ब्लॉग कसा तयार करावा | How to Start Blog in Marathi

ब्लॉग कसा तयार करावा (How to Start Blog in Marathi) :

मित्रांनो, आपल्या सर्वांना माहित आहे ह्या जगात मेहनती शिवाय काहीही साध्य होत नाही. त्याचप्रमाणे, तुम्हाला ब्लॉगिंग मध्येही खूप मेहनत घ्यावी लागेल. जरी तुम्ही ब्लॉगिंग सुरू केली असेल आणि तुम्हाला त्यातून अजिबात उत्पन्न मिळत नसेल, तर ब्लॉगिंग मध्ये Demotivate होऊन ब्लॉगिंग (Blogging) अर्धवट सोडू नका.

कारण फक्त एक दिवस झाड लावण्याने दुसऱ्या दिवशी लगेच त्याला फळं लागणार नाहीत. तुम्हाला वर्षानुवर्षे त्या झाडाची काळजी घ्यावी लागेल. म्हणून ब्लॉगिंग सुरू करण्यापूर्वी, ही गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला दररोज तुमच्या कामासाठी वेळ द्यावा लागेल, नवीन गोष्टी शिकाव्या लागतील आणि संयमाने काम करावे लागेल.

ब्लॉग कसा तयार करावा How to Start Blog in Marathi

ब्लॉगिंग सुरू करण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या पद्धती लक्षात घेऊन काम करावे लागेल. चला तर मग आपण ब्लॉग कसा तयार करावा (How to make blog in Marathi) यावर तपशीलवार माहिती घेऊया.

सविस्तर वाचा : ब्लॉग आणि ब्लॉगिंग म्हणजे काय | Blogging in Marathi

 

ब्लॉग तयार करण्यासाठी कोणती गोष्ट आवश्यक आहे (What you Need to Create a Blog in Marathi)

WordPress किंवा BlogSpot या पैकी एक निवडा :

जेव्हा ब्लॉगिंग सुरू करण्याचा प्रश्न येतो तेव्हा बरेच लोक BlogSpot किंवा WordPress वर सुरू करायचं या याबद्दल कन्फ्युज असतात आणि जवळजवळ हा प्रश्न सुरवातीच्या काळात प्रत्येक ब्लॉगरच्या मनात येतो की ब्लॉगिंगसाठी कोणते प्लॅटफॉर्म चांगले आहे WordPress की BlogSpot ? परंतू या प्रश्नाचे उत्तर एका ओळीत देणे अशक्य आहे.

ज्यांच्याकडे सुरुवातीस गुंतवणुक करणे शक्य नाही जे Web Hosting विकत घेऊ शकत नाही. त्यांचासाठी सुरवातीच्या काळात ब्लॉगस्पॉट (BlogSpot) हा चांगला पर्याय आहे. परंतू जे थोडीफार गुंतवणुक करू शकतात त्यांच्यासाठी WordPress कडे जाणे हे भविष्यासाठी अधिक फायदेशीर आहे. कारण ब्लॉगस्पॉटच्या तुलनेत WordPress मध्ये अधिक Features, Plugins उपलब्ध होतात. ज्याच्या साहाय्याने Blogging करणे सोपे होते.

 

Domain Name खरेदी करा :

जसे तुमचे नाव तुमची ओळख आहे, त्याचप्रमाणे ब्लॉगला सुद्धा त्याची ओळख असणे गरजेचे आहे. Domain Name हे युनिक आहे. Domain Name हा त्या वेबसाईट चा पत्ता आहे ते त्याला इंटरनेट वर त्याची ओळख प्राप्त करून देते. डोमेन नेमला तुमच्या साइटचा पत्ता किंवा URL असे म्हणतात. त्यासाठी तुम्हाला आपल्या वेबसाइटसाठी Domain Name खरेदी करावे लागेल.

Domain Name खरेदी करण्यासाठी GoDaddy आणि Namecheap हे खूप चांगले प्लॅटफॉर्म आहेत जिथे तुम्ही सवलती मध्ये Domain Name खरेदी करू शकता. तुमचे Domain Name युजर फ्रेंडली असले पाहिजे, जे वापरकर्ता सहजपणे लक्षात ठेवू शकेल.

सविस्तर वाचा : डोमेन नेम म्हणजे काय | What is Domain Name in Marathi

 

ब्लॉगसाठी एक Niche निवडा :

ब्लॉगच्या विषयाला Niche असे म्हणतात. प्रत्येक वेबसाईट कोणत्या ना कोणत्या विषयाला म्हणजेच Niche शी जोडलेली असते. जसं की मनोरंजन, शिक्षण, तंत्रज्ञान, आरोग्य इत्यादी हे सर्व टॉपिक आहेत. तुम्ही तुमच्या आवडीचे Topics निवडून तुमचा स्वतःचा ब्लॉग सुरू करू शकता.

परंतु हे लक्षात ठेवा की आपण निवडलेल्या टॉपिकमध्ये आपल्याला स्वारस्य असले पाहिजे. तरच तुम्ही ब्लॉगिंगच्या करिअरमध्ये यशस्वी होऊ शकाल.

 

ब्लॉगला Google Search Console आणि Google Analytics शी कनेक्ट करा :

तुमची वेबसाइट Google Search Console वर सबमिट करा. जेणेकरून गुगल तुमचा ब्लॉग Crawl करू शकेल आणि Google Search रिझल्टमध्ये तुमची पोस्ट दाखवू शकेल. जर तुम्ही असे केले नाही तर तुमची वेबसाइट Google वर अजिबात दिसणार नाही तसेच तुमच्या पोस्ट Rank सुद्धा होणार नाही.

Google Search Console मध्ये वेबसाईट सबमिट केल्यानंतर तुमचा ब्लॉग Google Analytics मध्ये जोडा. असे केल्याने तुम्हाला तुमच्या ब्लॉगवर येणाऱ्या Traffic ची योग्य माहिती मिळेल.

 

ब्लॉग वेबसाईट User Friendly बनवा :

तुमच्या ब्लॉगचा Interface नेहमी युजर फ्रेंडली असावा. जेणेकरून लोक आकर्षित झाले पाहिजे. जर लोकांना तुमच्या ब्लॉगची रचना आवडत नसेल तर ते तुमच्या वेबसाईट वर जास्त वेळ राहणार नाहीत. ते इतर साईटवर निघुन जातील.

ज्यामुळे तुमचा साईटचा Bounce Rate वाढेल परिणामी Traffic कमी होईल. ब्लॉग डिझाईन करण्यासाठी तुम्ही Elementor, Themes, Plugins इत्यादीचा वापर करू शकता. ज्याद्वारे तुम्ही तुमच्या ब्लॉगला सहजपणे आकर्षित करू शकता. त्याच बरोबर तुम्ही वेबसाईट यूजर फ्रेंडली बनवली तर तुमच्या वेबसाईटचा लोडिंग स्पीड देखील कमी होईल.

 

ब्लॉग Google AdSense ला Connect करा :

जर ब्लॉग सर्वांच्या पसंतीस उतरत असतील तर काही दिवसांमध्येच तुमच्या ब्लॉगवर प्रचंड Traffic येण्यास सुरुवात होते आणि ह्याच Traffic च्या माध्यमातून तुमची कमाई देखील सुरू होते. ब्लॉगिंगमधून पैसे कमवण्यासाठी तूम्ही तुमचा ब्लॉग Monetize करणे खूप महत्वाचे आहे.

ब्लॉगवर कमाई करण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यापैकीच एक Google AdSense आहे. तुम्ही अनेक प्रकारचे Ads लावून सहज पैसे कमवू शकता.

सविस्तर वाचा : गुगल अ‍ॅडसेन्स म्हणजे काय | Google AdSense Meaning in Marathi


आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

शेयर करा: