व पु काळे यांचे विचार | V.P Kale Thoughts & Quotes in Marathi

व पु काळे (V.P Kale) म्हणजेच वसंत पुरुषोत्तम काळे. मराठी साहित्यीक विश्वावर अधिराज्य गाजवणारे एक नाव. त्यांचा जन्म 25 मार्च 1932 (मृत्यू 26 जुन 2001) साली झाला. साहित्यीक लेखक, कादंबरीकार, कथाकथन अशी प्रचिती असलेले व.पु. काळे हे पेशाने वास्तुविशारद होते. अनेक पुरस्कारांचे धनी असलेले व. पु. काळे यांच्या लिहण्याला तोड नाही, जरी आज व.पु. काळे हयात नसले तरीही त्यांचे साहित्य वर्षों वर्ष रसिकांच्या मनावर कायम अजरामर राहिल. म्हणूनच आज आम्हीत त्यांचे निवडक विचार (Va Pu Kale Thoughts & Quotes in Marathi, V Pu Kale Marathi Suvichar) या वेबपेज वर शेअर करणार आहोत. आम्हांला आशा आहे की, तुम्हांला ते नक्की आवडतील.

 

व पु काळे यांचे विचार | V.P Kale Thoughts & Quotes in Marathi :

व पु काळे यांचे विचार | V.P Kale Thoughts & Quotes in Marathi

विकायच ठरवीलं तर फुल सुध्दा तराजुत टाकवी लागतात, विकणार्‍यांने फुलांचं वजन विकाव, सुगंध वेड्या माणसानं वजनात किती फुल येतात हे मोजू नये. – व पु काळे (गोष्ट हातातली होती)


कोणताही स्वार्थ नसतो, तेव्हाच माणूस शांतपणे इतरांच्या समस्या ऐकतो. – व पु काळे (वपुर्झा)


दॄष्टीवर वाजवीपेक्षा जास्त विश्वास टाकला कि चुकीची वाट सुध्दा बरोबर वाटायला लागते. – व पु काळे (ही वाट एकटीची)


आपल्या वाचून कुणाचं तरी अडतं हि भावना सौख्यदायक असते. – व पु काळे (वपुर्झा)


Read More : स्वामी विवेकानंद यांचे अनमोल विचार | Swami Vivekananda Quotes in Marathi


व पु काळे यांचे विचार | V.P Kale Thoughts & Quotes in Marathi

Ambulance वरील अक्षरे उलटी असतात कारण प्रत्येक जीविताचा प्रवास हा जीवनाकडून मरणाकडे चालू असतो, फक्त Ambulance मधील व्यक्तीचा प्रवास हा उलटा मरणाकडून जीवनाकडून चालू असतो. – व पु काळे (मोडेन पण वाकणार नाही)


आपत्ती पण अशी यावी कि, त्याचाही इतरांना हेवा वाटावा, व्यक्तीचा कस लागावा. पडुन पडायचचं तर ठेच लागुन पडु नये. चांगलं दोन हजार फुटांवरुन पडावं. माणुस किती उंचावार पोहोचला होता हे तरी जगाला समजेल. – व पु काळे (वपुर्झा)


दुखा:चा विचार करत बसलं की समोर उभं असलेल सुख पण डोळ्यांना दिसत नाही.- व पु काळे (वपुर्झा)


संशयाने एकदा समजूतदारपणाची वाट अडवली की माणूस सत्य जाणून घेण्याचा खटाटोपच करीत नाही. – व पु काळे (वपुर्झा)


Read More : लोकमान्य टिळक यांचे प्रेरणादायी विचार | Lokmanya Tilak Quotes in Marathi


व पु काळे यांचे विचार | V.P Kale Thoughts & Quotes in Marathi

ज्याला प्रेम समजत, शब्द समजतो तो वेळ पाळतो नि ज्याला फक्त स्वार्थ समजतो तो वेळ साधतो.- व पु काळे  (फँटसी एक प्रेयसी)


निसर्गाचा, सौंदर्याचा, मोठेपणाचा कशाचाही साक्षात्कार झाला की हात जुळतात.- व पु काळे (संवादिनी)


निसर्ग आणि नियती देण्यासाठी आतुर आहे. तुमच्यात आणि नियतीच्या मध्ये जर काही अडथळा असेल तर तो अडथळा म्हणजे तुमचे पसरलेले हात.- व पु काळे


कुणाचा तरी मुलगा होणं टाळता येत नाही. कुणाचा तरी बाप होणं टाळता येतं.- व पु काळे (माणसं)


Read More : चाणक्य नीति सुविचार मराठी | Best Chanakya Niti Suvichar in Marathi


व पु काळे यांचे विचार | V.P Kale Thoughts & Quotes in Marathi

आयुष्यात समंजस जोडीदार आणि गुणी संतती लाभली की धकाधकाची वाटचाल सरळ वाटते. निखारे सौम्य होतात. काट्यांची टोकं बोथट होतात आणि सारं सोपं सोपं होऊन जातं.- व पु काळे (गुलमोहर)


आपलाही कोणाला कंटाळा येऊ शकतो, ही जाणीव फार भयप्रद आहे. – व पु काळे (वपुर्झा)


स्वतःचे अनुभव उगीचच इतरांना सांगू नयेत. इतरांना एक तर ते अनुभव खोटे वाटतात किंवा आपण खोटे आहोत, असं वाटायला लागतं. ज्याने-त्याने स्वतःच्या मालकीचे अनुभव घ्यावेत.- व पु काळे (वपुर्झा)


अपेक्षीत गोष्टीपेक्षा अनपेक्षीत गोष्ट जास्त आनंद देते. – व पु काळे (महोत्सव)


खर्च झाल्याचं दु:ख नसतं, हिशोब लागला नाही की त्रास होतो. – व पु काळे (वपुर्झा)


व पु काळे यांचे विचार | V.P Kale Thoughts & Quotes in Marathi

आठवणी ह्या मुंग्याच्या वारूळाप्रमाणे असतात. वारूळात पाहून आतमध्ये किती मुंग्या असतील याचा अदमास होत नाही पण एका मुंगीने बाहेरचा रस्ता धरला की एका मागोमाग एक अश्या असंख्य मुंग्या बाहेर पडतात. आठवणीचं ही तसचं आहे. – व पु काळे (वपुर्झा)


सगळे कागद सारखेच. त्याला अहंकार चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते. – व पु काळे (वपुर्झा)


खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.- व पु काळे (वन फॉर द रोड)


सोन्याकडुन सुवासाची अपेक्षा मुळीच नाही, पण कमीतकमी सोन्याचे गुणधर्म तरी पूर्णत्वाने हवेत की नाहीत? अपुर्णतेत मजा आहे, पण माणूस ते कुठपर्यंत मानतो? जोपर्यंत ती अपुर्णता त्याच्या वाट्याला येत नाही तोपर्यंतच.- व पु काळे (गुलमोहर)


आपल्या वाचून कुणाचं तरी अडतं हि भावना सौख्यदायक असते. - व पु काळे (वपुर्झा)

शस्त्रक्रिया होण्यापूर्वी रोगी घाबरलेला असतो, बरा झाल्यावर शिवलेली जखम तोच कौतुकाने दाखवत सुटतो. – व पु काळे (वपुर्झा)


प्रश्नांपासून नेहमी पळता येत नाही. कधी ना कधी ते पळणार्‍याला गाठतातच. पळवाटा मूक्कामाला पोहचवत नाहीत. मूक्कामाला पोहचवतात ते सरळ रस्तेच. – व पु काळे (वपुर्झा)


मार्गदर्शन फक्त एकाच बाबतीत करता येतं. कोणत्या रस्त्याने गेलं तर shortcut पडतो, इतकंच मार्गदर्शन करता येतं. मुक्कामाचं ठिकाण प्रवाशानेच पसंत करायचं असतं.- व पु काळे (वपुर्झा)


बोलायला कुणीच नसण्यापेक्षा आपण बोललेलं समोरच्यापर्यंत न पोचणं हि शोकांतिका जास्त भयाण. – व पु काळे (वपुर्झा)


व पु काळे यांचे विचार | V.P Kale Thoughts & Quotes in Marathi

नजर शाबूत असलेला बाप मुलाला एकदाच जन्म देऊन थांबत नाही,आयुष्यभर तो जन्मच देत असतो. – व पु काळे


मन:स्ताप ही अवस्था अटळ. पण आपणच संघर्ष टाळू शकलो तर, तडा गेलेल्या काचेच्या भांड्याचे दोन्ही तुकडे जागच्या जागी राहतात. त्यातून पाणी पिता आलं नाही तर त्यात फुलं ठेवता येतात. – व पु काळे (रंग मनाचे)


मुर्ख प्रश्नांना तशीच उत्तरं सतत शोधण्याचा आणि त्याची पुर्वतयारी करण्याचा ताण विलक्षण असतो. त्यात आपण चांगलं काम करण्याची शक्ती गमावून बसतो. – व पु काळे (रंग मनाचे)


चार गोड शब्द बोलणं म्हणजे इवल्याशा खारीच्या पाठीवर रामाची बोटं उमटवणं. – व पु काळे (रंग मनाचे)


व पु काळे यांचे विचार | V.P Kale Thoughts & Quotes in Marathi

प्रत्येक व्यक्ती आपापल्या स्वभावानुसार वागत असली तरी सुध्दा त्या वागण्याचा एक अपराधी भाव मनात रेंगाळत असतो. अशा विचारांना एखाद्या प्रतिभावंताचा आविष्कार लाभला तर लग्न झालेल्या मुलीला पहिले तीन-चार दिवस पाठराखीन का हवी असते ते कळतं.- व पु काळे (वन फॉर द रोड)


कोणत्याही व्यक्तिच्या मृत्यूबद्दल, त्याची हळहळ संपली की स्मारकं संपली. राहतात त्या तसबिरी ! – व पु काळे (रंग मनाचे)


तंत्रावर फक्त यंत्रच जिंकता येतात. मन जिंकण्यासाठी मंत्र सापडावा लागतो. – व पु काळे (रंग मनाचे)


माणसं शरीरानं जवळ येत चालली म्हणून जेवढी ती शरीरानं जवळ येत आहेत तेवढी मनानं अंतर तुटलं जाणार नाही एवढ्या अंतरावर जात आहेत.- व पु काळे


व पु काळे यांचे विचार | V.P Kale Thoughts & Quotes in Marathi

माणसाला जीवाभावाची सखी एकच. तिचं नाव वेदना, सुख, समाधान, आनंद हे सगळे Birds of Passage वेदना मरेपर्यंत सोबत करते तर आपण तिचाच राग करतो.- व पु काळे (वपुर्झा)


माणूस मस्त असला की प्रथम डोळे हसतात आणि डोळ्यांना आनंद अनावर झाला म्हणजे ओठ लाफतात.- व पु काळे


आपण जागे झालो, म्हणजे स्वप्नातलं थोडं थोडं आठवतं, पण स्वप्नात गेलो म्हणजे जागेपणातलं काहीच आठवत नाही. स्वप्नातही जो जागा राहतो तो माणूस.- व पु काळे


प्रत्येक माणसाचे दोन चेहरे असतात. एक जगत असतो अन् दुसरा वागत असतो. वागणारा दिसत असतो अन् जगणारा पाहावा लागतो डोकावून.- व पु काळे (वपुर्झा)


व पु काळे यांचे विचार | V.P Kale Thoughts & Quotes in Marathi

आयुष्याची व्याख्या अत्यंत सोपी आहे. दोन गरजांची स्पर्धा म्हणजे आयुष्य. ज्याची गरज अगोदर संपते तो तुम्हाला सोडून जातो.- व पु काळे (वपुर्झा)


स्वप्न आणि ध्येय यांचा फार जवळचा संबंध आहे. स्वप्न पूर्ण करण्याचे ध्येय आणि ध्येय पूर्ण करण्याचे स्वप्न दोन्ही महत्वाचे आहे. या दोन्ही पैकी एकही नसेल तर तो माणूस अनोळखी मार्गावर आंधळेपणाने चालत असतो जेथे ना स्वप्नपूर्तीचा आनंद भेटतो, ना ध्येयपूर्तीचे समाधन भेटते. ना जगण्याचे महत्व कळते.- व पु काळे


श्रध्दा ही उघड्या डोळ्यांनी करावी हे पटले. मला असे वाटते कि ही श्रध्दाच माणसाला सशक्त बनवते. अपेक्षा न ठेवता केलेल्या श्रध्देचे फळ हे जास्त फलदायी, अधिक आनंद देणारे असते.- व पु काळे (रंगपंचमी)


व्याकुळावस्थेत स्वत:ची जी ओळख होते, ती ‘वास्तवता’.- व पु काळे (वपुर्झा)


माणुस हा एकच असा विषारी प्राणी आहे की ज्याच विषाचं मर्मस्थान सापडलेलं नाही.- व पु काळे (ही वाट एकटीची)


आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram