ब्रेकअप स्टेटस मराठी (Breakup Status in Marathi) :
आपण सर्व आयुष्यात कधी ना कधी प्रेमात पडतो. प्रेमाची भावना वेगळी असते. ते स्वत: पेक्षा आपल्या प्रिय व्यक्तीला अधिक महत्त्व देतात. तरी पण आयुष्यात एक काळ असा येतो की ती नाती तुटण्याच्या कगारवर येतात. कधीकधी ते संपुष्टात येतात. ती उद्भवणारी भावना खूप वेदनादायक असते. मित्रांनो आम्ही ब्रेकअप हृदयस्पर्शी स्टेटस, ब्रेकअप स्टेटस (Breakup Status in Marathi), प्रेम विरह स्टेटस (Breakup Quotes in Marathi) आणि ब्रेकअप शायरी मराठी ,दुःखी स्टेटस (Sad Status in Marathi) यांचा संपुर्ण संग्रह घेऊन आलो आहोत.
ब्रेकअप स्टेटस मराठी | Breakup Status in Marathi :
ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवावी,
फक्त तेच अपेक्षा भंग करतात,
मनापासुन प्रेम करणारेच,
फक्त आठवणीत रडतात.
जर अंधारात आपली स्वतःची सावली आपल्याला सोडून जाते,
तर मग इतर दूसरे काय आपली सोबत देणार.
खूप काळजी घेणारेच आपल्याला सोडून जातात,
कितीही मनापासून प्रेम करा तुझ्या शिवाय जगू शकत नाही,
असे म्हणणारेच एक दिवस सोडून निघून जातात.
भीती वाटते कोणाला आपलं बनवायची,
भीती वाटते काही वचणे निभावण्याची,
प्रेम तर एका क्षणात होतं,
पण मोठी किंमत मोजावी लागते विसरण्याची,
खुप त्रास होतो जवळचे दूर होतांना,
म्हणूनच मन घाबरतं आता कुणालाही जवळ करतांना.
खूप प्रेम केलं होतं त्याच्यावर,
आता कुणावर करूच शकत नाही,
खूप स्वप्नं पाहिली होती त्याची,
जी आता पूर्ण होऊ शकत नाहीत.
समजा तू मला धोका देण्यात यशस्वी झाला,
तर असे समजू नको की,
मी किती मूर्ख होती,
तर असा विचार कर की,
माझा तुझ्यावर किती विश्वास होता.
तुझ्या भिजलेल्या पापण्याच सांगतात
की तू देखील अजून विसरली नाहीस मला.
एकतर्फ़ी प्रेमात भरपूर काही शिकलो,
तुझ्यावर प्रेम केले इथेच थोडा चुकलो.
मी अजूनही त्या फालतूच्या आशेवर आहे की,
एक दिवस तू परत येशील.
चेहऱ्यावर नेहमीच हसू,
पण मनात खूप काही साठलेलं..
आले जरी डोळे भरून,
ते कोणालाही न दिसलेलं !!
लोक म्हणतात की, एक जण गेल्याने दुनिया संपत नाही,
पण हे कोणालाच कसे कळत नाही,
की लाखो लोग मिळाले तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही.
सोडून जायचे असेल तर बिंदास जा,
पण, लक्षात ठेव मागे वळून बघायची सवय मला पण नाही.
प्रेमात हरलात म्हणुन स्वत:ला दोष देत बसु नका,
कदाचित देवाने त्याही पेक्षा ही चांगली प्रेम करणारी
व्यक्ती तुमच्या नशिबात लिहुन ठेवली असेन.
कोणत्याही व्यक्तीला समजून
घेतल्याशिवाय पसंत करू नका..
आणि त्या पसंत केलेल्या व्यक्तीला
समजुन न घेता गमावु पण नका.
त्यावर हिरमुसू नका,
एक फुल उमललं नाही,
म्हणून रोपाला तुडवू नका..
सगळं मनासारखं होतं असं नाही,
पण मनासारखं झालेलं विसरू नका,
सुटतो काही जणांचा हात नकळत,
पण धरलेले हात सोडू नका.
कोण कोणाचे नसते हे अगोदर समजले असते,
तर हे तुटणारे नाते मी कुणाशीच जोडलेच नसते.
मन नसतं दुखवायचं कुणाचं
हृदय तोडून,
दुःख नसतं मिळत कधी आपल्यांकडून,
चुका आपल्याही असतात,
कारण, कुणी असंच नसतं जात कुणाला सोडून.
काचासारखे असतात खरं प्रेम करणाऱ्याचे हृदय,
कधी ते तुटतात तर कधी तोडल्या जातात.
जे आधी प्रेम होतं तेच पुढेही असेल,
तुझ्यातच सुरुवात झाली आणि तुझ्यातच शेवट असेल.
नशिबात आणि हृदयात फक्त एवढाच फरक असतो,
जो हृदयात असतो तो नशिबात नसतो,
आणि जो नशिबात असतो तो हृदयात नसतो.
आयुष्य हे अपेक्षांनी भरलेले आहे,
कोणाची अपेक्षा पूर्ण होते तर कोणाची अधुरी राहते
जिला मी मागितले देवाकडे प्रार्थनेमध्ये,
ती दुसर्याला न मागता मिळून जाते.
अजून वाचा : +101 मैत्री स्टेटस मराठी | Best Friendship Quotes in Marathi
आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram