डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानचे जनक यांचे मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. १४ एप्रिल १८९१ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला. डॉ. बाबासाहेब हे पेशाने कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. तसेच भारताचे पहिले कायदा व न्याय मंत्री होते. शिक्षणासाठी आणि समाजाच्या हितासाठी आयुष्यभर संघर्ष केला.
शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा गुरुमंत्र समाजाला दिला. त्यांनी समाजासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले. म्हणून अश्याच या महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादाई विचारांचा (Dr. Babasaheb Ambedkar Thoughts in Marathi) आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा (Dr Babasaheb Ambedkar Jayanti Wishes in Marathi) यांचा संपुर्ण संग्रह घेऊन आलो आहोत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादाई विचार | Dr. Babasaheb Ambedkar Quotes in Marathi
शरीरामध्ये रक्तांचा शेवटचा थेंब असेपर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढले पाहिजे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
शिका ! संघटित व्हा ! संघर्ष करा ! – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
माणूस हा धर्माकरीता नाही तर धर्म हा माणसाकरीता आहे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
माणसाला आपल्या दारिद्र्याची लाज वाटता कामा नये, लाज वाटायवा हवी ती आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो ते प्राषण करेल तो वाघासारखा गुरगुरल्या शिवाय राहणार नाही. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
ज्ञान हे पैशापेक्षा श्रेष्ठ आहे,कारण पैशाचे रक्षण तुम्हाला करावे लागते, परंतु ज्ञान तुमचेच रक्षण करते. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
पावलागणिक स्वत:च्या ज्ञानात भर टाकीत जाणे यापेक्षा अधिक सुख दुसरे काय असू शकते. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मनाच्या शांतीची मौलिकता संपत्ती व स्वास्थापेक्षा अधिक असते. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असले पाहिजे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
हिंसा ही वाईट गोष्ट आहे परंतु गुलामी ही त्यापेक्षाही वाईट गोष्ट आहे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
विज्ञान आणि धर्म या दोन भिन्न गोष्टी आहेत. एखादी गोष्ट विज्ञानाचे तत्त्व आहे की धर्माची शिकवण आहे याची विचार केला पाहिजे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मी महिलांच्या प्रगतीवरून त्या समाजाच्या प्रगतीचे मोजमाप करतो. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका. या जगात काहितरी करून दाखवायचे आहे. अशी महत्तवकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
माणूस कितीही मोठा विद्वान असला आणि जर तो इतरांचा व्देष करण्याइतका स्वत:ला मोठा समजू लागला तर तो उजेडात हातात मेणबत्ती धरलेल्या आंधळ्या सारखा असतो. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मी समाजकार्यात, राजकारणात पडलो तरी आजन्म विद्यार्थीच आहे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
आकाशातील ग्रह-तारे जर माझे भविष्य ठरवत असतील तर माझ्या मेंदूचा आणि माझ्या मनगटाचा काय उपयोग – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
बोलताना विचार करा, बोलून विचारात पडू नका. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
नशिबामध्ये नाही तर आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
स्त्री जात समाजाचा अलंकार आहे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
शब्दाला कृतीचे तोरण नसेल तर शब्द वांज ठरतील. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
वाणीचा व भाषेचा योग्य उपयोग करता येणे, ही एक तपश्चर्या आहे. तिला मन: संयमाची आणि नियंत्रणाची सवय करावी लागते. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
अग्नी तून गेल्याशिवाय माणसाची शुद्धी होत नाही. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे हुकूमशाही आणि माणसां-माणसांत भेद मानणारी संस्कृती. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही. जो मनुष्य मरणास भितो तो अगोदरच मेलेला असतो. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
काम लवकर करावयाचे असेल तर मुहूर्त पाहण्यात वेळ घालवू नका. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
अन्यायाविरूद्ध लढणाच्या ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वाभिमानी व स्वावलंबी बनलं पाहिजे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
ज्यांच्या अंगी धैर्य नाही. तो पुढारी होऊ शकत नाही. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
शिक्षण ही पवित्र संस्था आहे. शाळेत मने सुसंस्कृत होतात. शाळा म्हणजे नागरिक तयार करण्याचे पवित्र क्षेत्र आहे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मनाचे स्वातंत्र्य हेच खरे स्वातंत्र्य आहे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
शक्तिचा उपयोग वेळ आणि काळ पाहून करावा. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
तुम्ही सूर्याप्रमाणे स्वयंप्रकाशित व्हा, पृथ्वीप्रमाणे परप्रकाशित होऊ नका. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मोठ्या गोष्टींचे बेत आखत वेळ दडवण्यापेक्षा छोट्या गोष्टीने आरंभ करने अधिक श्रेयस्कर ठरते. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
धर्म हा विज्ञानाशी विसंगत असून चालत नाही. तो बुद्धिवाद्यांच्या कसोटीवर टिकला पाहिजे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
चारित्र्य शोभते संयमाने, सौंदर्य शोभते शीलाने. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सर्व धर्म सारख्या प्रमाणात बरोबर आहे हेच सर्वात मोठे चूक आहे. धार्मिक कलह म्हणजे मूर्खपणाचा बाजार. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
साऱ्या देशाला एका भाषेत बोलायला शिकवा मग बघा काय चमत्कार घडतो ते. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
उगवत्या सूर्याला नमस्कार करतांना मावळत्या चंद्राला विसरू नका. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
सचोटी आणि बुद्धिमत्ता यांचा संगम झाल्याशिवाय कोणत्याही माणसाला मोठे होता येत नाही. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
आपल्याला कमीपणा येईल असा पोषाख करू नका. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
बर्फाच्या राशी उन्हांने वितळतात, पण अहंकाराच्या राशी प्रेमाने वितळतात. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
स्वातंत्र्य विचारसरणीचे, स्वातंत्र्य वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
स्वत:ची लायकी विद्यार्थी दशेतच वाढवा. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
शिला शिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
लोकशाही म्हणजे प्रजासत्ताक किंवा संसदीय सरकार नव्हे. लोकशाही म्हणजे सहजीवन राहणाची पद्धती. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
अस्पृश्यता जगातील सर्व गुलामगिरी पेक्षा भयंकर व भिषण आहे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
लोकांत तेज व जागृती उत्पन्न होईल असे राजकारण हवे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
धर्म हा जर कार्यवाहित राहावयाचा असेल, तर तो बुद्धिनिष्ठ असला पाहिजे. कारण शास्त्राचे स्वरूप बुद्धिनिष्ठ हेच होय. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मी नदीच्या प्रवाहालाच वळवणाऱ्या भक्कम खडकासारख आहे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
मी संघर्ष करून अस्पृश्यात जाज्वल स्वाभिमान निर्माण केला आहे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
एकत्वाची भावना ही राष्ट्रीयत्वाची जननी होय. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
तिरस्कार माणसाचा नाश करतो. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
एकत्वाची भावना ही राष्ट्रीयत्वाची जननी होय. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
करुणा शिवाय विद्या बाळगणाऱ्याला मी कसाई समजतो. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
माणसाने जन्मभर जरी शिकायचे मनात आणले तरी विद्यासागराच्या कडेला गुडगाभर ज्ञानात जाता येईल. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
इतरांचे दुर्गुण शोधणापेक्षा त्यांच्यातील सदगुण शोधावे. – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा | Dr Babasaheb Ambedkar Jayanti Wishes in Marathi :
जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने,
कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व, भारतरत्न,
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या
जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.
सागराचे पाणी कधी आटणार नाही,
भिमाची आठवण कधी मिटणार नाही,
अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी,
आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा.
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती निमित्त या पावन स्मृतीस,
विनम्र अभिवादन !!
विश्वरत्न, विश्वभुषन, भारतरन्त, महाविद्वान, महानायक, अर्थशास्त्री,
महान इतिहासकार, संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष, परमपूज्य बोधीसत्व,
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम.
सजली अवघी पाहण्या तुमची किर्ती तुम्ही येणार म्हटल्यान
नसानसांत भरली स्फूर्ती आतुरता फक्त आगमनाची, जयंती माझ्या बाबांची.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा.
समाजातील जातिभेद, अस्पृश्यतेबद्दल सातत्याने लढा देणाऱ्या या महामानवाला विनम्र अभिवादन.
भारतरत्न परमपूज्य डाँ आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा.
आजचा दिवस आहे उत्सव आणि गौरव,
हा दिवस सर्वात महत्वाच्या व्यक्तीसाठी आहे
आत्मविश्वासाचा धडा घेतला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !
राजा येतोय संविधानाचा
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
ज्यांच्यामुळे लाखों घरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला.
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा.
हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्यांचा वेग होता.
अन्याया विरूध्द
लढण्याचा त्यांचा इरादा नेक होता.
असा रामजी बांबाचा लेक भिमराव आंबेडकर लाखात नाही,
तर जगात एक होता.
परमपूज्य डाँ आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा.
प्राणाची आहुती दिली, आमच्या जीवनासाठी,
त्रास भोगला किती, आमच्या हसण्यासाठी,
कसे विसरू बाबा तुमचे उपकार,
हा जन्म वाहिला मी फक्त तुमचे गुणगान गाण्यासाठी.
परमपूज्य डाँ आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा.
मान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने,
शिक्षणाचे महत्व समजावले माझ्या भीमाने,
अन्यायाविरुध्द लढायला शिकवले ज्याने,
माझे शत शत नमन त्याचे चरणी..
भारतरत्न डाँ आंबेडकर जयंंतनिमित्त हार्दिक शुभेच्छा.
अजून वाचा : छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस | Chhatrapati Shivaji Maharaj Status & Quotes in Marathi
आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram