डोमेन नेम म्हणजे काय | What is Domain Name in Marathi

डोमेन नाव काय आहे (What is Domain Name in Marathi) :

डिजिटल युगात प्रत्येकजण आपला ब्लॉग आणि व्यवसाय वाढविण्यासाठी इंटरनेटचा वापर करत असतो आणि कोणताही व्यवसाय इंटरनेटवर पसरवण्यासाठी वेबसाईट शिवाय इतर दुसरे माध्यम नाही.

जेव्हा आपण वर्डप्रेस किंवा ब्लॉगर सारख्या प्लॅटफॉर्मवर आपली वेबसाईट तयार करण्याचा विचार करता. तेव्हा आपली वेबसाईट कशी व कुठे असावी यावतिरिक्त तुमच्या वेबसाईटचे डोमेनचे नाव काय असावे आणि ते कसे निवडावे ह्या बद्दलची पुरेपूर माहिती असणे आवश्यक आहे. प्रथम लक्षात घेतले पाहिजे की, डोमेन नाव म्हणजे काय आणि ते किती प्रकार आहेत. चला तर मग जाणून घेवुया. डोमेन नेम विषयी सविस्तरपणे :

 

डोमेन नेम म्हणजे काय (What is Domain Name in Marathi)

डोमेन नेम (Domain Name) हे कोणत्याही वेबसाईटचे नाव आहे. डोमेन नाव हा एक पत्ता (Address) आहे. ज्यावरून इंटरनेट युजर त्या वेबसाईटवर सहजपणे प्रवेश करू शकतो.

डोमेन नाव हे एक युनिक नाव असते. जे वेबसाईटला ओळखत प्राप्त करून देते. उदा. आमच्या वेबसाईटचे डोमेन नाव “www.marathijournal.in” आहे. त्याचप्रमाणे, प्रत्येक वेबसाईटचे एक डोमेन नाव असते. जे ॲड्रेससारखे कार्य करते, जे युजर्सना वेबसाईटवर प्रवेश करण्यासाठी वापरले जाते.

Read More : वेब होस्टिंग म्हणजे काय | What is Web Hosting in Marathi

 

डोमेन नाव कसे काम करते (How a Domain Name works in Marathi)

जेव्हा आपण एखाद्या वेबसाईटवर जाता. तेव्हा वेब ब्राउझरच्या अ‍ॅड्रेस बारमध्ये डोमेन नाव (Domain Name) प्रविष्ट करूनच ती वेबसाईट ओपन होते.

म्हणजेच, डोमेन नाव इंटरनेट सर्व्हरवर वेबसाईटला शोधण्यासाठी आणि ओळखण्यासाठी वापरली जातात. त्यासाठी ते एक आयपी पत्ता वापरतात, जे क्रमांकाची मालिका असते.

वास्तविक, आयपी पत्त्यावर कार्य करणारे डोमेन नाव किंवा डीएनएस [Domain Name System]. प्रत्येक वेबसाइटचा वेगळा IP पत्ता असतो. उदा. फेसबुकचा आयपी ऍड्रेस 69.63.176.13.69.63.2 हा परंतु ही संख्या लक्षात ठेवणे फार कठीण आहे. म्हणूनच डोमेन नेम सिस्टम सुरू केले.

एक डोमेन नाव हे मजकूर (Text) आणि संख्या (Number) यां दोन्हीचे संयोजन असू शकते आणि हे विविध डोमेन नाव विस्तारांसह संयोजनात वापरले जाऊ शकते, जसे की .com, .net, .in आणि बरेच काही.

डोमेन नाव लक्षात ठेवण्यास सुलभ शब्द आहेत. जी आपण भेट देऊ इच्छित असलेल्या वेबसाईटवर डीएनएस सर्व्हरसह संचार करण्यासाठी वापरू शकतो. डोमेन नेम सिस्टम (DNS) असे आहे की, जे वेबसाईटचे कस्टम डोमेन नेमचे आयपी ऍड्रेस मध्ये रुपांतरीत करतो.

Read More : ब्लॉग आणि ब्लॉगिंग म्हणजे काय | Blogging in Marathi

 

डोमेनचे प्रकार (Types of Domain Name in Marathi)

टॉप लेवल डोमेन (Top Level Domains) :

टॉप लेवल डोमेन (TLDs) अश्या प्रकारेचे डोमेन सर्वाधिक लोकप्रिय आणि जास्त वापरले जाणारे डोमेन आहे. सर्च इंजिन मध्ये अश्या डोमेनचे अधिक महत्व असते.

उदाहरणार्थ :

 • .com : कमर्शियल वेबसाईट
 • .org : ऑर्गनायझेशन संबधित वेबसाईट
 • .net : नेटवर्क संबधित वेबसाईट
 • .gov : सरकारी संस्था संबधित वेबसाईट
 • .edu : शिक्षण संस्था संबधित वेबसाईट
 • .info : माहिती प्रदान वेबसाईट
 • .biz : बिझनेस संबधित वेबसाईट

 

कंट्री कोड टॉप लेवल डोमेन (Countryy Code Top Level Domains) : 

जसे त्याचे नाव सूचित करते (CCTLDs) म्हणजेच या प्रकारच्या डोमेनचा वापर त्यांच्या संबंधित देशासाठी केला जातो. हे डोमेन कोणत्याही देशाच्या नावाच्या कोणत्याही दोन शब्दाने बनलेले असते. जर कोणत्याही वेबसाइटच्या मागे या देशांचे कोणतेही सहयोगी असतील तर त्या देशाची वेबसाईट असल्याचे प्रतित होते.

उदाहरणार्थ :

 • .in : भारत (India)
 • .pk : पाकिस्तान (Pakistan)
 • .cn : चीन (China)
 • .us : अमेरिका (United State)
 • .ch : स्विझरलँड (Switzerland)
 • .ru : रशिया (Russia)
 • .br : ब्राझिल (Brazil)
 • .ca : कॅनडा (Canada)

 

न्यू जनेरिक टॉप लेवल डोमेन (New Generic Top-Level Domain)  :

अश्या प्रकारच्या New Generic Top-Level Domains (NGTLDs) डोमेन मध्ये संबंधित वेबसाईट कोणत्या प्रकारची आहे. त्यांच्या माहितीचे व बिझिनेस आधीच वर्णन केलेले असते.

उदाहरणार्थ :

 • .bike : बाईक व्यवसाय संबधित
 • .cafe : कॅफे रेस्टॉरंट संबधित
 • .movie : सिनेमा वेबसेरीज संबंधित
 • .dance : नुत्य डान्स क्लास संबंधित
 • .yoga : योगा क्लास संबंधित
 • .online : इंटरनेट संबंधित

 

डोमेन नेम कोठून खरेदी करावे (Where to Buy a Domain Name)

डोमेन नेम सर्व्हिस प्रदाता (Domain Name Service Provider) कंपन्या भरपुर आहेत. परंतु काही Best Domain Registrar in India कंपन्याची नावे खाली दिली गेली आहेत. जिथे तुम्ही ब्लॉग अथवा बिझनेस वेबसाईट करीता सहजरित्या डोमेन विकत घेऊ शकता. त्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला त्या वेबसाईट वर जाऊन खाते तयार करावे लागेल. नंतर डोमेन नाव सर्च करून तुमची वयक्तिक माहिती देऊन पेमेन्ट करून डोमेन विकत घेऊ शकता.

 • GoDaddy
 • Namecheap
 • HostGator
 • Bigrock
 • Bluehost
 • Google

 

डोमेन नेमच्या किंमती (Price of the Domain Name)

 • .com : ₹ 499 ~ ₹ 899
 • .in : ₹ 399 ~ ₹ 699
 • .net : ₹ 699 ~ ₹ 999
 • .org : ₹ 749 ~ ₹ 899

 

डोमेन नेम कसे असावे (How the Domain Name should be in Marathi)

डोमेन नेम म्हणजे काय | What is Domain Name in Marathi

 • जर आपण एखाद्या वेबसाईट साठी डोमेन खरेदी करणार असाल तर कोणत्या नावावरून असावे. ह्या पुढील बाबींचा विचार करून मग घेणे महत्वाचे आहे.
 • नेहमी युनिक आणि टॉप लेव्हल डोमेन निवडा. जसे की .com, .in, .net यांसारखे डोमेन निवडा. जेणेकरुन लोकांना तुमच्या वेबसाईटवर विश्वास संपादन होईल.
 • आपण जो काही डोमेन विकत घेत आहे. तो लोकांना लक्षात ठेवणे सहज सोपे जाईल.
 • आपले डोमेन नाव हे आपल्या कामाची Identity व ब्रँड आहे. त्यानुसारच नावं ठेवले पाहिजे.
 • आपली वेबसाईट कश्या संबधित आहे. समजा, जर ती शिक्षण आणि संस्था संदर्भात असेल तर .org किंवा .info यांचे पुर्ण आकलन करून निवडा.

आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

शेयर करा: