जगातील एकमेव उकळत्या पाण्याची नदी …

जगातील एकमेव उकळत्या पाण्याची नदी

हे अविश्वसनीय आहे, परंतु एक सत्य आहे, तुम्ही खूप सारे गरम पाण्याचे तलाव व स्रोता बद्दल ऐकलं असाल. परंतु गरम उकळत्या पाण्याची वाहणारी नदी बद्दल ऐकलं आहे का ? जगातील एकमेव गरम उकळत्या पाण्याची नदी . जगातील सर्वात मोठ जंगल असलेलं अमेझॉन जंगलातुन वाहत आहे. या नदीला “बोईलिंग रिव्हर” म्हणजे उकळत्या पाण्याची नदी या नावाने ही ओळखली जाते.

 

Image source: TED/Boilingriver.com

 

पेरू मधील अमेझॉनच्या मध्यभागी स्तिथ असलेल्या जंगलात ही गरम पाण्याची नदी वाहत आहे. नदीचे सामान्य तापमान 100 ते 200 फॅरेनहाइट इतके असते आणि काही ठिकाणी त्याची खोली 20 फूटा पर्यंत गेली आहे. नदीचे पाणी इतके गरम आहे की, जर आपण नदीकाठच्या चिखलात पाय ठेवले असता एका सेकंदा पेक्षा कमी वेळात आपली पायाची त्वचा पाण्याचा उष्णतेने जळते.

पेरूमधील अमेझॉन जंगलात असलेल्या या नदीची लांबी 6.4 किमी इतकी आहे. ही नदी सर्वात पहिल्यांदा अँड्रेस रुजोने या शास्त्रन्यने शोधुन काढली होती. शास्त्रन्य अँड्रेस हे पेशाने भू-थर्मल वैज्ञानिक आहेत. लहान वयात असताना शास्त्रन्य अँड्रेस हे आपल्या आजोबांकडून अशा उकळत्या पाण्याची नद्या बद्दलच्या गोष्टी ऐकत असत आणि जेव्हा ते भू-भौतिक शास्त्रज्ञ झाले, तेव्हा त्याने लहानपणी ऐकलेल्या कथा खरोखर सत्यात उतरवण्याचे ठरवले. याच सत्यापनासाठी ते अमेझॉनला गेले.

अमेझॉनच्या खोऱ्यात, शास्त्रन्य रुजो यांनी अथक परिश्रमा नंतर ती आश्चर्यकारक उकळत्या पाण्याची नदी शोधून काढली. उकळत्या पाण्यासारख्या चार मैलांच्या लांब नदीतून गरम वाफेचे लोट निघतात आणि विविध प्राणी व पक्ष्यांची मुत शव नदीच्या पाण्यात तसेच पडून आहेत. या नदीचे काही भाग इतके उष्ण आहेत. असे म्हणतात की त्यामध्ये पडलेले विविध प्राणी त्वरित उकळून जळून गेले आहेत, असे भू-वैज्ञानिक शास्त्रज्ञ अँड्रेस रुझो सांगतात.

 

 

नदीचे रहस्य…

तुम्हाला काय वाटत.. या परिसरातील आसपासच्या ज्वालामुखीच्या भूगर्भीय उष्णतेमुळे नदीचे पाणी उष्ण असेल. असाच विचार प्रथमदर्शनी शास्त्रज्ञांनी सुद्धा केला. कारण विषेतत अशी गरम पाण्याची तळी अथवा स्रोत सामान्यत: सक्रिय ज्वालामुखींच्या आसपास आढळतात. परंतु, आश्चर्याची बाब म्हणजे या नदीवरील सर्वात जवळचा सक्रिय ज्वालामुखी हा 400 मैल अंतरावर आहे. तसेच शास्त्रन्यांना अमेझॉन जंगलात कोणत्याही प्रकारचा भूमिगत मॅग्मा आढळून आला नाही.

शास्त्रज्ञांनी या नदीच्या पाण्याचे रासायनिक विश्लेषण केले असता त्यांना असे आढळले आहे की, या नदीचे पाणी पावसाचे पाणी होते. या पाण्यात असलेले हे रसायन देखील या उष्णतेचे स्रोत नाही. हे पाणी सामान्य पावसाच्या पाण्यासारखे आहे आणि ते पिण्या योग्य आहे. रुझोने असे समजले की जेव्हा अँडिस पर्वतावर पाऊस पडतो तेव्हा पाणी जमिनीत शिरते आणि अमेझॉनच्या खोऱ्यात भूमिगत प्रवास करते.

 

असे होते नदीचे पाणी गरम…

विषुववृत्तीय प्रदेशात स्थित असल्याने, शास्त्रज्ञांना प्रथम कल्पना होती – नदीच्या पाण्याने सूर्याच्या उष्णतेमुळे गरम होते काय? परंतु अधिक तपशीलवार विश्लेषणामध्ये त्यांना असे आढळले आहे की एक म्हणजे नदीचे पाणी उकळण्यास सूर्य (सौर ऊर्जा) जबाबदार नसुन तर पृथ्वीच्या भूगर्भीय कवच मधील फॉल्ट रेषांमधून वाहणारे गरम झरे आहेत. कारण भूगर्भातील तलावांमधून पाण्याचा बहिर्गमन आहे. हे आपल्याला पृथ्वीतील विपुल उर्जा साठाकडे निर्देश करते.

पृथ्वीची भूगर्भीय उर्जा ही पाणी गरम करते, जी नंतर पावसाच्या मध्यभागी असलेल्या फॉल्ट लाइनला मिळते आणि उकळत्या नदीचे रूप धारण करते. शास्त्रज्ञ रुझोच्या मते, हा एक विशाल हायड्रोथर्मल सिस्टमचा एक भाग आहे जो या ग्रहावर अद्वितीय आहे, कारण तो या आधी कुठीही आढळलेला नाही.

 

जगातील एकमेव उकळत्या पाण्याची नदी
Image source: TED/Boilingriver.com

 

जर आपण पृथ्वीची तुलना मानवी शरीराशी केली असता. पृथ्वीची फॉल्ट लाइन, टेक्टोनिक प्लेटच्या क्रॅकला धमनी मानले जाऊ शकते. विशेषतः या धमन्या किंवा क्रॅक सामान्यपणे गरम पाण्याने भरल्या जातात आणि जेव्हा गरम पाण्याचा हा प्रवाह पृथ्वीच्या पृष्ठभागावर वाहतो, तेव्हा आपण तो एक नैसर्गिक आश्चर्य म्हणून पाहतो; अशा या उकळती गरम पाण्याची नदी.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे या उकळत्या पाण्याच्या दरम्यान, अँड्रेस आणि त्याच्या सहकारी जीवशास्त्रज्ञांनी अशा काही नवीन लहान प्रजाती शोधल्या आहेत ज्या या अत्यंत तापमानातही टिकून राहण्यास सक्षम आहेत.

परंतु तरीही तेथील स्थानिक आदिवासी लोक या नदीत पोहतात. परंतु ते तेव्हाच शक्य होते, जेव्हा मुसळधार पावसानंतर पावसाचे पाणी त्यात मिसळते आणि नदीच्या पाण्याचे तापमान कमी होते. अशा प्रकारे ते हे पाणी पिणे, स्वयंपाकासाठी आणि इतर दैनदिन कारणांसाठी वापर केला जातो.

 

जगातील एकमेव उकळत्या पाण्याची नदी
Image source: TED/Boilingriver.com

 

स्थानिक आदिवासींमध्ये या नदीविषयी अनेक अंधश्रद्धा आहेत. नदीच्या भोवती तेल व नैसर्गिक वायूची साठे असल्या कारणाने वैज्ञानिकांना भीती आहे की, त्याचा नदी आणि त्याच्या जैवविविधतेवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. त्यांच्या मते, जगातील उकळत्या पाण्याच्या या एकमेव नदीचे योग्यप्रकारे जतन करण्यासाठी आता सर्व संबंधित लोकांना जागरूक होण्याची गरज आहे.

शास्त्रज्ञ अँड्रेस रुजो यांनी यापूर्वी नदी व तेथील पर्यावरण व्यवस्था टिकविण्यासाठी “उकळत्या नदी संवर्धन प्रकल्प” हाती घेण्याची योजना आखली आहे. या प्रकल्पाचा उद्देश स्थानिक आदिवासी आणि तेल आणि वायू कंपन्यांद्वारे होणारी जंगलतोड, जंगले जाळणे इत्यादी थांबवून या भागाच्या जैवविविधतेचे रक्षण करणे आणि त्या प्रदेशाचे महत्त्व अधोरेखित करणे हा आहे.

 

आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

शेयर करा:

1 thought on “जगातील एकमेव उकळत्या पाण्याची नदी …”

Comments are closed.