चुकूनही करू नका ह्या चुका, इंटरनेट बँकिंग करताना घेण्याची काळजी

आजच्या काळात, इंटरनेट बँकिंग ही संकल्पना तुमच्या आमच्यासाठी काही नवीन नाही. जेव्हा पासून नोटबंदी झाली तेव्हा पासून कॅशलेस म्हणजे इंटरनेट बँकिंग, ई-वॉलेट (Paytm, PhonePe, Google Pay) या सारख्या सेवांचा वापर अधिक वाढला. ऑनलाईन शॉपिंग करताना किंवा ट्रान्स एकशन करताना इंटरनेट बँकिंग आणि डिजिटल वॉलेटचा वापर करून पैसे देणे आता खूपच सोयीस्कर झाले आहे. जसा जसा वापर वाढत गेला, तस तसा इंटरनेट द्वारे फसवणुकीचे प्रमाण अधिक वाढत गेले. परंतु आपण थोडी काळजी घेतल्यास तुम्ही जमा केल्याला जमा पुंजीचे सरंक्षण करू शकता.

इंटरनेट बँकिंग

 

इंटरनेट बँकिंग करताना घेण्याची काळजी :

1. ब्राउझरमध्ये पासवर्ड सेव्ह करू नका.

ऑनलाईन पेमेंट किंवा नेट बँकिंग करत असताना तुमच्या ब्राऊझर मध्ये पासवर्ड (Remember Password) जतन करण्याबद्दलची शिफारस केली जाते. अश्यावेळी ते ऑप्शन्स वगळा, नाहीतर त्याचा तुमच्या नकळत इतर कोणी दुरउपयोग करू शकतो.

 

2. फ्रॉड मेसेज आणि कॉल पासून सावधगिरी बाळगा.

तुमच्या डिजिटल वॉलेटची KYC एक्सपायर्ड झाली आहे असे मेसेज येतील ते आल्यास वेळीच सावध व्हा. कोणतीही बँक किंवा बँकेतील सदस्य तुम्हाला कॉल किंवा ई-मेल द्वारे ओटीपी अथवा पासवर्ड किंवा पिन नंबर ची मागणी करत नाही. अश्या फसव्या कॉल पासुन तुम्ही नेहमी सतर्क रहा. आपले अकाऊंट डिटेल्स कोणाला ही शेअर करू नका.

 

3. फ्री VPN चा वापर टाळा.

हल्ली बहुतेकांना एकाद्या Restricted अँप किंवा वेब साईटचा एक्सेस मिळावा म्हणून फ्री (VPN) व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कचा वापर केला जातो. परंतु ह्यात डेटा चोरीचा धोका अधिक बळावतो. म्हणुन शक्यतो बँकिंग व्यवहार करत असताना फ्री VPN चा वापर करणे टाळा.

 

4. ओपन पब्लिक वाय-फाय वापरणं टाळा.

ओपन वाय-फाय नेटवर्कचा सर्वात मोठा धोका हा आहे की, आपला सर्व डेटा सहजपणे चोरी होवु शकतो. त्यामुळे सार्वजनिक (हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन, मंदिर) स्थळांचा वाय-फाय वापर करताना विशेष काळजी घ्यावी.

 

5. फ्रॉड ई-मेल व कॅशबॅक ऑफर पासून सावध रहा.

फ्रॉड ई-मेल पासून वेळीच सावध व्हा. कॅशबॅक किंवा बक्षीना आकर्षित होऊन बळी पडू नका. एखाद्या मोठ्या संस्थेची तुम्हाला लॉटरी लागली आहे किंवा बक्षीस लागले आहे असे सांगण्यात येईल, त्यासाठी तुम्हाला एक लिंक दिली जाईल त्यावर तुम्हाला तुमचे बँक डिटेल्स द्यावे लागतील असे मेल येतील. त्यामुळे तुम्ही वेळीच सावध व्हा, अश्या फसव्या ईमेल स्कॅम् पासुन आधीच सावध रहा. मेल मधील कोणत्याही लिंक वर क्लिक करून व्यक्तिगत माहिती देवू नका.

 

6. सोपा पासवर्ड ठेवू नका.

जर आपण सोपा पासवर्ड ठेवला जसे की, तुमचा पर्सनल फोन नंबर, जन्म तारीख असे ठेवल्यास तर तो हॅक करणे अधिक सोपे जाईल, म्हणून आपला पासवर्ड नेहमी स्ट्रॉंग ठेवा. यासाठी आपण त्यात संख्या, स्पेशल कैरेक्टर आणि शब्द अधिकाधिक समाविष्ट करून अधिक स्ट्रॉंग बनवता येईल. मोबाईल लॉक पिन, ATM Pin, Transaction पिन एक सारखा ठेवू नका. फिंगर लॉक सिस्टिम असल्यास अती उत्तम त्याचा उपयोग करावा. तसेच पासवर्ड काही कालांतराने चेंज करत राहावे.

 

7. नेहमी हिस्टरी तपासून बघा.

तुम्ही कधी लॉगिन झाला आहात, कधी लॉग आऊट झाला आहात. तुमचे कोणा- कॊणाशी व्यवहार केले आहेत हे सर्व अधून मधून चेक करत राहावे. जर तुम्ही इंटरनेट बँकिंग इतरांच्या कॉम्पुटर किंवा ऑफिस कॉम्पुटर माध्यमाने करत असल्यास काम झाल्यावर ब्राऊझर मधली हिस्टरी डिलीट करण्यास अजिबात विसरु नये.

 

8. स्वतच्या डिव्हाइसची काळजी घ्या.

नेहमी http च्या ऐवजी https ने सुरुवात होणाऱ्या वेबसाईट चा वापर करावा. ऑनलाईन बँकिंगचे सर्व व्यवहार शक्यतो आपल्या पर्सनल लॅपटॉप, कॉम्पुटर, मोबाईल वरच करावे. सायबर कॅफे, ऑफिस कॉम्पुटर यांमार्फत करू नये. आपल्या डिव्हाइसमध्ये मालवेयर, ट्रोजन, हॉर्स यांसारखे व्हायरस येणार नाहीत, म्हणुन विशेष काळजी घ्यावी. त्यासाठी ओरिजनल अँटी व्हायरसचा वापर करावा. आपले सिस्टम आणि बँकिंग अँप्स Up To Date अपडेट करत राहावे.

 

अजून वाचा : Google My Business वर आपला बिझनेस Register कसा करावा ?

 

आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

You cannot copy content of this page
Copy link
Powered by Social Snap