गुगल अ‍ॅडसेन्स म्हणजे काय | Google AdSense Meaning in Marathi

गुगल अ‍ॅडसेन्स बद्दलची माहिती  (Google AdSense Meaning in Marathi) :

हल्ली प्रत्येक जण Make in Money Online च्या माध्यमातून पैसे कमावण्याचे पर्याय शोधात आहे. त्यातीलच एक Trusted पर्याय म्हणजे Google AdSense द्वारे पैसे कमवायचे. गुगल अ‍ॅडसेन्स Google AdSense एक जाहिरात नेटवर्क (Advertising Network) आहे आणि ही कंपनी “Google” ची स्वतःची Advertising Product आहे. हे वेबसाईट मालकांना जाहिरातींद्वारे पैसे कमविण्याची संधी देते.

गुगल अ‍ॅडसेन्स म्हणजे काय | Google AdSense Meaning in Marathi

जर आपण ब्लॉग अथवा यूट्यूब चॅनेल सुरू करण्याचा विचार करत असाल किंवा आपल्याकडे आधीपासून वेबसाईट असल्यास आपण Google AdSense द्वारे आपली वेबसाईट Monetize करून पैसे कमावण्याचा विचार करत असल्यास सर्व प्रथम Google AdSense काय आहे व ते कश्या प्रकारे काम करते या बद्दलची सर्व प्रकारची माहिती असणे आवश्यक आहे.

 

गुगल अ‍ॅडसेन्स म्हणजे काय (What is Google AdSense in Marathi)

गूगल अ‍ॅडसेन्स (Google AdSense) ही स्वतः Google ची एक सेवा आहे. जी Google AdSense Publisher (प्रकाशक) ला त्याच्या Website, Blogs आणि YouTube Channel वर अपलोड केलेल्या सामग्रीवर जाहिराती देते आणि या जाहिराती Text, Videos, Images इत्यादी अनेक प्रकारच्या असू शकतात.

गूगल अ‍ॅडसेन्स (Google AdSense) वरून ऑनलाईन कमाई करण्यासाठी आधी तुम्हाला तुमचा ब्लॉग आणि वेबसाईट AdSense शी जोडावी म्हणजेच Google AdSense Apply करावी लागेल आणि त्यातून पैसे कमावणे तेव्हाच शक्य आहे तुमचा प्रेक्षक वर्ग म्हणजे तुमच्या वेबसाईट वर भेट देणारे Visitors खूप मोठ्या प्रमाणात आहे. जेव्हा Visitors तुमच्या ब्लॉगला भेट देतात त्यानंतर जेव्हा तुमचे visitors त्या जाहिरातींवर क्लिक करतात किंवा पाहतात तेव्हा तुम्ही Google AdSense Earning करू शकता.

आपण बर्‍याचदा कोणत्याही वेबसाईटवर स्वयंचलित मजकूर, प्रतिमा, व्हिडिओ आणि परस्परसंवादी मीडिया जाहिराती पाहिल्या असतील. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार तुमच्या वेबसाईटवर दाखवलेल्या जाणाऱ्या जाहिरातींचा प्रकार निवडू शकता. जे तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर येणाऱ्या Visitors कडून जास्तीत जास्त क्लिक मिळतील यामुळे तुमची कमाई अधिक होईल.

अजून वाचा : ब्लॉग आणि ब्लॉगिंग म्हणजे काय | Blogging in Marathi

 

गुगल अ‍ॅडसेन्स कसे काम करते (How does Google AdSense work in Marathi)

जेव्हा एखादा जाहिरातदार (Advertiser) त्याच्या कोणत्याही उत्पादनाची (Product) किंवा सेवेची (Service) जाहिरात करू इच्छित असेल, तेव्हा तो थेट कोणत्याही प्रकाशकाकडे (वेबसाईटच्या मालकाकडे) न जाता तो थेट Google Ads कडे जाऊन आपल्या जाहिरातीचे Advertising Campaign सुरू करतो. आणि ह्याच जाहिरात गुगल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने Google AdSense च्या माध्यमातून आपल्या वेबसाईटवर अथवा यूट्यूब चॅनेलवर दर्शविल्या जातात.

प्रकाशक (Publisher) म्हणजे ज्याचे स्वतःचे Website, Blogs किंवा कोणतेही YouTube Channel आहे आणि जाहिरातदार तो आहे जो उत्पादन किंवा सेवा यांची जाहिरात करतो.

Google AdSense चे मुख्य काम ब्लॉग्स, वेबसाईट आणि अधिक ट्रॅफिक असलेल्या यूट्यूब चॅनेलवर जाहिराती दर्शविणे आहे. गुगल अ‍ॅडसेन्स CPC (Cost Per Click) आणि CPM (Cost Per Thousand Impressions) नुसार ब्लॉग आणि वेबसाईट, यूट्यूब चॅनेलना देय देते. गूगल अ‍ॅडसेन्स आपल्या नफ्यामधून आपला वाटा कमी करते आणि ब्लॉग, वेबसाईट वरील जाहिरातींमधून हा महसूल प्राप्त झालेल्या ब्लॉग आणि वेबसाईट मालकास हा महसूल (Revenue) प्रदान करते.

उदाहरणार्थ, जर एखाद्या जाहिरातदाराने Google ला त्याच्या जाहिराती दर्शविण्यासाठी 100% पेय करत असेल व Google AdSense द्वारे त्या जाहिराती आपल्या दिसत असतील तर कोणी visitor आपल्या वेबसाईटवर भेट देऊन त्या जाहिरातीवर क्लिक करत असेल तर Google आपल्याला 100% पैकी 68% कमिशन देईल आणि उर्वरित राहिलेलं 32% कमिशन Google स्वतःकडे ठेवेल.

गुगल अ‍ॅडसेन्स बद्दल चांगली बाब म्हणजे की अ‍ॅडसेन्स आपल्या वेबसाईट आणि ब्लॉगच्या विषयानुसार जाहिराती दर्शविते. जर आपण तंत्रज्ञान (Technology) या विषयावर लेख किंवा माहिती प्रदान करत असला तर अ‍ॅडसेन्स आपल्या वेबसाईट वर तंत्रज्ञानाशी (Technology) संबंधित जाहिराती दर्शवतील.

अजून वाचा : ब्लॉग कसा तयार करावा | How to Start Blog in Marathi

 

गुगल अ‍ॅडसेन्स अकाउंट तयार कसे करावे  (How to Create a Google AdSense Account in Marathi)

  • सर्वप्रथम Google AdSense वेबसाईटवर जा आणि तिथे Signup या ऑपशन्स वर क्लिक करा.
  • साइनअप वर क्लिक केल्यानंतर, आपल्याला Google खात्यासह साइन इन करावे लागेल.
  • गूगल खात्यात लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या वेबसाईट, ब्लॉग किंवा यूट्यूब चॅनेलची यूआरएल लिंक टाकावी लागेल.
  • आता तुम्ही ज्या देशात राहता ती Country सिलेक्ट करावी लागेल.
  • देश निवडल्यानंतर आपल्या देशानुसार Google चे शर्ती, नियम आणि अटी दाखवल्या जातील व त्या वाचून तुम्हाला Accept काराव्या लागतील.
  • आता खाली Create Account हे ऑपशन्स दिसेल त्यावर क्लिक करा.
  • Create Account वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला AdSense कोड प्राप्त होईल. जो तुम्हाला तुमच्या वेबसाईट मध्ये टाकावा लागेल.
  • वेबसाईटवर कोड टाकल्यानंतर, तुम्हाला 24 तास ते 48 तास प्रतीक्षा करावी लागेल. कधी कधी हा कालावधी २ ते ४ आठवड्याचा सुद्धा असू शकतो कारण या काळात अ‍ॅडसेन्सचे कर्मचारी तुमची वेबसाईट, ब्लॉग किंवा यूट्यूब चॅनेल तपासतील की खरंच तुमची वेबसाईट, ब्लॉग किंवा यूट्यूब चॅनेल गुगल अ‍ॅडसेन्सच्या अटी आणि शर्तीं सर्व मान्य करत आहे की नाही.
  • जर तुमची वेबसाईट, ब्लॉग किंवा यूट्यूब चॅनेल गुगल अ‍ॅडसेन्सच्या अटी आणि शर्तीं सर्व मान्य करत असतील तर तुम्हाला सहजपणे ऍडसेन्सची मान्यता Approval मिळेल.
  • AdSense Account Approval चा ईमेल तुम्ही दिलेल्या ईमेल आयडी वर प्राप्त होईल.

 

गूगल अ‍ॅडसेन्स (Google AdSense) हा पैसे कमवण्याचा एक चांगला मार्ग आहे. परंतु येथे पोहोचणे इतके सोपे नाही कारण आपण आपल्या वेबसाईट अथवा ब्लॉगवर लिहित असलेली माहिती आणि सामग्री युनिक असली पाहिजे. आपण जी माहिती प्रधान करत आहोत त्या विषयाबद्दल आपल्याला अधिक ज्ञान असले पाहिजे. आपण दररोज आपल्या वेबसाईट किंवा ब्लॉगवर सामग्री (Up To Date) प्रकाशित केली पाहिजे. तेव्हा तुम्ही गुगलच्या (Make Money Online with Google) द्वारे अधिकाधिक पैसे कमवू शकता

आशा आहे की तुम्हाला गूगल अ‍ॅडसेन्स (Google AdSense) विषयी माहिती आवडली असेल आणि तुम्ही हे पोस्ट वाचून तुम्हाला गूगल अ‍ॅडसेन्स वरून पैसे कसे कमवायचे हे समजले असेल.


आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

शेयर करा: