मराठी विनोद | Best Marathi Jokes | मराठी जोक्स

मराठी जोक्स (Marathi Jokes) :

आज आम्ही खास वाचक वर्गासाठी मजेदार मराठी जोक्स, मराठी विनोद (Marathi Jokes, Jokes in Marathi, Funny Jokes in Marathi, Marathi Comedy Sms) यांचा संपूर्ण संग्रह घेऊन आलो आहोत. आम्हांल आशा आहे की, तुम्हाला ते नक्की आवडतील.

.

मराठी विनोद | Marathi Jokes | मराठी जोक्स :
घरचे या भरवशावर की आम्ही कुठे एखादी पाहून ठेवली असेल,
आणि आम्ही या भरवशावर की घरच्यांनी कुठेतरी एखादी पाहून ठेवली असेल.
सगळीच बोंबा-बोंब
“खुलता कळी खुलेना आमचं कुठं जुळेना संघटना”
😂😂😂😂😂

दुकानदार : काय पाहिजे ?
गिऱ्हाईक : मला ताकद पाहिजे हिंमत पाहिजे,
अक्कल पण पाहिजे.
दुकानदार : साहेबांना एक दारूचा 🍾🥃 खंबा दे
आणि मुगदाळ दे पाच वाली.

जिने एखाद्याला चुना लावलाय,
तिने आम्हाला हळद लावु नये म्हणजे झालं.
🙄🙄🙄🙄🙄

मुलगा : चलते चलते यूंही रुक जाता हूं मैं
बैठे बैठे यूंही खो जाता हूं मैं
क्या यही प्यार है
..
मुलगी अरे वेड्या, अशक्तपणा आलाय तुला, श्रावण चालू असल्याने.
😜😜😜😜😜

जुन्या काळात जे लोक आपली झोप ,भूख 
घर आणि परिवार आणि सर्व सुखाचा त्याग करत 
त्यांना ‘ऋषीमुनी’ म्हणायचे.
आजकाल त्यांना ‘Best Employee of the Year’ असे म्हणतात.

अजून वाचा : Funny Marathi Ukhane | गमतीदार मराठी उखाणे | Comedy Ukhane in Marathi


पोरींनो एक गोष्ट ध्यानात घ्या
चांगला जॉब, स्वतःचा फ्लॅट/घर अन् गाड़ी
वाला म्हंजी तुमच्याच भाषेत सांगायचं तर
Well Settled मुलं नसत्यात तर,
#काका 🧓 असतात.

काळजी घेत जावा स्वतःची
कारण, तुमच्यासारखी माणसे
म्हसोबाला कोंबडा कापून सुद्धा मिळणार नाहीत.
😜😜😜😜😜

शिक्षक : एका गाढवा पुढे 1 दारुचा 🥃आणि 1 पाण्याचा ग्लास 🥛
ठेवला, पण गाढव पाणीच प्यायला, तर सांगा यापासुन तुम्ही काय शिकलात ?
चिंटू : जो दारु पित नाही तो गाढव असतो.

टिचर : बंड्या तु वर्गात सारखा मुलींशी
गप्पा का मारत असतोस ?
बंड्या : बाई मी गरीब घरचा आहे,
मला “WhatsApp” 💬 परवडत नाही.

वडील : अरे एक काळ असा होता की, मी पाच रुपयांत किराणा सामान, दूध, पाव आणि अंडी घेऊन यायचो.
मुलगा : आता ते शक्य नाही. बाबा,आता तिथे सीसीटीव्ही बसवलाय.

प्रपोज करण्याची नवीन पद्धत :
चिंटू : तुझं नाव गूगल आहे का ?
चिंकी : नाही का ?
चिंटू : मी जे जे शोधत होतो ते सगळं तुझ्यात आहे म्हणून विचारलं.
🤭🤭🤭🤭🤭

गावात वीज येणार असल्या मुळे सगळे लोक नाचत होते.
त्यात एक कुत्रा हि नाचत होता.
लोकांनी विचारले तू का खुश आहेस ?
त्यावर कुत्रा 🐕 म्हणाला, वीज येईल तर खांब पण
लागतील ना !
😂😂😂😂😂

बंड्या – डॉक्टर माझी बायको गेल्या बारा तासांपासून एकही शब्द बोलत नाही.
डॉक्टर – मग तुम्ही माझ्याकडे का आलात ?
गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड वाल्यांकडे जा.

अजून वाचा : मराठी चारोळी संग्रह | Best Marathi Charoli Sangrah


केमिस्ट : तुम्हाला किती वेळा सांगितलं,
डोकेदुखीच्या गोळ्या हव्या असतील तर
डॉक्टरची चिट्ठी घेऊन या, प्रत्येक वेळी मॅरेज सर्टिफिकेट काय दाखवता ?

आय. आय. टी. चे विद्यार्थी : सर आज आम्ही अशी एक वस्तू बनवली आहे की,
ज्यामुळे तुम्ही भिंतीच्या आर – पार बघू शकता ?
सर : गुड जॉब मुलांनो, काय बनवल आहे तुम्ही ?
विद्यार्थी : भिंतीला ‘होल’ पाडलाय !

माणूस : केस बारीक कापा
कटिंग वाला : किती बारीक कापू ?
माणूस : बायकोच्या हातात येणार नाही इतके..
🤣🤣🤣🤣🤣

मुलीकडचे : आम्हाला असा मुलगा पाहिजे जो काही खात-पीत नसावा,
अन्‌ काही चुकीचं काम करत नसावा.
पंडित : असा मुलगा तर तुम्हाला हॉस्पीटलच्या आय.सी.यू वॉर्डातच मिळेल.

आजच्या नवरे लोकांची मानसिकता :
घराबाहेरची बाई – शांताबाई
अन घरातली बाई – शांत रहा ना बाई.

Girl : ओ फूलवाले भैय्या, केवढे को दिया ये गुलाब ?
भैय्या : 50 रुपया..
Girl : इतना मेहेंगा कैसे ?
भैय्या : माय लाईफ, माय रुल्स माय रोपटं, माय फूल्स..
😎😎😎😎😎

पाणी वाचवण्यासाठी अजून एक प्रयत्न करा.
गुटखा, तंबाखु, खाणार्याला पाणी पाजु नका.
एक ग्लास पाणी पितात आणि दोन ग्लास गूळन्या करतात.

मास्तर : कॉफ़ी शॉप आणि वाइन शॉप मध्ये काय फरक आहे ?
विद्यार्थी : सोप्प आहे सर, प्रेमाची सुरुवात कॉफ़ी शॉप मध्ये होते आणि शेवट वाइन शॉप मध्ये.

एक माणुस फार हुशारी झाडत होता –
“लोखंडाला लोखंड कापतं हिर्याला हिरा कापतो”
तेवढ्यात मागुन एक कुत्रा येतो आणि त्याला चावतो.
😂😂😂😂😂

स्ञी फक्त एकाच पुरुषाचे ऐकते,
तो म्हणजे “फोटोग्राफर”.💃📸

गावाकडच्या पोराची एका पोरीन रीक्वेस्ट अक्सेप्ट केली.
पोरगा : (खुश होवुन) Thank u
पोरगी : My Pleasure.
पोरगा : OH.. My 1 Bullet, 1 Swift ,1 Scorpio, & 17 एकर ऊस.
😂😂😂😂😂

ह्या जोकला तोडच नाही. 
परिक्षेतील एक प्रश्न : 
कोण कोणास म्हणाले ?
“तुम्हाला भेटुन आनंद झाला !”
.
.
.
एका मूलाचे उत्तर :
आनंदची आई, आनंदच्या वडिलांना…
😂😂😂😂😂

अजून काही दिवसात कोरोना गेला नाही तर बिल्डर्स अशी जाहिरात देतील.
2 बैडरूम, हॉल, किचन 
विथ आइसोलेशन रूम, ऑक्सीजन पाइप लाइन & वेंटिलेटर.

काकू – काय गं लग्न झाले का तुझे ?
मुलगी – हो..
काकू – काय करतो तुझा नवरा ?
मुलगी – पश्चात्ताप.
🤗🤗🤗🤗🤗

जगातील काही नमुने असलेली लोकं :
१. जे बस मधे चायना मोबाईलवर मोठ्याने गाणी लावतात.
२. जे फ़ेसबुकवर स्वता:च्या पोस्टला स्वता:च लाईक करतात.
३. जे स्वत:च्या एका मेल आयडिवरुन दुसर्यामेल
आयडिवर स्वत:च मेल पाठवतात.
आणि
४. मराठी जे महाराष्ट्रात राहुन मराठी लोकांशी हिंदीत बोलतात.

संशयाची हद्द झाली राव..
जेव्हा पतीची बायपास सर्जरी झाली पत्नीने सर्जनला एकच प्रश्न केला,
ह्यांच्या हृदयात कोणी दुसरी होती का हो ????

रिलेशनशिपमध्ये असला तर घरी सांगा.
उगाच वॉट्स अप वर रडके स्टेटस टाकत जाऊ नका.

(पेपरमध्ये प्रश्न होता)
शास्त्रिय कारणे द्या, डोक्यावर पांघरुण घेऊन झोपू नये ?
गण्याने उत्तर लिहिले : “कारण, कोण झोपलय ते कळत नाही.”
मास्तरांनी बदाबदा बदडला.
😜😜😜😜😜

शाळेमध्ये एक नवीन मुलगी येते.
मुलगा : तुझे नाव काय गं ?
मुलगी : मलाना सगळे ताई म्हणतात.
मुलगा : घ्या, काय योगा-योग आहे, मला सगळे दाजी म्हणतात.
😎😎😎😎😎😎

मुलगा – आई, मी अभ्यास करता-करता टीव्ही बघू का ?
आई – बघ…पण चालू करू नकोस.
😥😥😥😥😥

एकदा एक कंजूस जंगलातून जात असतो तेवढ्यात त्याच्या पायात काटा घुसतो.
..
..
कंजूस काटा काढत स्वताशीच: आयला बरे झाले चप्पल घालून नाही आलो
नाहीतर चप्पलला होल पडले असते.

एक मुंगी घाईत जात असलेली पाहून दुसऱ्या एका मुंगीने तिला विचारले :
अगं कुठे चाललीस एवढ्या गडबडीने ??
पहिली मुंगी म्हणाली : अगं हॉस्पिटलला चाललेय.
दुसरी मुंगी : का काय झालंय ??
पहिली मुंगी : अगं हत्तीदादा आजारी आहेत ना. त्यांना रक्ताची गरज आहे. मी रक्त देऊन येते.

पप्पा : आज चिकन आणलाय पण लिंबू नाही.
.
.
झम्प्या : जाऊ द्या न आता, नवीन विम बर आलाय त्यात १००
लिम्बांची शक्ती आहे तेच टाका दोन थेंब 💦

एक मुलगा देवाला विचारतो,
‘तिला गुलाबाचं फूल का आवडतं ???’
ते तर एका दिवसात मरून जातं !
मग तिला मी का आवडत नाही ???
मी तर तिच्यासाठी रोज मरत असतो.
देव उत्तर देतात,
‘भारी रे’
एक नंबर !
Whatsapp वर टाक !!!
😂😂😂😂😂

😎  पुणेरी जोक्स 😎
एक पुणेरी मुलगा आपल्या मित्रांना घरी घेऊन आला आणि म्हणाला,
“थांबा मी चहा घेऊन आलो”
(१० मिनीटांनी)
चला माझा चहा घेऊन झाला आपण आता जाऊया !
😂😂😂😂😂

पेशंट : डॉक्टर, प्लास्टिक सर्जरी करायची आहे. साधारण किती खर्च येईल ?
डॉक्टर : ३ लाख रुपये.
पेशंट (थोडा विचार करून) : आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर ?
(स्थळ : पुण्याशिवाय दुसरे असू शकत नाही)
😜😜😜😜😜

एक मुलगा सायकलवरुन जाताना, एका मुलीला धडकला.
मुलगी: बावळट, ब्रेक नाही का मारता येत…?
मुलगा (पुणेरी उत्तर) : अख्की सायकल मारली, आता काय ब्रेक वेगळा काढून मारु ?

भन्नाट पुणेरी बाळू : काकू, चिंटू आहे का घरी ?
जोशी काकू : आहे ना, गरमा-गरम पोहे खातोय. तुलापण भूक लागली असेल ना ?
बाळू : हो
जोशी काकूः मग घरी जा आणि काहीतरी खाऊन ये.

पुण्याला डेक्कनच्या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले.
(दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस कंट्रोल-रूमला आलेला पहिला फोन)
“अहो, जरा कॅमेरात बघून सांगा ना, चितळे उघडले आहेत का ?”

पुणेकर ग्राहक : उंदिर मारायचे औषध द्या..
पुणेकर दुकानदार : घरी न्यायचंय का ?
पुणेकर ग्राहक : नाही, उंदिर आणलाय सोबत, इथेच भरवतो.

एकदा अमेरिकेत एक विमान वाईट हवामानामुळे डोंगर दऱ्यात भरकटते,
वैमानिक सर्व कौशल्य पणाला लावून डोंगर दऱ्यातुन आडवे तिडवे कट मारून ते विमान सुखरूप विमान तळावर घेउन येतो.
त्याचा सत्कार केला जातो आणि हे कौशल्य कुठे आत्मसात केलस असं विचारलं जातं.
तो लाजून म्हणतो, आधी पुण्यात बाईक चालवायचो…!

मुंबईहून पुण्याला जाताना नेमकं काय होतं ?
तापमानात घट होते आणि अपमानात वाढ होते.

🤗 नवरा बायको जोक्स 🤗
बायको : अहो काल डॉक्टर मला सांगत होते की,
माझा ‘बीपी’ वाढलाय !
पण बीपी म्हणजे काय हो सांगा ना ?
नवरा : अगं ‘बीपी’ म्हणजे ‘बावळट पणा’.
🙈🙈🙈🙈🙈

नवरा थकलेला, ऑफिसमधुन घरी आलेला असतो.
नवरा : प्यायला पाणी आण गं?
बायको : तहान लागली आहे का ?
नवरा (संतापून) : नाही माझा गळा कुठुन लिक होतोय ते चेक करायचा आहे.

नवरा : तीन दिवस झाले भेंडीचीच भाजी खातोय, वैताग आलाय,
आता महिनाभर तरी खाणार नाही मी भेंडीची भाजी…
बायको : हीच गोष्ट दारुसाठी बोला नां, रोज रोज ढोसून येता, मला पण वैताग आलाय तुमच्या पिण्याचा…
नवरा : मस्करी केली गं, बनव उद्या पण भेंडीची भाजी, मस्त बनवतेस तू…

रविवारी नवरा केस कापून येतो आणि बायकोला म्हणतो.
“बघ मी तुझ्या पेक्षा १० वर्षांनी लहान वाटतो कि नाही ?”
हरहुन्नरी बायको उत्तर देते :
एकदम टक्कलच 👩‍🦲 करायचे म्हणजे तुम्हाला पाळण्यात 👶 टाकून खेळवले असते.

रात्रीचे अडीच वाजलेले असतात.
बायको नवर्‍याला गदागदा हलवून झोपेतून जागं करते.
नवरा गाढ झोपेतून
खडबडून जागा होतो.
नवरा : काय झालं? काय झालं ?
बायको : काही नाही. तुम्ही आज झोपेची गोळी खायला विसरलात. आधी गोळी घ्या
न मग झोपा.

बायको : बंदूक घेऊन दारात का थांबलात ?
नवरा : वाघाची शिकार करायला चाललोय.
बायको : मग थांबलात का ?
नवरा : बाहेर कुत्रा 🐕 उभा आहे, तो गेला की जातो.

एका स्त्रीने शेअर केले मनोगत
काल नेट बंद होते म्हणून नवऱ्या सोबत गप्पा मारल्या..
चांगला वाटला तो स्वभावाने.

पती (हॉटेल मॅनेजरला रूम मधुन फोनवर) :
कृपया रूममध्ये लवकर या, माझे माझ्या बायकोबरोबर भांडण झाले आहे आणि
ती आता म्हणते की, ती रूमच्या खिडकीतून उडी मारेल.
मॅनेजर : सर, माफ करा. पण हा तुमचा खाजगी विषय आहे.
पती : अहो, पण ती खिडकी उघडत नाहीए, हा तरी हॉटेलचा विषय आहे ना ?
लवकर याऽऽऽ
😂😂😂😂😂

बायको नवऱ्यासाठी सकाळी गरम दूध घेऊन येते,
नवरा ग्लास घेऊन तोंडाला लावतो आणि एक घोट घेतो.
नवरा : याक … छी … !!! हे कसलं गं दूध ?
बायको : ते काय आहे ना, केसर संपलं आहे म्हणून मी तुमच्या खिशातील विमल पान मसाला टाकला.
ते टीव्हीवर म्हणतात ना “इसके दाने दाने मे है केसर का दम” (नवऱ्याने विमल सोडली).

नवरा : कुठे गेली होतीस ?
बायको : रक्तदान करायला.
नवरा : हे बरोबर नाही, माझं प्यायचं आणि बाहेर जाऊन विकायचं.

नवरा दारू पिऊन रात्री उशिरा घरी येतो,
बायको हातात झाडू घेऊन समोर उभी दिसते.
नवरा : किती वेळ काम करशील ? रात्रीचे दोन वाजलेत, झोपायचं नाही का ?

नवरा : आजकाल तू खूप उदास असतेस. तुझ्याकडे पाहून तू आजारी आहेस असं वाटतं.
जरा डॉक्टरांकडे जाऊन ये.
बायको : जाऊन आले. ते म्हणाले, रक्तामध्ये शॉपिंगची कमी आहे.
तर दोन-चार मॉलमध्ये जाऊन या.
खरेदी करा, वातावरण बदललं की आपोआप ठीक व्हाल.
😎😎😎😎😎

बायको : आहो, माझ्याकडे तोंड करून
झोपा, मला भीती वाटते.
नवरा : हा, म्हणजे मी भीतीने मेलो
तरी चालेल ???
😥😥😥😥😥

नवरा : अगं, ऐकलस का ?
घरी पाहुणे आलेत ना, त्यांना
जेवणाचे विचार जरा.
बायको : भावजी, तुम्ही घरून
जेवून आलात की घरी गेल्यावर
जेवणार ??

बायको : (घाबरून) अहो डॉक्टर, आत्ता सकाळी चुकून माझ्या मिस्टरांनी डीसपरेन ची गोळी खाल्ली,
आता काय करू ?
डॉक्टर : त्यांना आता डोकेदुखी द्या, गोळी कशाला वाया घालवता ?
बायकोने सल्ला इतका मनावर घेतला कि नवरा गोळ्यांचे पाकीट शोधतोय.

एक विवाहीत स्त्री स्वत:च्याच
जिभेवर हळद, कुंकु नि अक्षदा
लावत होती, तेवढ्यात…
नवरा : अगं हे काय करतेस ?
बायको : अहो दसरा आहे ना आज !
म्हणुन शस्त्राची पुजा करतेयं.

नवरा : आज भाजीत थोडं मीठ जास्त वाटतंय..
बायको : मीठ बरोबर आहे, भाजीच कमी पडलीये,
सांगितलं होतं ना जास्त आणायला.
🙄🙄🙄🙄🙄

नवरा : साजणी, तुझ्या केसांच्या मखमली
जाळ्याला सांभाळत जा गं जरा
बायको : लाजत… तुम्ही पण ना… इश्य
नवरा : आईशप्पथ जर पुन्हा जेवणात तुझा
केस सापडला तर साजणीवरून
गजनी बनवून टाकेल तुला..

एक नवरा साधूकडे जातो
नवरा : बाबा रात्री कधी झोपेतून जाग आली तर,
बायकोचा चेहरा चादरीच्या आतून तेजाने चमकत असतो,
कुठलीतरी अद्भुत किरणे दिसतात,काय करू ?
साधू : आरे password टाक मोबाईलला तुझ्या,
येड्या तुझा मोबाईल चेक करते ती..

नवरा बायकोचे भांडण चालु असते.
नवरा : तु स्व:तला आवर नाहीतर माझ्या मधला जनावर बाहेर येईल.
बायको : हा हा येऊ दे ऊंदराला कोण घाबरते ?

बायको : माझी एक अट आहे,
नवरा : काय ?
बायको : तूम्ही सोडायला आले तरच मी माहेरी जाणार,
नवरा : माझी पण एक अट आहे.
बायको : काय ?
नवरा : मी घ्यायला आलो तरच परत यायचे.

बायको : अहो ऐकलं कां ?
आपले लग्न लावून देणारे भटजी वारले !!
नवरा : एक ना एक दिवस त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते.

सकाळी पत्नीने पतीला वर्तमानपत्र मागीतले.
पती : किती मागासलेली आहेस तु ?
विज्ञान किती पुढे गेले आणी तु अजुन वर्तमानपत्र मागतेस ???
हा माझा टॅब घे..
बायको टॅब घेते आणी त्याने झुरळ मारते.
नवरा बेशुध्द…
तात्पर्य : पत्नी जे मागते ते तिला डोकं न लावता द्या,
तुमची हुशारी फक्त ऑफीस पुरतीच ठेवा.
😂😂😂😂😂

एकदा नवरा बायको Discovery बघत असतात.
channel वर म्हैस दिसते.
नवरा : ती बघ तुझी नातेवाईक
बायको : अय्या… सासूबाई.
😜😜😜😜😜

आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram
शेयर करा: