गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा | Ganesh Chaturthi Wishes in Marathi :
गणेश चतुर्थी हा एक सण आहे, जो जगाच्या कानाकोपऱ्यात अतिशय धार्मिक पद्धतीने साजरा केला जातो. विशेषतः महाराष्ट्रामध्ये ह्या सणाचं खूप आकर्षण असते. वर्षभर सर्व गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची वाट बघत असतात. लहान पासून मोठ्या पर्यंत हा सण जलौषात आणि उत्साहात साजरे करतात. कारण ह्या दिवसाचे हिंदू धर्मात महत्व खूप मोठे आहे. हा सण दरवर्षी हिंदू महिन्यातील भद्राच्या शुक्ल चतुर्थीला साजरा केला जातो.
म्हणून ह्या खास दिनानिमित्त आम्ही तुमच्यासाठी निवडक गणपती बाप्पा स्टेटस मराठी (Ganpati Bappa Status in Marathi), श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा मराठी (Ganesh Chaturthi Wishes in Marathi) घेऊन आलो आहोत.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा | Ganesh Chaturthi Wishes in Marathi :
वंदन करतो गणरायाला,
हात जोडतो वरद विनायकाला,
प्रार्थना करतो गजाननाला,
सुखी ठेव नेहमी
साखरेपेक्षा गोड अश्या माझ्या मित्र मैत्रिणींना
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया
स्वर्गात पण जे सुख मिळणार नाही
ते तुझ्या चरणाशी आहे.
कितीही मोठी समस्या असुदे बाप्पा
तुझ्या नावातच समाधान आहे.
!! गणपती बाप्पा मोरया !!
माझं आणि बाप्पाचं खूप छान नातं आहे
जिथे मी जास्त मागत नाही
आणि बाप्पा मला कधी कमी पडू देत नाही.
!! गणपती बाप्पा मोरया !!
कोणतीही येऊ दे समस्या
तो नाही सोडणार आमची साथ,
अशा आमच्या गणरायाला नमन
करितो जोडुनी दोन्ही हाथ.
देव येतोय माझा,
आस लागली तुझ्या दर्शनाची
तुला डोळे भरून पाहण्याची
कधी उजाडेल ती सोनेरी पहाट
गणराया तुझ्या आगमनाची
जो पर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुज नाव ओठावर असेल
आणि ज्या दिवशी तुज नाव माझ्या ओठावर नसेल
त्या दिवशी बाप्पा मी तुझ्या जवळ असेल.
फुलांची सुरुवात कळीपासून होते
जीवनाची सुरुवात प्रेमा पासून होते
प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते
आणि आपली कामाची सुरुवात
श्री गणेशा पासून होते.
खूप अडचणी आहेत जीवनात
पण त्यांना सामोरे जायची ताकत
बप्पा फक्त तुझ्यामुळे येते.
बाप्पाचा आशिर्वाद तुमच्यावर
नेहमी असावा,
तुमचा चेहरा नेहमी
हसरा दिसावा,
आम्हालाही तुमचा हेवा वाटावा
असा तुमच्या जीवनाचा प्रवास असावा.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे
देव सर्व कार्येशु सर्वदा गणपति तुमच्या सगळचा मनोकामना पूर्ण करोत.
तुम्हाला सुख समृद्धि भरभराटी आणि उत्तम आरोग्य लाभो.
बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले
दुःख आणि संकट दूर पळाले
तुझ्या भेटीची आस लागते
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते.
अजून वाचा : गुढीपाडवा शुभेच्छा संदेश | Gudipadwa Wishes in Marathi
नूर गणेशाच्या प्रकाशाला भेटला
प्रत्येकाच्या मनाला धडकी भरते,
गणेशाच्या दारावर जे काही जात
त्यांना नक्कीच काहीतरी मिळेल.
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया
सजली अवघी धरती पाहण्यास तुमची कीर्ती
तुम्ही येणार म्हटल्यावर नसानसात भरली स्फुर्ती
आतुरता फक्त आगमनाची
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची
गणपती बाप्पा मोरया
बंद होऊ दे ही कोरोनाची वार्ता
नाद घुमू दे एक पुन्हा
तूच सुखकर्ता, तूच दुःखहर्ता
गणेश चतुर्थी निमित्त सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा.
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृध्दी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो,
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना.
गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया
!!! सर्वाना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा !!!
पाहून ते गोजिरवाणं रम्य रुप
मोह होई मनास खूप.
ठेविण्या तुज हाती मोदक प्रसाद
होते सदैव दर्शनाची आस.
नाव घेउनीया मोरयाचे मुखी
मन वाट पाहते फक्त तुझ्या आगमाची.
बाप्पाच्या आगमनाने आपल्या जीवनात
भरभरून सुख समृध्दी ऐश्वर्या येवो..
हीच गणरायाकडे प्रार्थना !!
गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया
तुमच्या आयुष्यातला आनंद,
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो,
अडचणी उंदरा इतक्या लहान असो,
आयुष्य सोंडे इतके लांब असो,
क्षण मोदका इतके असो.
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
आजपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाच्या तुम्हाला,
व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा.
बुद्धीची देवता असलेला गणपतीराया,
आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी,
आशीर्वाद देवो, अशी त्याच्या चरणी प्रार्थना.
!! गणपती बाप्पा मोरया !!
डोळ्यात आले अश्रू,
बाप्पा आम्हाला नका विसरू.
आनंदमय करून चालले तुम्ही,
पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही.
गणपती बाप्पा मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या
बाप्पा चालले आपल्या गावाला,
चैन पडेना आमच्या मनाला,
ढोलच्या तालात गुलाल रंगात न्हेऊया बाप्पाला,
वाजत गाजत नाचत याहो पुढल्या वर्षाला
गणपती बाप्पा मोरया
निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी,
चुकले आमुचे काही त्याची क्षमा असावी,
आभाळ भरले होते तू येताना,
आता डोळे भरून आलेत तुला पाहून जाताना.
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या
आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram