डाळिंब खाण्याचे फायदे आणि नुकसान | Benefits of Pomegranate in Marathi

डाळिंब खाण्याचे फायदे सांगा (Benefits of Eating Pomegranate in Marathi) :

डाळिंब हे एक प्रकारचे सुपर फूड आहे. डाळिंबाची फळे, फुले, पाने सर्व आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. हे अनेक रोगांवर उपचार करण्यास मदत करते कारण ते अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे समृध्द आहे. डाळिंब त्वचेचे सौंदर्य वाढवते आणि कर्करोगासारख्या प्राणघातक आजारांवर उपचार करण्यास मदत करते.

डाळिंब खाण्याचे फायदे आणि नुकसान | Benefits of Pomegranate in Marathi

अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या दूर करण्यासाठी डाळिंब प्रभावी आहे. याचे कारण असे की डाळिंबामध्ये जवळजवळ सर्व प्रकारच्या पोषक आणि खनिजे मोठ्या प्रमाणात असतात.

डाळिंबाचा रस प्यायल्याने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. डाळिंबामुळे कोणताही गंभीर आजार बरा होत नसला तरी त्यासाठी डॉक्टरांच्या औषधांची गरज असते. कदाचित अनेकांना डाळिंबाच्या फायद्यांबद्दल माहिती नसेल, म्हणून या लेखात आम्ही तुम्हाला रोज डाळिंब खाण्याचे फायदे व तोटे याबद्दल तपशीलवार सांगू.

 

डाळिंब मध्ये आढळणारे पोषक तत्वे (Nutritional and Health Benefits of Pomegranate in Marathi)

 • व्हिटॅमिन ए (Vitamin A)
 • कॅल्शियम (Calcium)
 • व्हिटॅमिन डी (Vitamin D)
 • व्हिटॅमिन बी -12 (Vitamin B12)
 • प्रोटीन (Protein)
 • फायबर (Fiber)
 • जिंक (Zink)
 • लोह (Iron)
 • ओमेगा 6 (Omega 6)
 • फॅटी ऍसिड (Fatty Acids)
 • पोटॅशियम (Potassium)

 

डाळिंब खाण्याचे फायदे (Benefits of Pomegranate in Marathi)

हृदयाचे आरोग्य उत्तम रहते :

डाळिंबाचे सेवन हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी एक उत्तम पर्याय असल्याचे सिद्ध झाले आहे. संशोधनानुसार, डाळिंबामध्ये अँटीहाइपरटेंसिव म्हणजेच रक्तदाब कमी करणे आणि तसेच अँटीएथीरियोजेनिक म्हणजेच धमन्यांमध्ये चरबी जमा होण्यास प्रतिबंध करणे यांसारखे गुणधर्म आहेत. याशिवाय, डाळिंब खाल्याने वाढलेल्या कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवण्यास मदत होऊ शकते. त्याचबरोबर डाळिंबाच्या बियांचे तेलाचे फायदे ही समाविष्ट आहेत. डाळिंबाचे तेल संपूर्ण लिपिड प्रोफाइल नियंत्रित करण्यात मदत करू शकते. म्हणून, डाळिंबाच्या सहाय्याने आपन हृदयरोगापासून संरक्षण करू शकतो.

 

रक्तदाब नियंत्रित करते :

डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडंट आणि एंटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. याचा अँटीहाइपरटेन्सिव प्रभाव देखील आहे. या अर्थाने, डाळिंब रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. हे शरीरातून खराब कोलेस्टेरॉल काढून चांगले कोलेस्टेरॉल बनवण्यास मदत करते आणि धमन्यांमध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे येऊ देत नाही. हेच कारण आहे की डाळिंबाच्या ज्यूसचे फायदे पाहून डॉक्टर ब्लड प्रेशर पीडित रुग्णास रक्तदाब नियंत्रित होण्यासाठी दररोज एक ग्लास डाळिंबाचा रस पिण्याची शिफारस करतात.

अजून वाचा : आहारात सोडियमचे (मिठाचे) प्रमाण कमी केल्याचे 20 फायदे

 

पाचन तंत्रासाठी फायदेशीर आहे :

डाळिंबामध्ये फायबर आणि इतर आवश्यक पोषक तत्व असतात. जे चांगल्या पाचन तंत्रासाठी आवश्यक असतात. जर डाळिंबाचे सेवन निर्धारित प्रमाणात केले तर बद्धकोष्ठतेसारख्या अश्या अनेक समस्येपासून मुक्तता मिळू शकते. याव्यतिरिक्त, डाळिंबामध्ये दाहक-विरोधी म्हणजेच एंटीइंफ्लेमेटरी गुणधर्म देखील आहेत. तसेच, डाळिंबामध्ये अँटी-हेलिकोबॅक्टर पायलोरी प्रभाव आढळतो. हेलिकोबॅक्टर पायलोरी हा पोटात आढळणारा जीवाणूंचा एक प्रकार आहे. हे पाचन तंत्रावर परिणाम करू शकतो.

 

गर्भवती महिलांसाठी उपयुक्त ठरते :

गरोदरपणात डाळिंब खाण्याचे फायदे हे आपल्याला खूप प्रकर्षाने दिसून आले आहे. यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते आणि त्याचबरोबर शरीरातील पाण्याचे प्रमाणही संतुलित ठेवते. डाळिंबामध्ये आढळणारी खनिजे, जीवनसत्त्वे, फ्लोरिक ॲसिड हे गर्भवती महिलांच्या गर्भात वाढणाऱ्या बालकांच्या विकासासाठी अतिशय फायदेशीर असल्याचे मानले जातात. परंतु हे लक्षात ठेवले पाहिजे की गर्भवती महिलांनी डाळिंबाचे अधिक प्रमाणात सेवन करू नये आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याचं योग्य प्रकारे सेवन केले गेले पाहिजे.

 

हाडांची समस्या सोडवते :

जर तुम्ही हाड किंवा सांधेदुखीने त्रस्त असाल तर आजपासून डाळिंबाचे सेवन सुरू करा. कारण डाळिंबाच्या बियांमध्ये एंटीइंफ्लेमेटरी गुणधर्म म्हणजे दुखण्यावर आराम देण्यास प्रभावी ठरते. म्हणून ते संधिवात सारख्या रोगांवर फायदेशीर ठरू शकतात. संशोधनावरून निश्चित झाले आहे की, डाळिंबाच्या सेवनाने केल्याने सांधेदुखी आणि सूज कमी होऊ शकते. याव्यतिरिक्त, संधिवात निर्माण करणारे एंजाइम देखील नष्ट होऊ शकतात.

 

त्वचेच्या सौंदर्य वृद्धीसाठी मदत करते :

डाळिंबाचे सेवन केल्याने तुमची त्वचा चमकदार होते. डाळिंब रक्तवाहिन्या आणि त्वचेच्या पेशींना चांगल्या प्रमाणात खनिजे पुरवते. त्यात असलेले लोह शरीरातील हिमोग्लोबिनला प्रोत्साहन देते, ज्यामुळे त्वचा अधिक ग्लो होते. यासह, शरीरातील पाण्याची कमतरता देखील मोठ्या प्रमाणात पूर्ण केली जाते, ज्यामुळे त्वचा हायड्रेटेड राहते आणि त्वचा सुखी कोरडी होण्यापासून बचावते. त्याचबरोबर वयोमानानुसार येणाऱ्या सुरकुत्या दूर होतात. डाळिंबामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात जे त्वचेला हानी पोहोचवणाऱ्या फ्री रॅडिकल्सशी लढतात. तसेच डाळिंबाचे सेवन केल्याने कोलेजनचे उत्पादन वाढते, ज्यामुळे त्वचा टाईट होते. डाळिंब हे रक्त शुद्ध करण्यास मदत करते, ज्यामुळे मुरुम, ब्लॅकहेड्स आणि व्हाईटहेड्स यांसारख्या समस्या देखील कमी होतात.

अजून वाचा : कोरफड खाण्याचे फायदे | Benefits of Eating Aloe Vera in Marathi

 

मधुमेहावर नियंत्रण ठेवते :

डाळिंबाचे फायदे मधुमेहाच्या समस्येमध्ये देखील उपयोगी ठरू शकतात. कारण डाळिंब रक्तातील शुगर आटोक्यात आणते. कारण डाळिंबामध्ये एलाजिक, गॅलिक आणि ओलेनॉलिक ॲसिड इ. या सर्व ॲसिडच्या उपस्थितीमुळे डाळिंबामध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म असतात. त्याचबरोबर, विशेष गोष्ट म्हणजे डाळिंबाच्या रसामध्ये असलेली साखर रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासही मदत करू शकते. डाळिंबाच्या या सर्व गुणधर्मांचा डाळिंबाचे सेवन मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

 

कर्करोग प्रतिबंध करते :

डाळिंबाचे गुणधर्म देखील कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी उपयुक्त ठरू शकतात. डाळिंबावर केलेल्या गेलेल्या संशोधनातून हे अगदी स्पष्ट झाले आहे की, डाळिंबामध्ये असलेल्या पॉलीफेनॉलमुळे डाळिंब हे कॅन्सर विरोधी गुणधर्म दर्शवते. असेही मानले जाते की, डाळिंबामध्ये एलागिटॅनिन आणि गॅलोटेनिन नावाचे पॉलीफेनॉल कर्करोगास कारणीभूत घातक ट्यूमरची वाढ कमी करून रोखण्यास मदत करते.

 

अल्झायमर आजरामध्ये फायदा होतो :

अल्झायमर हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर रोग आहे. जो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे निर्माण होतो. हा रोग विशेषतः वृद्धांना अधिक प्रभावित करतो. या समस्येमध्ये, वाढत्या वयाबरोबर वृद्धांची स्मरणशक्ती कमी होऊ लागते. या समस्येने ग्रस्त लोक डाळिंबाचा रस किंवा डाळिंबाचा ज्यूस याचे सेवन करून सुधारणा करु शकतात. एका संशोधनानुसार, डाळिंबाच्या रसामध्ये शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. या कारणास्तव डाळिंबाच्या रसाचे फायदे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करून अल्झायमरचा धोका कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. त्याच प्रमाणे डाळिंबामध्ये या अँटीऑक्सिडेंट गुणधर्मामुळे, न्यूरोप्रोटेक्टिव्ह प्रभाव देखील आढळतो. हा प्रभाव मज्जासंस्थेचे बिघडलेले कार्य सुधारून एखाद्या व्यक्तीची स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करू शकतो.

 

डाळिंब खाण्याची योग्य वेळ कोणती ?

डाळिंबाचे सेवन नेहमी सकाळी केले पाहिजे. कारण ते दिवसभर शरीरात ऊर्जा कायम ठेवते. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी याचे सेवन करणे टाळावे. जर तुम्हाला फक्त रात्रीच याचे सेवन करायचे असेल तर ते जेवणाच्या 1-2 तास आधी खावे. यामुळे वजन देखील नियंत्रणात राहते आणि आपण पोटाशी संबंधित इतरीत होणाऱ्या समस्या देखील टाळता येतात.

 

डाळिंब खाण्याचे नुकसान (Side Effects of Pomegranate in Marathi)

आरोग्याच्या दृष्टीने डाळिंबाचे फायदे अनेक आहेत. परंतु काही स्थितींमध्ये डाळिंबाचे सेवन केल्यास आपल्या आरोग्यास हानिकारक परिणाम देखील होऊ शकतात.

 • जास्त प्रमाणात डाळिंबाचे सेवन केल्याने गॅसची समस्या उद्भवू शकते. म्हणून डाळिंबाचे अधिक सेवन करू नये. डाळिंब हे फळं थंड असते, ज्यामुळे अन्नपचन आणि ॲसिडिटी यांसारखी समस्या उद्भवू शकते.
 • मधुमेहाच्या रुग्णांनी डाळिंबाचे सेवन करू नये. कारण डाळिंब गोडचे प्रमाण आहे. त्याचे सेवन केल्याने रक्तातील शर्कराची पातळी वाढू शकते. जे मधुमेहाच्या रुग्णांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
 • ज्या लोकांना खोकल्याची समस्या आहे, त्यांनी डाळिंब अजिबात खाऊ नये.
 • जर तुम्हाला त्वचेशी संबंधित कोणतीही समस्या असेल. तर तुम्ही डाळिंबाचे सेवन करणे टाळावे. याचे कारण असे की डाळिंबाचे सेवन केल्याने तुमच्या त्वचेवर लाल पुरळ, ॲलर्जी यांसारखी समस्या उद्भवू शकते.
 • जर तुम्ही कमी रक्तदाबाचे रुग्ण असाल तर डाळिंबाचे सेवन करू नका, यामुळे तुमची समस्या वाढू शकते. डाळिंबाचे सेवन कमी रक्तदाबामध्ये हानिकारक ठरू शकते.
 • जे काही आजाराने ग्रस्त आहेत औषध चालू आहेत. अश्या व्यक्तीने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डाळिंबाचे सेवन करावे. कारण त्याचा शरीरावर हानिकारक परिणाम होऊ शकतो.

 

लक्षात ठेवा :

डाळिंब खाण्याचे फायदे व तोटे या लेखात आम्हीं सामान्य माहिती सादर केली गेली आहे. कृपया अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा किंवा वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घ्यावा.


आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

शेयर करा: