डेटा एंट्री वर्क म्हणजे काय | What is Data Entry Work in Marathi

Data Entry Information in Marathi :

तुम्ही सर्वांनी डेटा एंट्री वर्कचे (Data Entry Jobs Work from Home) नाव ऐकले असेलच आणि जर तुम्ही विद्यार्थी असाल किंवा गृहणी असला तर तुमच्या मोकळ्या वेळेत पार्ट टाईम काम करून Make Money Online पैसे मिळविण्याचा विचार करत असाल तर हा प्रश्न तुमच्या मनात आलाच असेल, Online Data Entry Work मधून पैसे कैसे कमवायचे. कारण डेटा एंट्रीचे काम करणे खूप सोपे आहे आणि कोणताही सुशिक्षित माणूस हे अगदी सहजपणे घरबसल्या करू शकतो.

आपल्याकडे कॉम्प्यूटरचे बेसिक ज्ञान असल्यास आणि आपल्याला इंग्रजी टायपिंग येत असेल तर डेटा एन्ट्रीच्या कामातून तुमच्या मोकळ्या वेळेत तुम्ही चांगली कमाई करू शकता आणि त्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याचीही गरज नाही, तुम्ही तुमच्या संगणकावर घरी बसून हे काम करू शकता. त्याच बरोबर आपण ते लॅपटॉप किंवा मोबाईल वरून देखील करू शकता, यासाठी आपल्याला उच्च पदवीधर शिक्षणाची आवश्यकता नाही, फक्त आपल्याला थोडेफार इंग्रजी लिहता वाचता आले पाहिजे.

 

डेटा एंट्री म्हणजे काय ? (What is Data Entry Work in Marathi) :

कोणतेही काम करण्यापूर्वी आपाल्याला काय करावे लागेल त्याची पुरेपूर माहिती असणे आवश्यक आहे. म्हणूनच आता डेटा एन्ट्री म्हणजे काय ते आम्ही तुम्हाला समजवून सांगणार आहोत.

मित्रांनो, डेटा एन्ट्री ही एक प्रकारची नोकरीच आहे. विशेषत: विद्यार्थी, गृहिणी ज्यांना पार्ट टाईम काम करून काही पैसे कमवण्याची संधी उपलब्ध करून देते.

Data Entry Jobs मध्ये तुम्हाला मोठ मोठ्या कंपनी, रुग्णालय, सरकारी कार्यालये अशा विभागात काम करण्याची संधी मिळते ज्यामध्ये तुम्हाला या विभागांची डेटा एंट्री करावी लागतात. डेटा एंट्री जॉबमध्ये, आपल्याला फक्त त्यांनी दिलेली माहिती डेटाच्या रूपात संग्रहित करावी लागते.

डेटा एन्ट्रीच्या कार्यासाठी तुम्हाला एमएस वर्ड (MS-Word), एमएस एक्सेल (MS Excel), नोट पॅड (Notepad) यासारख्या सॉफ्टवेअरमध्ये काम करावे लागेल. डेटा एंट्री जॉबमध्ये तुम्हाला अनेक प्रकारचे डेटा मिळतील जे तुम्हाला त्या कंपनीच्या वेबसाइटवर किंवा त्या कंपनीच्या मेल वरून पुरवले जातील.

अशा बर्‍याच खाजगी कंपन्या देखील आहेत. ज्या तुम्हाला डेटा एन्ट्री जॉब पुरवतात, त्यामध्ये तुम्हाला त्या कंपनीच्या कर्मचार्‍यांची संपूर्ण माहिती डाटाच्या रूपात संग्रहित करावी लागते.

यामध्ये कंपनी किंवा विभाग तुम्हाला डेटा प्रदान करते, तुम्हाला फक्त हा डेटा पाहत कंपनीच्या डेटा स्टोअर मध्ये प्रविष्ट करावी लागते. त्याआधी कंपनी पुर्ण कामाचे स्वरूप समजावून सांगते.

अजून वाचा : शिका,अफिलिएट मार्केटींग म्हणजे काय ?

डेटा एंट्री वर्क म्हणजे काय | What is Data Entry Work in Marathi

 

डेटा एंट्रीचे किती प्रकार आहेत ? (Types Of Data Entry Work in Marathi) :

डेटा एंट्री जॉबचे बरेच प्रकार आहेत, त्यातील काही प्रकार खालील प्रमाणे :

  • Online Form Filing
  • Online Survey Job
  • Captcha Entry Job
  • Copy And Paste Job
  • Captioning
  • Formatting And Editing Job
  • Image to Text Data Entry
  • Content Writing
  • Medical Transcription
  • Online Data Capturing Job
  • Email Processing
  • Updating Database
  • Catalog Data Entry Operator
  • Payroll Data Entry Operator
  • Entering Data Into Web Based

 

डेटा एन्ट्रीसाठी शैक्षणिक पात्रता (Educational Qualification for Data Entry Work) :

जर तुम्ही डेटा एन्ट्रीचे काम करण्यास इच्छुक असाल तर पात्रता शैक्षणिक पात्रता किमान दहावी किंवा बारावी उत्तीर्ण पाहिजे. जर तुम्ही हे उत्तीर्ण असाल तर तुम्ही डाटा एन्ट्री काम करू शकता. जर तुमच्याकडे ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर ते तुमच्यासाठी डाटा एन्ट्रीमध्ये काम करणे अधिक सोयीस्कर ठरेल.

 

डेटा एन्ट्रीसाठी वयोमर्यादा (Age limit for Data Entry Work) :

डेटा एन्ट्री काम करण्यासाठी कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 45 वर्ष पाहिजे. परंतु अश्या ही कंपन्या आहेत जे सर्व वयाच्या व्यक्तींना काम करण्याची संधी उपलब्ध करून देते.

 

डेटा एन्ट्री जॉब मधून किती पैसे कमवू शकता ?

How Much Do Online Data Entry Jobs Pay डेटा एन्ट्री हा असा जॉब आहे जिथून आपण फिक्स सॅलरीची अपेक्षा करणे चुकीचे आहे. तुम्ही दिवसातून किती वेळ काम करता, कसे काम करता त्यावर संपुर्ण पणे त्याचा मोबदला ठरवला जातो. सर्व साधाणपणे एक अनुभवी व्यक्ती सुमारे ₹10,000 ते ₹40,000 महिना काठी कमवू शकतो.

 

डेटा एन्ट्री ऑपरेटर कसे बनाल ?

Data Entry Work मिळवण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला indeed, naukri.com etc यासारख्या जॉब पोर्टल वेबसाईट वर जाऊन तुमचं प्रोफाईल तयार करून माहिती सादर करावी लागेल. त्यांनतर Data Entry Jobs असे लिहून तुमच्या location नुसार सर्च करून वेगवेगळ्या कंपनीचे लिस्ट व कामाचे स्वरूप बघुन तुम्ही थेट Apply करून जॉब मिळवू शकता. त्याच बरोबर Feverr, Freelancer यांसारख्या वेबसाईट वरून देखिल काम मिळवू शकता.

 

लक्षात ठेवा :

आज इंटरनेटवर अश्या बऱ्याच कंपन्या आणि संस्था आहेत. ज्या Online Data Entry Work करण्याचे काम देतात Work from Home करण्याच्या आधारे देतात. पण इथे लक्षात घेण्याचा मुद्दा म्हणजे त्या कंपन्या खरचं जेन्युइन आहेत की बनावट, त्या किती काळापासून मार्केटमध्ये कार्यरत आहेत. हे आधी तपासूनच त्या कंपनी बरोबर काम करण्याची सुरुवात केली पाहिजे.

 

आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

शेयर करा: