वेब होस्टिंग म्हणजे काय | What is Web Hosting in Marathi

Web Hosting Information in Marathi :

जर आपण एखादी वेबसाईट तयार करण्याचा किंवा ब्लॉगिंग मध्ये करिअर करण्याचा विचार करत असाल तर सर्वात आधी वेब होस्टिंग म्हणजे काय ते कसे काम करते, ते का गरजेचं आहे हे समजून घेतले पाहिजे.

वेब होस्टिंग म्हणजे काय (Web Hosting meaning in Marathi) असा प्रश्न सर्वांच्या मनात कधीना कधी येतोच. वेब होस्टिंग कसे काम करते त्यांचे प्रकार काय आणि ते का गरजेचं असते अश्याच अनेक प्रश्नांची उत्तरे आज आम्ही या लेखात तुम्हाला देणार आहोत.

वेब होस्टिंग म्हणजे काय | What is Web Hosting in Marathi

आज खुप सारे नवे ब्लॉगर असे आहेत जे जाहिरातींना व अज्ञानाने किंवा चुकीच्या माहितीच्या आधारे चुकीची होस्टिंग खरेदी करून पैसे आणि वेळ दोन्ही गमावून बसले आहेत. त्यासाठी त्याची पुरेपूर आवश्यक माहिती असणें आवश्यक आहे.

जेव्हा तुम्ही तुमची प्रोफेशनली बिझिनेस वेबसाइट किंवा ब्लॉग तयार करण्याचा विचार करता तेव्हा तुमच्याकडे 2 गोष्टी असणे आवश्यक आहे. प्रथम म्हणजे डोमेन नेम आणि दुसरे म्हणजे वेब होस्टिंग. या दोन्ही शिवाय आपण इंटरनेटवर वेबसाइट किंवा ब्लॉग तयार करू शकत नाही. (अपवाद: ब्लॉगरस्पॉट वगळता)

 

वेब होस्टिंग म्हणजे काय (What is Web Hosting in Marathi) :

कोणताही ब्लॉगर आणि वेब डेव्हलपर आपली माहिती, प्रतिमा, व्हिडिओ इ. सारखी त्यांची वेब फाइल आणि मीडिया माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी वेब होस्टिंग सेवा वापरतात.

समजा, तुमच्या कडे जुन्या पद्धतीचा कॉम्प्युटर आहे. तो सी.पी.यू (CPU) शी कनेक्ट आहे आणि त्यामध्ये तुम्हाला फास्ट ॲक्सेस करता यावा यासाठी स्पेसिफिक रॅम (RAM), प्रोसेसर (Processor) आणि स्टोअर करता यावी यासाठी हार्ड डिस्क यासारखे Device जोडले असता आणि तुम्ही तुमच्या आवश्यक असलेली सर्व माहिती त्यात जतन करून ठेवत असता आणि गरज भासेल तेव्हा सहजपणे ती ॲक्सेस करु शकता. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झाल्यास तुमचा सी.पी.यू (CPU) हाच तुमचा पर्सनल सर्व्हर आहे आणि तुम्ही त्यात तुमची माहिती त्यात होस्ट करत आहात.

जेव्हा आपण एखादया होस्टिंग कंपनीच्या सर्व्हरवर आपली वेबसाइट किंवा ब्लॉग होस्ट करता तेव्हात्या ब्राउझरमध्ये आपल्या वेबसाइटची URL टाईप करुन जगभरातील युजर आपल्या वेबसाइटवर येऊन त्यावरील सामग्री पाहू शकतात आणि जगातील कुटल्याही कानाकोपऱ्यातून सहजपणे ॲक्सेस करु शकतात.

ही होस्टिंग आपल्याला वेब होस्टिंग सर्व्हिस प्रदाता (Hosting Service Provider) कडून प्रदान केली जाते.

 

वेब होस्टिंगचे प्रकार (Types of Web Hosting in Marathi) :

वेब होस्टिंगचे मुख्यत: चार प्रकाराचे असतात. ते पुढीलप्रमाणे :

  • शेअर्ड वेब होस्टिंग (Shared Web Hosting)
  • डेडिकेटेड होस्टिंग (Dedicated Web Hosting)
  • व्हीपीएस वेब होस्टिंग (VPS Web Hosting)
  • क्लाऊड वेब होस्टिंग (Cloud Web Hosting)
1. शेअर्ड वेब होस्टिंग (Shared Web Hosting) :

शेअर्ड वेब होस्टिंग (Shared Web Hosting) म्हणजेच सामायिक वेब होस्टिंग होय. त्याच्या नावाप्रमाणेच या वेब होस्टिंग मध्ये एकापेक्षा जास्त वेबसाईट एकाच वेळी होस्ट केल्या जाऊ शकतात. शेअर्ड वेब होस्टिंग (Shared Web Hosting) मध्ये सर्व्हरची डिस्क स्पेस आणि कॉन्फिगरेशन जसे की सीपीयू, रॅम आणि प्रोसेसर इ. अनेक वापरकर्त्यां (Users) मध्ये विभागले जातात.

जेणेकरून एकापेक्षा अधिक वापरकर्ते एका वेबसाईटवर सहजपणे त्यांची वेबसाइट चालवू शकतील. शेअर्ड वेब होस्टिंग (Shared Web Hosting) खूप स्वस्त आहे. म्हणूनच असे नवीन ब्लॉगर्स जे प्रथमच वेबसाईट बनवित आहेत आणि ज्यांच्याकडे जास्त बजेट नाही त्यांच्यासाठी ह्या वेब होस्टिंगसाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.

 

2. डेडिकेटेड होस्टिंग (Dedicated Web Hosting) :

डेडिकेटेड होस्टिंग (Dedicated Web Hosting) मध्ये वेबसाइटच्या मालकाचे सर्व्हरवर संपूर्ण नियंत्रण असते. यात वेबसाइटच्या मालकास त्याच्या स्वत: च्या सोयीने Hosting व्यवस्थापित करण्याची मुभा दिली जाते.

तो त्याच्या आवश्यकता नुसार संपूर्ण होस्टिंग सेट करू शकतो. जसे की ऑपरेटिंग सिस्टम, हार्डवेअर आणि मेमरी इ. वेबसाईट मालकाच्या नियंत्रणाखाली असतात.

डेडिकेटेड होस्टिंगचा सर्व्हर केवळ एका वेबसाइटच्या डाटा (Data) स्टोअर करतो. म्हणून त्याची स्पीड सर्वात वेगवान असते. त्यामुळे ती अधिक महाग सुद्धा असते. उदा. फ्लिपकार्ट, अमेझॉन, स्नॅपडील इत्यादी सर्व मोठ्या शॉपिंग साईट ह्या डेडिकेटेड होस्टिंग (Dedicated Web Hosting) चा वापर करतात.

 

3. व्हीपीएस वेब होस्टिंग (VPS Web Hosting) :

व्हीपीएस होस्टिंगचे पूर्ण नाव Virtual Private Servers (व्हर्च्युअल खाजगी सर्व्हर) होस्टिंग आहे, हे होस्टिंग शेअर्ड होस्टिंगपेक्षा अधिक विश्वसनीय आणि स्थिर आहे.

यामध्ये सर्व्हर इतर वापरकर्त्यांसह सामायिक केला गेला आहे. परंतु या सर्व्हरचे वेब होस्ट प्रत्येकास स्वतंत्र विभाजन देते.

व्हीपीएस वेब होस्टिंग (VPS Web Hosting) मध्ये एकापेक्षा अधिक व्हर्च्युअल मशीन (Virtual Machine) तयार करण्यासाठी व्हर्च्युअलायझेशन तंत्रज्ञानाचा वापर करून स्टोरेज, CPU सी.पी.यू (CPU) आणि रॅम (RAM) इत्यादी Physical सर्व्हर द्वारे तयार केली जातात आणि ही वेगवेगळ्या व्हर्च्युअल मशीन्स वेगवेगळ्या सर्व्हरप्रमाणे कार्य करतात. यानंतर, प्रत्येक व्हर्च्युअल मशीनमध्ये एक वेबसाइट होस्ट केली जाते.

ह्यालाच आपण ‘व्हर्च्युअल सर्व्हर’ असे म्हणतो. ज्याद्वारे आपल्याकडे स्वतःचे सर्व्हर स्पेस, आणि मेमरी रिझर्व्ह केेलेली असते.

व्हीपीएस वेब होस्टिंग (VPS Web Hosting) हे Shared Hosting आणि Dedicated Web Hosting हे एकमेकांचे एकत्रीकरण आहे. Shared Web Hosting सारख्या एकाधिक सर्व्हरवर एकाधिक वेबसाइट होस्ट केल्या जातात आणि Dedicated Web Hosting (समर्पित वेब होस्टिंग) मध्ये एका सर्व्हरवर फक्त एक वेबसाइट होस्ट केली जाते.

 

4. क्लाऊड वेब होस्टिंग (Cloud Web Hosting) :

क्लाऊड वेब होस्टिंग (Cloud Web Hosting) ही होस्टिंग सर्व्हिस मधील खूप लोकप्रिय अशी होस्टिंग आहे. आजच्या काळात हे सर्वात जास्त वापरले जाणारी होस्टिंग असेल तर क्लाऊड होस्टिंगच आहे. ही होस्टिंग व्हीपीएस होस्टिंग सारखीच आहे. यातही व्हर्च्युअल मशीनचा वापर केला जातो.

क्लाऊड वेब होस्टिंग (Cloud Web Hosting) मध्ये आपले होस्ट सर्व्हरचा एक सेट प्रदान करते. ज्यामध्ये बर्‍याच फाईल्स आणि इत्यादी सर्व संसाधने डुप्लिकेट कॉपी तयार केल्या जातात आणि जग भरातल्या सर्व सर्व्हर मध्ये ते स्टोअर केल्या जातात. जर एखादा सर्व्हर व्यस्त असेल किंवा सर्व्हरमध्ये समस्या असेल तर. तर आपल्या वेबसाइटची Traffic रहदारी आपोआप दुसर्‍या सर्व्हरवर ट्रान्स्फर केली जाते.

क्लाऊड वेब होस्टिंग (Cloud Web Hosting) मध्ये आपली वेबसाइट कोणत्याही सर्व्हरवर आहे (Shared Web Hosting किंवा Dedicated Web Hosting) त्यात होस्ट करण्याऐवजी हे वेगवेगळ्या सर्व्हरमध्ये होस्ट केले जाते.

क्लाऊडड वेब होस्टिंगमध्ये एक क्लस्टर सर्व्हर तयार करण्यासाठी बरेच सर्व्हर एकत्र केले गेले आहेत आणि या क्लस्टर सर्व्हरवर आपली वेबसाइट होस्ट केली जाते.

उदा. तुमच्या वेबसाईट वर येणारे युजर अमेरिका, कॅनडा अश्या देशातून आहे. परंतू तुमची वेबसाईट भारतील आहे आणि तुमची वेबसाईट Cloud hosting वर जोडली गेली आहे. अश्या वेळी युजर्सना तुमच्या वेबसाईट ॲक्सेस मिळवण्यासाठी भारतील सर्व्हरशी जोडण्याची गरज भासणार नाही. Cloud Hosting द्वारे त्यांच्या जवळपास असलेल्या सर्व्हरशी जोडण्यात येईल. अश्याने वेबसाईटचा वेग (Speed) अधिक जलद होईल आणि सर्व्हर डाऊन अश्या प्रकारच्या समस्या उद्भवणार नाहीत.

 

होस्टिंग घेताना घेव्याची काळजी

होस्टिंग घेताना आपण त्याच्या वैशिष्ट्यांची काळजी घ्यावी, तर वेब होस्टिंगची वैशिष्ट्ये काय आहेत हे जाणून घेऊया.

बँडविड्थ (Bandwidth) :

एका सेकंदात आपल्या वेबसाइटवर किती डेटा ॲक्सेस केला जाऊ शकतो त्याला आपण बँडविड्थ असे म्हणतो. जेव्हा कोणी आपल्या वेबसाईटवर प्रवेश करतो तेव्हा आपला सर्व्हर काही डेटाचा वापर करून माहिती शेअर करतो. जर आपली बॅन्डविड्थ कमी असेल आणि अधिकाधिक युजर्स आपल्या वेबसाइटवर प्रवेश करत असतील तर आपली वेबसाइट डाउन होण्याची संभावना अधिक असते.

याद्वारे आपण चांगल्या रीतीने समजु शकता की, आपल्या वेबसाईटवर येणार्‍या अभ्यागतांच्या दरम्यान डेटा बँडविड्थ काय हस्तांतरित (Transfer) केला जात आहे.

बँडविड्थ जितकी जास्त असेल तितके लोक कोणत्याही वेबसाइटवर कोणत्याही व्यत्ययाशिवाय एकाच वेळी प्रवेश करण्यात सक्षम होतील.

 

बॅकअप (Backup) :

ज्या प्रकारे आपल्या संगणकामधून संग्रहित डेटा (Stored Data) बॅकअप घेतला जातो. त्याचप्रमाणे सर्व्हरमध्ये संग्रहित डेटाचा बॅकअप घेणे तेेवढंच गरजेच असते.

सर्व्हर हा देखील संगणकाचा एक प्रकार आहे, जर एखाद्या तांत्रिक अडचणी मुळे सर्व्हर खराब झाला तर आपला डेटा गमावला जाण्याची चिंता असते. हीच समस्या कायम दुर करण्याकरिता आपण आपल्या वेब होस्टिंग प्रदात्या (Web Hosting Service Provider) कडून ‘बॅकअप’ ची सुविधा घेणे आवश्यक आहे.

 

एफटीपी ॲक्सेस (FTP Access) :

एफटीपी ॲक्सेसच्या मदतीने आपण सर्व्हरमध्ये स्टोअर केलेला डेटा आपल्या संगणकावर डाउनलोड करू शकता. आपण आपल्या वेबसाइटच्या एचटीएमएल/ पीएचपी / एपी फायली, ग्राफिक्स, प्रतिमा आणि व्हिडिओ इत्यादी आपल्या संगणकावरून वेब सर्व्हरवर एफटीपी मार्फत हस्तांतरित (Transfer) करू शकता.

 

डेटाबेस (Database) :

आपला होस्टिंग प्लॅन निवडताना आपण आपल्या डेटानुसार डिस्क स्पेस घेऊ शकता. म्हणजेच सर्व्हरवर ठराविक क्षमता वापरण्याची परवानगी देते. ज्यामध्ये आपण आपल्या यूजरसाठी समाविष्ट केेलेली सामग्री जसे की एचटीएमएल फायली (HTML File), प्रतिमा (Images) आणि व्हिडिओ (Videos) इत्यादी ठेवू शकता.

 

अपटाईम (Uptime) :

आजकाल प्रत्येक मोठ्या वेब होस्टिंग सर्विस कंपन्या अपटाइमच्या 99.99% ची हमी देतात. आपली वेबसाईट ऑनलाइन उपलब्ध होण्याच्या वेळेस अपटाईम असे म्हणतात. काही वेळा आपली वेबसाईट काही तांत्रिक अडचणींमुळे डाऊन होते, याचा अर्थ असा की आपल्याला ॲक्सेस करण्यास अडचणी येतात. आपण याला डाउनटाइम असे म्हणतो.

 

ग्राहक सहाय्यता (Customer Support) :

कोणत्याही वेब होस्टिंग सेवेचे हे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य आहे. प्रत्येक मोठया होस्टिंग कंपन्या ह्या त्यांच्या ग्राहकांना 24×7 ग्राहक सेवा प्रदान करतात. आपल्या वेब साईटवर कोणत्याही प्रकारची तांत्रिक समस्या असल्यास आपण आपल्या कस्टमर केअर सेंटरशी थेट कॉल करून, चॅट करून किंवा ईमेल पाठवून आपल्या समस्येबद्दल निराकरण करू शकता.

Read More : व्हीपीएन VPN काय आहे व ते कसे काम करते ? 


आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

शेयर करा: