आयुष्यात काही नसले तरी चालेल,
पण आई-वडिलांचा हात नेहमी पाठीशी असावा.
चारचौघात आई बापाची मान
खाली झुकू नये असं लेकीने जगावं,
आणि आई वडिलांना कुणापुढे हात
पसरायची वेळ येऊ नये असं मुलाने जगावं.
यशाच्या आकाशात गरूड होऊन जेव्हा आपण भरारी मारत असू.
पृथ्वीवर दोन आतूर डोळे जग विसरून पहात असतील.
ते दोन डोळे म्हणजे आपले आई वडील.
जगाच्या बाजारात सर्व काही मिळेल,
पण आईची माया आणि वडिलांच प्रेम
कितीही पैसे खर्च केले तरी मिळणार नाही.
आई-वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा पण,
कोणत्याही गोष्टीसाठी आई-वडिलांना सोडू नका.
प्रेमात हारलात म्हणून
आयुष्य संपवण्यात काहीच अर्थ नाही.
कारण, तिला/त्याला कदाचित दूसरा साथीदार मिळेल.
पण तुमच्या आई-बाबा ला तुमच्या सारखा मुलगा/
मुलगी कधीच मिळणार नाही.
सगळी नाती नकली असतात,
वेळ आली की सगळे साथ सोडतात,
पण या आयुष्यात दोनच नाती,
एक आईच्या मायेचा हात आणि बापाची साथ
आयुष्यभर सोबत राहतात.
आईने बनवल, बाबानी घडवल,
आईने शब्दांची ओळख करुन दिली, बाबानी शब्दांचा अर्थ समजवला.
आईने विचार दिले, बाबानी स्वातंत्र्य दिले,
आईने भक्ती शिकवली, बाबानी वृत्ती शिकवली
आईने लढण्यासठी शक्ती दिली बाबानी जिकण्यासाठी नीती दिली
त्यांच्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे.
जिथे आपल्या आई बाबांना इज्जत नाही,
तिकडे आपण वाकुन सुद्धा बघत नाही.
हजारो माणसे मिळतील आयुष्यात पण,
आपल्या हजारो चुकाना क्षमा करणारे आई वडील पुन्हा मिळणार नाही.
कोणाचं ATM CARD बनण्यापेक्षा
आई वडिलांचा AADHAR CARD
बनायला जास्त आवडेल मला.
नात्याचीं दोरी नाजुक असते
डोळ्यातील भाव ही ह्रदयाची भाषा असते,
जेव्हा जेव्हा विचारतो भक्ती व प्रेमाचा अर्थ
तेंव्हा एक बोट आईकडे तर दुसरे बोट बाबाकडे असते.
न थकता, न हरता, कधी न कंटाळता, न थांबता कसलाही मोबदला न घेता.
आपल्याला घडवण्यात महत्वाचा हक्क कोणाचा असेल,
तर तो आपल्या आई वडिलांच..
या जगात आई बाप सोडले ना तर
आपली कदर कोणालाच नसते,
हे मरेपर्यंत विसरू नका.
आयुष्यात तुम्ही कितीही शिकलात पैसा आणि नाव कितीही कमवलतं,
तरीही आई वडील गुरू यांच्या आशीर्वादा शिवाय सर्वकाही व्यर्थ असतं.
जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं,
आणि जिंकणं वडिलांच्या साठी असावं.
संध्याकाळच्या जेवणची चिंता करते ती “आई“
आणि आयुष्याभराच्या जेवणाची चिंता करतात ते “बाबा“.
देशातील प्रत्येक घर हे शाळा आहे
आणि घरातील माता-पिता हे शिक्षक आहेत.
स्वत:चे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते
तिला आई म्हणतात,
पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो
त्याला बाप म्हणतात.
जगातील अनमोल गोष्ट काय असेल तर,
आपले आई वडील त्याचा इतके प्रेम कोणी देत नाही.
स्वत:च काहीच नाही माझं
आपलं हृदय आई जवळ आणि
जीव बाबा जवळ आहे.
आई घराचं मांगल्य असते,
तर बाप घराचं अस्तित्व असतो,
आईकडे अश्रुचे पाट असतात,
बापाकडे संयमाचे घाट असतात,
ज्योतीपेक्षा समई जास्त तापते,
ठेच लागली की आईची आठवण येते,
मोठ मोठी वादळे पेलवताना बाप आठवतो,
मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप असतो.
आई शिवाय घर अपुर असतं
आणि बापा शिवाय आयुष्य.
आईच्या चरणात जर स्वर्ग असेल तर,
वडिल त्या स्वर्गाचे दार आहेत.
आई स्टेटस मराठी | Mother Status in Marathi :
जेव्हा घरात भाकरीचे चार तुकडे असतात
अन् खाणारे पाच असतात तेव्हा एक जण
म्हणते मला भुख नाही ती म्हणजे आई.