ग्रीन टी चे फायदे आणि नुकसान | Benefits of Green Tea in Marathi

ग्रीन टी चे फायदे (Benefits of Green Tea in Marathi) :

हल्ली ग्रीन टी (Green Tea) चे सेवन करण्याचे प्रमाण बऱ्या पैकी वाढले आहे. विशेषतः डाएट फॉलो करणाऱ्या व्यक्तींसाठी हा महत्वाचा घटक झाला आहे. ज्यांना वजन कमी करायचे आहे ते ग्रीन टी (Green Tea) चे हमखास सेवन करतात. ग्रीन टी ही कैमेलिया साइनेन्सिस या नावाच्या वनस्पतीच्या पानांपासून बनविली जाते. खूप साऱ्या अध्यानानुसार, ग्रीन टी निरोगी आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे. जे लोक दररोज ग्रीन टी चे सेवन करतात त्यांना हृदयरोग, वजन वाढणे आणि कोलेस्टेरॉलची पातळी वाढणे यासारखी समस्या कमी करते.

ग्रीन टीमध्ये स्थित असलेले अँटीऑक्सिडंट्स जे चयापचय वाढवतात. त्यामुळे चरबी कमी करण्यास मदत होते. तसेच, ते प्यायल्याने भूक देखील कमी लागते, यामुळे आपले वजन नियंत्रणाखाली राहते.

Benefits of Green Tea in Marathi

बहुतांश लोकांना ग्रीन टी कधी प्यावी व ग्रीन टी कशी बनवायची हे माहित नसते त्यामुळे ग्रीन टीच्या फायद्यांपासून वंचित राहतात. परंतु ग्रीन टी पिण्याचे फायदे (Benefits of Green Tea in Marathi) आपल्या निरोगी आरोग्यासाठी खूपच लाभदायक ठरतात.

 

ग्रीन टी चे फायदे (Benefits of Drinking Green Tea in Marathi)

वजन कमी करण्यास मदत करते :

ग्रीन-टी (Green Tea) एक नैसर्गिक अँटीऑक्सिडेंट असते. यामुळे तुमच्या शरीरातील सर्व टॉक्सिक घटक बाहेर टाकण्यास उर्सजित करते. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत करू होते. परंतु वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी विशिष्ट वेळी सर्वोत्तम कार्य करते. नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण होण्याच्या 30 मिनिटांपूर्वी एक कप ग्रीन-टी वजन कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकते.

अजून वाचा : वजन कमी करण्याचे घरगुती उपाय | Weight Loss Tips in Marathi

 

मधुमेहासाठी फायदेशीर :

वजन कमी करण्याबरोबरच ग्रीन टी मधुमेहाच्या रूग्णांसाठी खूप उपयुक्त आहे. त्यातील स्थित असलेले अँटिऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुण मधुमेहाच्या रुग्णांमध्ये हृदयाशी संबंधित आजार होण्याचा धोका कमी करण्यास मदत करते. एका अध्ययनानुसार, जर तुम्ही आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार दररोज ग्रीन टी (Green Tea) चे सेवन करत असाल तर तुमचा टाइप 2 मधुमेह होण्याचा धोका खूप कमी होतो.

अजून वाचा : मधुमेह (Diabetes) म्हणजे काय ? त्याची कारणे, लक्षणे आणि उपाय

 

त्वचेसाठी फायदेशीर ठरते :

ग्रीन टीमध्ये कैटेचिन नावाचा घटक असतो, जो वृद्धत्व विरोधी एजंट म्हणून काम करतो. वयानुसार, मुक्त रेडिकल आपल्या शरीरात जमा करण्यास सुरवात करतात. ज्यामुळे त्वचेवर आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडण्यास सुरुवात होते.परंतु ग्रीन टीमध्ये असलेले कैटेचिन हे घटक रॅडिकल्स जमा होण्यापासून रोखतात. दुसरीकडे, पॉलीफेनॉल शरीरात नवीन पेशी बनवतात आणि जुन्या पेशींना कमकुवत होण्यापासून वाचवतात. हे दोन्ही घटक एकत्रितपणे त्वचेला सुरकुत्या येण्यापासून आणि वृद्धत्वापासून लांब ठेवतात.

अजून वाचा : कोरफड खाण्याचे फायदे | Benefits of Eating Aloe Vera in Marathi

 

मेंदूसाठी फायदेशीर :

ग्रीन टी (Green Tea) हे शरीर आणि मेंदूसाठी खूप फायदेशीर आहे. यात अमीनो ऍसिड असतात जे मानसिक ताण तणाव कमी करणारे हार्मोन्सच्या स्राव होण्यास मदत करतात. या संप्रेरकास म्हणजेच हार्मोन्सास सेरोटोनिन असे म्हणतात. ग्रीन टीमध्ये उपस्थित अँटीऑक्सिडंट्स मेंदूत असलेल्या सेरोटोनिनच्या प्रवाहास गती देतात, ज्यामुळे मानसिक ताण कमी होतो.

अजुन वाचा : नैराश्य (डिप्रेशन) का येते व नैराश्य कसे दूर करावे ?

 

तोंडातील संसर्ग प्रतिबंध करते :

ग्रीन टी मधील कैटिचिन नावाच्या बॅक्टेरिया नष्ट करतात आणि इन्फ्लूएंजा व्हायरस सारख्या व्हायरसांना प्रतिबंधित करून आपल्या तोंडात होणाऱ्या संसर्गाची शक्यता कमी करतात. त्याचबरोबर ते स्ट्रेप्टोकोकस म्युटान्सच्या वाढीस प्रतिबंध करण्यास देखील मदत करतात. आपल्या तोंडातील बॅक्टेरिया आणि व्हायरसशी लढून दुर्गंधी दूर करण्यास मदत करते.

अजून वाचा : लवंग खाण्याचे फायदे | Benefits of eating Cloves in Marathi

 

कर्करोगापासून बचाव करते :

कैटेचिन्स सारख्या पॉलीफेनॉलमुळे कर्करोग होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी होते. कैटेचिन्स इतर पॉलीफेनॉल्स एकत्र मुक्त रॅडिकल्स लढा देतात. जेणेकरून डीएनएमुळे होणाऱ्या नुकसानापासून पेशींचे संरक्षण होते. पॉलीफेनॉल्स हे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करत असल्या कारणाने आपण अनेक गंभीर आजारांपासून संरक्षित रहता. ग्रीन टी फुफ्फुस, त्वचा, स्तन, यकृत, पोट आणि आतड्यांमधील कर्करोगापासून संरक्षण प्रदान करते. ग्रीन टीमध्ये असलेले अनेक घटक आणि पोषक्ततव कर्करोगाच्या पेशींना वाढण्यापासून प्रतिबंध करतात.

 

ग्रीन टी कशी बनवायची ? (Green Tea Recipe in Marathi)

सामग्री :

  • दोन कप पाणी
  • अर्धा चमचा ग्रीन टी.
  • चवीनुसार मध

कृती :

सर्वप्रथम, एका चहाच्या पातेल्यात दोन कप पाणी टाका आणि ते चांगले उकळू घ्या. नंतर त्या उकललेल्या पाण्यामध्ये ग्रीन टी घाला आणि उकळी येऊ द्या. उकळी आल्यावर गॅस बंद करा आणि आता एक चमचा मध घालून चहामध्ये मध मिसळून घ्या. अश्याप्रकारे तुमचा ग्रीन टी तयार आहे. गरमागरम ग्रीन टीचा आस्वाद घ्या.

 

ग्रीन टी कधी प्यावी ? (When to Drink Green Tea in Marathi)
व्यायाम करण्यापूर्वी :

व्यायाम करण्यापूर्वी अर्धा तास ग्रीन टी प्यायल्याने तुमची ऊर्जा पातळी वाढू शकते. हे निश्चितपणे शरीरातील अतिरिक्त फॅट्स बर्न आणि वजन कमी करण्यास मदत करू शकते.

 

न्याहारीनंतर :

तज्ञांच्या मते, सकाळी रिकाम्या पोटी आणि नाश्त्याच्या अगोदर घेऊ नये. नाश्ता आणि दुपारच्या जेवणानंतर अर्ध्या किंवा एक तासानंतर घेणे केव्हाही चांगले.

 

जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर :

आपल्यापैकी बर्‍याच जणांना जेवण झाल्यावर ग्रीन टी पिण्याची सवय आहे. तथापि, ग्रीन टी मधून जास्तीत जास्त फायदे मिळविण्यासाठी ते जेवणाच्या दोन तास आधी किंवा नंतर ग्रीन टी पिणे फायदेशीर असल्याचे दिसून आले आहे.

 

रात्री :

जर तुम्ही झोपायच्या किमान दोन तास आधी ग्रीन टी चे सेवन केल्याने तुम्हाला चांगल्या झोपेसह आरोग्य प्रदान करते. हे आपल्या शरीराचा चयापचय दर वाढवते आणि झोपताना फॅट्स बर्न करण्यास मदत करते.

 

ग्रीन टी पिणे कधी टाळावे ?

झोपण्यापूर्वी ग्रीन टी पिणे टाळावे :

झोपण्यापूर्वी ग्रीन टी पिणे प्रत्येकासाठी योग्यच असते असे नाही. कारण ग्रीन टी मधील कॅफिनची मात्रा थकवा जाणवण्याची भावना कमी करून जागरूकता आणि लक्ष केंद्रित करण्यास प्रवृत्त करते. ज्यामुळे झोप येणे कठीण होते. म्हणून रात्री ग्रीन टी प्यायल्याने तुमची रात्रीची झोप विस्कळीत होऊ शकते.

 

रिकाम्या पोटी ग्रीन टी पिणे टाळावे :

जेव्हा आपण काहीही न खाता ग्रीन टी चे सेवन करता तेव्हा ग्रीन टी पियाल्याने पोटात पित्ताची समस्या वाढवू शकते. यामुळे मळमळ, उलट्या आणि यकृत समस्या उद्भवू शकतात. तसेच रिकाम्या पोटी ग्रीन टीचे सेवन केल्याने अन्नातील आयरोन यासारख्या विविध पोषक घटकांचे शोषण करणे थांबते. यामुळे डिहायड्रेशन होते आणि गैस्ट्रिक रस सोडण्यास उत्तेजित करते. ज्यामुळे अल्सर देखील होऊ शकते.

 

ग्रीन टी चे नुकसान (Side Effects of Green Tea in Marathi)

  • ज्या महिला गर्भवती आहेत किंवा त्यांच्या बाळाला स्तनपान करतात त्यांनी देखील ग्रीन टी चे अधिक सेवन करणे टाळावे. कारण ग्रीन टी मध्ये कॅफिनची मात्रा असते ते गर्भवती स्त्रियांना नुकसानदायक ठरू शकते.
  • जर आपण रिकाम्या पोटी ग्रीन टी पित असाल तर तुम्हाला अ‍ॅसिडिटी (Acidity), आम्लपित्त, बद्धकोष्ठता, उलट्या, मळमळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
  • अधिक ग्रीन टी चे सेवन केल्याने काही लोकांमध्ये डोकेदुखी सारखी समस्या दिसून येते. कारण यात असलेल्या कॅफीन हे डोकेदुखीला कारणीभूत ठरते.
  • निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला चांगली आणि पुरेपूर झोप मिळणे फार महत्वाचे आहे. परंतू ग्रीन टीच्या अतिसेवनामुळे निद्रानाश होण्याची शक्यता असते. कारण ग्रीन टीचे अति सेवन तुमच्या झोपेमध्ये व्यत्यय आणू शकते.
  • ग्रीन टी चे अधिक प्रमाणात सेवन केल्याने भूक कमी होऊ शकते. ज्यामुळे तुमचे शरीर देखील कमकुवत होऊन अशक्तपणा येऊन इतर आजारांना बळी पडण्याची शक्यता असते.

 

लक्षात ठेवा :

ज्या प्रमाणे आपल्या आरोग्यासाठी ग्रीन टी पिण्याचे फायदे (Benefits of Green Tea in Marathi) जरी असले तरी त्याच प्रमाणे ग्रीन टी चे तोटे देखील आहे. ग्रीन टी चे योग्यरित्या सेवन कसे करावे हे जाणून घेण्यासाठी कृपया आपल्या डॉक्टरांचा अथवा आरोग्य तज्ञांचा सल्ला घ्यावा.


आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

शेयर करा: