मैत्री स्टेटस मराठी | Friendship Quotes in Marathi :
रक्ताच्या नात्यात नसेल एवढी ओढ मैत्रीच्या नात्यात असते, कशीही असली तरी शेवटी मैत्री गोड असते. थोडक्यात सांगायचं झाल्यास मैत्री म्हणजे त्याग आहे. मैत्री म्हणजे विश्वास आहे हवा फक्त नावापुरती तर मैत्री खरा श्वास आहे मैत्रीच्या या नात्या बद्दल लिहिण्यासारखे खूप आहे खरे नात्याला नसले तरी मैत्रिला एक रूप आहे मैत्रिला कधी गंध नसतो मैत्रीचा फक्त छंद असतो मैत्री सर्वानी करावी त्यात खरा आनंद असतो.
अश्याच तुमच्या सारख्या खास मित्र मैत्रिणीसाठी मैत्रीचे शुभेच्छा संदेश (Maitri Status in Marathi) आणले आहेत.
मैत्री स्टेटस मराठी | Friendship Quotes in Marathi :
हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा,
जो हजार जण तुमच्या विरुद्ध असतांना तुमच्या सोबत असेल.
मैत्री असावी चंदनासारखी,
सुगंध देणाऱ्या फुलासारखी,
जशी तुटलेल्या ताऱ्याला आधार देणाऱ्या धरतीसारखी,
प्रकाशाचे तेज घेऊन सावलीसारखी कोमल असावी.
प्रेम + काळजी = आई
प्रेम + भय = वडील
प्रेम + मदत = बहिण
प्रेम + भांडण = भाऊ
प्रेम + जिवन = नवरा / बायको
प्रेम + काळजी + भय + मदत + भांडण + जिवन = मित्र
ज्या चहात साखर नाही,
ती चहा पिण्यात मजा नाही आणि ज्या जीवनात मैत्री नाही,
असे जीवन जगण्यात मजा नाही.
असे हृदय तयार करा की त्याला कधी तडा जाणार नाही,
असे हास्य तयार करा की हृदयाला त्रास होणार नाही,
असा स्पर्श करा की त्याने जखम होणार नाही,
अशी मैत्री करा की त्याचा शेवट कधी होणार नाही.
अडचणीच्या काळात एकट न सोडता आधाराचा हात खांद्यावर ठेवून
डोळे झाकून निभावणार विश्वसनीय नातं म्हणजे “मैत्री”
अजून वाचा : +101 लव स्टेटस मराठी | Best Love Status in Marathi
मैञी असावी प्रकाशासारखी मनाचा आसमंत उजवल करणारी,
मैञी असावी एक मार्ग स्वप्ऩांना सत्यात उतवणारी,
मैञी असावी विश्वासाची हिशेबाची उठाठेव न करणारी,
मैञी असावी सुखाची साथीदार अन दुःखाची भागीदार.
जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते.
आनन्द दाखवायला हास्यची गरज नसते.
दुःख दाखवायला आसवांची गरज नसते.
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते.
ती म्हणजे मैत्री !!!
जीवनात दोनच मित्र कमवा.
एक श्रीकृष्णासारखा जो तुमच्यासाठी युध्द न करताही तुम्हाला विजयी करेल.
आणि दुसरा कर्णासारखा जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युध्द करेल.
मेल्यावर स्वर्ग नको आम्हास
जिवंत पणी यश पाहिजे,
अंतक्रियेला गर्दी नको माणसांची,
जिवंतपणी मित्रांची साथ पाहिजे.
आई म्हणजे भेटीला आलेला देव,
पत्नी म्हणजे देवाने दिलेली भेट आणि मित्र म्हणजे देवाला ही न मिळणारी भेट.
अजून वाचा : आई वडील स्टेटस मराठी | Best Mom & Dad Status in Marathi
जन्म एका टिंबासारखा असतो आयुष्य एका ओळीसारखं असतं,
प्रेम एका त्रिकोणां प्रमाणे असतं.
पण मैत्री असते ती वर्तुळासारखी की ज्याला शेवट नसतो.
जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील
एकत्र नसलो तरी सुगंध मैत्रीचा दरवरळत राहील
कितीही दूर जरी गेलो तरी
मैत्रीचे नाते हे आज आहे तसेच उद्या राहील.
मित्र मैत्रिणी हे असेच असतात,
पाखरासारखे कुठून तरी उडत उडत येतात,
मनामध्ये हळव्या प्रेमाचं घरटं बनवतात,
सुख-दु:खाची गाणी गुणगुणतात,
आणि एके दिवसी मैत्रिच्या धाग्याचं एक अविस्मरणीय घरटं,
मनामध्ये आठवण म्हणून ठेवून जातात.
अजून वाचा : ब्रेकअप स्टेटस मराठी | Latest Breakup Status in Marathi
आम्ही वेळ घालवण्यासाठी मित्र ठेवत नाही,
मित्रासाठी वेळ घालवत असतो.
लोक रुप पाहतात, आम्ही हृदय पाहतो लोक स्वप्न पाहतात,
आम्ही सत्य पाहतो फरक एवढाच आहे की,
लोक जगात मित्र पाहतात.
पण आम्ही मित्रामध्ये जग पाहतो.
काही शब्द नकळत कानावर पडतात
कोणी दूर उगाच जवळ वाटतात,
खरंतर ही मैत्रीची नाती अशीच असतात
आयुष्यात येतात आणि आयुष्यच बनून जातात.
समोरच्याच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता
याची जाणीव म्हणजे मैत्री.
आयुष्य नावाची Screen जेव्हा Low बॅटरी दाखवते आणि
नातेवाईक नावाचा Charger मिळत नाही,
तेव्हां Power Bank बनूंन जे तुम्हांला वाचवतात ते म्हणजे.
!! मित्र !!
रक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात,
पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनांना मैत्री म्हणतात.
मैत्रीच्या नात्याने ओंजळ माझी भरलेली
तुझ्या साथीने आयुष्याची वाट नव्याने फुललेली
रात्र होती काळोखी दुःखामध्ये बुडलेली
तुझी सावली होती संगे प्रकाश बनुनी खुललेली.
मैत्री करत असाल तर
दिव्यातल्या पणती सारखी करा.
अंधारात जे प्रकाश देईल
हृदयात असं एक मंदीर करा.
पैश्या पेक्षा मित्र कमवा तेव्हा जास्त श्रीमंत व्हाल..
आमची मैत्री समजायला थोडा वेळ लागेल आणि जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल.
लहानपणापासून मला दोनच गोष्टी जास्त मिळाल्या,
एक म्हणजे बिस्कीट आणि दुसरी म्हणजे मित्र,
फरक फक्त एवढाच आहे बिस्कीट मिळाले मारीचे,
आणि मित्र मिळाले हाणामारीचे.
चांगले मित्र हे हात आणि डोळे प्रमाणे असतात
जेव्हा यातना होतात तेव्हा डोळे रडतात आणि
जेव्हा डोळे रडतात तेव्हा हात अश्रू पुसतात.
मैत्री म्हणजे शब्दांशिवाय एकमेकांचं मन जाणून घेणं,
चुकलं तर ओरडणं, कौतुकाची थाप देणं, एकमेकांचा आधार बनणं,
मैत्री म्हणजे अतूट विश्वास
मैत्री म्हणजे आयुष्याचा प्रवास सुसह्य करणारी हिरवीगार पाऊलवाट.
मैत्री करायचीच असेल ना पाण्यासारखी निर्मळ करा,
दूरवर जाऊन सुद्धा क्षणो क्षणी आठवेल अशी.
अजून वाचा : आठवण स्टेटस मराठी | Aathavan Marathi Status | Miss You Status Marathi
मैत्री म्हणजे शब्दांशिवाय एकमेकांचे मन जाणून घेणं,
चुकलं तर ओरडण, कौतुकाची थाप देण, एकमेकांचा आधार बनणं,
मैत्री म्हणजे अतूट विश्वास, माणसं जोडतात,
तीच आयुष्यात यशस्वी होतात.
मैत्री म्हणजे मायेची साठवण,
मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण हा धागा नीट जपायचा असतो,
तो कधी विसरायचा नसतो कारण ही नाती तुटत नाहीत,
ती आपोआप मिटून जातात
जशी बोटांवर रंग ठेवून फुलपाखरे हातून सुटून जातात.
लक्षावधी वर्षानी एखादा सुर्य निर्माण होतो,
कित्येक कळप शोधल्यावर कस्तुरी मृग सापडते,
हजारो शिँपले उघडल्यावर एखादा मोती दिसतो,
शेकडो माणसे आयुष्यात भेटतात पण त्यात,
तुझ्या सारखा मित्र एखादाच असतो.
बंधना पलीकडे एक नाते असावे, शब्दांचे बंधन त्याला नसावे,
एक प्रेमळ भावनांचा आधार असावा, दु:खाला तिथे थारा नसावा,
असा गोडवा एक आपल्या मैत्रीत असावा.
ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे.
जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे.
जिवनाच्या वाटेवर अनेक मित्र मिळतील तुला परंतु,
हदयाच्या एका बाजुस जागा मात्र माझी असु दे.
कधी आठवण आली तर डोळे झाकू नकोस.
जर काही तरी नाही आवडले तर सांगायला उशीर करु नकोस.
कधी भेटशील तिथे एक स्माईल देउन बोलायला विसरु नकोस.
कधी चुक झाल्यास माफ कर पण कधी मैत्रीची जाणीव कमी करु नकोस.
काट्यांवर चालुन दुसऱ्यासाठी रचलेली फुलाची रास म्हणजे मैत्री
तिखट लागल्यावर घेतलेला पहिला गोड घास म्हणजे मैत्री
एकटे असल्यावर झालेला खरा खुरा भास म्हणजे मैत्री
मरतांना घेतलेला शेवटचा श्वास म्हणजे मैत्री.
चांगल्या मैत्रीला,
वचन आणि अटींची गरज नसते.
फक्त दोन माणसं हवी असतात,
एक जो निभाऊ शकेल,
आणि दुसरा जो त्याला समजु शकेल.
कळत असत सार काही पण एक मात्र वळत नाही काय असते ही मैत्री ?
ते मित्रांपासून दुर गेल्याशिवाय कळत नाही.
आज काल जळणारे भरपूर झालेत, त्यांना जळु दया,
आम्हाला साथ देणारे मित्र भरपूर आहेत हे त्यांना कळू दया.
हसतच कुणीतरी भेटत असतं,
नकळत आपल्यापेक्षाही आपलसं वाटत असतं,
केंव्हा कोण जाणे मनात घर करुन राहत असतं,
ते जोपर्यंतजवळ आहे त्याला फूलासारखं जपायचं असतं,
दूर गेल्यावरही आठवण म्हणून मनात साठवायचं असतं,
याचचं तर नाव मैत्री असं असतं.
मैत्री आपली मनात जपली..
कधी सावलित विसावली..
कधी उन्हात तापली, मैत्री आपली.
कधी फुलात बहरली कधी काट्यात रुतली.
जीवनात बरेच मित्र आले, काही हृदयात स्थिरावले,
काही डोळ्यात स्थिरावले, काही हळूहळू दूर गेले,
पण जे हृदयातून नाही गेले ते तुमच्यासारखे जिवलग मित्र झाले.
देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो.
एक दिवस देव म्हणाला..
किती हे मित्र तुझे यात तू स्वतः ला हरवशील,
मी म्हणालो भेट तर एकदा येउन यांना
तू पुन्हा वर जाणं विसरशील.
मैत्री ती नाही जी जीव देते, मैत्री ती नाही जे हास्य देते,
खरी मैत्री तर ती असते जी,
पाण्यात पडलेला अश्रू देखील ओळखून घेते.
आयुष्यभर सोबत राहावी,
नको कधि त्यात दुरावा, नेहमीच नवा फ़ुलोरा,
मैत्री अपुली अशी असावी, सर्वांना एकत्रित आणावी,
हसने रुसने चालत राहवे, एकमेकांना समजुन घ्यावे,
मैत्री आपण अशी जगावी, एकमेकांचा आधार असावी,
सुख दुखात नेहमी सोबत असावी,
असे हे आपले मैत्रिचे नाते नेहमीच जपावे, तुझी मझी मैत्री अशी असावी.
तुझ्याशी खुप खुप बोलावेसे वाटते, पण शब्द चुकण्याची भीती वाटते
तुझ्या खुप खुप जवळ यावेसे वाटते, पण विरहाची भीती वाटते
तुझ्या सोबत चालावेसे वाटते, पण रस्ता चुकण्याची भीती वाटते
तुझ्या नजरेला नजर द्यावीशी वाटते, पण पापण्या मिटण्याची वाटते
तुला बाहुपाश्यात घ्यावेसे वाटते, पण मिठी चुकण्याची वाटते..
तुझ्या सोबत आयुष्यभर जगावेसे वाटते, पण तुझ्या आई-बाबाची भीती वाटते.
आता तुच सांग सखी
हे प्रेम आहे की मैत्री ? तुला काय वाटते !!
चांगले मित्र या जगात सहजा सहजी मिळत नाहीत
जवळ असताना मात्र एकमेकांशी पटत नाही.
मैत्री नसावी चंद्रासारखी कलाकलांनी बदलणारी,
ती असावी सुर्यासारखी जिवन सुतेज करणारी.
मैत्री नसावी एकाबाजूला कललेली,
ती असावी एकमेकांना समजून घेणारी.
मैत्री असावी आयुष्यभर टिकणारी,
आयुष्य संपल तरी मित्राच्या आठवणी जपणारी.
मैत्रीत तुझ माझ काहीच नसत,
जे काही असत ते आपलच असत.
कधी मस्ती कधी गंभीर, निराशेच्या अंधारात आशेचा कंदिल.
मैत्री असते एक नात माणसा-माणसाला जोडणार,
भावनांच्या आधारावर विचारांच्या सहाय्याने विश्वास पेलणार.
मैत्री हसणारी असावी मैत्री चिडवणारी असावी,
प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी एकवेळेस ती भांडणारी असावी.
पण कधीच बदलणारी नसावी.
मैत्री असावी मना मनाची,
मैत्री असावी जन्मो जन्माची मैत्री असावी
प्रेम आणि त्यागाची अशी मैत्री असावी
फक्त तुझी आणि माझी.
आमची मैत्री पण अशी आहे
तुझं माझे जमेना आणि तुझ्या विना करमेना.
देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो
त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो.
Life मध्ये एक वेळेस Bf नसला तरी चालेल
पण तुमचे रडगाणे ऐकणारा एक
Best Friend नक्की हवा.
जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते,
आनंद दाखवायला हास्याची गरज नसते,
दुःख दाखवायला आसवांची गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,
ती म्हणजे “मैत्री” असते.
मैत्री म्हणजे
एक प्रेमळ हृदय जे कधी तिरस्कार करत नाही,
एका गालावरील खळीजी कधीही रडू देत नाही
एक भास जो कधीही दुखावत नाही,
आणि एक गोड नातं जे कधी संपतच नाही.
कोण म्हणतं मैत्री बरबाद करते,
जर निभावणारे कट्टर असतील ना
तर सारी दुनिया सलाम करते.
आयुष्यं हे बदलतं असतं, शाळेपासून कॉलेजपर्यंत
चाळीपासून फ्लँटपर्यंत, पुस्तकापासून फाईलपर्यंत
जीन्सपासून फॉर्मलपर्यंत, पॉकेटमनीपासून पगारापर्यंत
प्रेयसीपासून पत्नीपर्यंत, लहाणपणापासुन वृद्धत्वापर्यंत
पण, मित्र मात्र तसेच राहतात.
प्रेमळं, जिवलगं, सच्चे आणि जिवास जिव देणारे..
माझ्या आयुष्यातील सर्व जिवलग मित्रांच्या मैत्रीला माझा मानाचा मुजरा !!
आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram
Comments are closed.