+51 Best Marathi Shayari | मराठी शायरी संग्रह | Marathi Status

मराठी शायरी संग्रह | Marathi Shayari :

आज आम्ही तुमच्यासाठी काही चांगले मराठी शायरी संग्रह (Marathi Shyari Sangrah) घेऊन आलो आहोत. जे तुम्हाला खूप आवडतील. मराठी शायरी हे असेच एक माध्यम आहे. ज्याद्वारे आपण आपले मन अगदी सहज व्यक्त करू शकतो आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या भावना अधिक प्रकट करून वेगळी ओळख निर्माण करण्यास मदत करते. म्हणून आज आम्ही तुमच्यासाठी गुलाब शायरी मराठी, मराठी शायरी नवीन, मराठी लव शायरी SMS, दु:ख शायरी मराठी दोस्ती शायरी मराठी घेऊन आलो आहोत.

 

मराठी लव शायरी | Love Shayari in Marathi :

कधी आठवण आली तर डोळे झाकू नकोस.
जर काही तरी नाही आवडले तर सांगायला उशीर करु नकोस.


मला पाहुन तू गाल्यातल्या गाल्यात हसतेस,
आणि मी बोलल्यावर माझ्यावर पटकन रूसतेस,
पण तुला चॉकलेट दिल्यावर,
पटकन माझ्या कुशीत घुसतेस,
अस कस विचित्र प्रेम तू माझ्यावर करतेस.


अगोदर ही होते, आताही आहे आणि नेहमी राहील.
प्रेम आहे वर्गातला Syllabus नाही जो शिकल्यावर संपून जाईल.


अजून वाचा : +101 लव स्टेटस मराठी | Best Love Status in Marathi


माझ्या प्रत्येक वेदनेवर औषध आहेस तू
माझ्या प्रत्येक सुखाचे कारण आहेस तू
काय सांगू कोण आहेस तू
फक्त हा देह माझा आहे त्यातील जीव आहेस तू.


हा ओघ आहे कवितातल्या शब्दांचा
या मनातून त्या मनात पोहोचणारा
एखाद्याच्या मनाला सहजच रुचणारा
तर एखाद्याला हृदयात खोलवर टोचणारा.


तिचं ते खोटे बोलणे
बोलताना दुसरीकडेच पाहणे
मधेच खाली पाहून लागणे
लागताना मग पुन्हा हसणे
खूप आवडतं.


कोणाच पहिला प्रेम बनायला
नशीब लागत असेल तर,
कोणाच्या शेवटचं प्रेम बनायला पण भाग्य लागतं.


तुझे शब्द पुढे जात राहतात,
प्रवाहात उलट सुलट वाहतात,
नवे विस्तार प्रस्थापितात,
मी मागे पळत राहते नेटाने, हट्टाने
तुझ्या शब्दखुणा खेळवत राहतात.


कोणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी,
हक्काची किंवा महत्त्वाची पण ती कधीही बदलणारी नसावी.


एखाद्या दिवशी तुम्हाला एक अशी व्यक्ती मिळेल,
जिच्या मागील गोष्टींची तुम्हाला काळजी नसेल,
कारण तुम्हाला त्या व्यक्तीसोबत भविष्यात जगायचं असेल.


प्रेम ही एक अशी विचित्र गोष्ट आहे,
जी दुर्बल व्यक्तीला मजबूत आणि मजबूत व्यक्तीला दुर्बल बनवू शकते.


नातं म्हणजे काय ?
ते कोणाच्याही सांगण्यावरून जळू नये,
आणि कोणी कितीही सांगितलं म्हणून तुटू नये,
भक्कम लावलेला जीव म्हणजे नातं.


 

मराठी शायरी नवीन | Latest Marathi Shayari

आयुष्य रेल्वे पटरीसारखे गुंतागुंत झाले आहे,
रस्ते तर खूप आहेत,
परंतु कोणत्या रस्त्यावर चालायचं तेच समजत नाहीये.


कृष्णसारखा मित्र नाही भेटला तर मैदान सोडून पळायचं नसतं,
तर मैदानावर घट्ट कर्णसारख लढायच असतं.


आयुष्यात यशस्वी होण्यासाठी हातावर रेषा नाही,
तर मनगटात जोर पाहिजे.


मी तुम्हाला मेसेज किंवा कॉल करत नाही
याचा अर्थ असा नाही की, मी तुम्हाला विसरलोय,
तर मी तुम्हाला माझ्या आयुष्यातून कायमच ब्लॉक केलंय.


लोकांचा विचार कराल तर लोकं जगू ही देणार नाही,
कारण लोकं हसायला येतात पोसायला नाही.


Attitude ची गोष्ट करता साहेब,
फरक फक्त एवढाच आहे की,
तुमच्याकडे Negative आहे आमच्याकडे Positive आहे.


जो आपल्याशी बोलतो त्याच्याशीच आपण बोलायचं,
उगाच कोणाच्या बुंडात एवढं घुसायच नसतं,
कारण आपल्यालाही सेल्फ रिस्पेक्ट आहे.


 

दोस्ती शायरी मराठी | Dosti Shayari Marathi :

असे हुदय तयार करा की, त्याला कधी तडा जाणार नाही,
असे हास्य तयार करा की, हृदयाला त्रास होणार नाही,
असा स्पर्श करा की, त्याने जखम होणार नाही,
अशी मैत्री करा की, त्याचा शेवट कधी होणार नाही.


एक दिवस प्रेमाने मैत्रीला विचारले,
जगात मी हजर असताना तू आलीस कशाला ?
तेव्हा मैत्री म्हणाली,
जिथे जिथे तू अश्रू देऊन जाशील ते पुसायला..


बंधना पलीकडे एक नाते असावे,
शब्दांचे बंधन त्याला नसावे,
भावनांचा आधार असावा, दु:खाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा आपल्या मैत्रीत असावा.


अजून वाचा : +101 मैत्री स्टेटस मराठी | Best Friendship Quotes in Marathi


चांगले मित्र ,
हात आणि डोळे प्रमाणे असतात
जेव्हा हाताना यातना होतात
तेव्हा डोळे रडतात आणि
जेव्हा डोळे रडतात तेव्हा हात अश्रू पुसतात.


दिवा मातीचा आहे कि सोन्याचा आहे हे महत्वाचे नसून,
तो अंधारात किती प्रकाश देतो हे महत्वाचे आहे,
त्याच प्रमाणे मित्र श्रीमंत आहे की गरीब आहे हे महत्वाचे नसून,
तो तुमच्या संकटात किती खंबीर पणे तुमच्या पाठीशी
उभा राहतो हे महत्वाचे आहे.


आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

शेयर करा: