महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Maharashtra Day Wishes In Marathi 2022

१ मे हा दिवस ‘महाराष्ट्र दिन‘ म्हणून साजरा केला जात आहे. १ मे १९६० हाच तो दिवस ज्या दिवशी महाराष्ट्राला स्वंतत्र ओळख प्राप्त झाली. म्हणुनच दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा दिवस जोशात आणि उत्साहात साजरा केला जातो. याच बरोबर आंतररष्ट्रीय कामगार दिन देखील साजरा केला जातो.

या महाराष्ट्र भूमीचं आपल्या देशाच्या विकास आणि प्रगतीमध्ये अमूल्य योगदान दिले आहे. इथल्या मातीनं इथे आलेल्या प्रत्येकाला मान, पैसा, सन्मान सर्व काही दिलं. या शिवरायांच्या पावन भूमीत जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती स्वतःला भाग्यवान समजतो असा हा आपला प्रिय महाराष्ट्र देशा.

आज या खास दिवसासाठी आम्ही तुमच्यासाठी महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश, Maharashtra Day Wishes in Marathi, Maharashtra Day Quotes & Status in Marathi घेऊन आलो आहोत.

 

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Maharashtra Day Wishes In Marathi :
दगड झालो तर सह्याद्रीचा होईन,
माती झालो तर महाराष्ट्राची होईन,
तलवार झालो तर भवानी मातेची होईन.
🚩 जय शिवराय 🚩


समुद्राच्या किनार्याची किंमत समजण्यासाठी लाटेचे स्वरूप जवळून पहावे लागते,
पाण्याची किंमत समजण्यासाठी दुष्काळात जावे लागते,
प्रेमाची व्याख्या समजण्यासाठी प्रेमात पडावे लागते,
आणि छञपती शिवाजी राजांचा इतिहास समजण्यासाठी महाराष्ट्रात जन्म घ्यावे लागते.
🚩 जय महाराष्ट्र 🚩


महाराष्ट्राची यशो गाथा, महाराष्ट्राची शौर्य कथा,
पवित्र माती लावू कपाळी, धरणी मातेच्या चरणी माथा.
🚩 जय महाराष्ट्र 🚩
महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार
दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.


पाण्याची किंमत कळण्यासाठी दुष्काळात जन्मावं लागतं.
प्रेमाची किंमत कळण्यासाठी प्रेमात पडावं लागतं.
आणि शिवरायांचा इतिहास समजण्यासाठी
महाराष्ट्रात जन्माला यावं लागतं.
🚩 जय भवानी, जय शिवराय 🚩


शूरांचा इतिहास आमचा उगाच बडाया मारत नाही.
मराठी आम्ही रक्तच मराठी मराठी शिवाय जात लावत नाही.
वेळ आला तर प्राण देवू पण स्वाभिमान आमचा झुकत नाही.
🚩 जय महाराष्ट्र 🚩


भीती ना आम्हा तुझी मुळीही गडगडणाऱ्या नभा,
आस्मानाच्या सुलतानीला, जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा.
🚩 महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩


महाराष्ट्र दिनाच्या सर्व महाराष्ट्रवासीयांना तसेच
मराठी बांधवांना मनापासुन कोटी कोटी शुभेच्छा.
।। महाराष्ट्रदिन चिरायु होवो ।।
गर्व आहे मला महाराष्ट्रीयन असल्याचा
🚩 महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩


शुन्यातुन स्वराज्य उभं करन
हे फक्त आणि फक्त मराठाच करु शकतो
मराठ्यांच्या पराक्रमाची
गाथा फक्त आणि फक्त सह्याद्रीच सांगु शकतो.


माझा माझा महाराष्ट्र माझा,
मनोमनी वसला शिवाजी राजा,
वंदितो या भगव्या ध्वजा, गर्जतो, गर्जतो महाराष्ट्र माझा.
गर्जा महाराष्ट्र माझा..
🚩 महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩


अभिमान आहे मराठी असल्याचा,
गर्व आहे महाराष्ट्रीय असल्याचा.
🚩 महाराष्ट्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩


दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढल्याच्या घामाने भिजला.
देश गौरवासाठी झिजला,
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा.


राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा,
नाजूक देशा, कोमल देशा,
फुलांच्याही देशा, मंगल देशा, पवित्र देशा
महाराष्ट्र देशा,
प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा.


कृतज्ञता राष्ट्राची, कृतज्ञता इथल्या मातीची,
माझ्या महाराष्ट्राची.
🚩 महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩


माझ्या राष्ट्राच्या मातीला सुंगध आहे मराठी माणसांचा,
नेहमीच अग्रेसर राहील महाराष्ट्र माझा.
🚩 महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🚩


आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram
शेयर करा: