच्या प्रेमळ शुभेच्छा !


सगळा आनंद, सगळे सौख्य,
सगळ्या स्वप्नांची पूर्णता,
यशाची सगळी शिखरे, सगळे ऐश्वर्य,
हे आपल्याला मिळू दे,
हि दीपावली आपल्या आयुष्याला,
एक नवा उजाळा देऊ दे.
दीपावलीच्या तेजोमय शुभेच्छा !


लक्ष दिव्यांनी उजळली निशा घेवूनी नवी उमेद,
नवी आशा होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा,
दिवाळीच्या तुम्हाला खुप खुप शुभेच्छा


दिपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्नं साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी,
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं.
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !


रांगोळीच्या रंगांची,
उटण्याच्या सुगंधाची,
आकाश कंदिलाच्या रोषणाईची,
फराळाच्या चटकदार चवीची,
हि दीपावली आनंदाची, हर्षाची,
सौख्याची, समाधानाची !
आपण सर्वाना हि दीपावली आणि नूतन वर्ष
सुख समृद्धीचे, संकल्प-पूर्तीचे आणि
आरोग्य संपन्नतेचे जावो.
! शुभ दीपावली !


सोनेरी प्रकाशात पहाट सारी न्हाऊन गेली,
आनंदाची उधळण करीत आली दिवाळी आली,
नवे लेणे भरजारी दारी रांगोळी न्यारी,
गंध प्रेमाचा उधळीत,
आली आली दिवाळी आली.


दारी दिव्यांची आरास,
अंगणी फुललेला सडा रांगोळीचा खास,
आनंद बहरलेला सर्वत्र आणि हर्षलेले मन,
आला आला दिवाळी सण,
करा प्रेमाची उधळण.


रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे.
!! शुभ दिपावली !!


धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी,
धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी,
विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत,
हि दिवाळी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुखाची,
सम्रुद्धीची व भरभराटिची जावो.
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!


दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
आमच्याकडुन दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !


दिवाळी अशी खास,
तिच्यात लक्ष्मीचा निवास,
फराळाचा सुगंधी वास,
दिव्यांची आरास,
मनाचा वाढवी उल्हास,
अशा दिवाळीच्या शुभेच्छा.
तुमच्यासाठी खास !!
हि दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो.


उटण्याचा मंद सुगंध घेऊन,
आली आज नरक चतुर्दशीची पहाट,
पणतीतल्या दिव्याच्या तेजाने,
उजळेल आयुष्याची वहिवाट
तुम्हांला आणि तुमच्या परिवाराला
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !


समृध्दीच्या कणाकणात सजावी, नटावी दीपावली,
हासत, नाचत, गात यावी दीपावली,
उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे,
सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे.
श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे,
शुभेच्छांच्या समृद्धीने अवघे अंगण तुमचे भरावे.
!! शुभ दीपावली !!


स्नेहाचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सण आला.
विनंती आमची परमेश्वराला,
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला.
! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !


Read More :

+101 Best Marathi Suvichar | मराठी सुविचार | Marathi Quotes | Marathi Status


आनंदाचे गाणे गात दिवाळी येते अंगणात,
सुखाची मग होते बरसात तेजाची मिळते साथ.
हि दिवाळी आनंदाची, सुखसमृध्दीची जावो.


पुन्हा एक नवे वर्ष,
पुन्हा एक नवी आशा,
तुमच्या कर्तुत्वाला पुन्हा एक नवी दिशा
नवे स्वप्न, नवे क्षितीज,
सोबत माझ्या दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !


ही दिवाळी आपल्या आयुष्यात सुख-समृध्दी घेऊन येवो!
दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी,
इडा – पिडा जाऊ दे, बळीचं राज येऊ दे!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !


फटाके, कंदील अन् पणत्यांची रोषणाई,
चिवडा-चकली, लाडू-करंजीची ही लज्जतच न्यारी,
नव्यानवलाईची दिवाळी येता, आनंदली दुनिया सारी!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !


तेजोमय झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख,
लुकलुकणार्‍या चांदण्याला किरणांचा सोनेरी अभिषेक,
सारे रोजचे तरीही भासे नवा सहवास,
सोन्यासारख्या लोकांसाठी खास,
!! दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!


नवी स्वप्ने नवी क्षितिजे, घेउन येवो ही दिवाळी,
ध्येयार्पण प्रयत्नांना, दिव्ययशाची मिळो झळाळी,
आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो, ही दिवाळी.


फुलांचा सुगंध कोणी चोरू शकत नाही,
सूर्याची किरणे कोणी लपवू शकत नाही,
तुम्ही आमच्यापासून कितीही दूर असलात तरी,
दिपावली सारख्या मंगल प्रसंगी
तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही.
!! शुभ दिपावली !!


धनाची पूजा, यशाचा प्रकाश कीर्तीचे अभ्यंगस्नान,
मनाचे लाक्ष्मीपूजन संबंधाचा फराळ,
समृद्धीचा पाडवा प्रेमाची भाऊबीज
अशा या दीपावलीच्या आपल्या सहकुटुंब सह परिवारास सोनेरी शुभेच्छा !!!


दिवाळीची आली पहाट,
रांगोळ्यांचा केला थाट अभ्यंगाला मांडले पाट, उटणी,
अत्तरे घमघमाट लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट पणत्या दारांत एकशेसाठ,
आकाश दिव्यांची झगमगाट !
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा !


चिमूटभर माती म्हणे, मी होईन पणती,
टीचभर कापूस म्हणे, मी होईन वाती,
थेंबभर तेल म्हणे, मी होईन साथी ठिणगी,
पेटताच फुलतील नव्या ज्योती
अशीच यासारखी फुलत जावी आपली नाती.
!! दिपावलीच्या हार्दिक शुभेछा !!


फटाक्यांची माळ, विजेची रोषणाई पणत्यांची आरास,
उटण्याची आंघोळ रांगोळीची रंगत,
फराळाची संगत लक्ष्मीची आराधना,
भाऊबीजेची ओढ दिपावलीचा सण आहे खूपच गोड.
दिवाळीच्या मंगलमयी शुभेच्छा !


रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दीप उजाडू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृद्धी ने भरू दे.


दिपावळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेछा
हि दिपावळी सगळ्यांना खूप आनंदमयी, आरोग्यदायी, सुखमय, वैभवशाली, जावो..


आनंद घेऊन येतेच ती
नेहमीसारखी आताही आली
तिच्या येण्याने मने
आनंदाने आनंदमय झाली
सर्व मित्र-मैत्रीणीना मनापासून
आनंदाची शुभ दिपावली.


नक्षत्रांची करीत उधळण, दीपावली ही आली
नवस्वप्नांची करीत पखरण, दीपावली ही आली
सदिच्छांचे पुष्पे घेउनी, दीपावली ही आली
शुभेच्छांचे गुच्छ घेउनी, दीपावली ही आली.
!! दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छ !!


आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

You cannot copy content of this page
Copy link
Powered by Social Snap