विमा पॉलिसी म्हणजे काय, त्याचे प्रकार आणि महत्व | Insurance Policy in Marathi

विमा म्हणजे काय ? (What is Insurance in Marathi)

भविष्यात नुकसान होण्याची शक्यता कमी करण्यासाठी विमा हे प्रभावी शस्त्र आहे. उद्या काय होईल हे आम्हा तुम्हाला माहित नाही, म्हणून आपण विमा पॉलिसी द्वारे भविष्यात होणाऱ्या नुकसानीची भरपाई करण्याचा प्रयत्न करू शकता.

विमा म्हणजे जोखमीपासून संरक्षण. जर एखाद्या विमा कंपनीने एखाद्या व्यक्तीचा विमा उतरविला असेल तर विमा कंपनी त्या व्यक्तीला झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई करते. हे सर्व विमा कंपनीचे मुख्य उद्दिष्ट असते.

Read More : शेअर मार्केट म्हणजे काय | What is Share Market in Marathi

 

विमा पॉलिसी म्हणजे काय, त्याचे प्रकार आणि महत्व | Insurance Policy in Marathi

 

विम्याचे महत्त्व (Importance of Insurance in Marathi) :

विमा एक प्रकारे सुरक्षा कवच आहे. कोणत्याही गोष्टीचा विमा काढणे म्हणजे त्या गोष्टीच्या सुरक्षिततेची हमी घेणे असा होतो.

एखादी व्यक्ती आपल्या मौल्यवान वस्तूंचा विमा उतरवते. यापैकी सर्वात मौल्यवान त्याचे जीवन आहे. म्हणजेच जीवनात काहीही विपरीत घडल्यास त्या व्यक्तीच्या कुटुंबाला विम्याचे पैसे मिळतात.

विमा कुटुंबातील सदस्यांसाठी जीवनाचा आधार प्रदान करते. याशिवाय आरोग्य, घर, दुकान, कारचा विमा मिळविणे ही फायदेशीर आहे.

 

विमा पॉलिसी म्हणजे काय ? (What is Insurance Policy in Marathi)

प्रत्येक विमा कंपनीच्या काही अटी असतात. त्या विमाधारकाने त्याचे पालन केले पाहिजेत असे नमुद केलेले असते. म्हणुनच विमाधारकाने या अटींचे संपूर्णपणे वाचन करूनच मग विमा घ्यावा.

प्रत्येक कंपनीची रक्कम आणि नियमावली वेगवेगळे असतात. या विमा दस्तऐवजांना “विमा पॉलिसी (Insurance Policy)” असे म्हणतात.

 

विम्याचे प्रकार (Types of Insurance in Marathi) :
  • जीवन विमा (Life Insurance)
  • गृह विमा (Home Insurance)
  • आरोग्य विमा (Health Insurance)
  • वाहन विमा (Vehicle Insurance)
  • पीक विमा (Crop Insurance)
  • यात्रा विमा (Travel Insurance)

 

जीवन विमा (Life Insurance) :

लाईफ इ्शुरन्स (Life Insurance) ज्याला आपण जीवन विमा असे ही म्हणतो, हा एक प्रकारचा करार आहे. जो विमा विकणारी कंपनी आणि विमा पॉलिसी घेणारी व्यक्ती ह्या दोघांत हा करार झालेला असतो.

या कराराअंतर्गत, विमा कंपनी विमा पॉलिसी घेणार्‍याला हमी देते की, एखादी अनुचित घटना घडल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास विमा कंपनी त्या व्यक्तीच्या कुटूंबाला निश्चित रक्कम देण्यात येईल असे आश्वासन देते. जेणेकरुन त्या व्यक्तीच्या कुटुंबात कोणतेही आर्थिक संकट उद्भवणार नाही, ही रक्कम विमा कंपनीने मृत व्यक्तीच्या कुटुंबाला देण्यात येते.

एक ठराविक रक्कम विमा पॉलिसी घेण्याच्या वेळी निश्चित केली जाते. विमा पॉलिसी घेणार्‍या व्यक्तीला विशिष्ट कालावधीसाठी पॉलिसी घेण्याकरिता निश्चित रक्कम भरावी लागते.

आज प्रत्येक व्यक्तीला आपल्या कुटूंब आणि आपल्या मुलांच्या भविष्याची चिंता आहे, म्हणूनच इतर पॉलिसी पेक्षा जीवन विमा पॉलिसी घेण्याचे प्रमाण अधिक आहे. जेणेकरून त्यांच्या पश्यात (मृत्युनंतर) त्यांच्या कुटुंबाला कोणत्याही आर्थिक समस्यांना सामोरे जाण्याची गरज भासणार नाही.

 

गृह विमा (Home Insurance) :

स्वतचं घर असणें हे आपल्या सारख्या प्रत्येक सर्व सामान्यच स्वप्न असते. जर आपण आपल्या घराचा सामान्य विमा कंपनीसह गृह विमा उतरविला असेल तर आपल्या घराचे संरक्षण होईल.

गृह विमा पॉलिसी खरेदी केल्यानंतर, जर आपल्या घरास कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास तर विमा कंपनी त्यास नुकसान भरपाई म्हणुन पैसे देण्यात येईल.

आपल्या घरास होणार्‍या कोणत्याही नुकसानी पासून संरक्षण करण्यासाठी या गृह विमा पॉलिसी मध्ये समाविष्ट केले गेले आहे.

घराला नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानी पासुन म्हणजेच आग, भूकंप, वीज, पूर इत्यादी मुळे होणारे नुकसान भरपाईचा समावेश केला गेला आहे. तसेच कृत्रिम आपत्ती सारख्या म्हणजेच घर चोरी, आगीमुळे घराचे नुकसान, दंगली इत्यादींचा आपत्तींचा देखील समावेश आहे.

 

आरोग्य विमा (Health Insurance) :

आरोग्य विमा पॉलिसी घेण्याचे बरेच फायदे आहेत. जसे की वैद्यकीय उपचारांचा खर्च भागविण्यासाठी घेऊ शकता. आरोग्य विमा घेतल्यास ती विमा कंपनी आजारपणाच्या बाबतीतील सर्व उपचार खर्च भागवते. असे अनेक प्रकारचे आरोग्य विमा पॉलिसी आहेत.

हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी मध्ये वेगवेगळ्या आजारांचा समावेश आहे. कोणत्याही प्रकारचे आजार झाल्यास त्या व्यक्तीस उपचारासाठी लागणारा खर्च मिळवून देणे ह्या विम्या मागचा मुख्य उद्देश आहे. आपण सामान्य आरोग्य विमा पॉलिसी किंवा आजरासाठी विशिष्ट पॉलिसी (उदा. स्टार हेल्थ इन्शुरन्स यांसारख्या) देखील घेऊ शकता.

 

वाहन विमा (Vehicle Insurance) :

आपल्या देशात वाहनाचा विमा काढणे कायद्यानुसार अत्यंत गरजेचे आहे. जर आपण आपले वाहन विमा न घेता रस्त्यावर चालवत असाल तर, वाहतूकाच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी आपल्याला दंड देखील भरावा लागु शकतो. तसेच कायदेशीर प्रक्रियेला देखील सामोरे जावे लागते.

मोटार किंवा वाहन विमा पॉलिसी नुसार वाहन विमा कंपनीकडून होणार्‍या कोणत्याही प्रकारच्या नुकसानीची भरपाई दिली जाते. जर आपले वाहन चोरीस गेले असेल किंवा एखादा अपघात झाला असेल तर वाहन विमा पॉलिसी आपल्याला खूप मदत करेल.

जेव्हा एखादी व्यक्ती दुखापत झाली असेल किंवा एखाद्याने आपल्या वाहनातून मरण पावला असेल तेव्हा आपणास वाहन विमा पॉलिसीचा सर्वाधिक फायदा होतो. हे थर्ड पार्टी विमा अंतर्गत संरक्षित आहे. आपल्याकडे दुचाकी तीनचाकी वाहन किंवा कार असल्यास (Car Insurance) विमा उतरविणे आवश्यक आहे. तसेच Gadi Ka Insurance Kaise Check Kare येथून अधिक माहिती घेऊ शकता.

 

पीक विमा (Crop Insurance):

नवीन नियमांनुसार, कृषी कर्ज घेणार्‍या प्रत्येक शेतकऱ्याला पीक विमा पॉलिसी खरेदी करणे आवश्यक असते. पीक विमा पॉलिसी अंतर्गत विमा कंपनी पिकाचे काही नुकसान झाल्यास शेतकऱ्यास नुकसान भरपाई देणे हा पीक विमाचा मुख्य उद्दिष्ट असते.

पीक विमा पॉलिसीअंतर्गत आग, पूर किंवा कोणत्याही आपत्ती मुळे पीक निकामी झाल्यास विमा कंपनीकडून नुकसान भरपाई दिली जाते.

पीक विमा पॉलिसीची नियम कडक असल्याने आणि नुकसानाच्या किंमतीनुसार नुकसान भरपाई न मिळाल्याने भरपुर शेतकर्यांमध्ये पीक विम्याबाबत असंतोष दिसत आहे.

 

यात्रा विमा (Travel Insurance) :

यात्रा विमा म्हणजेच ट्रॅव्हल इन्शुरन्स हे प्रवाशाच्या दरम्यान झालेल्या कोणत्याही प्रकारच्या नुकसानापासून संरक्षण करते.

जर एखादी व्यक्ती एखाद्या कामासाठी किंवा प्रवासासाठी विदेशात गेली आणि त्याला तिथे दुखापत झाली किंवा वस्तू हरवली तर विमा कंपनी त्याला नुकसाभरपाई प्रदान करते.

प्रवास विमा ही पॉलिसी केवळ आपल्या प्रवासाच्या सुरुवातीपासून प्रवासाच्या समाप्तीपर्यंतच वैध असते.

 

आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

शेयर करा: