Kotak 811 Account काय आहे | Kotak 811 Savings Account in Marathi

Kotak 811 Account काय आहे (Kotak 811 Savings Account in Marathi) :

सरकारची डिजिटलायझेशन प्रक्रिया लक्षात घेऊन जवळपास सर्व बँक हे डिजिटल बचत खात्याकडे वाटचाल करत आहे. त्यात कोटक महिंद्रा बँकही या यादीत समाविष्ट झाले आहे. ह्याच डिजिटल बचत खात्या अंतर्गत Kotak Saving Account Type पैकीच हे Kotak 811 Saving Account म्हणजेच बचत खाते सुरू करण्यात आले आहे.

Kotak Mahindra Bank ही एक खाजगी बँक आहे आणि Kotak 811 हे Digital Zero Balance Saving Account आहे, जे कोटक महिंद्रा बँक बचत खात्याचे एक रूप आहे. जी लोकांना Kotak 811 Zero Balance Account असलेले खाते उघडण्याची सुविधा पुरवते. याचा अर्थ असा की तुमच्या खात्यामध्ये किमान Balance Maintain राखण्यासाठी तुम्हाला बँकेला कोणत्याही प्रकारचा दंड भरावा लागणार नाही आणि तुम्ही तुमच्या खात्यामध्ये Zero Balance देखील ठेवू शकता. परंतु आपण रक्कम शिल्लक राखल्यास, आपण आपल्या बचती वरील सरासरी व्याजापेक्षा अधिक व्याजदर मिळवू शकता.

कोटक महिंद्रा बँक ही स्वतःहून घरबसल्या आपल्या मोबाईल वर काही मिनिटांत ऑनलाईन ओपन खाते उघडण्याची सुविधा देखील पुरवते. ही सुविधा आल्यापासून ग्राहकाला यापुढे बँकेत रांगेत उभे राहण्याची गरज भासणार नाही. ही भारतातील पहिली बँक आहे जी ग्राहकांना इतक्या सुविधा पुरवते.

 

कोटक 811 पात्रता निष्कर्ष (Eligibility to Open Kotak 811 in Marathi) :

  • पॅनकार्ड
  • आधारकार्ड
  • ईमेल आयडी
  • आधारकार्ड नोंदणीकृत मोबाईल नंबर
  • 18 वर्ष पूर्ण झालेले असावे.
  • कोटक महिंद्रा बँकेत यापूर्वी कोणतेही Account नसावे.

 

कोटक 811 बचत खाते कसे उघडावे (How to open Kotak 811 Savings Account in Marathi) :

  • Kotak 811 Savings Account उघडण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये जाऊन कोटक महिंद्रा बँकेचे मोबाइल बँकिंग ॲप डाउनलोड करावे लागेल.

Kotak 811 Account काय आहे | Kotak 811 Savings Account in Marathi

  • एकदा ॲप इंस्टॉल झाल्यावर, लिंकवर क्लिक करून खाते उघडण्याची प्रक्रिया सुरू करा.
  • तुमचे पुर्ण नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी हा तपशील भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. ह्या पुढच्या प्रक्रियामध्ये PAN CARD आणि AADHAR CARD नंबर देणे बंधनकारक आहे.
  • त्यानंतर आधारकार्ड नोंदणीकृत मोबाईल नंबरवर ओटीपी (OTP) प्राप्त होईल. ह्या साहाय्याने एक फॉर्म ओपन होईल त्या मध्ये तुमचा पुर्ण तपशील व Nominee Name द्यावा लागेल.
  • यानंतर त्वरित बँकिंग सेवा सुरू ठेवण्यासाठी आपल्याला Mobile Banking Personal Identification Number (MPIN) 6 Digit पिन सेट करणे आवश्यक आहे.
  • यानंतर खाते उघडण्याची प्रक्रिया जवळजवळ पूर्ण होईल आणि तुमचे खाते तपशील जसे खाते क्रमांक (Account Number) आणि सीआरएन (CRN) तपशील तयार होतील.
  • Note : लॉगिन करते वेळी सीआरएन (CRN) आणि 6 Digit MPIN पिन नंबर असणे आवश्यक आहे.

 

Kotak 811 Account चे मुख्यत प्रकार (Types of Kotak 811 Account) :

Kotak 811 Account मुख्यतः 3 प्रकारचे असते.

  • Kotak 811 Lite
  • Kotak 811 Limited KYC
  • Kotak 811 Full KYC Account

Kotak 811 Lite खात्यात तुम्ही वार्षिक 1 लाख रुपयांपर्यंत पैसे ठेवू शकता. तर Kotak 811 Limited KYC खात्यात तुम्ही वार्षिक 2 लाख रुपयांपर्यंत क्रेडिट करू शकता. एकदा तुमचे खाते Kotak 811 Full KYC Account मध्ये रूपांतरित केल्यावर ठेवीची मर्यादा असणार नाही. ही वैधता अट फक्त Kotak 811 Limited KYC आणि Kotak 811 Lite खात्यांना लागू आहे. तुम्ही 12 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण केवायसी (Full KYC) प्रक्रिया पूर्ण न केल्यास 12 महिन्यानंतर खात्यात पुढील ठेवींना परवानगी दिली जाणार नाही.

 

Kotak 811 खाते पूर्ण केवायसी (Full KYC Account) खात्यात रूपांतरित कसे करावे ?

आपले खाते पूर्ण केवायसी खात्यात रूपांतरित करण्यासाठी आपल्या मोबाइल बँकिंग ॲपमध्ये लॉग इन करून बँक प्रतिनिधी सोबत अपॉइंटमेंट बुक करा किंवा जवळच्या कोटक महिंद्रा बँकेच्या शाखेला भेट द्या. कारण या प्रक्रियेत वैयक्तिक पडताळणी समाविष्ट आहे. अश्याप्रकारे बायोमेट्रिक यंत्राद्वारे तुमच्या आधार तपशीलांची पडताळणी केल्यानंतर तुमचे खाते Kotak 811 Full KYC Account मध्ये रूपांतरीत होईल.

 

Kotak 811 Account काय आहे | Kotak 811 Savings Account in Marathi

 

कोटक 811 Account ची खास वैशिष्ट्ये (Kotak 811 Savings Account Features in Marathi) :

  • Savings Account उघडल्यावर प्रत्येक वर्षी 4% त्याहून अधिक व्याजदर मिळतो.
  • Account मध्ये कोणत्याही प्रकारचा Minimum Balance Maintain करण्याची गरज भासत नाही, तुम्ही तुमच्या खात्यात Zero Balance देखील ठेवू शकता.
  • तुम्हाला एक व्हिसा व्हर्च्युअल डेबिट कार्ड (Visa Virtual Debit Card) बिलकुल फ्री दिले जाते, त्या साहाय्याने तुम्ही इंटरनॅशनल व नॅशनल अश्या दोन्ही ठिकाणाहून शॉपिंग किंवा पैसे ट्रान्सफर केले जाऊ शकतात.
  • NEFT, IMPS आणि RTGS के द्वारे आपण मोफत निधी हस्तांतरण करू शकता.
  • नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग ॲप बरोबरच तुम्ही एक फिजिकल डेबिट (Physical Debit Card) कार्ड देखील Rs.199+ प्रति वर्ष या दारात ऑनलाईन Apply करू शकता.
  • Kotak 811 Full KYC खात्यामध्ये तुम्ही Cheques Book ची Request करू शकता.

आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

शेयर करा: