होळी हा हिंदु संस्कृती मधील सर्वात महत्त्वाचा सण मानला जातो. फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला येणारा हा सण दरवर्षी संपुर्ण भारत देशामध्ये मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरी केली जाते.
होळी चा सण मुख्यत: दोन दिवसांचा असतो. परंतु गावगावा नुसार ही प्रथा बदली जाते. पहिल्या दिवशीच्या रात्री होळी जाळली जाते तर दुसरा दिवस हा धुलीवंदन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी रंगपंचमी खेळून एक दुसऱ्याला रंग लावले जातात. या दिवशी सर्व लोक आपले राग, रोष आणि दुःख विसरून एकमेकांसोबत आनंदाने साजरी करतात. म्हणूनच होळीला अधिक महत्व आहे.
म्हणून, मित्रांनो आज आम्हीं तुमच्यासाठी होळीच्या हार्दिक शुभेच्छा संदेश आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश संग्रह घेऊन आलो आहोत.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Holi Wishes in Marathi :
रंग हर्षाचा, रंग सुखाचा, रंग आनंदाचा, रंग आपुलकीचा, रंग बंधांचा, रंग उल्हासाचा,
रंगात रंगला रंग असा, रंग तुमच्या आमच्या प्रेमाचा
होळी व रंगपंचमीच्या सगळ्यात आधी माझ्याकडून
तुम्हाला आणि तुमच्या गोड परिवारास हार्दिक शुभेच्छा.
Happy Holi !
होळी दर वर्षी येते आणि सर्वाना रंगवून जाते,
ते रंग निघून जातात पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो.
होळी व धुलीवंदनच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा !
लाल रंग तुमच्या गालांसाठी,
काळा रंग तुमच्या केसांसाठी,
निळा रंग तुमच्या डोळ्यांसाठी,
पिवळा रंग तुमच्या हातांसाठी,
गुलाबी रंग तुमच्या होठांसाठी,
सफेद रंग तुमच्या मनासाठी,
हिरवा रंग तुमच्या आरोग्यासाठी,
होळीच्या या सात रंगांसोबत,
तुमचे जीवन रंगून जावो.
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
होळीच्या पवित्र अग्नीत तुमची सर्व दुःख चिंता जळून जावो,
गोड गोड पुरणपोळीचा गोडवा तुमच्या आयुष्यात येवो
आणि, रंगपंचमीच्या विविध रंगां प्रमाणे तुमचा जीवन
अनेक रंगानी आणि आनंद सुख, शांतीने उजळून निघो हीच सदिच्छा
होळी पौर्णिमेच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !
तुमच्या चेहर्याला रंग लावण्यास
मी आज तुमच्यापर्यंत पोहचु शकत नाही.
पण मी ईश्वराकडे प्रार्थना करतो की,
तुमचे आयुष्य सुखाच्या वेगवेगळ्या रंगानी भरून जाऊ दे.
धुलीवंदनाच्या खूप खुप शुभेच्छा
वसंताच्या आगमनासाठी
वृक्ष नटले आहेत.
जुनी पानॆ गळून
नवी पालवी मिरवीत आहॆत,
रंग-बेरंगी रंगाची
उधळण करीत आहॆत,
जुनॆ नकॊ तॆ हॊळीत टाकून तुम्ही ही,
रंगा-रंगार-रंगुन जा.
होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
वसंत ऋतू फुलाला आज साजणीच्या मनी रंगांची उधळण तिच्यावर सजणाच्या अंगणी प्रीतीची वेल फुलली गातो आम्ही गाणी चिंब भिजू दे आज रंगपंचमीची राणी होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा.
रंगून जाऊ रंगात आता, अखंड उठु दे मनी तरंग,
तोडून सारे बंध सारे, असे उधळुया आज हे रंग,
ही होळी तुम्हा सर्वांना सुख समृद्धीची आणि भरभराटीची जावो.
सर्वांना होळीच्या आणि धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा.