किडनी स्टोन (मुतखडा) कसा होतो | Kidney Stone in Marathi

मुतखडा – किडनी स्टोनची माहिती (Kidney Stone Information in Marathi) :

आजकाल लोकांमध्ये मुतखडाचा आजार होणे ही एक सामान्य समस्या बनलेली आहे. मूत्रपिंड म्हणजे किडनी हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याचे कार्य रक्त फिल्टर करणे हे आहे. मूत्रपिंड हे सोडियम, कॅल्शियम यांसारखे इतर खनिजे कणाच्या रुपात मूत्रमार्गाद्वारे मूत्राशयात पोहोचतात आणि मूत्रमार्गातून ते शरीराबाहेर उस्तर्जित केली जातात.

Kidney stone in Marathi

किडनी स्टोन सारख्या समस्येचं मुख्य कारण म्हणजे जीवनशैली मध्ये झालेले बदल. तसेच, चुकीची आहार पद्धती व शारीरिक गरजे पेक्षा कमी पानी पिणे अश्या कारणामुळे मुतखड्याचा विकार होतो. ही समस्या टाळण्यासाठी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या लक्षणे ओळखणे आणि त्यांच्यावर वेळीच उपचार करणे.

 

किडनी स्टोन कसा होतो ?

किडनी मध्ये स्टोन ज्याला आपण मुतखडा असे देखील म्हणतो हे होण्याचे मुख्य कारण म्हणजे मूत्रपिंडांमध्ये विशिष्ट प्रकारचे क्षार जमा होणे. यात प्रथम बारीक स्टोन (निडस) तयार होतात, ज्याभोवती मिठाचा (क्षारांचा थर) जमा होतो. स्त्रियांपेक्षा पुरुषांना किडनी स्टोन होण्याची संभावना अधिक असते.

किडनी स्टोन हे होण्यामागे इतर जेनेटिक कारणे सुद्धा असतात तसेच, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, मधुमेह आणि इतर कोणत्याही आतड्यां संबंधी समस्या यांसारख्या जनुकीय कारणामुळे देखील उद्भवू शकतात.

किडनी स्टोनचा आपल्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणूनच, किडनी स्टोनची लक्षणे ओळखणे आणि त्यावर वेळेत उपचार घेणे महत्वाचे आहे.

चला तर मग जाणून घेऊया, मुतखडाच्या या सुरुवातीचे लक्षणे.

 

किडनी स्टोनची लक्षणे (Symptoms of Kidney Stone in Marathi) :

  • लघवी दरम्यान तीव्र वेदना व जळजळ होणे.
  • पोटात आणि पाठीच्या खालच्या बाजूस वेदना होणे.
  • ताप, घाम येणे इ.
  • मूत्रातुन रक्त स्राव होणे.
  • मळमळ आणि उलटी सारखे वाटणे
  • मूत्राला दुर्गंधी येणे
  • वारंवार लघवी होण्याची तीव्र इच्छा येणे.

 

किडनी स्टोन होण्याची कारणे (Causes of Kidney Stone in Marathi)

प्रथिने, मीठ किंवा ग्लुकोस जास्त असलेले आहार खाणे :

जर एखादी व्यक्ती प्रथिने, मीठ किंवा ग्लुकोस जास्त असलेले आहार अधिक प्रमाणत घेत असेल, तर त्याला मुतखडा होण्याची समस्या उद्भवू शकते.

अजून वाचा : आहारात सोडियमचे (मिठाचे) प्रमाण कमी केल्याचे 20 फायदे

 

डिहायड्रेशन :

आपले मानवी शरीर 70% पाण्याने व्यापलेले आहे. त्यामुळे शरीरात पुरेसे प्रमाण असणे खुप महत्त्वाचे आहे. कारण पाण्यामध्ये आवश्यक असे मिनिरल घटक शरीरासाठी खुप उपयुक्त असतात. म्हणून, जी व्यक्ती पुरेसे पाणी पिणार नाही त्याला किडनी स्टोन होण्याची संभावना जास्त असते.

 

लघवी थांबविणे :

काही लोकांना लघवी खुप वेळ थांबवण्याची सवय असते. लघवीचे जास्त वेळ थांबविणे देखील मूत्रपिंडाच्या समस्या वाढवू शकते. या चुकीच्या सवयीमुळे मूत्रपिंडातील स्टोन किंवा मूत्रपिंड निकामी होण्यासारख्या समस्या देखील उद्भवू शकतात.

 

थायरॉईड असणे :

जर एखाद्या व्यक्तीस थायरॉईड असेल तर त्याला किडनी स्टोन होण्याची समस्या उद्भवू शकते. म्हणूनच, थायरॉईड ग्रस्त असलेल्या व्यक्तीने स्टोनचा त्रास आहे की नाही याची पुष्टी करण्यासाठी हे डॉक्टरच्या सल्ल्याने चाचणी केली पाहिजे.

 

बायपास शस्त्रक्रिया :

किडनी स्टोनची समस्या अलीकडेच बायपास शस्त्रक्रिया केलेल्या व्यक्तीलाही होऊ शकते. हे मुख्यतः या शस्त्रक्रियेच्या दुष्परिणामांमुळे होते.

 

धूम्रपान आणि तंबाखूचे सेवन करणे :

धूम्रपान आणि तंबाखूच्या अति सेवनामुळे बर्‍याच गंभीर आजार उद्भवतात. विशेषत: फुफ्फुसांशी संबंधितील रोग परंतु त्याचबरोबर एथेरोस्क्लेरोसिस या सारखा रोग देखील होतो. ज्यामुळे रक्तवाहिन्यांमधील रक्ताचा प्रवाह कमी होतो आणि रक्त कमी झाल्यामुळे मूत्रपिंडाची कार्य करण्याची क्षमता कमी होते. परिणामी किडनी स्टोन सारखे आजार उद्भवतात.

 

अतिरेक वजन :

किडनी स्टोन हे अतिरेक वजनामुळे देखील होवू शकतात. म्हणूनच एखाद्या व्यक्तीने आपले वजन नियंत्रित ठेवले पाहिजे.

अजून वाचा : वजन कमी करण्याचे घरगुती उपाय | Weight Loss Tips in Marathi

 

किडनी स्टोन वरती घरगुती उपाय (Kidney Stone Home Remedies in Marathi)

भरपूर पाणी प्या :

पाणी आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेला सर्वात मोठा घटक आहे. जी व्यक्ती जास्तीत जास्त पाणी पिते त्याचे शरीर अधिक हायड्रेटेड राहते. त्याशिवाय पाचन प्रणाली देखील ठीक ठेवण्यास मदत होते.

कोणत्याही सामान्य व्यक्तीने दिवसातून किमान 7-8 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे. आपण जितके जास्त पाणी प्याल तितके शरीरातून जास्त विषारी टॉक्सिक पदार्थ मूत्राद्वारे शरीरा बाहेर टाकले जातात. जेव्हा स्टोन लहान असतो तेव्हा तो लघवीतून आपोआप बाहेर निघून जातो. म्हणुन, आपण जर मुतखड्याच्या आजारापासून ग्रस्त असल्यास अधिक पाणी पिणे गरजेचे आहे त्यामुळे स्टोन बाहेर काढून टाकण्यास मदत करू शकते.

अजून वाचा : पाणी पिण्याचे फायदे | Top 8 Health Benefits of Drinking Water in Marathi

 

लिंबाचा रस :

तुम्हाला आश्चर्य वाटले परंतु लिंबू आणि ऑलिव्ह ऑइल मुतखडा ग्रस्त रुग्णांसाठी एक अतिशय फायदेशीर उपाय आहे. लिंबाचा रस स्टोन तोडण्यात मदत करते, तर ऑलिव्ह ऑईल ते मूत्राद्वारे बाहेर टाकण्यास मदत करते. जर तुम्हाला शस्त्रक्रियाविना किडनी स्टोनपासून मुक्त होयचं असेल तर दररोज हे मिश्रण घ्या.

अजून वाचा :लिंबाचे फायदे | Lemon Benefits in Marathi

 

आवळा :

आवळा किडनी स्टोन काढून टाकण्यासही मदत करते. यासाठी रोज सकाळी एक चमचा आवळा पावडर खा. आवळा व्यतिरिक्त, बेरी देखील किडनी स्टोनच्या उपचारांमध्ये प्रभावी असल्याचे मानले जाते.

अजून वाचा : आवळा खाण्याचे फायदे | (आमला) Amla Top Benefits in Marathi

 

डाळिंब :

डाळिंब आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असल्याचे मानले जाते. डाळिंबाचा रस आपल्या शरीराला पाण्याच्या कमतरतेपासून वाचविण्यास मदत करते आणि नैसर्गिक पद्धतीने किडनी स्टोनच्या विकारामध्ये आराम प्रदान करण्याचे काम करते. कारण डाळिंबामध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात. याशिवाय डाळिंबामध्ये इतरही अनेक पौष्टिक पदार्थ असतात. हे रोग प्रतिकारक प्रणालीला बळकट करण्याचे देखील कार्य करते.

 

सफरचंदाचा रस किंवा व्हिनेगर :

सफरचंद रस आणि व्हिनेगरमध्ये सायट्रिक ऍसिड आढळते, जे किडनी स्टोनला लहान लहान कणांमध्ये तोडण्याचे काम करते. किडनी स्टोनमध्ये सफरचंद सायडर व्हिनेगर हे दररोज दोन लहान चमचे कोमट पाण्याने घेतले जाऊ शकते.

 

तुळस :

तुलसी किडनी स्टोन काढून टाकण्यासाठी एक रामबाण उपाय असल्याचे दिसुन येते. तुळशीच्या पानांमध्ये एसिटिक असिड आणि आवश्यक तत्व आढळतात. म्हणुन, दररोज 5 ते 7 तुळशीची पाने चघळून खाल्याने किडनी मधील स्टोन फोडून मूत्रमार्गे बाहेर टाकण्यास मदत करतात.

अजून वाचा : तुळशीचे फायदे | Top 12 Health Benefits of Tulsi (Basil) in Marathi

 

टरबूज :

टरबूज हे पोटॅशियमचे चांगले स्रोतआहे, जे मूत्रपिंड मजबूत करण्यास मदत करते. हे लघवी मधील आम्लाची पातळी समान ठेवते. याचबरोबर त्यात पाण्याचे प्रमाणही अधिक असते. ते खाल्ल्याने शरीरात पाण्याचे प्रमाण वाढते आणि लघवीद्वारे स्टोन बाहेर उर्त्सजित केले जातात.

 

लक्षात ठेवा :

हा लेख केवळ आपल्याला सामान्य माहिती प्रदान करण्यासाठी दिला जात आहे. आपल्याला कोणत्याही आजारचे निदान करण्यापूर्वी किंवा कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास कृपया प्रथम आपल्या डॉक्टरांचा किंवा विशेष तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.


आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

शेयर करा: