Google My Business वर आपला बिझनेस Register कसा करावा ?

अलीकडे जेव्हा पासून प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल व त्यामध्ये इंटरनेट आला आहे. तेव्हा पासुन बिझनेस करण्याची परिभाषा पुर्णपणे बदलून गेली आहे. प्रत्येक जण स्वतःचा बिझनेस ऑनलाईन वाढवण्याच्या चढाओढीत आहे. अश्या या डिजिटल युगात तुमचा बिझनेस मागे राहून कसा काय चालेल.

चला तर, मग तुमच्या व्यवसायाच्या वाढीसाठी काय करता येईल याची माहिती घेऊया.

गूगल बद्दल सर्वांना ठाऊक असेलच. गूगल हे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन आहे. हे एक असे सर्च इंजिन जिथे क्षणार्धात माहिती आपल्याला पुढे प्राप्त होते. प्रत्येक सेकंदाला त्याचे कोट्यधीश वापर्तेकर्ते आहे. अश्या गूगल वर तुम्ही तुमचा बिझनेस ऑनलाईन घेऊन गेलात तर, त्याचा तुम्हाला किती फायदा होईल.

काही वर्षांपूर्वी गूगलने छोट्या मोठ्या व्यवसायिक करीता एक स्पेशल टूल्स लॉन्च केले. त्याच नाव Google My Business या टूल्स द्वारे आपण आपला बिझनेस रजिस्टर करू शकता. तेही पूर्णपणे नि:शुल्क स्वरूपात. विशेष बाब म्हणजे रजिस्टर करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही कागदपत्राची आवश्यकता नसते.

जर तुम्ही हॉटेल व्यवसायिक आहे, छोटे किरकोळ किराणा मालाचे दुकान आहे, सळून, मोबाईल शॉप, टपरी किंवा टेलरचे दुकान आहे. मग ते शहरी किंवा खेडेगावात का नाही असेना, तुम्ही निःसंकोच पणे तुम्ही तुमचा बिझनेस ऑनलाईन रजिस्टर करू शकता.

 

Google My Business वर आपला बिझनेस सेटअप करण्याची प्रक्रिया :

  • सर्व प्रथम गूगल सर्च बार वर Google My Business टाईप करा किंवा Google Play Store वर जाऊन Google My Business हा ऍप इंस्टॉल करा.

Google My Business वर आपला बिझनेस Register कसा करावा | How to Register Your Business on Google My Business

  • ऍप इंस्टॉल झाल्यावर किंवा विंडो ओपन झाल्यावर तुमच्या Gmail account ने लॉगिन करा. (नोट: Gmail Account/ID शक्यतो, तुमच्या बिझनेसच्या नावाने असावे किंवा तयार करून घ्यावे.)

 

  • लॉग इन केल्यानंतर, आपल्याकडे Create New List (नवीन सूची) तयार करण्याचा पर्याय दिसेल. त्यावर आपल्याला आपल्या व्यवसायाशी संबंधित सर्व माहिती (तुमच्या व्यवसायाचे नाव, कॅटेगरी, फोन नंबर, संपूर्ण पत्ता) देणे बंधनकारक आहे. (नोट : तुमचे बिझनेस लोकेशन हे रजिस्टर प्रक्रियेसाठी सर्वात महत्त्वाचा दुवा आहे, त्यासाठी तुमचा पत्ता अचूक असणे गरजेचं आहे, तुम्ही गूगल मॅपचा उपयोग करून ही तुमचे बिझनेस लोकेशन सबमिट करू शकता).

 

  • सर्व डिटेल्स दिल्यानंतर तुमच्या बिझनेस लोकेशन वेरीफाई करण्याची प्रक्रिया सुरू होते. ज्यामध्ये गूगल कडून लोकेशनची खातरजमा करण्यासाठी तुमच्या पत्यावर पत्रा द्वारे एक संख्याकिक कोड (G-****) पाठवण्यात येईल. त्यासाठी तुमच्या व्यवसायाचा पत्ता पुर्णपणे योग्य असावा लागेल. हा कोड प्राप्त होण्यासाठी 10-15 दिवसाचा कालावधी लागू शकतो.

 

  • कोड द्वारे अकाऊंट वेरीफाई झाल्यानंतर तुमचा बिझनेस पूर्णपणे गूगलवर लिस्ट करण्यात येईल.

 

  • शेवटची प्रक्रिया, तुमच्या बिझनेस बद्दलची माहिती उदा. फोन नंबर, तुमच्या व्यवसायाची वेळ, प्रॉडक्टची माहिती, फोटो, किंमती, ऑफर ई. माहिती योग्यरीत्या देऊन तुमचा बिझनेस प्रोफेशनल बनवता येईल, जेणेकरून ग्राहक वर्ग तुमच्या व्यवसायाकडे अधिक आकर्षित होऊन तुम्हाला समोरून प्रतिसाद येण्याची सुरवात होईल.

 

Google My Business वर रजिस्टर का करावे :

  • जर तुमच्या संभावित ग्राहकाने तुमच्या कडे असलेल्या प्रॉडक्ट विषयी काहीही शब्द (Keywords) गूगलवर सर्च केले असता, तुमच्या सेवे बद्दलचा पूर्ण तपशील त्यांना प्राप्त होईल. (उदा. तुम्हाला चायनीज फूड खायचे आहे. अश्या वेळी तुम्ही गूगलवर “चायनीज फूड” सर्च केले असता, तुमच्या आसपास असलेलं हॉटेल्स, रेस्टॉरंट व त्यांचे पूर्ण लिस्ट व तपशील तुमच्या समोर येतील.)

Google My Business वर आपला बिझनेस Register कसा करावा | How to Register Your Business on Google My Business

 

  • म्हणजेच अश्या प्रकारे गूगल तुमचा बिझनेस डायरेक्ट इन-डायरेक्ट पणे लोकांपर्यंत पोचवण्यास मदत करत आहे, तेही कोणत्याही प्रकारचे मानधन न घेता.

 

  • विशेष बाब म्हणजे, आपले ग्राहक आपल्या सेवेबद्दल प्रतिक्रिया नोंदवू शकतात, ह्याचा उपयोग तुम्हाला भविष्यात येणाऱ्या ग्राहकांनचा विश्वास संपादन करून तसेच त्यांना आकर्षित करून तुमच्या बिझनेस विस्तार करण्यासाठी केला जाऊ शकतो.Google My Business वर आपला बिझनेस Register कसा करावा | How to Register Your Business on Google My Business

 

आम्ही आशा बाळगतो, तुम्हाला आमचा लेख आवडला असेल, तुम्हाला ह्या मार्फत तुमचा बिझनेस नक्कीच जगापुढे ऑनलाईन घेऊन जाण्यास मदत होईल. काही अडचणी आल्यास नक्कीच तुम्ही कमेंटमधे विचारु शकता. आम्ही लवकरात लवकर आपल्या शंकेचे निरासरण करु. लेख आवडल्यास पुढे शेयर करायला विसरु नका.


आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

शेयर करा:

1 thought on “Google My Business वर आपला बिझनेस Register कसा करावा ?”

Comments are closed.