मराठी उखाणे | Best Marathi Ukhane for Male | मराठी उखाणे नवरदेव साठी

मराठी उखाणे नवरदेवसाठी | Marathi Ukhane for Male :

ज्या प्रमाणे मुलगी आपल्या सासरी जाताना उखाणे घेण्याची परंपरा आहे, त्याच प्रमाणे त्याच प्रमाणे नवरदेवांनी सुद्धा त्या शुभ प्रसंगी आपल्या पत्नीचे नाव घेण्याची परंपरा आहे. म्हणून आज आम्ही आपल्याला समोर काही निवडक चांगले मराठी उखाणे नवरदेवासाठी आणले आहेत.

आपण आपल्या Marathi Ukhane, Marathi Ukhane for Male किंवा लग्नातील उखाणे मराठी नवरदेव साठी सारख्या Ukhane in Marathi, Marathi Ukhana, मराठी उखाणे, Ukhane Marathi, Latest Marathi Ukhane For Groom यांचा वापर करू शकता आणि आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणीशी किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्यांसह सामायिक करू शकता.

क्लिक करा :

Latest Marathi Ukhane for groom | मराठी उखाणे - Marathi Ukhane for male | मराठी उखाणे नवरदेव साठी

 

मराठी उखाणे नवरदेव साठी | (Marathi Ukhane for Male) :
अतूट असते मैत्री, नात असत घड्ड,
पूर्ण करीन सगळे ***** चे हट्ट.


हो-नाही म्हणता म्हणता, लग्न जुळले एकदाचे,
***** मुळे मिळाले मला, सौख्य आयुष्यभराचे.


*****च्या मैदानात, खेळत होतो क्रिकेट,
*****ला पाहून, पडली माझी विकेट.


ढीगभर चपात्या, किती पटापट लाटतेस,
***** तू मला, सुपरवूमन वाटतेस.


उंदीर राहतो, ती जागा असते बीळ,
घायाळ करतो ***** च्या गालावरचा तीळ.


रोज ***** म्हणून सारखी नावाने हाक मारतेस,
***** काय ग उखाणे घेताना कशाला खोटे लाजतेस.


राधे शिवाय कृष्णाला, उरनार नाही अर्थ,
***** शिवाय माझं, जीवनच व्यर्थ.


कृष्णाला बघून, राधा हसली,
***** माझ्या ह्रदयात बसली.


हँगओव्हर उतरवायला, उपयोगी पडते लिंबू ,
***** एवढी हॉट असताना, ऑफिस मध्ये कशाला थांबू.


माधुरीच्या अदा, कतरीनाच रूप,
*****ची प्रत्येक गोष्ट, मला भावते खूप.


सोण्याचा दिवा, कापसाची वात,
आयुष्य भर देईन, *****ची साथ.


सुंदर प्रेमाचे, सुंदर गाव,
*****च्या मेहंदीत, माझे नाव.


पाहताच *****ला, जीव झाला येडापीसा,
तिच्या शॉपिंगच्या वेडापायी, रिकामा होतो माझा खिसा.


ऊन पसरले कोवळे, समुद्राच्या लाटेवर,
साथ देईन ***** ची, आयुष्याच्या वाटेवर.


काय जादू केली, जिंकल मला एका क्षणात
प्रथम दर्शनीच भरली ***** माझ्या मनात.


प्रेम म्हणजे, दोन मनांना जोडणारा पूल,
*****च्या बोलक्या डोळ्यांनी, घातली मला भूल.


गच्चीवर गच्ची सिमेंटची गच्ची,
***** माझी बायको आहे मोठी लुच्ची.


जीवनरूपी सागरात सुखदु:खाच्या लाटा,
सुखी संसारात सौ. ***** चा अर्धा वाटा.


ती सोबत असली की, खराब मूड होतो बरा,
***** मुळे कळला, जगण्याचा आनंद खरा.


गाडीत गाडी डेक्कन क्वीन,
***** आहे माझी ब्युटी क्वीन.


पक्षांचा थवा, दिसतो छान,
***** आली जीवनात, वाढला माझा मान.


गोऱ्या गोऱ्या गालावरती, तीळ काळा काळा,
*****च्या गोड हास्याचा, मला लागलाय लळा.


स्वरांचा सुर, सुरांची गायिकी,
***** समोर माझ्या, चंद्राची काय लायकी.


बशीत बशी कप बशी,
***** सोडून बाकी सगळ्या म्हशी.


प्रेमाच्या राणात, नाचतो मोर,
.***** शी केल लग्न, नशीब माझ थोर.


***** आणि माझं नातं, आंबा कैरीची फोड,
आंबट वाटलं आधी जरी, पिकल्यावर मात्र गोड.


मनी माझ्या आहे, सुखी संसाराची आस,
***** तू फक्त, मस्त गोड हास.


भाजीत भाजी मेथीची, ***** माझ्या प्रीतीची.

सोण्याचा मुकुट, जरीचा तुरा,
***** माझी, कोहिनूर हिरा.


सिते साठी रामाणे, रावणाला मारले,
*****च नाव, मी ह्रदयात कोरले.


काही शब्द येतात ओठातून,
*****चं नाव मात्र येतं माझ्या हृदयातून.


मुंबई-पुण्याच्या मध्ये आहे शहर लोणावळा,
*****ला विचारतो मी आती क्या खंडाळा ?


नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री,
***** झाली आज माझी गृहमंत्री.


चंदनाच्या झाडाला नागिणीचा वेढा,
सौ. *****चा आणि माझा जन्मो-जन्माचा जोडा.


***** आणि ***** ची जमली आता जोडी,
लग्नाला येऊन सर्वांनी, वाढवा दिवसाची या गोडी.


मातीच्या चूली, असतात घरोघर,
नव्या जीवनाची सुरूवात ***** बरोबर.


ढीगभर चपात्या, किती पटापट लाटतेस,
***** तू मला, सुपरवूमन वाटतेस.


दुर्वाची जुडी वाहतो गणपतीला,
सौ ***** सारखी पत्नी मिळाली आनंद झाला मला.


अभिमान नाही संपत्तीचा, गर्व नाही रूपाचा,
*****ला घास घालतो वरण-भात तूपाचा.


ग़जाननाच्या मंदिरात संगीताची गोडी,
सुखी ठेवा गजानना ***** आणि माझी ही जोडी.


सोण्याची बरणी, भरली तूपाने,
सूख आल घरात, *****च्या रूपाने.


असावी नेहमी हसतमुख ,बोलणे असावे गोड,
*****च्या प्रीतीसाठी मन घेते ओढ.


रुक्मीणीने केला पण कृष्णाला वरीन,
*****च्या साथीने आदर्श संसार करीन.


प्रेमाची कविता. प्रेमाचे लेक,
***** माझी, लाखात एक.


लोकांनी आणला, प्रेमाचा आहेर,
माझ्या प्रेमात ***** विसरेल तिच माहेर.


चहा गरम राहावा म्हणून कपावर ठेवली बशी,
***** माझी गरीब गाय, बाकी सगळ्या म्हशी.


खुपच सुंदर, दत्तांचे मुख,
आज पासून, *****च माझ सुख.


खिशात माझ्या, प्रेमाची लेखणी,
***** माझी, सगळ्यात देखणी.


गोड मधुर आवाज करी, कृष्णाची बासरी,
*****ला घेऊन जातो, मी तीच्या सासरी.


पर्जन्याच्या वृष्टीने सृष्टी होते हिरवी गार,
*****च्या गळ्यात घातली मंगळ सुत्राचा हार.


श्रावण महिन्यात दिसते इंद्रधनूची रंगत न्यारी,
*****च्या साधीसाठी केली लग्नाची तयारी.


दूधाची शाई, शाईच दही,
***** आली आयुष्यात, आयुष्य झाल मंगलमयी.


पावसाचे पाणी, नदि मध्ये साठले,
माझ्या नावाचे, काळे मणी *****ने घातले.


गर गर गोल, फिरतो भवरा,
*****च नाव घेतो, मी तिचा नवरा.


पोर्णिमेचा चंद्र, असतो गोल ***** समोर माझ्या, पैशाला पण नाही मोल.


उसाचा पेर, लागतो गोड,
माझ्या आयुष्याला मिळाली, *****ची जोड.


जंगलात पसरला, मोगर्याचा सुहास,
***** बरोबर करेन,  प्रेमाचा प्रवास.


 माझ्याशी लग्न करायला ***** झाली राजी,
 केल मी लग्न ***** झाली माझी.


जीवनात लाभला मनासारखा साथी,
माझ्या संसार रथावर ***** सारथी.


चंद्राचा होता उद्य समुद्रला येते भरती,
***** स्पर्शाने सारे श्रम हरती.


चंद्रला पाहून भरती येते सागराला,
*****ची जोड मिळाली माझ्या जीवनाला.


जंगलात पसरला, मोगर्याचा सुहास,
***** बरोबर करेन, प्रेमाचा प्रवास.


आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

You cannot copy content of this page
Copy link
Powered by Social Snap