कडुलिंबाचे फायदे आणि नुकसान | Neem Benefits In Marathi

कडुलिंबाचे फायदे (Neem Benefits In Marathi) :

कडुलिंबाचा वापर भारतात चार हजार वर्षांपासून केला जात आहे. वेदांमध्ये कडुनिंबाला “सर्वरोग निवारणी” म्हणूनही ओळखले जाते. याचा अर्थ असा की, कडुनिंब आमच्या शरीराला सर्व प्रकारच्या आजारांपासून संरक्षण करते. कडुनिंबामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. बर्‍याच औषधांमध्येही याचा वापर केला जातो. कडुनिंबाची पाने खाल्ल्याने अनेक रोग बरे होतात.

कडुलिंबाचे फायदे आणि कडुलिंबाचे नुकसान | Neem Benefits In Marathi | Neem Side Effects in Marathi

कडुलिंबाची पाने खाण्याचे फायदे असंख्य आहेत. कडुलिंबाची पाने खाण्यास कडू असली तरी ती आपल्याला बर्‍याच गंभीर आजारांपासून वाचवते आणि तुमचे सौंदर्य वाढवण्यासाठी रामबाण औषध म्हणून काम करते. कडुलिंबाच्या फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास, कडुलिंबाची पाने खाणे आणि कडुलिंबाच्या पानांची पेस्ट लावल्यास वेगवेगळे फायदे मिळतातच परंतू कडुलिंबाच्या तेलाचे उपयोग देखील तितकेच महत्त्वाचे आहेत.

चेहरा व त्वचेची डाग साफ करण्यास आणि बर्न्स किंवा जखमांना बरे करण्यासाठी कडूलिंबाची पाने खूप प्रभावी असल्याची मानली जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला कडुलिंबाच्या पाण्याचे फायदे सांगणार आहोत.

 

कडुलिंबाचे औषधी गुणधर्म (Medicinal Properties of Neem in Marathi) :

कडुलिंबाचे औषधी गुणधर्म बरेच आहेत. शतकानुशतके याचा उपयोग होत आहे. वास्तविक त्यात अँटी बॅक्टेरिया, अँटी फंगल, अँटीऑक्सिडंट आणि अँटीवायरल असे महत्वाचे गुणधर्म आहेत. या व्यतिरिक्त, कडुनिंबाचे इतर फायदे आहेत, त्याबद्दल आम्ही लेखात पुढील माहिती देणार ​​आहोत.

 

कडुलिंबाचे पौष्टिक तत्व (Neem Nutritional Value in Marathi) :

  • कैल्शियम (Calcium)
  • मैग्नीशियम (Magnesium)
  • पोटेशियम (Potassium)
  • सोडियम (Sodium)
  • विटामिन ए (Vitamin A)
  • विटामिन सी (Vitamin C)
  • बीटा कैरोटीन (Beta carotene)
  • लाइकोपीन (Lycopene)
  • प्रोटीन (Protein)
  • आयरन (Iron)
  • गंधक (Sulfur)

 

कडुलिंबाचे फायदे (Neem Benefits In Marathi)

कर्करोगाच्या समस्येसाठी फायदेशीर ठरते :

कडुनिंबामध्ये जास्त प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात, ज्यामुळे शरीरात कर्करोगाचा धोका कमी होतो. कडुलिंबामुळे आपल्या शरीरातील अँटीऑक्सिडेंट फ्री रॅडिकल्सचे हानिकारक परिणाम रोखले जातात. त्यामुळे शरीर कर्करोगापासून वाचवते. कडुनिंब कर्करोगाच्या प्रतिबंधाव्यतिरिक्त हृदयरोगाचा धोका देखील कमी करतो.

अजून वाचा : गुळ खाण्याचे फायदे आणि तोटे | Benefits of Eating Jaggery in Marathi

 

रोगप्रतिकार शक्ती वाढवते :

कडुनिंब खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते. होय, जर दररोज काही कडुनिंबाची पाने रिकाम्या पोटावर चघळली गेली तर ते आरोग्यासाठी फायदेशीर आहे, कारण त्यात अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आहेत.

अजून वाचा : रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी ?

 

मुरुमांच्या समस्येपासून मुक्त करते :

कडुलिंबामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत, ज्यामुळे मुरुमांच्या समस्येपासून मुक्त होते. कडुलिंबामध्ये अँटीऑक्सिडेंट असतात, जे वृद्धत्वाच्या समस्येचे निदान करण्यात देखील मदत करते, यामुळे त्वचा निस्तेज आणि टवटवीत दिसतेे. कडुलिंबाचे तेल किंवा पेस्ट चेहऱ्यावर नियमितपणे लावल्याने त्वचेवरील वयाचा परिणाम दिसत नाही.

 

पचन क्रिया सुरळीत करते :

कडुनिंबाची पाने पोटातील पाचन क्रिया बरे करते. हे पोटात अल्सर, ज्वलन, गॅस सारख्या समस्या दूर करते. तसेच बद्धकोष्ठतेची समस्या देखील दूर करते. कडुनिंब पोटातून विषारी टॉक्सीक पदार्थ काढून पोट पूर्णपणे स्वच्छ करते.

अजून वाचा : अ‍ॅसिडिटी आणि गॅस समस्येवर घरगुती उपचार

 

त्वचेच्या समस्या सोडवते :

कडुलिंबाच्या तेलामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल यांसारखे अनेक गुणधर्म असतात. हे गुणधर्म त्वचा संसर्ग दूर करण्याचे कार्य करते. त्वचेवरील कोणत्याही बॅक्टेरियांचा संसर्ग दूर करण्यासाठी कडुलिंबाचे तेल वरदान असल्याचे मानले जाते. ज्या ठिकाणी जखम झाली आहे तेथे कापसाच्या मदतीनं कडुलिंबाचे तेल लावाल्यास. या तेलामुळे जखमेतील सूक्ष्म जीवजंतूंचा खात्मा होवुन त्वचा विकार बरा करतो.

अजून वाचा : कोरफड खाण्याचे फायदे | Benefits of Eating Aloe Vera in Marathi

 

केसांच्या वृध्दीसाठी फायदेशीर ठरते :

केसांच्या वाढीसह केस घनदाट आणि मजबूत करण्यासाठी कडुनिंबाचे तेल वापरले जाऊ शकते. यामध्ये लिनोलिक, ओलिक आणि स्टीअरिक असिडसह विविध प्रकारचे फॅटी असिड सुद्धा असतात, जे टाळू आणि केसांचे पोषण प्रदान करतात. त्याचं बरोबर केसातील कोंडा (Dandruff) आणि ऊवा या सारख्या समस्या सोडवण्यासाठी कडुलिंबाच्या तेलाचे उपयोग केला जातो.

अजून वाचा : केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय | Hair Growth Tips in Marathi

 

दृष्टी सुधार करते :

डोळ्यांसाठी ही कडुनिंब फायदेशीर आहे. त्याचा नियमित सेवन केल्याने दृष्टी वाढते. डोळ्यांतून पाणी येत असेल किंवा वेदना कायम होत असल्यास कडुनिंबाच्या पाण्याचे सेवन केल्यास आराम मिळतो.

अजून वाचा : सॅलड (Salad) Top 12 Benefits for Health’s in Marathi | सलाड खाण्याचे फायदे

 

कडुलिंबाचे नुकसान (Side Effects of Neem In Marathi) :

  • कडुलिंबामुळे साखरेची पातळी कमी होते. त्यामुळे मधुमेह ग्रस्त व्यक्तीनी रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर समतोल राहील अथवा एखाद्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच कडूलिंबाचे सेवन करावे.
  • कडुलिंब हे वेदना निवारक आहे. त्यामुळे योग्य प्रमाणात आणि योग्य मार्गाने कडुनिंबाचे सेवन करावे अन्यथा आपणास थकवा येऊ शकतो.
  • केस धुताना हे लक्षात घेतले पाहिजे की, कडूनिंब तुमच्या डोळ्यात जाणार नाही याची दक्षता घ्यावी, जेणेकरून तुमच्या डोळ्याला त्रास होणार नाही.
  • कडुनिंबाचे अति सेवन केल्याने पोटात जळजळ देखील होते. म्हणून, त्याचे सेवन करण्यापूर्वी त्याच्या प्रमाणांची विशेष काळजी घ्यावी.
  • जर स्त्रिया गर्भवती किंवा स्तनपान देत असतील तर त्यांनीही कडुनिंबाचे सेवन करणे टाळावे.
  • जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे लहान मुलांमध्ये मूत्रपिंड आणि यकृत यांसारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते.
  • कडुनिंबाचे जास्त सेवन केल्याने तोंडाची चव जाऊ शकते.

 

लक्षात ठेवा :

कडुलिंबाचे फायदे असले तरी, त्याचे थोड्या प्रमाणत कडुलिंबाचे तोटे (Side Effect of Nerm in Marathi) देखील आहे. तत्पूर्वी आपण कोणत्याही प्रकारचे सेवन अथवा उपचार सुरू करण्याआधी तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.


आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

शेयर करा: