जाणुन घ्या.. गुळवेल खाण्याचे फायदे | Top 8 Benefits of Giloy in Marathi

गुळवेलची माहिती (Gulvel Information in Marathi) :

गुळवेल (Gulvel) ला भारतीय आयुर्वेदात खुप मोलाचे स्थान आहे. आयुर्वेदात गुळवेलचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. याला गिलोय (टीनोस्पोरा कॉर्डिफोलिया), गुडूची आणि अमृतवेल असेही म्हणतात.

जाणुन घ्या.. गुळवेल खाण्याचे फायदे | Top 8 Benefits of Giloy in Marathi

आपल्या देशात गुळवेलचा उपयोग बर्‍याच आयुर्वेदिक औषधांसाठी केला जातो. जेव्हा पासून जगभरात कोविडचा पादुर्भाव झाला आहे, तेव्हा पासून गुळवेलला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. रोग प्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी वापरली जाणारी एक सुप्रसिद्ध इम्युनो-मॉड्युलेटर औषधी वनस्पती म्हणून गुळवेल कडे बघितले जाते.

त्याचबरोबर ताप, मधुमेह, मूत्रमार्गाच्या विकार, अशक्तपणा, कावीळ, दमा, ह्रदयाचा विकार इत्यादींच्या उपचारांमध्ये मोठ्या प्रमाणात ह्याचा वापरला जातो. म्हणूनच आरोग्याच्या दृष्टीने गुळवेल खाण्याचे फायदे खूप आहेत.

 

गुळवेल कशी ओळखणार ? (How to Identify Giloy Plant in Marathi)

गुळवेल कसा ओळखावा ? हा प्रश्न सर्वांच्या मनात येतो. गुळवेलचे झाड हे वेलीसारखी असते, त्याची पाने सुपारीच्या पानांसारखे असतात. गुळवेलचे खोड दिसायला हिरवे असते. परंतु, तपकिरी रंगाची पातळ साल असते आणि त्याचा अंतर्गत भाग गोलाकार चक्रीदार असतो. जस जसे देठाचे वय वाढते, तस तसे आकाराने मोठे होत जाते.

 

गुळवेलचे औषधी गुणधर्म (Medicinal Properties of Giloy in Marathi)

गुळवेल मध्ये अँटी-ऑक्सिडेंट्ससह ग्लूकोसाइड, टेनोस्पोरिन, पाल्मारिन आणि टेनोस्पोरिक असिड आहे आणि तसेच तांबे, लोह, फॉस्फरस, जस्त, कॅल्शियम आणि मॅंगनीजचा चांगला स्रोत आहे.

गुळवेलचा पानांपासून ते खोडा पर्यंत वापर केला जातो. हे बर्‍याच रोगांमध्ये फायदेशीर ठरले जाते. आयुर्वेदात याला अमृत असे ही संबोधतात.

 

गुळवेल खाण्याचे फायदे (Benefits of Giloy in Marathi)

रोग प्रतिकारशक्ती वाढवते :

गुळवेल (Gulvel) ही एक नैसर्गिक औषधी वनस्पती आहे, जी रोग प्रतिकारशक्ती वाढीसाठी मदत करते. ह्याला अँटीऑक्सिडेंटचे एक पॉवर हाउस देखील म्हटले जाते. जे फ्री-रॅडिकल्सशी लढा देते. आपल्या शरीरातील पेशी निरोगी ठेवतात आणि रोगांपासून मुक्त ठेवतात.

गुळवेल शरीरातील टॉक्सिन बाहेर काढून टाकण्यास, रक्ताला शुद्ध करण्यास, रोगास कारणीभूत असलेल्या घातक बॅक्टेरियांशी लढा देण्यास मदत करते, तसेच यकृत रोग आणि यूरिनरी ट्रैक्ट संसर्गावर देखील प्रतिकार म्हणुन महत्वाची भुमिका बजावते. सर्दी आणि खोकल्या सह बर्‍याच प्रकारचे बॅक्टेरिया आणि विषाणूजन्य संसर्ग रोगांना प्रतिबंध करते.

अजुन वाचा : रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी ? | How to boost the Immune system in Marathi

 

पचन क्षमता सुधारते :

पचन क्षमता सुधारण्यास आणि आतड्यांशी संबंधित समस्येवर उपचार करण्यासाठी गुळवेल खूप फायदेशीर मानली जाते. ही औषधी वनस्पती डिटोक्सिफाइंग एजंट म्हणून देखील काम करतात. याचा अर्थ असा होतो की, याचे सेवन केल्याने शरीरात असलेले विषारी घटक दूर होतात.

गुळवेल पचन बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण असल्याचे मानले जाते. मजबूत पाचन प्रणाली बनवण्यास मदत करते सह यकृतावर कोणत्याही ताण पडत नाही. यासह, गुळवेल हे देखील सुनिश्चित करते की, यकृतामध्ये कोणत्याही प्रकारचे संक्रमण नाही. तसेच बद्धकोष्ठता समस्येवर देखील गुणकारी मानले जाते.

अजून वाचा : अ‍ॅसिडिटी आणि गॅस समस्येवर घरगुती उपचार

 

वारंवार येणाऱ्या तापापासुन मुक्तता करते :

वारंवार येणाऱ्या तापापासुन मुक्ती मिळविण्यासाठी देखील गुळवेलचा वापर केला जातो. गुळवेल मध्ये खास अँटी-पायरेटिक प्रॉपर्टीज असल्या कारणाने डेंग्यू, स्वाईन फ्ल्यू अश्या जीवघेण्या (तापाना) आजारांना दुर ठेवते. यासाठी गुलवेलची मूळ आणि त्यांच्या पानाचा वापर करु शकता. यामध्ये, अँटी पायरेटिक आणि अँटी मलेरियल हे घटक असल्याने दीर्घकालीन तापाच्या समस्येतून मुक्त करण्यात मदत करू शकतात. हे गुळवेल खाण्याचे फायदे आहे.

अजुन वाचा : तुळशीचे फायदे | Top 12 Health Benefits of Tulsi (Basil) in Marathi

 

वाढत्या वयाचा प्रभाव कमी करते :

गुळवेल मध्ये अनेक गुणधर्मी घटक आहेत. त्यात असलेलं अँटी-एजिंग नावाचं प्रभाव घटक देखील उपस्थित आहेत. यामुळे, वाढत्या वयाचा प्रभाव कमी करण्यासाठी तसेच, सुरकुत्या पडणे, डार्क सर्कल्स स्पॉट्स अश्या अनेक संबंधित समस्या कमी करण्यास मदत करू शकते.

अँटी-एजिंग गुणधर्मांमुळे गुळवेलचे नियमित सेवन केल्यामुळे त्वचेमध्ये तेजस्वीपणा येतो. या कारणास्तव असे म्हटले जाऊ शकते की, गुळवेलच्या नियमित सेवनाने सौंदर्य वृध्दीसाठी विशेष महत्वाची भूमिका बजावते.

अजून वाचा : कोरफड खाण्याचे फायदे | Benefits of Eating Aloe Vera in Marathi

 

जाणुन घ्या.. गुळवेल खाण्याचे फायदे | Top 8 Benefits of Giloy in Marathi

 

नजर (दृष्टी) सुधारते :

डोळ्यांशी संबंधित अनेक विकारांपासून मुक्त होण्यासाठी आपण गुळवेलचा वापर करू शकतो. तज्ञांच्या मते, गुळवेल मध्ये सापडलेल्या इम्युनोमोड्युलेटरी गुणधर्म डोळ्यांसाठी खुप उपयुक्त असतात. कारण ते दृष्टी स्पष्टतेस वाढीसाठी चालना देण्यास मदत करते. हे गुळवेल खाण्याचे फायदे आहे.

अजून वाचा : लवंग खाण्याचे फायदे | Benefits of eating Cloves in Marathi

 

दम्याचा त्रास कमी करते :

दम्यात आराम मिळवण्यासाठी गुळवेलचे फायदेही मोठ्या प्रमाणात उपयोगात आणू शकतात. जसे की, दम्यामुळे धाप लागणे, खोकला येणे, श्वास घेण्यास अडचण येणे, घरघर आवाज येणे, श्वासोच्छवासाच्या समस्येची लक्षणे कमी करण्याची मजबूत क्षमता गुळवेल मध्ये आहे. यासाठी, आपण गुळवेलचे खोड बारीक वाटून अथवा रस काढून मधा मध्ये मिसळून घेऊ शकता.

गुळवेल कफ कमी करण्यास नियंत्रित करते आणि रोग प्रतिकारशक्ती वाढवते. यामुळे दमा आणि खोकला यासारख्या आजारांपासून बचाव होतो आणि फुफ्फुसांना निरोगी ठेवता येते.

अजून वाचा : गुळ खाण्याचे फायदे आणि तोटे | Benefits of Eating Jaggery in Marathi

 

मधुमेह नियंत्रित करते :

गुळवेल फायदे मधुमेह (टाईप २) टाळण्यासाठी देखील दिसून येतात. कारण त्यात अँटी-हायपरग्लिसेमिक घटक रक्तातील साखर कमी करण्यास प्रभावी काम करते. या कारणास्तव, हे शरीरातील इन्सुलिनची सक्रियता वाढवून रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते. अशा परिस्थितीत असे म्हणता येईल की, गुळवेलचे फायदे मधुमेहाच्या समस्येपासून मुक्त होण्यास देखील मदत करतात.

अजून वाचा : मधुमेह (Diabetes) म्हणजे काय ? त्याची कारणे, लक्षणे आणि उपाय

 

मानसिक ताण तणाव आणि चिंता कमी करते :

गुळवेल मध्ये अ‍ॅडॉप्टोजेनिक औषधी वनस्पती म्हणून वापर केला जाऊ शकतो. अ‍ॅडॉप्टोजेन हा एक असा घटक आहे. जो आपल्या मानसिक ताण तणावातून मुक्त करण्यास मदत करते. त्याच बरोबर आपल्या शरीरातील विषारी घटकांपासून मुक्त होण्यास आणि आपल्या स्मरणशक्तीला चालना देण्यास देखील मदत करते.

अजुन वाचा : नैराश्य (डिप्रेशन) का येते व नैराश्य कसे दूर करावे ?

 

संधिवातामध्ये फायदेशीर :

गुळवेल मध्ये सांधेदुखी विरोधी गुणधर्म आहेत जे सांधेदुखीच्या उपचारात मदत करतात. जर तुम्हाला देखील सांधेदुखीचा त्रास होत असेल तर तुम्ही रोज गुळवेलचे सेवन करून या आजारापासून मुक्त होऊ शकता. सूज कमी करण्याबरोबरच, सांधेदुखीच्या वेदना कमी करण्यासाठी त्याचे अनेक अँटी गुणधर्म आहेत. म्हणून हे या संधिवाताच्या आजरा पासून मुक्त होण्यासाठी रामबाण औषध आहे.

 

गुळवेलचा काढ़ा कसा बनवायचा ?

सामग्री :

  • दोन इंच आले
  • 3-4 तुळशीची पाने
  • गुळवेलची स्टिक
  • दोन काळी मिरी
  • दोन लवंग

कृती :

  • दोन ग्लास पाण्यामध्ये आले, तुळस आणि गुळवेल घालुन ते उकळवा.
  • जेव्हा पाणी अर्धे झाल्यावर गॅस बंद करा आणि त्यात काळी मिरी आणि लवंग यांचे मिश्रण मिसळा आणि पॅन झाकून ठेवा.
  • 5-10 मिनिटे झाल्यानंतर, ते गाळून घ्या आणि प्या. दिवसातून एक ग्लास पेक्षा जास्त सेवन करू नये.

 

गुळवेलचा काढा कसा घ्यावा ?

गुळवेलचे सेवन कसे करावे हा प्रश्न सर्वांच्या मनात येतो. गुळवेलचा काढ़ा सकाळी अनोशी (रिकाम्या) पोटी घेणे हे जास्त फायदेशीर असल्याचे दिसुन येते. परंतु गुळवेल मध्ये उष्णतेचे प्रमाण असल्या कारणाने उन्हाळ्यात गुळवेलच्या काढयाचे अधिक सेवन करू नये.

गुळवेल रोग प्रतिकाशक्ती वाढवते. अश्या परिस्थितीत, कोणत्याही प्रकारचे विषाणूजन्य संसर्ग टाळण्यासाठी तज्ञांच्या किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गुळवेलचे प्रमाण सुनिश्चित करुनच सेवन करू शकता. तसेच गुळवेल चूर्ण अथवा गुळवेल टॅब्लेटचे देखील सेवन करू शकता.

 

एक उपयोग असाही ….

गुळवेल मधील पौष्टिक सामग्री खूप जास्त आहे, म्हणून ती प्राचीन काळापासून औषधाचा अविभाज्य आणि विस्तृत भाग आहे. परंतु, गुळवेलचा पर्यायी वापर सुशोभीकरणासाठी सजावटीच्या वनस्पती म्हणून केला जाऊ शकतो.

गुळवेल कशी लावावी.. गुळवेलची वेल (Gulvel Plant) आपण सजावट म्हणून आपल्या घराच्या किंवा खिडकीच्या शेजारी लागवड करू शकता. परंतु वेलीला आकारात ठेवण्यासाठी आपल्याला नियमितपणे ट्रिम करणे आवश्यक आहे.

 

गुळवेलचे नुकसान (Side Effects of Giloy in Marathi)

  • गुळवेलचे सेवन केल्याने ब्लड शुगर (रक्तातील शुगरच्या) पातळीवर कमालीची घट करु शकते. तत्पूर्वी आपण कोणत्याही प्रकारचे सेवन अथवा उपचार सुरू करण्याआधी विशेष काळजी घ्यावी, अन्यथा रक्त साखर मध्ये लक्षणीय घट झाल्याचे दिसून येते.
  • तसेच, गुळवेल पाचन शक्तीसाठी उपयुक्त मानले गेले आहे. परंतु गरम गुणधर्मामुळे, पोटाशी संबंधित अधिक प्रमाणात अशा समस्या उद्भवू शकतात. जसे की पोटात जळजळ होणे आणि गॅस समस्या तयार होणे.
  • गर्भवती महिलांनी गुळवेलचे कोणत्याही प्रकारे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

 

लक्षात ठेवा :

गुळवेल खाण्याचे फायदे असले तरी, त्याचे थोड्या प्रमाणत नुकसान (Side Effect of Giloy in Marathi) देखील आहे. तत्पूर्वी आपण कोणत्याही प्रकारचे सेवन अथवा उपचार सुरू करण्याआधी तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.


आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram
शेयर करा: