पपई खाण्याचे फायदे आणि नुकसान | Papaya Benefits and Side Effects in Marathi

पपई खाण्याचे फायदे (Papaya Benefits in Marathi) :

पपई खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. बहुतेक लोकांना पपई खायला आवडते. पपई आरोग्यासाठीच फायदेशीर ठरत नाही तर त्वचा सुधारण्यासही ते खूप प्रभावी ठरते. अनेक मार्गांनी, पपईचा घरगुती उपचार म्हणून देखील वापरला जातो. म्हणून आज आम्ही तुम्हाला पपईचे फायदे सांगणार आहोत.

पपई खाण्याचे फायदे आणि नुकसान | Papaya Benefits and Side Effects in Marathi

पपईमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, नियासिन, मॅग्नेशियम, पोटॅशियम, प्रथिने, कॅरोटीन, फायबर यासारखे पुरेसे पोषक घटक असतात. फक्त पपई खाल्ल्याने शरीराला भरपूर फायदा होतो.

 

पपई खाण्याचे फायदे (Papaya Benefits in Marathi) :

पचन क्रिया सुलभ करते :

पपईचे फायदे सर्वांना ठाऊक आहेत की, पपई हे पचनास मोठ्या प्रमाणात मदत करते. पपईचे सेवन शरीराला अनेक आवश्यक असलेले घटक प्रदान करते. यात पपेन सह अनेक पाचन एंझाइम्स आणि अनेक डायट्री फायबर म्हणजेच तंतूमय घटक असतात.जे बद्धकोष्ठता सारख्या समस्यांना प्रतिबंधित करतात. तसेच, यात बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन ई आणि फोलेट असतात.

अजून वाचा : अ‍ॅसिडिटी आणि गॅस समस्येवर घरगुती उपचार

 

वजन वाढण्यास प्रतिबंध करते :

पपई वजन कमी करण्यात खूप मदत करते. पपईमध्ये कोलेस्ट्रॉल आणि फॅट्स (चरबी) यांसारखे घटक आढळत नाही. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. मध्यम आकाराचे पपई खाणे फायद्याचे आहे, यात १२० कॅलरीज, व्हिटॅमिन सी, फोलेट आणि पोटॅशियम इत्यादी असतात.

अजून वाचा : वजन कमी करण्याचे घरगुती उपाय | Weight Loss Tips in Marathi

 

त्वचेच्या समस्या दूर करते :

पपईमध्ये असे बरेच घटक आहेत. जे तुमच्या त्वचेसाठी हे खूप फायदेशीर आहेत. जास्तीत जास्त त्वचेच्या रंग उजवळण्यासाठी पपई वापरली जाते. हे आपल्या त्वचेचे सर्व छिद्र उघडण्यास मदत करते. तसेच, आपल्या मुरुमांवर उपचार करण्यास आणि त्वचेच्या संक्रमण रोखण्यात मदत करते. ज्यामुळे पपई मृत त्वचेचे पेशी काढून टाकून त्वचेचा संसर्ग रोखण्यास कार्य करते. म्हणून त्याचा वापर फेसपॅक सारख्या उत्पादनं तयार करण्यासाठी केला जातो.

अजून वाचा : कोरफड खाण्याचे फायदे | Benefits of Eating Aloe Vera in Marathi

 

रोगप्रतिकार शक्ती मजबूत करते :

पपई मधून शरीराला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळते, जे पांढऱ्या पेशी तयार होण्यास उपयुक्त ठरते. अँटीऑक्सिडेंट्स, प्रथिने, जीवनसत्त्वे अ आणि ई आपल्या रोगप्रतिकार शक्तीस बळकट करण्यासाठी आवश्यक आहेत. म्हणून पपई मुळे बरेच आजारापासून दूर ठेवण्यास मदत होते.

अजून वाचा : रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी ?

 

दृष्टी निरोगी ठेवते :

पपईमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते. ज्यामुळे डोळ्यांना फायदा होतो. यात कॅरोटीनोईड ल्यूटिन आहे जे डोळ्याला निळ्या प्रकाशापासून वाचवते. हे डोळयातील रेटिना (पडदा) आणि मोतीबिंदू पासुन संरक्षण करते.

अजून वाचा : सॅलड (Salad) Top 12 Benefits for Health’s in Marathi | सलाड खाण्याचे फायदे

 

केसांची वाढ करते आणि मजबुती देते :

पपई आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे, म्हणून आपण पपईचे सेवन केले पाहिजे. पपईमध्ये खनिजे, जीवनसत्त्वे आणि एन्झाइम्स यांची मात्रा अधिक प्रमाणत असते. ज्यामुळे केसांची वृध्दी होते आणि बळकटी येते. तसेच पपईचा वापर डोक्यातील कोंडापासून मुक्त होण्यासाठी केला जातो.

तज्ञांच्या मते, आपण केसांसाठी पपईच्या फायद्यांचा लाभ घेऊ शकता. म्हणून आपण पपईयुक्त तयार केलेल्या केसांच्या उत्पादनांचा नियमितपणे पपई वापरू शकता.

अजून वाचा : कडुलिंबाचे फायदे आणि नुकसान | Neem Benefits In Marathi

 

कर्करोग प्रतिबंध करते :

पपईमध्ये असलेल्या घटकांमध्ये लाइकोपिन, कैरोटिनॉइड, एंटीऑक्सिडेंट, बीटा-क्रिप्टोक्साथीन आणि बीटा कैरोटिन यांचा समावेश आहे जो कर्करोगापासून बचाव करतो.

अजून वाचा : गुळ खाण्याचे फायदे आणि तोटे | Benefits of Eating Jaggery in Marathi

 

पपई खाण्याची योग्य वेळ ?

सकाळी पपईचे सेवन करावे. पण रात्रीच्या जेवणा नंतर पपई खाऊ नये कारण फायबर (तंतुमय) पदार्थाचे प्रमाण मुबलक असल्यामुळे पचायला जड जाते. परंतु हयात एसिडिक गुण कमी असल्यामुळे सकाळी पपई खाल्ल्याने हे अधिक सहजरीत्या पचते. यात भरपूर प्रमाणात पाणी आणि फायबर असते. जे शरीराच्या चयापचय दर संतुलित करते. परंतु हे लक्षात ठेवा की पपई खाण्याचे प्रमाण सूनीचित करावे. एकावेळी एक पेक्षा अधिक पपई खाऊ नये. तसेच काही संध्याकाळच्या नाश्त्यातही सामाविष्ट करु शकतात.

 

पपईचे नुकसान (Papaya Side Effects in Marathi) :

  • पपईमुळे रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते. मधुमेह ग्रस्त रुग्णांसाठी पपई खाणे आरोग्यास घातक ठरू शकते. म्हणून पपई खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे.
  • गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच हे सेवन करावे. पपईच्या बिया आणि मुळ गर्भाला हानी पोहोचवू शकतात.
  • काही लोकांना पपईची अलर्जी असू शकते. यात सूज येणे, चक्कर येणे, डोकेदुखी आणि खाज सुटणे समाविष्ट आहे. अशा लोकांनी पपईचे सेवन करणे टाळावे.
  • जर तुम्ही रक्त पातळ करणारी औषधे घेत असाल किंवा पोटदुःखी पासुन ग्रस्त असाल तर पपईचे सेवन करू नये. तज्ञांच्या मते पपईच्या बाह्य अवराणामध्ये लेटेक्स असते, ज्यामुळे पोट खराब किंवा अतिसार होण्याचे कारण ठरू शकते. यामुळे पोटात वेदना देखील होऊ शकते.
  • पपईमध्ये उपस्थित असलेले एंजाइम पपेन मुळे सूज येणे, चक्कर येणे, डोकेदुखी, पुरळ आणि खाज सुटणे यासारख्या समस्या निर्माण करते.

आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा :Facebook | Instagram | Twitter | Telegram

शेयर करा: