बिटकॉइन म्हणजे काय | What is Bitcoin in Marathi

बिटकॉईन काय आहे (Bitcoin Meaning in Marathi) :

आज प्रत्येकाला व्हर्च्युअल चलनाबद्दल जाणून घ्यायचे आहे. त्यातील एक जग प्रसिद्ध चलन म्हणजे बिटकॉइन (Bitcoin). बिटकॉईन दिवसेंदिवस खूप लोकप्रिय होत चालले आहे. परंतु बऱ्याच लोकांना हे बिटकॉइन काय आहे कोठे विकत घ्यायचे ह्या बद्दलची अजिबात माहित नाही, म्हणून आज या लेखात आम्ही आपल्याला सांगणार आहोत की, हा बिटकॉईन म्हणजे काय आणि ते कसे विकत घ्यायचे.

बिटकॉइन म्हणजे काय | What is Bitcoin in Marathi

 

बिटकॉइन चा शोध कोणी लावला :

बिटकॉइनचा संस्थापक सातोशी नाकामोटो (Satoshi Nakamoto) होते. त्यांनी सन 2009 मध्ये बिटकॉइनचा याचा शोध लावला. तेव्हापासून ते जगभरात क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) मधील हे एक लोकप्रिय चलन बनले आहे.

 

बिटकॉइन म्हणजे काय (What is Bitcoin in Marathi)

बिटकॉइन हे क्रिप्टोकरन्सी (Cryptocurrency) म्हणजेच एक प्रकारचं डिजिटल चलन (Digital Currency) आहे. ज्यास आपण सोप्या भाषेत इंटरनेट चलन असे देखील म्हणू शकतो.

आपण हे बिटकॉइन (Bitcoin) चलन हे कोणत्याही प्रकारचे नाणे आणि नोट नाही. आपण ते घरात किंवा बँकेत ठेव म्हणुन जमा करू शकत नाही. कारण आपण याचा उपयोग केवळ ऑनलाइन माध्यमातून घेऊ शकता.

बिटकॉइन म्हणजे काय | What is Bitcoin in Marathi

बिटकॉइन (Bitcoin) हे चलन असे आहे की, या चलनावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतीही बँक किंवा सरकारचा देखरेखीचा अधिकार नाही.

बिटकॉईन (Bitcoin) हे पीअर ते पीअर नेटवर्क (Peer To Peer Network) आधारावर कार्य करते. त्यामुळे बिटकॉइन ग्राहकांना ते चलन असल्याचे समजते. अशा प्रकारे ते जागतिक चलन म्हणून उदयास आले आहे.

अजून वाचा : क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय | What is Cryptocurrency in Marathi

 

बिटकॉइन कसे खरेदी करावे (How to buy Bitcoin in Marathi)

आपण आपल्या स्थानिक करेन्सी मार्फत देखील बिटकॉइन खरेदी करू शकता. एकतर आपण एखाद्या सेवेद्वारे त्यांची वस्तू विक्री करून त्या मोबदल्यात बिटकॉइन मिळवू शकता. याशिवाय कोणत्याही इंटरनेट वेबसाइट किंवा ॲप्लिकेशनच्या साहाय्याने तुम्ही बिटकॉइन मिळवू शकता.

जर आपण बिटकॉईनचे मूल्य (Bitcoin Price) बघितले तर आज एका बिटकॉइनची किंमत लाखों भारतीय रुपयांच्या बरोबरीची आहे. असे नाही की आपल्याला एक बिटकॉईन खरेदी करायचा असेल तर आपल्याला फक्त एक बिटकॉइन खरेदी करावा लागेल. आम्ही सांगू इच्छितो की, बिटकॉइनची सर्वात छोटी युनिट म्हणजे सातोशी (Satoshi) आणि एक बिटकॉइन ही 100 मिलियन सातोशी आहे. सातोशी हे नाव बिटकॉईनच्या जनक यावरून दिले आहे.

Bitcoin price inr

 

बिटकॉइनचे मुल्य कसे बदलते (How the value of Bitcoin changes in Marathi)

आज बिटकॉइनचा वापर वेगवेगळ्या हेतूंसाठी केला जात आहे आणि एखादी व्यक्ती ऑनलाईन खरेदी किंवा विक्री करू शकते. हे इतर कोणत्याही चलनाप्रमाणे आंतरराष्ट्रीय मूल्यमापन आधरे बिटकॉइनचे मूल्य देखील चढ उतार होत असते. जगातील एकूण बिटकॉइन्सची संख्या आधीच ठरलेली आहे आणि या चलनावर कोणत्याही संस्थेचे नियंत्रण नाही, त्यामुळे बिटकॉइनच्या मूल्यामध्ये अनेक चढउतार आहेत. इतर कोणत्याही बाजाराप्रमाणे, बिटकॉईनचे बाजार देखील मागणी पुरवठ्यावर आधारित आहे आणि या कारणास्तव बिटकॉइनची किंमत (Bitcoin Price) सतत वाढत आहे. अनेक बिटकॉइन एक्सचेंज (Bitcoin Exchange) आहेत जिथे बिटकॉइन व्यापार होतो.

 

बिटकॉइन कसे काम करते (How Bitcoin Works in Marathi)

बिटकॉइनवर अकाऊंट तयार केल्यावर आपल्याला एक यूनिक एड्रेस (Unique Address) प्रदान केला जातो. उदा समजा आपण एखादे बिटकॉइन खरेदी केले आहे व ते तुमच्या अकाऊंट मध्ये जमा करायचे आहे तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या अकाऊंटच्या यूनिक एड्रेस (Unique Address) ची आवश्यकता भासेल.

तर अशा प्रकारे आपण सहजपणे आपल्या बिटकॉइन वॉलेट (Bitcoin Wallet) मध्ये बिटकॉइन स्टोअर (Bitcoin Store) करू शकता. आपण बिटकॉइन विक्री करून ही पैसे कमवू शकता. परंतू त्या रुपयांना आपल्या बँके अकाऊंट मध्ये ट्रान्स्फर करण्यासाठी आपले बिटकॉइन वॉलेट (Bitcoin Wallet) असणे गरजेचे आहे.

 

बिटकॉइन वॉलेट म्हणजे काय (What is a Bitcoin Wallet in Marathi)

बिटकॉइन वॉलेट हे इतर पेमेंट वॉलेट प्रमाणेच आहे म्हणजे एक प्रकारचे सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे. ज्यामध्ये बिटकॉइन्स साठवून ठेवल्या जातात. परंतु खऱ्या अर्थाने ती कुठेही ठेवली जात नाही. बिटकॉईनचा स्वतःचा खाजगी क्रमांक असतो, म्हणजेच एक युनिक कोड असतो. जो बिटकॉइन वॉलेटमध्ये सुरक्षित ठेवला जातो. याच्या मदतीने आपण अगदी आरामात बिटकॉईन ट्रांस्केक्शन करु शकतो किंवा सहजपणे कुणाला ही हस्तांतरित करू शकतो. हे मोबाईल वॉलेटसारखेच आहे.

 

ब्लॉकचेन म्हणजे काय (What is Blockchain in Marathi)

बिटकॉइन (Bitcoin) आणि ब्लॉकचेन (Blockhain) यांचे कार्य भिन्न असेल तरी ते एकमेकांशी निगडीत आहेत. बिटकॉइन ब्लॉकचेन मध्ये राहणार्‍या डेटामध्ये व्यवहाराचा तपशील असतो. Sender, Receivers आणि Account यासारखी माहिती यात नोंदविली जाते.

ब्लॉकचेन (Blockhain) हे दोन शब्दांनी बनलेले आहे. पहिला ब्लॉक म्हणजे श्रृंखला आणि दुसरी चेन म्हणजे साखळी. थोडक्यात सांगायचं झाल्यास ब्लॉकचेन तंत्रज्ञानातील (Blockhain Technology) बरेच डेटा ब्लॉकने तयार केले जातात. याचा अर्थ असा की क्रिप्टोकरन्सी (डेटा) याच ब्लॉक्समध्ये ठेवला जातो. वेगवेगळ्या बॉक्समध्ये चलन (डेटा) असते आणि ते एकमेकांशी पूर्णपणे जोडलेले असतात. डेटाची एक लांब साखळी तयार होते. नवीन डेटा येतोच, तो एका नवीन ब्लॉकमध्ये समाविष्ट केला जातो आणि एकदा की ब्लॉक मध्ये डेटा समाविष्ट झाला की तो मागील ब्लॉकमध्ये जोडला जातो. अश्या प्रकारे सर्व ब्लॉक्स एकमेकांना जोडलेले असतात.

 

बिटकॉइन वापर कशासाठी केला जातो (What is Bitcoin used for in Marathi)

  • ऑनलाइन शॉपिंगसाठी आपण बिटकॉइन वापर करू शकता.
  • आपण जगात कुठेही पैसे पाठविण्यासाठी बिटकॉइन वापरू शकता किंवा बिटकॉइन प्राप्त करण्यासाठी देखील वापरू शकता.
  • आपण पैसा ऐवजी बिटकॉइनचा वापरू शकता.
  • आपण पैसे कमविण्यासाठी बिटकॉइन देखील वापरू शकता.
  • आपण बिटकॉइनची खरेदी व विक्री देखील करू शकता.

 

बिटकॉइनचे फायदे (Benefits of Bitcoin in Marathi) :

आपण जगात कोठेही सहजपणे बिटकॉइनची खरेदी आणि विक्री करू शकता. बिटकॉइनची देवाणघेवाण करण्यासाठी इतर चलनाच्या हांस्तातरित करण्यासाठी लागणाऱ्या फी पेक्षा कमी आहे आणि आपण यात दीर्घकालीन गुंतवणूक करू शकता. कारण बिटकॉइन आतापर्यंतच्या विक्रमात वाढत आहे. सरकार बिटकॉइनमध्ये तुमच्यावर अकाऊंटवर कुठल्याही प्रकारे लक्ष ठेवत नाही.

 

बिटकॉइनचे नुकसान (Disadvantages of Bitcoin in Marathi) :

बिटकॉइनचे बरेच फायदे असूनही त्याचे अनेक तोटे देखील आहेत. जसे की त्यावर कोणतेही कंट्रोलिंग ॲथॉरिटी बँक किंवा सरकार करत नाही. ज्यामुळे त्याची किंमत सतत वाढ कमी जास्त होत राहते. तसेच, जर आपले बिटकॉइन खाते हॅक केले असेल तर आपण बिटकॉइन काढू शकत नाही आणि सरकार यात आपल्याला मदत करू शकत नाही.

बिटकॉइनवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणतेही प्राधिकरण किंवा सरकार नाही, ज्यामुळे बिटकॉइनची किंमत वाढत किंवा कमी होत राहते, ज्यामुळे त्यात गुंतवणूक करणे थोडे धोकादायक असू शकते.

नियंत्रण नसल्या कारणाने काही व्यक्ती चुकीच्या गोष्टींसाठी देखील वापर करण्याची शक्यता असते. जसे की शस्त्रे खरेदी करणे, ड्रग्स पुरवणे इ. जे गुन्हेगारी पार्श्वभूमीवर वापर केले जाण्याची शक्यता असते.

जर तुमचे खाते एखाद्या हॅकरने हॅक केले असेल तर तुम्ही तुमचे बिटकॉइन गमावू शकता. सर्वात मोठा तोटा म्हणजे तुम्ही ते परत मिळवू शकत नाही.


आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

शेयर करा: