अ‍ॅसिडिटी आणि गॅस समस्येवर घरगुती उपचार | Acidity Home Remedies in Marathi

Acidity Home Remedies in Marathi :

अ‍ॅसिडिटी (Acidity) ही अशी एकमेव समस्या आहे. जी प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी होतच असते. अ‍ॅसिडिटी होण्याचे खुप सारे कारणे असु शकतात. त्यात म्हणजे खाण्यावर नसलेलं नियंत्रण, फास्ट अँड जंक फूड (मैद्याचे, तळलेल पदार्थ) चे खुप प्रमाणात केल गेलल सेवन, जेवणाचे अनियमित वेळापत्रक, व्यायामकडे फिरवलेली पाठ, मानसिक ताण-तणाव, अधिक मद्यपान व धूम्रपानाचे व्यसन, अपुरी मिळालेली झोप (निद्रानाश) इ. कारणे असु शकतात. परंतु ह्या मागचे मुख्य कारण आहे: आपली बिघडलेली पचन प्रणाली.

आपल्या शरीराच्या एका विशिष्ट घटकामुळे म्हणजेच हायड्रोक्लोरिक ऍसिडमुळे अन्न पचन होण्यास मदत होते. जेव्हा हे आम्ल जास्त प्रमाणात तयार होते तेव्हा आपणास आम्लता येते. तेव्हा अ‍ॅसिडिटीची लक्षणे दिसु लागतात. आपणास छातीत किंवा पोटात जळजळ होणे, डोकेदुखी, आंबट ढेकर येणे, उलटीची येण्याची तीव्र भावना जागृत होणे अश्या खुप साऱ्या समस्येला सामोरे जाऊ शकता.

 

अ‍ॅसिडिटी आणि गॅस समस्येवर घरगुती उपचार (Acidity Home Remedies in Marathi)

1. लिंबू पाणी :

लिंबु पाणी हे पोटातील आम्लाचे प्रमाण नीटनेटके करते आणि पचन क्षमता सुधारण्यास मदत करते. जेवणा किंवा खाण्यापूर्वी काही वेळे आधी कोमट पाण्यात एक चमचा लिंबाचा सरबत बनवुन प्या.

अ‍ॅसिडिटी आणि गॅस समस्येवर घरगुती उपचार | Acidity Home Remedies in Marathi

अजून वाचा : लिंबाचे फायदे | Lemon Benefits in Marathi

 

2. थंड दुध :

अ‍ॅसिडिटीच्या त्रासा पासून मुक्तता मिळवायची असेल तर त्यांना थंड दुधाचा पर्याय सुचावला जावू शकतो. ज्या कुणाला दुधाची अलर्जी नसेल त्याने थंड गार दुधाचे सेवन केल्याने पोटातील होणारी जळजळ शांत व कमी होण्यास मदत होते. तसेच दुधात असलेलं कॅल्शिअम हा घटक अल्काईन धर्मी असल्याने अ‍ॅसिडिटीवर न्यूट्रलाइजचे काम करते. दुधा ऐवजी तुम्ही व्हॅनिला आईस्क्रिमचा सुद्धा पर्याय निवडू शकता. व्हॅनिला आईस्क्रिम खाल्याने पोटात थंडावा निर्माण होऊन पोटातील व छातीतील जळजळ कमी होण्यास मदत होते.

अ‍ॅसिडिटी आणि गॅस समस्येवर घरगुती उपचार | Acidity Home Remedies in Marathi

 

3. खाण्याचा सोडा :

खाण्याचा सोडा खाल्ल्यानंतर पोटातील आम्ल द्रुतगतीने निरुपयोगी होते आणि अपचन, पोटात गोळा येणे आणि गॅसपासून मुक्त होते. अर्धा चमचा बेकिंग सोडा गरम पाणी किंवा पेया मध्ये मिसळून घ्या.

 

4. आलं :

आल्यामुळे पोटातील आम्लाचे प्रमाण कमी होते. एक कप आल्याचा चहा प्या, आपण आल्याची छोटी काप करून ते खावून त्यातील रस शोषून घेऊ शकता. आल्यामध्ये दाहक क्षमता अधिक असते. म्हणुन जास्त प्रमाणात आल्याचे सेवन केल्याने गॅस, घशात जळजळ आणि छातीत जळजळ होणे अश्या समस्या उद्भवू शकतात. म्हणुन त्याचे योग्य प्रमाात सेवन करावे. आपण दररोज केवळ 3 ते 4 ग्रॅम घेऊ शकता.

अ‍ॅसिडिटी आणि गॅस समस्येवर घरगुती उपचार | Acidity Home Remedies in Marathi

अजून वाचा : आले खाण्याचे फायदे आणि नुकसान | Health Benefits of Ginger in Marathi

 

5. बडीशेप :

जेवण झाल्यावर बडीशेप खाल्ल्यानंतर अपचन दूर करण्यास मदत होते. तसेच मळमळ, सूज येणे, पोटात गोळा येणे यासारख्या इतर समस्येस शांत करते. आपण जेवणानंतर बडीशेप चर्वण करू शकता. आणखी एक मार्ग म्हणजे 1/2 चमचे बडीशेप पाण्यात घाला आणि 10 मिनिटे उकळवा आणि ते पाणी प्या.

 

6. तुळशीची पाने :

तुळशीची पाने आपल्याला आंबटपणापासून त्वरित आराम देते. तुळशीची पाने खावी किंवा एका कप पाण्यात 3 ते 4 तुळस पाने उकळा आणि प्या.

अ‍ॅसिडिटी आणि गॅस समस्येवर घरगुती उपचार | Acidity Home Remedies in Marathi

अजून वाचा : तुळशीचे फायदे | Top 12 Health Benefits of Tulsi (Basil) in Marathi

 

7. ताक :

ताकामध्ये लैक्टिक ऍसिड असते. जे पोटातील आम्लता सामान्य करण्यास उपयुक्त ठरते. काळी मिरी आणि कोथिंबीर देखील फायदेशीर आहे. म्हणूनच, मिरपूड किंवा कोथिंबीर चिरून त्यात टाका.

 

8. गूळ :

गूळा मध्ये मुबलक प्रमाणात मॅग्नेशियम असते हे पचन क्रियेस मदत करते आणि पचनशक्ती अधिक अल्कधर्मी बनवुन अ‍ॅसिडिटी कमी होण्यास मदत होते. म्हणुन नियमित जेवणानंतर गूळाचा एक छोटा तुकडा घ्या.

अजून वाचा : गुळ खाण्याचे फायदे आणि तोटे | Benefits of Eating Jaggery in Marathi

 

9. जीरे :

जिरे एक उत्तम सहाय्य न्यूट्रलायझर म्हणून काम करते, पचनशक्तीला मदत करते आणि तसेच पोटदुखीपासून मुक्त करते. एक ग्लास पाणी घ्या किंवा उकळत्या पाण्यात एक चमचे जिरे घाला आणि जेवल्यानंतर ते प्या. तुम्हाला नक्की फायदा होईल.

 

10. केळी :

अ‍ॅसिडिटीसाठी हे खूप उपयुक्त आहे. केळीमध्ये नैसर्गिक अँटासिड असतात जे अ‍ॅसिड रिफ्लेक्स मध्ये बफर म्हणून कार्य करू शकतात. आंबटपणापासून बचाव करण्यासाठी दररोज जेवणानंतर एक केळी नक्की खा.

अ‍ॅसिडिटी आणि गॅस समस्येवर घरगुती उपचार

अजून वाचा : नियमित केळी खाण्याचे फायदे | Banana Top 8 Benefits for Health’s in Marathi

 

11. नारळाचे पाणी :

नारळाच्या पाण्यामध्ये खुप सारे नैसर्गिक गुणधर्म आहेत. नारळाचे पाणी थंड मानले जाते. अ‍ॅसिडिटी  झाल्यावर नारळाच्या पाण्याचे सेवन केल्याने पोटात गारवा निर्माण होऊन जळजळ कमी होते व आराम मिळतो.

अ‍ॅसिडिटी आणि गॅस समस्येवर घरगुती उपचार | Acidity Home Remedies in Marathi

अजून वाचा : पाणी पिण्याचे फायदे | Top 8 Health Benefits of Drinking Water in Marathi

 

12. आवळा :

आवळ्याचे खुप सारे फायदे आहेत. त्यातील एक फायदा तुम्हाला अ‍ॅसिडिटी कमी करण्यासाठी सुद्धा ही होऊ शकतो. जर तुम्हाला अ‍ॅसिडिटीचा त्रास होत आहे .असे जाणवायला लागले की, तुम्ही लगेचच मुरावलेला आवळा किंवा आवळा सुपारी ही खावु शकता. आवळ्याचा रस पोटात गेल्यानंतर तुम्हाला अ‍ॅसिडिटीचा त्रास कमी होण्यास मदत होईल.

अ‍ॅसिडिटीची समस्या आपल्या जीवनशैली, मानवी वयोमानावर शारिरीक स्वास्थ्यावर इतर बाबींवर सुद्धा अवलंबून असते. अश्या परिस्थितीत वैदकीय सल्ला घेणं उत्तम .

अजून वाचा : आवळा खाण्याचे फायदे | (आमला) Amla Top Benefits in Marathi

 

लक्षात ठेवा :

हा लेखात आम्हीं सामान्य माहिती सादर केली गेली आहे. कृपया अधिक माहितीसाठी प्रथम आपल्या डॉक्टरांचा किंवा वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घ्यावा.

लेख आवडल्यास सर्वांना शेअर करा …


आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

शेयर करा: