SEO म्हणजे काय ? SEO का आणि कसे करावे ? | What is SEO in Marathi

SEO काय आहे (What is SEO in Marathi) : जेंव्हा आपण एखादी Queries ही Google अथवा Bing यांसारख्या Search Engine मध्ये Search करतो तेंव्हा आपल्याला हवी असलेली माहिती बहुतेकदा पहिल्या पानावरच भेटून जाते. असे मुळीच नाही की ज्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या पेज वर Rank असलेल्या पोस्ट/आर्टिकल तुम्हाला हवी असलेली माहिती देत नाही, त्या सुद्धा तेवढीच माहिती प्रदान करत असतात, जेवढ्या First Page वर Rank करणाऱ्या वेबसाईट माहिती प्रदान करत असतात. परंतू First Page वर Rank करणाऱ्या मागे एकच Secret Factor काम करते ते म्हणजे SEO (Search Engine Optimization).

म्हणून तूम्ही तुमची वेबसाईट आणि ब्लॉग अशा प्रकारे बनवले पाहिजे की ते Search Engine मध्ये चांगल्या स्थानावर रँक करू शकेल आणि Organic Traffic मिळवू शकेल. म्हणून आपण SEO काय आहे व ते का महत्त्वाचे आहे हे अधिक चांगल्या रीतीने समजवून घेऊया.

SEO म्हणजे काय ? SEO का आणि कसे करावे ? | What is SEO in Marathi

 

SEO म्हणजे काय ? (What is SEO in Marathi)

SEO ही एक अशी प्रोसेस आहे, ज्याचा साहाय्याने आपण आपली वेबसाईट सर्च इंजिनच्या शोध परिणामांमध्ये आणू शकतो. तांत्रिकदृष्ट्या सांगायचे झाल्यास, Google Algorithm हे प्रत्येक वेबसाईट व ब्लॉगची रँकिंग सुनिश्चित करत असते.

कोणत्याही वेबसाईट किंवा ब्लॉगवर अधिक Traffic येण्यासाठी, आपण शोध परिणामांच्या शीर्षस्थानी असणे आवश्यक आहे.

बऱ्याचदा असे दिसून येते की एकाच विषयावर अनेक वेबसाईट्स आहेत, अशा स्थितीत तुमची वेबसाईट शोध परिणामांच्या रँकिंगमध्ये वर आणणे खूप महत्वाचे आहे, त्यासाठी SEO ची मदत घेतली जाते.

SEO सह तुमची वेबसाइट डिझायनिंग सुद्धा चांगली असणे हा सुद्धा एक महत्वाचा Factor आहे.

 

SEO चे पूर्ण फॉर्म (SEO Full Form in Marathi)

तुम्ही अनेकदा SEO बद्दल ऐकले असेल. एसईओ एक शॉर्ट फॉर्म आहे, ज्याचे पूर्ण नाव सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन असे आहे. जर तुम्ही तुमची एखादी वेबसाईट किंवा ब्लॉग चालवत असाल तर तुमच्यासाठी SEO बद्दल माहिती असणे खूप महत्वाचे आहे.

 

SEO का महत्त्वाचे आहे (Why SEO is important in Marathi)

बहूंताश लोक Google किंवा Bing सारख्या Search Engine वर काही Search करतात, तेव्हा ते फक्त पहिल्या पेजवर आलेल्या वेबसाईटला भेट देतात. खुप कमी लोक दुसऱ्या पेज पर्यंत जातात. कारण त्यांना आधीच माहिती प्राप्त झालेली असते. बोलतात ना, First Impression is Last Impression त्या प्रकारचे हे सुद्धा आहे.

म्हणून आपल्या वेबसाईटवर किंवा ब्लॉगवर Traffic वाढवण्यासाठी SEO करणे आवश्यक आहे. आजकाल, जर तुम्हाला कोणत्याही गोष्टीबद्दल जाणून घ्यायचे असेल, तर सर्वात आधी आपण Google वर सर्च करतो. अशा परिस्थितीत जर तुमची वेबसाईट गुगलच्या वरच्या पानावर आली तर त्याचा फायदा तुम्हालाच होईल.

 

SEO in Marathi

 

Search Engine ची तीन मुख्य प्रक्रिया आहेत

Crawl करणे :

Google किंवा Bing यांसारख्या Search Engine चे स्वतःचे Boat असतात. जे इंटरनेटवर नवनवीन उपलब्ध झालेल्या माहितीची शोध घेऊन ते पेज Crwal करतात. त्यानंतर ते पेज Search Engine वर Index करण्याची प्रक्रिया सुरू होते.

 

Indexing होणे :

Crwaling प्रक्रियेदरम्यान नवीन उपलब्ध झालेली सामग्री संग्रहित करते आणि जतन करते. त्यानंतर पेज रँकिंग करण्याची प्रक्रिया सुरू होते.

 

Rank होणे :

तुम्ही उपलब्ध केलेली माहिती अचूक आहे व इतर सर्व SEO चे सर्व नियम मान्य करत असेल. तर तुमच्या पोस्ट अथवा पेज सर्व अल्गोरिदमच्या आधारे सूनिश्चित करून रँकिंग सुधरवण्यास मदत केली जाते.

 

SEO चे फायदे (Benefits of SEO in Marathi)

ब्लॉगचे SEO करण्याचे बरेच फायदे आहेत, काही महत्वाचे फायदे पाहू.

  • SEO करून वेबसाईट सर्च इंजिन रिझल्ट (Search Engine Results) मध्ये First Page वर रँक करता येते.
  • SEO करून वेबसाईटचा Organic Traffic वाढवता येते.
  • SEO केल्याने तुमच्या वेबसाईटचा Trust Ratio वाढतो. जेव्हा तुम्ही SEO करता. तेव्हा Google Algorithm च्या दृष्टीने तुमच्या वेबसाईटचे मूल्य वाढते.
  • जेव्हा तूम्ही एखादे Articles Publish करता तेव्हां SEO हे तुमच्या आर्टिकलला पटकन रँक होण्यास मदत करते.
  • जेव्हा तुम्ही वेबसाइटची SEO ‘योग्य’ पद्धतीने करता आणि तुमची वेबसाइट Google च्या ‘First Position’ वर येतेच. परंतू ह्याचा फायदा इतर आर्टिकल व पोस्ट त्यांच्या रँकिंग Growth होण्यास सुद्धा मदत होते. कारण Google/Bing यांसारख्या Search Engine मध्ये तुमच्या वेबसाईटचा Trust Ratio वाढला जातो.
  • जेव्हा वेबसाईट User Friendly SEO च्या दृष्टीने बनवली जाते तेव्हा ती User’s ला चांगला अनुभव प्रदान करत असते आणि वेबसाईट जितकी जास्त युजरला अनुकूल असेल तितकी ती तुमच्या वेबसाईटला Search Engine मध्ये रँक होण्यास मदत होते.

आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

शेयर करा: