Marathi Mhani | मराठी म्हणी व त्यांचे अर्थ | Best Marathi Proverbs

मराठी म्हणी (Marathi Mhani) :

म्हणी हे समजाचा आरसाच आहेत. म्हण म्हणजे लोकांनी वारंवार उच्चारलेले वाक्य. मराठी म्हणी मध्ये जीवनातील विशिष्ट अनुभव, माहिती, सत्य व उपदेश साठविलेला असतो. म्हणीच्या विचारात मार्मिकता असते. जे वाक्य किंवा वचन वारंवार उच्चारलेले जातात. त्यांना म्हण असे संबोधले जाते. मानवाच्या चांगल्या वाईट प्रवृत्ती, आचार विचार इ. चे प्रतिबिंब यात दडलेले असते. म्हणून समाजातील सर्व थोरा मोठ्यांना म्हणीचे आवड असते.

म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी मराठीतून म्हणी व त्यांचे अर्थ (Marathi Mhani, Mhani in Marathi, Marathi Mhani Puzzle, Marathi Proverbs & Their Meanings) यांचा संपूर्ण संग्रह घेऊन आलो आहोत

 

मराठी म्हणी व त्यांचे अर्थ | Marathi Mhani (Proverbs) & Their Meanings :
  • असतील शिते तर जमतील भूते – आपल्या जवळ पैसे असतील तर मित्र व नातेवाईकांची उणीव नसते.

  • अति शहाणा त्याचा बैल रिकामा – जो मनुष्य स्वतःचा शहाणं पणा दाखवतो शेवटी तोच गोत्यात येतो.

  • आयत्या बिळावर नागोबा – दुसऱ्याचे श्रमाचे बाजुला सारुन त्याचे श्रेय स्वतः घेणे.

  • आंधळ्या गायीत, लंगडी गाय शहाणी – सर्व माणसे अडाणी असतील तर ते थोडासा जाणकार असेल तर त्याला विद्वान समजले जाते.

अजून वाचा : Funny Marathi Ukhane | गमतीदार मराठी उखाणे | Comedy Ukhane in Marathi


  • कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही – कितीही अडथळे आले तरी जे होणार आहे ते होवुनच जाते.

  • घर फिरले की घराचे वासेही फिरतात –  प्रतिकूल परिस्थिती आली म्हणजे सारेच त्याच्याशी वाईट वागू लागतात.

  • एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरु मारु नये – दुसऱ्याने केलेल्या मोठ्या वाईट गोष्टींकडे बोट दाखवून आपण केलेल्या वाईट गोष्टीचे समर्थन करू नये.

  • आपला हात जगन्नाथ – स्वत:च्या कर्तबागरीवर विश्वास ठेवणे.

  • पळसाला पाने तीनच – तोच तो पणा.

  • अति तेथे माती – कोणत्याही गोष्टीचा अतिरेक झाला की, शेवटी नुकसान दायक ठरते.

  • जनी जनार्दन – परमेश्वर हे व्यापक स्वरूप आहे, ते सर्वांमध्ये आढळून येते.

  • एक ना धड भाराभर चिंध्या – एकावेळी एकच काम हाती न घेता इतर काम हाती घेणे त्यामुळं कोणतेही काम पुर्ण होवु न शकणे.

  • एका हाताने टाळी वाजत नाही – कोणत्याही भांडणात दोन्हीं पक्षाचा दोष असतो.

  • गर्जेल तो पडेल काय ? – बडबड करणाऱ्याच्या हातून काहीही प्रत्यक्षात घडत नाही.

  • निंदकाचे घर असावे शेजारी– निंदा करणारा माणूस नेहमीं उपयोगी ठरतो त्यामुळे आपले दोष समजतात.

  • तहान लागल्यावर विहीर खणणे – पुढील संकट अडचणी कोणतीही तरतूद नाही करणे.

  • भरवशाच्या म्हशीला टोणगा – ज्या व्यक्तीवर अति विश्वास आहे नेमक्या अशाच व्यक्ती कडून विश्वासघात होणे.

  • आंधळा मागतो एक डोळा, नि देव देतो दोन डोळे – अपेक्षे पेक्षा जास्त लाभ होणे.

  • आंधळे दळते कुत्र पिठ खात – काम एकाने करावे परंतु लाभ दुसऱ्याने घ्यावा.

  • रोज मरे त्याला कोण रडे – तीच ती गोष्ट वारंवार होऊ लागली म्हणजे तिच्यातील स्वारस्य नष्ट होते व तिच्याकडे कोणीही लक्ष देत नाही.

  • दुरुन डोंगरे साजरे – फार लांबूनच एकाद्या बद्दल आदर वाटणे, प्रत्यक्ष जवळ गेल्यावर तो आदर नाहीसा होणे.

  • उचलली जीभ लावली टाळ्याला – मनाला वाटेल तसे बोलणे.

  • पोटी कस्तुरी वासासाठी फिरे भिरीभिरी – स्वतः जवळच असताना देखील वस्तू शोधण्यासाठी इतरत्र फिरणे.

  • हात ओला तर मित्र भला – तुमच्या पासून काही फायदा होणार असेल तर लोक तुमचे गोडवे गायाला लागतात.

  • आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला – ज्या दोषाबद्दल आपण दुसर्‍याला हसतो परंतु तोच दोष आपल्या अंगी असणे.

  • एका कानावर पगडी, घरी बाईल उघडी – बाहेर बडेजाव करणे पण घरी दारिद्र्य असणें.

  • नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ पाहू नये – नदीचे उगमस्थान व ऋषीचे कूळ पाहू नये कारण त्यात काहीतरी दोष असतोच.

  • जानवे घातल्याने ब्राह्मण होत नाही – फक्त बाह्य देखाव्याने माणूस ज्ञानी होत नाही.

  • गाढवापुढे वाचली गीता, कालचा गोंधळ बरा होता – मुर्खाला कितीही चांगला उद्देश केला तरी त्याचा उपयोग काहीच होत नसतो.

  • मुलाचे पाय पाळण्यात दिसतात – लहान वयातच व्यक्तीच्या गुणदोषांचे दर्शन होते.

  • देव तारी त्याला कोण मारी ? – देवाची कृपा असल्यास आपले कोणीही वाईट करू शकत नाही.

  • मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये – कोणाच्याही चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये.

  • नाचता येईना अंगण वाकडे – आपल्याला एखादे काम करता येत नसेल तेव्हा आपला कमीपणा लपविण्यासाठी संबंधित गोष्टीत दोष दाखवणे.

  • मनी वसे ते स्वप्नी दिसे – ज्या गोष्टींचा आपण सतत विचार अथवा ध्यास केल्याने तिच गोष्ट स्वप्नात दिसणे.

  • मन राजा, मन प्रजा –  बरेवाईट वर्तन करणे हे केवळ आपल्या इच्छा शक्तीवर अवलंबुन असते.

  • मनात मांडे पदरात धोंडे – भव्य मनोराज्य आणि अखेरीस निराशा.

  • सुंभ जळेल, पण पीळ जळत नाही – परिस्थिती बदलली तरी मूळचे गुण व दोष नाहीसे होत नाही.

  • सत्तेपुढे शहाणपण नाही – ज्याच्याजवळ अधिकाराचे बळ आहे, त्याच्यापुढे शहाण्याचे काही चालत नाही.

  • कोल्हा काकडीला राजी –  जरी अपेक्षित नसलेली वस्तू प्राप्त झाली तरी स्वार्थी मनुष्य त्यावर संतोष ठेवतो.

  • दगडाचा काही दोर होत नाही – भलत्याच वस्तू पासून एखाद्या विशिष्ट वस्तूची अपेक्षा करणे व्यर्थच आहे.

  • काखेत कळसा आणि गावाला वळसा – एखाद्या जवळच्या असलेल्या वस्तूचा शोध करीत बसणे.

  • टिटवीदेखील समुद्र आठवते – क्षुद्र वाटणारे प्राणीसुद्धा प्रसंगी समयी अचाट कृत्य करून दाखवतो.

  • कधी तुपाशी, कधी उपाशी – कधी चांगली तर कधी वाईट परिस्थिती असणे.

  • जशी देणावळ तशी धुणावळ – मिळणाऱ्या मोबदल्याच्या प्रमाणातच काम करणे.

  • अंथरूण पाहून पाय पसरावे – आपली कुवत पाहून कोणत्याही कामाची जबाबदारी स्वीकारणे.

  • बावली मुद्रा देवळी निद्रा – दिसायला वेडपट पण व्यवहार चातुर्य उत्तम असणे.

  • ज्याचा हाती ससा तो पारधी – कर्तुत्व एकाचे परंतु नाव दुसऱ्याचे.

  • काप गेली नि भोके राहिली – वैभव गेले आणि त्याच्या फक्ततखुणा शिल्लक राहिली.

  • इकडे आड तिकडे विहीर – दोन्ही बाजूंनी संकटे असणे.

  • कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही – क्षुद्र माणसाने केलेल्या दोषारोपांने थोरांचे नुकसान होत नसते.

  • जलात राहून मशाशी वैर करु नये – ज्याच्या सहवासात राहवे लागते त्यांच्याशी कधीही वैर करु नये.

  • न कर्त्याचा वार शनिवार – ज्याला काम करण्याची इच्छा नसते ते कोणतेही सबबी सांगुन टाळणे.

  • दृष्टीआड सृष्टी – आपल्यामागे जे चालते त्याकडे दुर्लक्ष करणे.

  • खोट्याच्या कपाळी गोटा – खोटेपणाने किंवा वाईट वर्तन करणाऱ्यांचे नेहमीं नुकसान होते.

  • पालथ्या घड्यावर पाणी – कितीही चांगला उपदेश केला तरी तो निरर्थक ठरणे.

  • चोर सोडून संन्याशाला फाशी – खऱ्या अपराधीला सोडून निरपराधीला शिक्षा देणे.

  • टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही – कष्ट सोसल्याशिवाय मोठेपण प्राप्त होत नाही.

  • लेकी बोले सुने लागे – एकद्याला उद्देशून बोलणे परंतु ते दुसऱ्याला लागेल असे बोलणे.

  • शितावरून भाताची परीक्षा – कोणत्याही छोट्याश्या कृतीवरून योग्यता ठरवणे.

  • अगं अगं म्हशी मला कोठे नेशी – स्वत:ची चूक मान्य करण्याऐवजी इतरांवर दोष देणे.

  • साखरेचे खाणार त्याला देव देणार – भाग्यवान मनुष्यांस कशाची उणीव भासत नाही.

  • ताकापुरते रामायण – आपले गरजेपूर्ता एखाद्याची खुशामत करणे.

  • दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते, पण आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही – दुसऱ्याचा लहान लहान दोष दिसतात पण अहंकारामुळे स्वतःच्या मोठ्या दोषांकडे लक्ष दिले जात नाही.

  • नाव मोठे, लक्षण खोटे – मोठ मोठी आश्वासने परंतु कृती मात्र शुन्य.

  • नाकापेक्षा मोती जड – मालकापेक्षा नोकराचे प्रतिष्ठा वाढणे.

  • थेंबे थेंबे तळे साचे – शुल्लक वाटणाऱ्या गोष्टींचा संग्रह केल्याने कालांतराने त्यात अधिक मोठा संचय होतो.

  • एका हाताने टाळी वाजत नाही – दोघांच्या भांडणात पूर्णपणे एकट्यालाच जबाबदार ठरवले जावु शकत नाही.

  • गाढवाला गुळाची चव काय ? – ज्याला एखाद्या गोष्टीचे महत्त्व प्राप्त नाही अश्या व्यक्तीला त्या गोष्टीचे महत्त्व कधी कळू शकत नाही.

  • नागेश्वराला नागवून सोमेश्वराला वात लावणे – एकाचे लुटून दुसऱ्याला दान करणे.

  • नाक दाबले, की तोंड उघडते – एखाद्या व्यक्तीचे वर्म जाणून त्यावर दबाव आणला, की चुटकीसरशी काम करून घेता येते.

  • दिव्याखाली अंधार – मोठ मोठ्या माणसात देखील दोष हा असतो.

अजून वाचा : मराठी चारोळी संग्रह | Best Marathi Charoli Sangrah


आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram
शेयर करा: