तुम्हाला कोणी सांगितले की, कोलकाता ते लंडन असा प्रवास करायचा आहे. तर सर्वप्रथम तुमच्या डोक्यात हवाई मार्गाचा विचार येईल. पण एक काळ असा पण होता, जिथे हा अशक्य वाटला जाणारा प्रवास बसने केला जाई.. तो ही बसने कोलकाता ते लंडन असा. चला तर बघुया कसा होता हा प्रवास..
कोलकाता ते लंडन.. (Kolkata to London Bus Service)
ही बस सेवा सिडनीची कंपनी अल्बर्ट टूर आणि ट्रेव्हल्स ने सन 1950 मध्ये सुरू केली होती, ज्यात ती सन 1973 पर्यंत चालू होती.
ही बस लंडन वरून निघत बेल्जियम, ऑस्ट्रिया, जर्मनी, यूगोस्लाविया, बुल्गारिया, तुर्की, ईरान, अफगानिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असे देश घेत, शेवटी भारतात येत असे. भारतात आल्यावर ही बस दिल्ली, आग्रा, बनारस इलाहबाद (प्रयागराज) असे मार्ग करत शेवटी ती पश्चिम बंगाल मधील कोलकाता शहरात पोहचत असे.
ही जगातील सर्वात लांब पल्याची बस सेवा होती, असं बोलायला काहीच हरकत नाही. हा रुट खूप लांब पल्याचा होता ही बस जवळपास 7957 किमी अंतराचा प्रवास करत असे. हे ऐकून तुम्हाला आश्चर्यच वाटेल की, ही बस प्रवासी घेऊन सलग 45 दिवस विविध देशातून प्रवास करत असे. अर्थात अंतर खुप जास्त असल्याने खुप ठिकाणी थांबत थांबत पुढे जात असे.
तुम्ही आश्चर्य चकित व्हाल, पण या बस मध्ये प्रवाशी साठी सर्व सोयसुविधाची विशेष काळजी घेतली जात असे.
जसे की, यात विशेषत: प्रवाश्यांना झोपण्यासाठी बेड, बाहेरील दृश्यांचा आनंद घेण्यासाठी बाल्कनी, डायनिंग टेबल, लायब्ररी, जेवण, हॉटेल मध्ये राहण्याची सोय सर्व काही सुविधा सामिल केल्या गेल्या होते.
तसेच प्रवाश्यांना शॉपिंग सठी दिल्ली, काबुल, तेहरान, साल्ज़बर्ग, काबुल, इस्तांबुल, विएना अश्या मोठ्या शहरात काही दिवस राखीव सुद्धा ठेवले जात असे. या बसचे एका मार्गाचे तिकीट भाडे प्रत्येकी व्यक्ती मागे 145 पौंड इतके होते म्हणजे भारतीय चलाना नुसार सुमारे ₹ 14,000 इतके. त्या काळी ही रककम नि:संशयपणे खुप महागडी होती व सर्व सामान्यांच्या आवाक्याबाहेरचे बाहेरची होती. कोलकाता ते लंडन ही टूर मनोरंजनासाठी खास बनवली होती.
आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram
Nice Content