भाजीपाला विक्री व्यवसाय कसा करावा | Top Vegetable Business Ideas in Marathi

भाजीपाला फळे विक्री व्यवसाय माहिती (Vegetable Business Information in Marathi) :

तुमच्याकडे अशी पुरेपूर जागा आहे जिथे तुम्ही शेती करू इच्छिता किंवा शेती निगडित जोडधंदा शोधत आहात. तर का मग तुम्ही भाजीपाला व्यवसाय सुरू करू शकत नाही. तुमच्याकडे शेतीसाठी जागा असो अथवा नसो किमान तुम्ही भाजीचे दुकान सुरू करू शकता.

तुम्ही तुमच्या नियमित नोकरी बरोबर किंवा शेती बरोबर भाजीपाला व्यवसाय सहजपणे करू शकता आणि जर तुम्हाला व्यवसायावर पूर्णपणे अवलंबून राहायचे असेल तर तुम्ही ते देखील करू शकता.

भाजीपाला विक्री व्यवसाय कसा करावा | Top Vegetable Business Ideas in Marathi

जर तुम्हाला झाडे लावणे आणि झाडांची काळजी घेणे आवडत असेल, तर हे तुमच्या व्यवसायासाठी फायदेशीर आहे. कारण भाजीपाला व्यवसायात तुम्हाला जास्त गुंतवणूक किंवा जास्त मेहनत करण्याची गरज भासत नाही. तसेच, आपण भाजीपाला व्यवसायात कमीत कमी वेळेत अधिक चांगला नफा कमवू शकता.

खाली आम्ही भाजीपाला व्यवसाय कसा सुरू करावा (How to start a Vegetable Selling Business in Marathi) याबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे, जे वाचून तुम्ही भाजीचे दुकान सहज सुरू करू शकाल.

 

भाजीपाला विक्री व्यवसाय कसा करावा (Vegetable Business Ideas in Marathi) :

भाजीचा फळांचा स्टॉल लावणे (Planting Vegetable Fruit Stalls) :

रस्त्याच्या कडेला भाजीचे व फळांचे दुकान उघडणे हा एक सर्वात चांगला व्यवसाय आहे. कारण यासाठी जास्त गुंतवणूक करण्याची गरज नसते. फक्तं सुरुवातीला किमान श्रम करणे आवश्यक असते तसेच त्यातून होणाऱ्या नफ्याची अपेक्षा खूप अधिक असते.

ताज्या भाज्यांची व फळांची मागणी दिवसंदिवस वाढत आहे. जर तुमच्याकडे शेत असेल तर तुम्ही सर्व काही पिकवत असाल तर फक्त मोठ्या भाजी मार्केट मध्येच विकत असाल तर त्या ऐवजी तुम्ही एक पर्यायी म्हणुन तुम्ही तुमच्या घरा सभोवलती परिसरात भाजीचे दुकान उघडू शकता आणि तुमच्या शेतातील भाजीपाला रहदारी आणि हायवे अश्या ठिकाणी लावुन वाटसरूंना विकू शकता कारण यात नफा अधिक आहे.

पर्यटन स्थळे, रहदारी क्षेत्र, गॅस पेट्रोल स्टेशन, पार्किंग क्षेत्र, औद्योगिक उद्याने आणि मुख्य महामार्ग इत्यादींमध्ये रस्त्याच्या कडेला भाजीपाला आणि फळांची दुकाने उघडून आपला व्यवसाय सुरू करू शकता.

 

पैक्ड कट भाजी व्यवसाय (Packed Cut Vegetable Business) :

हल्ली प्रत्येक जण आपल्या दैनंदिन कामात व्यस्त आहेत. विशेषत महिला वर्ग त्यांना नोकरी आणि घर ह्यामध्ये पुरेसा वेळ मिळत नाही की ते भाजीपाला निवडून साफ करून मग स्वयंपाक तयार करतील. म्हणुन खास त्यांचा साठी पॅकिंग फूड हा सर्वात जलद मार्ग आहे.

जर तुम्ही ही अशा परिस्थितीत भाजी कापणे, पॅकिंग करणे आणि विकणे सुरू केले तर त्यांचा बराच वेळ वाचेल आणि लोक चिरलेल्या आणि पॅक केलेल्या भाज्या खरेदी करतील.

या आधीच, कट फळे आणि भाज्यांची दुकाने अनेक मोठ मोठ्या शहरांमध्ये चांगला व्यवसाय करत आहेत. अशा स्थितीत तुम्ही तुमच्या परिसरात कट-पॅक केलेल्या भाज्यांचे दुकान उघडूनही व्यवसाय करण्याची चांगली संधी तयार करू शकता.

भाजीपाला विक्री व्यवसाय कसा करावा | Top Vegetable Business Ideas in Marathi

 

डोअर टू डोअर भाजीपाला वितरण करणे (Door to Door Delivery of Vegetables):

जर तुमच्याकडे भाजीपाल्याचा स्टॉल लावण्यासाठी जागा नसेल किंवा इतर कारणास्तव तुम्ही स्टॉल लावणे शक्य नसेल तर तुम्ही Door to Door Vegetables Supply करू शकता.

हल्ली मोठ मोठ्या शहरांमध्ये Bigbasket, Grofers etc साऱ्या Online Vegetable and Fruits Supply करणाऱ्या सर्व्हिसेस आहेत की तुम्ही घरबसल्या थेट बुकिंग करून तुम्हाला हवे ते Vegetable and Fruits घरी मागवू शकता. उदाहरण द्यायचे झालेच तर Zomato ची सर्व्हिस घ्या. ह्या मध्ये तुम्हाला हॉटेल मध्ये जावून ऑर्डर देण्याची गरज नाही तुम्ही ऑर्डर बूक करा त्यांचे Delivery Boy तुमच्या दारापाशी येऊन पार्सल देऊन जातात. ही प्रक्रिया पण अश्याच प्रकारे चालते.

त्याच प्रमाणे भाजीपाला व्यवसाय करत असताना तुम्हाला घरोघरी जाऊन भाजी आणि फळांची विक्री करण्याची व परिश्रम घेण्याची गरज नाही. फक्त तुम्ही ग्राहक वर्ग कश्या प्रकारे आकर्षित करतात त्यावर अवलंबून आहे. तुम्ही तुमचा व्यवसायचे Banners, Visiting Card, Facebook Groups, WhatsApp Business Group तयार करुन तसेच Google My Business वर देखील रजिस्टर करुन जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करू शकता.

 

जैविक उत्पादन (Organic Production) :

सध्या मार्केट मधे सर्वात जास्त डिमांड्स असेल तर जैविक उत्पादनाना. जैविक शेती द्वारे आपण रासायनिक किटनाशक आणि खतं ऐवजी पारंपारिक सैंद्रिय खेतांचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर करून कमी खर्चात उत्पादन घेऊ शकतो.

सध्याच्या परिस्थितीत लोक आपल्या आरोग्या बाबतीत खुप जागरूक झालेले आहेत त्यामुळे जैविक उत्पादनाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे जैविक फळे भाज्यांसाठी वाटेल तेवढी किंमत मोजायला तयार आहेत. जर तुमचा भाजीचा मळा असेल तर तुम्ही सुद्धा जैविक शेती सुरू करू शकता. त्याच बरोबर तुम्ही तुमच्या ग्राहकांना तुमची शेती किंवा मळा याला प्रत्यक्ष भेट देऊन बघण्याची संधी देऊ शकता त्यामुळे त्यांचा अधिक विश्वास संपादन होईल व अश्या रितीने तुमचा व्यवसाय वाढवू शकता.

 

मार्केटवर कब्जा करणे (To Capture the Market) :

ज्याप्रमाणे तुम्ही ग्राहकांना सुट्या स्वरूपात भाजी विक्री करतात त्याच प्रमाणे तुम्ही डेली बेसिस वर घाऊक स्वरूपात भाजी विक्री करण्याचा प्रयत्न करा.

तुमच्या आसपासच्या परिसरातील हॉटेल, चायनीज रेस्टॉरंट, ढाबे, कॅटर्स यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या गरजा काय आहेत त्यांना कोणत्या प्रकारचा भाजीपाला हवा आहे अश्या सर्वांची यादी तयार करुन त्यांना होलसेल दारात उपलब्ध करून त्यांच्या डेली ऑर्डर्स मिळवण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून तुम्हाला अधिक नफा प्राप्त होईल व तुमच्या व्यवसायाची प्रत्येक दिवशी Rolling कायम सुरु राहील.

 

मोबाईल ॲप आणि वेबसाईटद्वारे भाजीपाला ऑनलाईन विकणे (Selling Vegetables Online Through Mobile App and Website)

साहजिक आहे की नव उद्योजकला सुरुवातीच्या काळात आपल्या भाजीपाला व्यवसाय करिता मोबाईल ॲप किंवा वेबसाईट तयार करणे खर्चिक आहे. परंतु भविष्यात तुम्ही ह्या संदर्भात नक्की विचार करू शकता. कारण दिवसेंदिवस मोबाईल ॲप व वेबसाईट उद्योग धंद्यांना खूप विकसित करत चालले आहे. म्हणून व्यवसाय ॲप्सच्या नेहमी अशा ग्राहकांच्या शोधात असतात जे त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवण्यास मदत करतील.

जर तुम्हाला ही तुमच्या व्यवसायासाठी मोबाईल ॲप (Mobile App) ची गरज असेल, तर तुम्ही एक ॲप विकसित करून शकता. जिथे लोक तुमच्या क्षेत्रातील ताजी फळे आणि भाज्या एका क्लिक वर मागवू शकतात. त्याच बरोबर आपण ॲपवर शेतकरी आणि घाऊक विक्रेत्यांची व भाजपाल्यांची यादी तयार करू शकता जेणेकरून ग्राहकाना सहजपणे ऑर्डर देणे सोईस्कर ठरेल.

मोबाईल ॲपद्वारे लोक सहजपणे भाजी खरेदी करू शकतील आणि घरात किंवा दुकानात बसून तुम्हाला ऑर्डर्स प्राप्त होतील. ज्यामुळे तुमच्या व्यवसायाला चांगला नफा मिळेल.

 

आम्हाला आशा आहे की, तुम्हाला वरील भाजी व्यवसायाची कल्पना आवडेल आणि तुम्ही भाजीपाला व्यवसाय सहजपणे सुरू करू शकाल. लेख आवडल्यास आपल्या मित्रांना व नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद..


आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

शेयर करा: