पाणी पिण्याचे फायदे | Top 8 Health Benefits of Drinking Water in Marathi

पाणी पिण्याचे फायदे :

आपल्या सर्वांना हे माहित आहे की, पाण्याला “जीवन’‘ असे संबोधले जाते. शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी आपल्या आहारात भरपूर पाणी असणे अत्यावश्यक आहे. म्हणुन आपल्याला नियमीत भरपूर पाणी पिण्याची गरज आहे. अन्यथा, निर्जलीकरण, बद्धकोष्ठता, मूत्रपिंडातील समस्या, शरीरात विषांचे संचय इत्यादी अश्या अनेक घातक समस्या उद्भवू शकतात. पाणी हा एकमेव घटक आहे जे कॅलरी, फॅट्स, शर्करा विरहित बनले आहे.

पाणी पिण्याचे फायदे

थोडक्यात सांगायचे झाल्यास, नियमितपणे कोमट पाणी पिणे शिवाय सकाळी उपाशी पोटी पाणी पिणे शरीरासाठी खूपच लाभदाक आहे. परंतु आपल्या आरोग्यासाठी योग्यरित्या हायड्रेट करणे किती महत्त्वाचे आहे, हे आपल्यापैकी बहुतेकांनाच माहित नसेलच.

खरं तर, मानवी शरीरातील प्रत्येक यंत्रणा ही पूर्णपणे पाण्यावर अवलंबून असते. परंतु आपण रोज शरीरातून वेगवेगळ्या प्रकारे पाणी उत्सर्जित करत असतो. (जसे की लघवी, घाम, श्वासोच्छ्वास द्वारे). शिवाय आपले शरीर सक्रिय ठेवण्यासाठी पाण्याची देखील आवश्यकता आहे.

प्रौढ मानवी शरीराचे सुमारे दोन तृतीयांश भाग पाण्याने व्यापलेलं आहे. आपल्या मेंदू मध्ये 70-80 % भाग पाण्याचे प्रमाण असते, आपले स्नायू, आपले रक्त, फुफुस, आपली त्वचा ह्या प्रत्येक भागांमध्ये पाणी असतेच. म्हणून आपल्याला पाहिजे तितके पाणी प्या, काही हरकत नाही. बरेच पाणी पिण्याचे फायदे आहेत.

 

नियमित पाणी पिण्याचे फायदे (Health Benefits of Drinking Water in Marathi)

पाचन शक्ती वाढवते :

आपल्या शरीरात अन्नाचे पचन योग्य प्रमाणात होण्यासाठी पाण्याची खूप गरज असते. पाण्याचा हा सर्वात महत्वाचा फायदा आहे. पाणी पिण्यामुळे चयापचय क्रिया देखील मजबूत होते, तसेच आपल्या शरीराची चयापचय करण्याची क्षमता 20-30 % वाढते. याचा अर्थ असा की, आपण अन्न लवकर पचवू शकता. जेव्हा अन्न योग्य पचन होते तेव्हा आरोग्याच्या अनेक तसेच असिडिटी सारख्या समस्या देखील संपुष्टात येतात.

अजून वाचा : अ‍ॅसिडिटी आणि गॅस समस्येवर घरगुती उपचार

पाणी पिण्याचे फायदे

वजन आणि तापमान संतुलित राहते :

जेव्हा आपण थंड पाणी पिता, तेव्हा शरीर त्याचे पचन व तापमान संतुलित करण्यासाठी काही प्रमाणात कॅलरीज जाळतात . अश्या प्रकारे वजन कमी होण्यास मदत होते. पाणी शरीराचे तापमान नियंत्रित करते. पाण्याअभावी हीटस्ट्रोक देखील होऊ शकतो.

अजून वाचा : वजन कमी करण्याचे घरगुती उपाय | Weight Loss Tips in Marathi

 

किडनी स्टोन होण्याचा धोका कमी होतो :

किडनी स्टोनची समस्या दिवसंदिवस वाढत आहे. त्या मागचे एकमेव कारण म्हणजे योग्य प्रमाणात पाणी न पिणे. शरीरातील काही खनिजांन मुळे स्टोन बनवतात, परंतु पाणी त्यांना प्रतिबंधित करतात व त्या खनिजांना मूत्रात विरघळवण्यास मदत करतात. ज्यामुळे किडनी स्टोन होण्याचा धोका कमी होतो.

अजून वाचा : किडनी स्टोन (मुतखडा) कसा होतो | Kidney Stone in Marathi

 

त्वचेचे सौंदर्य वाढवते :

शरीरातील पाण्याची कमतरता किंवा डिहायड्रेशनमुळे आपल्या त्वचेवर सुरकुत्या येतात. म्हणून जर तुम्ही भरपूर पाणी पियाले तर तुम्ही सुरकुत्यापासून मुक्त राहू शकता. पाण्यामुळे पेशीं मधील पाण्याचे प्रमाण वाढते. शिवाय, पाणी शरीरातून सर्व दूषित पदार्थ काढून टाकते, रक्त परिसंचरण वाढवते आणि म्हणूनच त्वचेचे सौंदर्य वाढवते. तर आपल्याला निरोगी, कोमल त्वचा मिळण्यासाठी भरपूर पाणी पिण्याची आवश्यकता असते.

अजून वाचा : कोरफड खाण्याचे फायदे | Benefits of Eating Aloe Vera in Marathi

 

अधिक ऊर्जा प्रदान करते :

जर आपणास अशक्तपणा किंवा सुस्तपणा जाणवत असल्यास ह्या मागचे कारण आहे, शरीरात झालेली पाण्याची कमी झालेली मात्रा. पाण्याअभावी स्नायू मध्ये कमकुवतपणा, अस्वस्थता, चक्कर येणे आणि इतर समस्या उद्भवू शकतात. रिकाम्या पोटी पाणी पिण्यामुळे लाल रक्तपेशी वेगवान बनतात, ज्यामुळे तुम्हाला अधिक ऑक्सिजन मिळते आणि तुम्हाला उर्जेची कमतरता जाणवत नाही. शारीरिक थकवा दूर होतो आणि ऊर्जा पुनर्संचयित होते. या मागचे कारण असे आहे की, पाणी रक्त आणि पेशींना ऑक्सिजन आणि इतर पोषक तत्व पुरवते. याव्यतिरिक्त, पाणी हे शरीरातील रक्तपुरवठा आणि रक्ताभिसरण क्रिया देखील वाढवते.

 

डोकेदुखी पासून बचाव करते :

मेंदू मध्ये 70-80% पाणी आहे. तर पाण्याच्या अभावामुळे आपण मानसिक अथवा शारीरिक ताणतणावातून ग्रस्त होण्याची शक्यता असते. पाणी पिण्यामुळे मानसिक तणाव कमी होण्यास व तसेच शारीरिक सामर्थ्य वाढण्यास देखील मदत होते. एवढेच नव्हे तर मेंदूला जोडलेल्या मांसपेशींना तनाव मुक्‍त राखण्यासाठी दिवसभर मधून मधून पाणी पिणे खूप महत्वाचे आहे. पाणी न पिणे देखील डोकेदुखीचे एक कारण असू शकते.

अजून वाचा : गुळवेलचे फायदे | Top 8 Benefits of Giloy in Marathi

 

रोगप्रतिकारक शक्ती वाढते :

शरीराची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पाणी खूप महत्वाचे आहे. पाण्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात (जसे की लघवी, घाम, श्वासोच्छ्वास द्वारे), ज्यामुळे शरीराचे अवयव निरोगी आणि सक्रिय होण्यास मदत होते. यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती अधिक बळकट होते.

अजून वाचा : रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी ?

 

हृदयविकाराचा धोका कमी होतो :

पाण्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. कारण पाणी हृदयाच्या आणि मेंदूच्या रक्तवाहिन्यांना आवर घालण्यापासून प्रतिबंधित करते. तसेच पाण्यामुळे रक्त परिसंचरण वाढते, त्यामुळे उच्च रक्तदाब कमी होतो. म्हणून दिवसातुन किमान 10-12 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.

अजून वाचा : आहारात सोडियमचे (मिठाचे) प्रमाण कमी केल्याचे 20 फायदे

 

पाणी पिण्याची योग्य वेळ :

सकाळी उठल्यावर कधीही उपाशी पोटी पाणी पिणे चांगलेच. सकाळी उठल्यावर अनोशी पोटी कोमट अथवा सामान्य तापमान असलेलं पाणी पिणे. तसेच, जेव्हा शरीरातील पाण्याची कमतरता जाणवु लागल्यास पाणी पिणे.

 

पाणी कसे आणि किती प्यावे ?

पाणी कसे प्यावे :

साधाणपणे सर्व जणांना व्यस्त जीवनशैली मुळे उभे राहून पाणी पिण्याची सवय असते. परंतु ही सवय आपल्या आरोग्याला घातक ठरु शकते. उभे राहून पाणी पिल्याने किडनीवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो तसेच, वाढत्या वयात सांधे दुखी अश्या अनेक समस्या उद्भवू शकतात.

 

पाणी किती प्यावे :

पाणी पिण्याचे फायदे जरी असले तरी अति प्रमाणात पाणी पिल्याणे पोट गच्च झाल्यासारखे होईल. पचन क्रियासाठी लागणारा काळ मंदावेल. त्यासाठी अति प्रमाणात पाणी पिण्याऐवजी थोडे थोडे कालांतराने शारीरिक गरज लक्षात घेऊन पाणी पिणे आवश्यक आहे.


आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

शेयर करा: