ब्लॉग आणि ब्लॉगिंग म्हणजे काय | Blogging in Marathi

ब्लॉग आणि ब्लॉगिंग म्हणजे काय | Blogging in Marathi :

आजच्या काळात इंटरनेट वरून पैसे कमवण्याच्या हजारो मार्गांपैकी एक सर्वात सोपा मार्ग म्हणजे ब्लॉगिंग (Blog meaning in Marathi). पण ब्लॉगिंग करत असताना गरज आहे फक्त चांगले लिहिण्याची, अनुभवातून नवनवीन गोष्टी शिकण्याची आणि जगापुढे सरळ सोप्या भाषेत माडण्याची. जर तुमच्याकडे हे कौशल्य असेल तर तुम्हाला ब्लॉगिंगमध्ये यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

Blogging in Marathi

आज या पोस्टमध्ये आपण ब्लॉग म्हणजे काय, ब्लॉगिंग काय आहे, ब्लॉगचे प्रकार कोणते आणि आपल्याला ब्लॉगिंगमधून कोणते फायदे मिळू शकतात ह्या बद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. तर ज्यांना ब्लॉगिंग बद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे त्यांनी ही संपूर्ण पोस्ट नक्की वाचा.

अजून वाचा : ब्लॉग कसा तयार करावा | How to Start Blog in Marathi

 

ब्लॉग लेखन म्हणजे काय ? (What is Blog Writing in Marathi)

ब्लॉग ही एक वेबसाईट आहे. जिथे तुम्ही तुमचे विचार इंटरनेटवर लेख आणि चित्रांच्या माध्यमातून प्रकाशित करता. ब्लॉगवर लेख लिहिणाऱ्यांना ब्लॉगर( Blogger) असे म्हणतात.

ब्लॉगर्सचा हेतू हा आहे की जास्तीत जास्त लोक त्यांच्या ब्लॉग पोस्ट पोचविणे आणि त्यांच्या समस्या सोडविणे. जेणेकरून लोकांना योग्य माहिती मिळेल आणि त्यांचा ज्ञानात भर पडेल.

 

ब्लॉगिंग म्हणजे काय (What is Blogging in Marathi)

जसे आपण आधी सांगितले होते की ज्या वेबसाईटवर आपण लेख पब्लिश करतो त्या प्लॅटफॉर्मला ब्लॉग असे म्हणतात आणि ते चालवणे म्हणजे ब्लॉगिंग होय. ब्लॉगिंग करणे म्हणजे फक्त ब्लॉग चालवणे असा अर्थ होतो. सर्व प्रथम तुम्हाला एक टॉपिक निवडावा लागेल. ज्याला आपण इंग्रजीत Niche असे म्हणतो.

सर्वप्रथम तुमच्या आवडीचा Niche किंवा विषय निवडा त्या कीवर्डवर संशोधन (Keywords Research) करा. जर तुम्हाला लिखाणात रस असेल आणि तुमचं लिखाण लोकांपर्यंत पोहचण्यात स्वारस्य असेल तर ब्लॉगिंग ही तुमच्यासाठी योग्य कारकीर्द होईल. जर तुम्ही चांगले लिहू शकत असाल तर आणि योग्य विषय निवडू शकलात तर तुम्ही तुमच्या ब्लॉगमधून विविध मार्गांनी भरपूर पैसे कमवू शकता. लक्षात ठेवा की तुमची सामग्री काहीही असली तरी तुम्ही स्वतः लिहलेली असायला हवी. ती कोठूनही कॉपी केलेली नसावी.

Read More : वेब होस्टिंग म्हणजे काय | What is Web Hosting in Marathi

 

ब्लॉगिंगचे प्रकार (Types of Blogging in Marathi)

वैयक्तिक ब्लॉग (Personal Blog) :

ऑनलाईन माध्यमातून माहिती शेअर करण्यासाठी किंवा कल्पना व्यक्त करण्यासाठी वैयक्तिक ब्लॉग हे एक उत्तम माध्यम बनले आहे. पूर्वीच्या काळात कोणी कल्पना करू शकत नव्हते की इंटरनेटवर आपले विचार व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून देखील काम करू शकते. परंतु हे निःसंशयपणे घडले आणि रोजनिशीची जागा आता ब्लॉगिंगनी घेतली असे बोलणें वावग ठरणार नाही.

आजकाल एक ब्लॉगर त्याच्या ब्लॉगमध्ये त्याच्या कोणत्याही आवडीबद्दल निःसंशयपणे लिहू शकतो, जसे की कविता लेखन, शिक्षण, तंत्रण्यान किंवा राजकारण का नाही असो. वैयक्तिक ब्लॉगिंगमध्ये कोणत्याही प्रकारचे बंधन नाही.

वैयक्तिक ब्लॉगिंग ही संकल्पना 1990 च्या उत्तरार्धात सुरू झाली. सुरवातीस यामध्ये लोक त्यांची ऑनलाईन डायरी लिहायचे. ज्यात ते काहीही लिहायचे जणू तो रोजच्या प्रवासाचे अनुभव लोकांशी शेअर करत असे. ज्याप्रमाणे सध्या फेसबुक आणि ट्विटर द्वारे पोस्ट शेअर केले जातात त्याच प्रमाणे वैयक्तिक ब्लॉग द्वारे अनुभव शेयर केले जातात.

 

बिझनेस ब्लॉग (Business Blog in Marathi) :

बिझनेस ब्लॉगमध्ये ब्लॉगर त्यांच्या व्यवसायासाठी ब्लॉग लिहत असतात. त्याच्या व्यवसायाला नवीन ओळख देण्यासाठी आणि व्यवसायासाठी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ते ब्लॉगिंग करतात. हेच बिझनेस ब्लॉगिंग सुरू करण्याचा मुख्य उद्देश आहे.

या प्रकारच्या ब्लॉगमध्ये ब्लॉगर्स स्वतःपेक्षा व्यवसायावर अधिक लक्ष केंद्रित करतात.

व्यवसायिक ब्लॉगर्स (Business Bloggers) त्यांच्या ब्लॉगमध्ये त्यांच्या ग्राहकांना आवडणाऱ्या विषयांवर लिहितात. अश्या रितीने त्याच्या व्यवसायाची वाढ आणि जाहिरात होण्यास मदत होते.

 

प्रोफेशनल ब्लॉग (Professional Blog in Marathi) :

प्रोफेशनल ब्लॉगर्स त्यांच्या ब्लॉगमधून ऑनलाइन पैसे कमवण्यासाठी ब्लॉग चालवतात. यामध्ये ते त्याच्या ब्लॉगमधून वेगवेगळ्या प्रकारे पैसे कमवण्याचे मार्ग लोकांपुढे आणतात. यासाठी त्या ब्लॉगवर डिजिटल उत्पादने विकणे किंवा इतर लोकांच्या उत्पादनांचा प्रचार करून Affiliate Marketing च्या द्वारे त्यातून कमिशन प्राप्त करतात.

प्रोफेशनल ब्लॉगर्स त्यांच्या एका ब्लॉगवर लक्ष केंद्रित करतात किंवा विविध Niche ब्लॉगच्या मदतीने पैसे कमवतात. हा ब्लॉग चालवण्यासाठी तुमच्याकडे अधिकाधिक लोकांना आकर्षित करण्याची क्षमता असली पाहिजे. जर तुमच्या ब्लॉगवर जास्त Traffic असेल तरच तुम्ही अधिक पैसे कमवू शकाल.

 

Niche ब्लॉग (Niche Blog in Marathi) :

या प्रकारच्या ब्लॉगमध्ये, ब्रंड टॉपिक व्यतिरिक्त, तुम्हाला विशिष्ट एका विषयावर ब्लॉग चालवावा लागतो.

उदाहरण – फूड ब्लॉग, गुंतवणूक मार्गदर्शक, आरोग्य ब्लॉग, कविता लेखन, तंत्रज्ञान ब्लॉग यासारख्या कोणत्याही एका विषयावर आपल्या Niche ब्लॉगमध्ये लिहावे लागते.

 

ब्लॉगिंगचे काय फायदे आहेत (Blogging Benefits in Marathi)

  • तुम्ही ब्लॉगिंग करण्याच्या छंदाला तुम्ही भविष्यात करिअरच्या दृष्टिकोनातून बघू शकता.
  • ब्लॉगिंग मध्ये लिहण्याचे पुर्णपणे स्वतंत्र असते. त्यामुळे आपण आपल्या क्षेत्रात अधिक प्रभुत्व प्राप्त करता.
  • तुम्हाला दररोज नवनवीन शिकण्याची आवड निर्माण होते. त्यामुळे तुमच्या ज्ञानात भर पडते.
  • ब्लॉगिंग करत असताना तुमच्या जीवनात आमूलाग्र बदल होत असतात. त्यातील एक म्हणजे तुम्ही जगापुढे कसे व्यक्त होता. तुमचा आत्मविश्वास वाढण्यास सुरुवात होते.
  • ब्लॉगिंग करण्यामागचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पैसा कमविणे. आपण ब्लॉगिंगमध्ये जाहिरात, Affiliate Marketing, Brand Promotion अश्या विविध प्रकारे पैसे कमवू शकता.
  • आपल्याला ब्लॉगिंगचा फायदा हा आहे की कळत नकळत तुम्ही जगभरात प्रसिद्ध होत असतात. जगभरातील लोक तुम्हाला तुमच्या प्रोफेशनवरून ओळखू लागता.

आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

शेयर करा: