मटण बिर्याणी रेसिपी मराठी | Top Mutton Biryani Recipe in Marathi

मटण बिर्याणी रेसिपी मराठी | Mutton Biryani Recipe in Marathi :

बिर्याणीचे हे नाव ऐकल्यावर नॉनवेज प्रेमीच्या तोंडाला पाणी सुटू लागते. ही एक जुनी रेसिपी आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे तयार आणि सर्व्ह केली गेली जाते. ही ह्या मटण बिर्याणी रेसिपीची खासियत आहे.

मटण बिर्याणी ही खायला खूप चवदार असते. तुम्ही ते सलाड, रायता बरोबर देखिल सर्व्ह करू शकता. परंतू मटन बिर्याणी कशी बनवायची हा स्रीयांना सर्वात मोठा पडलेला प्रश्न म्हणुनच आम्ही मटण बिर्याणी ची रेसिपी घेऊन आलो आहोत. चला तर मग कोणताही विलंब न करता आपण अप्रतिम मटन बिर्याणी ची रेसिपी मराठी मधून पाहूया. ज्याचा उपयोग करून आपण आपल्या घरात घर बसल्या रेस्टॉरंट सारख्या डिश बनवू शकता आणि आपल्या कुटूंबासमवेत बसून या लज्जदार पाककृतीचा आनंद घेऊ शकता.

 

मटण बिर्याणी रेसिपी (Mutton Biryani Recipe in Marathi) :

मटण बिर्याणीची रेसिपी मराठी

साहित्य :

 • 1 किलो मटण
 • 1/2 किलो बासमती तांदूळ
 • 1 टेबलस्पून आले लसूण पेस्ट
 • 8 लवंगा, 4 दालचिनी तुकडे, 1 तमालपत्र, 4 मसाला वेलदोडे, 3 लहान वेलदोडे
 • 2 टेबल स्पून साजूक तूप , केशर दुधात मिक्स करून.
 • 1/2 वाटी तळलेले काजू , 1/2 वाटी खवा

मटणासाठी साहित्य :

 • 1 टी स्पून आलेलसूण, मिरची, कोथिंबीर पेस्ट
 • 2 वाटी दही
 • 1 वाटी तेल
 • तळलेला कांदा
 • 1 टेबल स्पून गरम मसाला पावडर
 • 1 वाटी कापलेला कांदा
 • 1 टेबल स्पून गरम मसाला पावडर
 • 1 टेबल स्पून कांदामसाला
 • 4-5 लवंग, 4 दालचिनी तुकडे, 3-4 वेलच्या, 2 मिरी तिखट
 • 2 टी स्पून तिखट
 • चवीनुसार मीठ

 

मटण बिर्याणी बनवण्याची कृती :

प्रथम मटण स्वच्छ धुवून एका भांड्या मध्ये घ्या.

त्यानंतर मटणाला दही, आलं लसूण, कोथिंबीर, धणेजिरे पावडर , तिखट गरम मसाला पावडर, तळलेला कांदा, लवंग दालचिनी, वेलदोडे, मिरी, मीठ हे मिश्रण लावून १ तास तसेच ठेवा. नंतर कुकरमध्ये मटण शिजवून घ्या.

एका पातेल्यात साजूक तूप टाकून त्यात लवंग, दालचिनी, तमालपत्र मसाला, वेलदोडे, साधे वेलदोडे टाकून तांदूळ टाका व परतून घ्या. त्यात मीठ व गरम पाणी टाकून भात शिजायला ठेवा. खवा कुस्करून टाका व मोकळा भात शिजवून घ्या. परंतु भात करण्यापूर्वी तांदूळ 1 तास धुवून ठेवा.

कढईत तेल टाकून थोडा कांदा परतून घ्या. त्यात शिजलेले मटण, तिखट, तळलेले काजू टाकून मसाल्याला तेल येईपर्यंत परतुन घ्या. गॅस बंद करा.

आता बिर्याणी तयार करयाला घ्या. एका मोठ्या पातेल्यात प्रथम तूप टाकून त्यावर परतलेले मटण टाकुन ते पसरून घ्या. त्यावर तयार केलेल्या भाताचा थर द्या. थोडा तळलेला कांदा व तळलेले काजू, केशर दूध घालून शिंपडा. तूप टाका व पातेल्याला गच्च झाकण लावून गॅस मंद आचेवर ठेवा. थोड्या वेळानंतर बिर्याणीचा वास आल्यावर गॅस बंद करा. अश्या प्रकारे मटण बिर्याणी तयार आहे.
आता सर्व्ह करून गरमागरम मटण बिर्याणीचा मनसोक्त आस्वाद घ्या.

अजून वाचा : चिकन रेसिपी मराठी | Top Chicken Recipe in Marathi

 

मटण अंडा बिर्याणी रेसिपी (Mutton Egg Biryani Recipe in Marathi) :

साहित्य : 

 • 1 किलो मटण
 • 1/2 किलो बासमती तांदूळ
 • 2 कांदे उभे कापलेले
 • 1 टेबल स्पून आलेलसूण पेस्ट
 • 4 हिरव्या मिरच्या उभ्या कापून
 • 1 वाटी दही
 • 1 टी स्पून गरममसाला पावडर
 • 2 टी स्पून मिरची पावडर
 • 2 तमालपत्र, 4-5 वेलदोडे, 4-5 दालचिनी, 4-5 मिरी, 4-5 लवंग, 1 टी स्पून शहाजिरे
 • 1/2 वाटी चिरलेली कोथिंबीर
 • 4 टी स्पून धणे पावडर
 • 1 टेबलस्पून बेदाणे
 • 1 वाटी काजू
 • 3/4 टी स्पून केशरी रंग

मटणासाठी साहित्य :

 • 2 टेबलस्पून साजूक तूप
 • 1 वाटी तेल
 • 1/2 वाटी खवा
 • 1 वाटी भिजवलेली कणीक
 • 2 वाट्या कुरकुरीत तळलेला कादा
 • 2 टोमॅटो, 1 लिंबू
 • 4 उकडवलेली अंडी
 • चवीनुसार मीठ

 

मटण अंडा बिर्याणी बनवण्याची कृती : 

प्रथम मटण स्वच्छ धुवून त्याला धणे पावडर, गरममसाला पावडर, मिरची पावडर, आलंलसूण पेस्ट, दही लावून घ्या नंतर बारीक चिरलेल्या मिरच्या, कोथिंबीर ,टोमॅटो बारीक चिरून, लिंबाचा रस, चवीनुसार मीठ टाकून हलवून घ्या त्यानंतर ते मिश्रण मुरण्यासाठी तसेच 2 तास ठेवा.

आता एका पातेल्यात 1 वाटी तेल घालून त्यात तमालपत्र, चिरलेला कांदा टाका. कांदा गुलाबी झाल्यावर त्यात मटण टाका, मटणाला पाणी सुटेल. नंतर पातेल्यावर झाकण ठेवून मंद गॅसवर मटण शिजवू द्या .

मटण शिजल्यावर त्यात तळलेला कांदा कुस्करून टाका, तुमच्या आवश्यकते नुसार काजू टाका. आता दुसरे पातेला घ्या त्यात 4 टी स्पून तूप टाका, त्यात लवंग, दालचिनी, मिरी, शहाजिरे टाका, खवा तांदूळ टाकून त्यात गरम पाणी, मीठ टाका, भात मोका शिजू द्या .

शिजलेल्या मटणावर भात टाकून घ्या. भात पसरून लावा. त्यात दुधात केशरी रंग कालवून चमच्याने ढवळून घ्या, नंतर त्यात तळलेला कांदा, तळलेले काजू पसरून घाला. साजूक तूप सोडा, उकडलेली अंडी कापून ठेवा. पातेल्यावर झाकण बंद करून मंद आचेवर गॅसवर थोडावेळ वेळ ठेवून द्या. अश्या रितीने मटण बिर्याणी तयार आहे.

 

मटण पुलाव बिर्याणी रेसिपी (Mutton Pulao Recipe in Marathi) :

साहित्य :

 • 1 किलो मटण
 • 1/2 किलो बासमती तांदूळ
 • 1 वाटी तळलेला कुरकुरीत कांदा (तुपात तळलेला)
 • 1/2 वाटी काजू तळलेले
 • 1/2 वाटी बारीक चिरलेला कांदा फोडणीसाठी
 • 2 टेबल स्पून आले लसूण पेस्ट
 • 2 टेबल स्पून कांदामसाला, हळद
 • 1 टी स्पून तिखट
 • 1/2 वाटी दही
 • 7-8 लवंगा, 4-5 दालचिनी तुकडे, 4-5 मिरी, 4-5 वेलदोडे, तेजपत्ता, शहाजिरे, 2 बादल
 • 1/2 वाटी घरगुती तूप
 • चवीनुसार मीठ

 

मटण पुलाव बिर्याणी बनवण्याची कृती :

तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून ठेवा.

आता मटणाला दही 1 टेबल स्पून आले लसूण पेस्ट, हळद, मीठ, 1 टी स्पून गरम मसाला टाकून कुकर मध्ये पाणी टाकून शिजवून घ्या. मटण पिसेस व सूप वेगळे करा.

कढईत 1 वाटी तूप टाकून गरम करा. त्यात कांदा टाकून परता. कांदा लाल झाल्यावर त्यात शिजलेले मटणाचे बाजूला ठेवलेले पिसेस तळून घ्या. त्यात कांदा मसाला, गरम मसाला टाकून त्यात काजू व तळलेला कांदा टाकून गॅस बंद करा. हे मिश्रण बाजूला ठेवा. त्यात 1 टी स्पून लाल तिखट टाका .

मोठ्या पातेल्यात 1/2 वाटी तूप टाकून त्यात लवंग, दालचिनी, मिरी, वेलदोडे, तेजपत्ता, बादल, शहाजिरे टाका. तांदूळ टाकून परता. मीठ टाका. त्यात 1 टेबलस्पून आलेलसूण पेस्ट टाकून परता. मटणाचे काढून ठेवलेले सूप व जरुरीनुसार गरम पाणी टाकून भात मोकळा शिजवा.

भात शिजल्यावर त्यात तयार केलेले मटण मसाला टाकून चांगले हलवून घ्या. वरून चांगले तूप टाकून झाकण ठेवा. एक वाफ येऊ द्या. भात झाल्यावर वरून उरलेले तळलेले काजू व कांदा टाकून मटण पुलाव बिर्याणी गरमागरम सर्व्ह करा.


आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

शेयर करा: