मराठी चारोळी संग्रह (Marathi Charoli Sangrah) :
चारोळी म्हणजे काय ? चार ओळीच्या कवितेला चारोळी म्हणजेच चारोळ्या म्हणतात. मोजक्याच शब्दात परंतु मनातील संवेदना ओळीमधुन जगापुढे माडण्याची एक भावनिक पद्धत. एकंदरीत चारोळी जरी काल्पनिक असल्या तरी त्यातील शब्दरुपी संवेदना आपल्या सर्वांनच्या मनात कायम घर करून जाते आणि आपल्या पुढील वाटचलीस प्रेरणादाई ठरते.
म्हणुन अश्या काही खास मराठी चारोळी संग्रह तुमच्यासाठी आणला आहे. निश्चित हा मराठी चारोळ्या संग्रह तुमच्या पसंतीस उतरेल. मराठी चारोळी संग्रह आवडल्यास आपल्या प्रियजनांना शेयर करायला विसरु नका.
आयुष्य मराठी चारोळी (Marathi Charoli On Life) :
जीवनात सगळंच मिळत नाही
म्हणून प्रयत्न सोडायचा नसतो
कुठल्यातरी वळणावर
आपला वाट पाहणाराही असतो.
सरता सरता आयुष्य माझं
मी कधी माझा झालोच नाही,
दु:ख सोसले अफाट मी, पण
सुखाचा साथी, कधी झालोच नाही.
जीवन कसे पक्ष्यांसारखे असावे,
कुठे ही उडावे आणि कसे ही जगावे
आणि मरताना देखील कधी कुणावर
आपले ओझे न देता जावे.
जीवनाच्या प्रवाहात अनेक माणसं भेटतात,
काही आपल्याला साथ देतात काही सोडून जातात.
जीवनात कोणीतरी
कुणाच खास असाव लागतं,
त्याला जीवनात
जीवापलीकडे जपावं लागतं.
होकारांला शब्दांना महत्व नसते
दाटल्या भावानांना काही बंध नसते,
डोळेच सांगून जातात हाल हृदयाचे,
प्रेमात शब्दांची गरज नसते.
जीवन काय असतं हे माहीत नाही ?
पण अशी नाती नकळतच मिळतात,
कधी सुखात तर कधी दु:खात ती
आपलीशी होऊन सहभागी होतात.
छोट्याशा या आयुष्यामध्ये
खूप काही हवं असत,
असंख्य चांदण्या भरून सुद्धा
आपलं आभाळ रिकाम असत.
जीवन एक रहस्य आहे
इथे सगळे लपवायचे असते,
मनात कितीही दुःख असले तरी
दुसऱ्या पुढे हसायचे असते.
जीवनाच्या मैफिलीत आज सारी गणिते उजवी ठरली
बेरीज आणि वजाबाकी आज श्वासांमध्ये अडकून पडली.
जीवनाचा प्रत्येक क्षण आपल्याला काही तरी देत असतो,
पण नकळतपणे आपल्या आयुष्याचा एक क्षण तो घेत असतो.
कोणाची तरी ओढ लागली की ओढाताण होते
वणवा लागतो मनाला नि आयुष्याचे कोरडे रान होते.
कळत नकळत आयुष्यात खुप काही घडून जाते
अलवावरचे पाणी देखील अलगद ओघळून जाते.
असे नाते बनवा की, त्याचा अंत केव्हाच नसावा,
प्रत्येक नात्यात मैत्रीचा अंश शेवटपर्यंत असावा.
जीवनात नाती तशी अनेकच असतात,
पण ती जपणारी लोक फार कमीच असतात.
हृदयात नेहमीच तुझ्यासाठी थोडी जागा जपून ठेवतो,
कधीतरी येशील म्हणून त्या जागेवर फुले पांघरूण ठेवतो.
आयुष्य कसं असत बाभळीच्या पालवी सारखं,
काट्यातच फुलणार अन काट्यातच विरणार.
कधी कधी अनोळखीच जास्त जवळचे वाटतात
थोड्यासाठी असतो एकत्र नंतर अनेक वाटा फुटतात.
मोत्यांना काय माहित,
शिंपल्यानी त्यांना किती जपलयं,
मोत्यांच्या केवळ नाजुकपणासाठी
त्यांनी आपलं आयुष्य वेचलयं.
पंख नाहीत मला पण
उडण्याची स्वप्नं मात्र जरूर बघतो,
कमी असलं आयुष्य तरी भरभरून जगतो.
भावना ओंजलित घेउन नको जगुस,
त्या व्यक्त करन्यात मजा आहे.
डोळ्यात अश्रु नेहमीच येतात,
ते पुसुन हसन्यात मजा आहे.
मनच मनाला मोकाट सोडतं,
आणि मनच मनाला आवरत राहतं,
विचारांच्या खाईत झोकून देतं,
आणि उगीचच स्वतःला सावरत राहतं.
बोलायचे बरेच काही
पण, कोणी ऐकायला तयार नाही.
आपले म्हणणारे तसे हजार,
तरी शब्दांचाही आधार नाही.
मराठी चारोळी प्रेम (Marathi Charoli On Love) :
मन होतं माझं कुठेतरी हरवलेलं,
पण तरी ते तुलाच शोधत होतं,
तुला खरच ओळखता नाही आलं,
ते फक्त तुझ्यासाठीच झुरत होतं.
प्रेमाच्या हाकेला साद मिळाली,
स्वप्नांना वास्तवाची आस मिळाली,
मन माझं खुदकन हसलं,
तुझ्या डोळ्यांत जेव्हा माझं प्रेम दिसलं.
हृदयाच्या प्रत्येक कप्प्यात तुझीच आठवण ताजी आहे.
शरीराने कितीही दूर गेलीस तरी मनाने अजूनही तू माझीच आहे.
मनाची तहान पाण्यानं भागत नाही
हे बरं आहे की सगळ्यानाच मनाची तहान लागत नाही.
आज डोळ्यांना रडावेसे वाटते,
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते.
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,
की आयुष्य भर तुलाच पाहावेसे वाटते.
अजून वाचा : +101 लव स्टेटस मराठी | Best Love Status in Marathi
माझ्या ओठावरचं हसु आहे साक्ष तु आठवल्याचं.
आठवणी तुझ्या आठवुन क्षणभर जगाला विसरल्याचं.
हे प्रेमाचं असचं असत.
थोडसं अवघड अन थोडं सोप असत.
पण एकदा जमायला लागलं की ते आपोआपच घडत असतं.
प्रेम माझं तुझ्यावरच
कोणत्याच शब्दात मावणार नाही..
तुला मिठीत घेताच कळतं
आता त्याचीही गरज भासणार नाही.
हे सांगू की ते सांगू करततेच तर सांगायाच राहीले
तिचे ते मुके शब्द मी माझ्या मुक्या डोळ्यांनीच पाहिले.
ह्रदय ही हल्ली, माझं तुझ्या शिवाय काहीच मागत नाही,
तू सोबत असताना माझे ह्रदय माझे राहत नाही.
प्रेमात असं थांबायच नसतं,
मागे न वळता पुढेच चालायच असतं.
एकमेकांची साथ घेऊन जग जिंकायचं असतं.
बोटांना माझ्या आता वेगळं राहायला आवडत नाही.
तुझ्या बोटात गुंतल्या शिवाय त्यांना ही करमत नाही.
माझं तुझ्याकडे एकटक पाहणं,
अन् तुझं ते गोड हसणं,
आपल्या दोघांनाही सुखावत होतं,
पण दृष्ट जगाला ते पाहावत नव्हतं.
तू भेटलीस त्या वाटेवर सगळीकडे प्रेमच होतं,
कुणास ठाऊक तुझं माझ्यावर कुठल्या जन्माचं ऋण होतं.
ती अशी आली जीवनात की डोळे माझे बोलके झाले
तिने हसून डोळे झाकले आणि आज त्या सूर्यालाही बुडवणे कठीण झाले.
हळूच चालत तुझ्या रूपाने नशीब येईल दारी
मला न कळता अशी अचानक घडेल किमया सारी.
तू मला खूप आवडतेस,
बोलण्याकरिता जीभ ही वळत नाही.
जेव्हा असतं बोलायचं,
तेव्हा ओठांना शब्दचं मिळत नाही.
प्रेम करायचं म्हटलं तर कुणाशीही जमत नाही,
मनासारख्या जोड़ी दाराशिवाय संसारात मन रमत नाही.
सावली नको शोधु ती आपल्या जवळच असते,
नजर फक्त मागे वळव डोळ्यांच्या कडेला ती हळुच दिसते.
अजूनही जातो त्याच बागेत रातराणी फ़ुलताना
पण मला फ़क्त दिसते सकाळी ती कोमेजताना.
तिचं ते खोटं बोलणं बोलताना दूसरी कडेच पाहणं
मध्येच खाली पाहून लाजणं लाजताना मग पुन्हा हसणं.
मऊपण काय असत,
हे तिच्या एका स्पर्शाने सांगितलं
त्या एका स्पर्शातच मी तीच प्रेम मागितलं.
तू मला हवी आहेस,
तू जशी आहेस तशीच,
जपेन तुला आयुष्यभर
राणी फक्त माझ्यासाठीच.
बुचकळ्यात पडलेलं ह्रदय माझं,
तुलाच शोधत असतं.
तुझ्या सोबत घालवलेल्या त्या गोड
क्षणांना आठवत राहतं.
प्रेम माझं असलं
तरी मी मात्र तुझाच आहे.
शब्द माझे असेल
तरी सामर्थ्य त्यात तुझंच आहे.
पुन्हा त्या वळणावर ,
तू पहिल्यासारखीच भेटावीस.
अर्धवट राहिलेल्या प्रेमाला ,
सुरुवात नव्याने करावीस.
प्राण माझा असला तरी, श्वास मात्र तुझाचं आहे.
प्रेम माझे असले तरी, सुगंध मात्र तुझाचं आहे.
बघतो दुरूनच तुला मी रात्र रात्र मज झोप नाही,
भोवती तुझ्या फिरताना छंद दुसरा उरलाच नाही.
पुन्हा त्या भावनांनी,
मनातून ओथंबून वाहावं.
वेड्या माझ्या प्रेमपावसात,
तू चिंब चिंब भिजत राहावं.
पाहता पाहता मन माझ तुझ्यात विसावून गेल,
तुझ्या रूपाला पाहूनं ते स्वप्नात हरवून गेल.
पाहून तुला तो चंद्रही फसेल,
चांदणी समजून पाहत तुलाच बसेल.
मराठी चारोळी आठवण (Marathi Charoli Aathvan) :
खरच तुझ्या आठवनिंना दुसरी कुठलीच तोड नाही,
तुझ्या आठवण झऱ्यां इतकी तर साखरही गोड नाही.
मला विसरण्याची तुझी सवय जुनी आहे
तुझ्या आठवणीत माझी रात्र सुनी आहे.
महिन्यातील प्रत्येक दिवसाला,
दिवसातील प्रत्येक तासाला,
तासाच्या प्रत्येक मिनिटाला,
आठवण येते तुझी क्षणाक्षणाला.
खुप काही सांगायचं होतं तुला पण
मनातलं मनातच राहून गेलं.
सुखाचं घरटं बांधण्या आधीच
पाखरु रानातलं उडून गेलं.
मला विसरण्याची तुझी सवय जुनी आहे,
तुझ्या आठवणीत माझी रात्र सुनी आहे.
मलमली तारुण्य माझे तू पहाटे पांघरावे,
मोकळ्या केसात माझ्या तू जीवाला गुंतवावे.
एकदा तरी आठवण माझी आठवड्यातुन तुला यावी
अशीच मैञी आपली नकळत चालावी.
मला तुझ्या ह्रदयात शोध मी तुला तिथेच भेटेन,
मी जगेण तरी कसा जर तुझ्या दुर असेन.
मला कळतय ग तुझं उदास आणि बैचेन मन,
मी पण तुझ्याच आठवणीत हरवुन जातो प्रत्येक क्षण.
मनाला बांध घातला होता हृदयातला पूर थोपवला होता.
पण डोळ्यांनी चुगली केली होती अन आसवांनी दगा दिला होता.
मनातील आठवणी लाटांसारख्या उसळतात
जशा काही नभातल्या विजाच जणू कोसळतात.
मनाचे भाव असतात साधे भोळे,
तुझी आठवण येताच भरतात डोळे.
मराठी चारोळी मैत्री (Marathi Charoli On Friendship) :
तुझ्या माझ्या मैत्रीत काय गुपित लपलय
तुझ्या माझ्या मैत्रीने फकत आपलेपण जपलंय
नात्यांचे स्नेह बांध कोण शोधत बसलय
जीवा पेक्षाही फुलासारखे मी मैत्रीला जपलय.
तुझी नि माझी मैत्री जगाहून न्यारी आहे.
सगळे समजतात प्रेम मला प्रेमाहून प्यारी आहे.
मैत्रीचे बंध कधीच नसतात तुटणारे
जुन्या आठवणींना उजाळा देऊन
गालातल्या गालात हसणारे.
मैत्रीचा मोती कुणाच्याही भाग्यात नसतो,
सागराच्या प्रत्येक शिंपल्यात मोती नसतो,
जो विश्वासाने मैत्री जपतो,
तोच खरा मैत्रीचा मोती असतो.
मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट,
ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट.
तुझी न माझी मैत्री दिवसेंदिवस फुलू दे,
एकमेकांच्या आठवणीमध्ये एक एक क्षण हा हरवू दे.
आमची मैत्री समजायला वेळ लागेल,
पण जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल.
जीवनात कोणी ना कोणी सोबतीला असावं,
या सोबतीच नावच ही मैत्री असावं.
सतत जीवनात तुझी आणि माझी
मैत्री अशीच सतत फुलू दे,
कधीकाळी काही दोष माझा तरी
त्यात तुझ्या मायेचा गोडवा राहू दे.
आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे,
पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे,
तुझ्यासाठी मित्र खूप असतील
पण माझ्यासाठी फक्त तू आहे.
निशब्द भावनेला स्पर्शाची साथ,
हळव्या मनाला आसवांची साथ,
उधाण आनंदाला हास्यांची साथ,
तशीच माझ्या जीवनाला तुझ्या मैत्रीची साथ.
मैत्री कधी संपत नसते,
आशेविना इच्छा पूरी होत नसते,
तुझ्या जीवनात मला ओझे नको समजुस,
कारण डोळ्यांना कधी पापण्यांचे ओझे नसते.
निर्सगाला रंग हवा असतो.
फुलांना गंध हवा असतो.
माणुस हा एकटा कसा राहणार,
कारण त्यालाही मैञीचा छंद हवा असतो.
पावसातुन जेवढा ओलावा मिळत नाही
तेवढा जिव्हाळा मैत्रीत मिळतो.
मैत्री मधल्या सावलीचा अर्थ
कधीतरी उन्हातुन गेल्यावर कळतो.
मैत्रीचे नाते नेहमी अखंड राहूदे ,
खऱ्या मैत्रीवर विश्वास राहूदे ,
असं नाही की मित्र जवळच असला पाहिजे,
जवळ असला तरी आठवणीत राहू दे.
मैत्री एक अलगद स्पर्श मनाचा,
मैत्री एक अनमोल भेट जीवनाची,
मैत्री एक अनोखा ठेवा आठवणींचा,
मैत्री एक अतूट सोबत आयुष्याची.
मैत्री हाच जिवनातील
आनंदाचा ठेवा असतो,
आयुष्याच्या दुःखावर मैत्रीच्या
अमृताचा एक थेंब ही पुरेसा असतो.
रक्ताची नाती जन्माने मिळतात.
मानलेली नाती मनाने जुळतात.
पण नाती नसताना ही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनाना मैत्री म्हणतात.
तुझी आणि माझी मैत्री अशी असावी,
काटा तुला लागला तर कळ मला यावी.
मैत्रीच्या या नात्या बद्दल लिहिण्यासारखे खूप आहे,
खरे नात्याला नसले तरी मैत्रिला एक रूप आहे.
मैत्रीची वाट जरा कठिण आहे पण तितकीच छान सुद्धा आहे,
कारण आयुष्याच्या घडीचा
एक मैत्रीच तर जीव की प्राण आहे.
मैत्रिला कधी गंध नसतो,
मैत्रीचा फक्त छंद असतो,
मैत्री सर्वांनी करावी त्यात खरा आनंद असतो.
आई वर चारोळी मराठी (Marathi Charoli On Mother) :
ह्रदयरुपी मंदिरात आई तुझीच आहे मूर्ती
त्यात तूच माझा देव आणि तुझीच गातो आरती.
पूर्वजन्माची पुण्याई असावी
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,
जग पाहिलं नव्हतं तरी
नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला.
आई, हजार जन्म घेतले तरी
एका जन्माचे ऋण फीटणार नाही
आई, लाख चुका होतील मज कडून
तुझं समजावनं मिटणार नाही.
असेन जर मजला,
मानव जन्म कधी
आई तुझ्याच पोटी,
पुन्हा जन्मावेसे वाटते.
अजून वाचा : आई वडील स्टेटस मराठी | Best Mom & Dad Status in Marathi
शोधून मिळत नाही पुण्य
सेवार्थाने व्हावे धन्य
कोण आहे तुजविण अन्य ?
‘आई’ तुजविण जग हे शून्य.
एकदा जरासं कुठे खरचटलो
आई, किती तू कळवळली होतीस
एक धपाटा घालून पाठीत
जख्मेवर फुंकर घातली होतीस.
आई, तुझ्या रागवण्यातही
अनूभवलाय वेगळाच गोडवा
तुझ्या मायेच्या नित्य नव्या सणात
फिका पडतो दसरा नि पाडवा.
आई जितकी प्रेमळ असते
आणि तितकीच कणखर दिसते
भर उन्हात ती आपल्याला
गारवा देणारी सावली असते.
खरं प्रेम कसं करावं
ते आईकडून शिकावं
मुलांना काहीच न मागतां
त्यांना फक्त देत राहावं.
कुणी उपवास धरला, कुणी रोजा ठेवला
ज्यांनी आईवडीलांना पूजलं
देव त्यांनाच पावला.
आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram