Cracked Heels Home Remedy in Marathi :
आपण आपल्या शरीराच्या इतर अवयवाची जेवढी काळजी घेतो, तेवढी काळजी आपण पायाची घेतली जात नाही. परिणामी पायांच्या टांचाना भेगा (Cracked Heel) पडणे, त्वचा कोरडी होणे अश्याच खूप साऱ्या समस्या उद्भवत जातात आणि वयोमानानुसार अधिकच वाढत जातात.
सर्व प्रथम, टाचांना भेगा पडण्याची समस्या का होते हे आधी जाणून घेऊया. वास्तविक यामागची बरीच कारणे असू शकतात. जसे की, उदा. थंडीत टांचाना भेगा पडण्याचे प्रमाण वाढते. थंडीमुळे त्वचेतील ओलावा नष्ट होण्यास सुरवात होते आणि त्वचा कोरडी होते आणि क्रॅक निर्माण होऊ लागते.
तसेच आरोग्याशी निगडीत असलेली कारणे सुद्धा तेवढीच जबाबदार आहेत. जसे की, अतिरिक्त वाढलेलं वजन, डायबेटिस, शरीरात झालेली व्हिटॅमिनची कमतरता, थायरॉईडची समस्या, गर्भावस्था, असुरळीत रक्त प्रवाह अशी खुप सारी कारणे आहेत.
त्याचबरोबर चप्पल न घालने, अनवाणी उन्हातून चालणे, खुप गरम पाण्याने स्नान करणे, कामाची कष्टदायक कार्यपद्धती, चुकीचे चप्पल आणि बूट वापरणे ते केवळ आपल्या पायांना इजा करत नाहीत तर हे टाचाना भेगा (Cracked Heel) पडण्याचे एक मुख्य कारण असू शकते.
ही समस्या वेदनादायक आहेच त्याबरोबर कधी कधी तर त्यातुन रक्त स्राव सुधा होवु लागतो म्हणून आपल्या पायांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
पायांच्या टांचाना भेगा (Cracked Heels) समस्येवर काही घरगुती उपाय :
कोरफडीचा गर :
पायांच्या टांचानमधील भेग भरण्यासाठी कोरफडीचा गर उत्तम प्रकारे कार्यरत आहे. कोरफडी मधले अमिनो एसिड त्वचा सॉफ्ट व मुलायम करते. रात्री झोपण्यापूर्वी पाय स्वच्छ पाण्याने धुवा व नंतर कोरफडीचा गर लावून मालिश करा काही दिवसातच तुम्हाला फायदा दिसुन येईल.
अजून वाचा : कोरफड खाण्याचे फायदे | Benefits of Eating Aloe Vera in Marathi
वॅसलीन (Vaseline) :
वॅसलीन (Vaseline) चा प्रभाव आपणा सर्वांना माहीत असेलच. वॅसलीन (Vaseline) हे फक्त चेहऱया पुरताच मर्यादित नसून त्याचे फायदे पायासाठी सुद्धा लाभदायक आहे. हे स्किनला कोणत्याही प्रकारचे नुकसान न करता कोरडी त्वचेला मॉईस्चराईज करून मुलायम करण्यास मदत करते. रोज रात्री झोपण्यापूर्वी वॅसलीन (Vaseline) आणि निंबाचा रस एकत्र करून पायचा तळव्यावर मसाज केल्यास काही दिवसातच फरक जाणवेल.
खोबरेल तेल :
कोरडी त्वचेला मॉईस्चराईज करण्यासाठी खोबरेल तेलाशिवाय दुसरा उत्तम आणि स्वस्त कोणताही पर्याय असू शकत नाही. खोबरेल तेल मृत त्वचा काढून टाकते आणि भेंगा मध्ये आत जाऊन ओलावा निर्माण करते. जर तुम्हाला सॉफ्ट आणि चमकदार टाच हवे असतील, तर दररोज रात्री आपल्या पायांच्या तळव्यांना नारळ तेलाने उत्तम प्रकारे मालिश करा आणि त्यावर नंतर मोजे घाला. आपल्याला पायांच्या टाचांवर लवकरच त्याचे परिणाम दिसेल.
तीळाचे तेल :
तीळच्या तेलामध्ये अनेक पोषक तत्त्वे असतात, जे ते त्वचेच्या आतमध्ये जातात आणि ते बरे करण्यास मदत करतात. हे त्वचा दुरुस्त व सॉफ्ट करण्याचा हा सर्वोत्तम पर्याय आहे. रात्री झोपण्यापूर्वी त्यांना चांगल्या प्रकारे रगडून मालिश करा आणि सकाळी कोमट पाण्याने धुवा.
मध :
मधी मधे निसर्गतः अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. हे पायंच्या भेगा भरण्यास लवकर मदत करतात व त्वचेला सुद्धा मुलायम बनवतात. म्हणुन मधाने मालिश करा व त्यानंतर अर्ध्या बादलीत थोडे गरम पाणी करून त्यात दोन्ही टाचा काही कालावधी करिता बुडवून ठेवा.
प्युमिक दगड (Pumice stone) :
प्युमिक दगडाला झांवा दगड असेही म्हणतात. प्युमिक दगडाचा उग्र पृष्ठभाग हा पायाची मृत त्वचा अतिशय सहजपणें काढून टाकण्यास मदत करते आणि आपल्या पायांच्या तलव्यांची त्वचा त्यामुळे मुलायम आणि सॉफ्ट बनवले जाते. स्नान करते वेळी नक्कीच प्युमिक दगडाचा वापर करावा.
तांदळाचे पीठ :
तांदळाचे पीठ हे टाचाना गुळगुळीत व मृत-त्वचा काढून टाकण्यासाठी हे उपाय खूप प्रभावी असल्याचे मानले जाते. तांदूळ पिठामध्ये थोडे मध, सफरचंदाचा रस आणि व्हिनेगर वापरून पेस्ट तयार करून टचांच्या भेगाना लावा.
व्हिटॅमिन ई कॅप्सूल :
व्हिटॅमिन ई कॅप्सूल मधे हायड्रेट्स व त्वचेचे पोषण करण्याचे गुणधर्म आहे, त्यामुळे हे नक्कीच प्रभावी आहे. हे सहजपणे कमी किंमतीत उपलब्ध होणारे आहे. रात्रीच्या वेळी झोपण्यापूर्वी हे कॅप्सूल उघडा आणि आतील तेल काढून तळव्याना काही मिनिटे मसाज करून घ्या. ह्यामुळे टाचा सॉफ्ट आणि मुलायम बनण्यास मदत करते.
आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा :Facebook | Instagram | Twitter | Telegram