कीवर्ड म्हणजे काय | Keyword Meaning in Marathi

ब्लॉगिंगमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत. हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे आणि या गोष्टींपैकी एक कीवर्ड म्हणजे काय (Keyword Meaning in Marathi). हे आपल्या वेबसाईटसाठी तसेच ब्लॉगिंगसाठी तितकेच महत्वाचे आहे. तर आता प्रश्न उद्भवतो की, कीवर्ड काय आहे आणि ते कसे कार्य करते. म्हणुन आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या मदतीने सांगणार आहे की कीवर्ड म्हणजे काय आहे (What is Keyword in Marathi) आणि ते कसे कार्य करते.

 

कीवर्ड म्हणजे काय ? (Keyword Meaning in Marathi)

जेव्हाही तुम्ही “ब्लॉगिंग म्हणजे काय” सारखी कोणतीही गोष्ट सर्च करता, तेव्हा तो तुमचा कीवर्ड असतो. त्याचप्रमाणे, जेव्हाही तुम्ही सर्च इंजिनमध्ये कोणतीही Query Search करता तेव्हा त्या शब्दाला कीवर्ड असे म्हणतात. तुमच्या ब्लॉग पोस्टसाठी हे खूप महत्वाचे आहे. कारण तुमच्या ब्लॉगला भेट देणारे बहुंताश लोक कोणत्या ना कोणत्या कीवर्डवर सर्च करून तुमच्या ब्लॉगला भेट देत असतात. म्हणून SEO च्या दृष्टीने Keywords खूप महत्वाचे असते.

जर तुम्ही पोस्ट लिहिताना तुमच्या Articles मध्ये कीवर्ड वापरत असाल, तर जेव्हा जेव्हा कोणी तो कीवर्ड गुगलमध्ये किंवा इतर कोणत्याही सर्च इंजिनवर Search करेल, तेव्हा तुमच्या वेबसाईटला रँकिंग करण्याची चांगली संधी असेल आणि अशा प्रकारे बरेच लोक त्यावर क्लिक करतील ज्याने Traffic वाढेल आणि आपली वेबसाईट अशा प्रकारे हळूहळू लोकांमध्ये लोकप्रिय होऊ लागते.

 

कीवर्डचे प्रकार (Types of Keywords in Marathi)

शॉर्ट टेल कीवर्ड (Short Tail Keywords) :

हे असे कीवर्ड आहेत त्यात फक्त 1-2 शब्द असतात यालाच आपण Short Tail Keywords असे म्हणतो. उदा सांगायचे झाल्यास Web Hosting किंवा Life Insurance Policy असे अनेक कीवर्ड आहेत. ज्यात फक्त एक किंवा दोन किंवा फक्त 3 शब्द असतात. ते सर्व Keywords शॉर्ट टेल कीवर्ड मध्ये मोडतात.

 

लाँग टेल कीवर्ड (Long Tail Keywords) :

हे कीवर्ड असे कीवर्ड आहेत जे लांब म्हणजे यात 4 पेक्षा अधिक जास्त शब्द असतात. जसे How to Start Blogging किंवा How to Make Money in Online यासारखे अनेक कीवर्ड ज्यात 4 किंवा अधिक शब्द आहेत. त्यांना लाँग टेल कीवर्ड (Long Tail Keywords) म्हणतात.

 

कीवर्ड कसे वापरावे ? (How to use Keywords in Marathi)

पोस्टच्या आत योग्यरित्या कीवर्ड कसे वापरावे हे प्रत्येकाला माहित असतेच असे नाही, कारण ही एक प्रकारची Technique आहे. जी प्रत्येकाला उमगत करावी लागते ज्याला ही Technique समजली आहे, त्याच्या पोस्ट नेहमी Google मध्ये पहिल्या 5 मध्ये रँक करतात. तुम्ही हे तुमच्या अनुभवाच्या आधारावर तुम्हाला ज्ञात होईल, पण त्यासाठी खालील दिलेल्या पद्धतींचे अनुसरण करावे लागेल.

  • Title मध्ये लिहा.
  • Permalink मध्ये ठेवा.
  • Meta Description मध्ये Add करा.
  • तुमच्या पहिल्या Paragraph मध्ये Keyword Density चांगली ठेवा.
  • Image Alt Tag मध्ये वापरा.
  • Subheading आणि Subheading अर्थात H2 आणि H3 मध्ये ठेवा.

 

कीवर्ड रिसर्च म्हणजे काय ? (What is Keyword Research in Marathi)

कीवर्ड रिसर्च (Keyword Research) ही एक अशी प्रक्रिया आहे. ज्याद्वारे तुम्हाला लोकप्रिय सर्च शब्द (Popular Search Terms) सापडतात. जे लोक गुगल सारख्या सर्च इंजिनमध्ये टाइप करतात आणि त्याच्या साहाय्याने तुमच्या कंटेंटमध्ये ते विशिष्ट शब्ध समाविष्ट करून तुम्ही तुमची सामग्री Search Engine Results Page (SERP) च्या शीर्षस्थानी म्हणजे Top वर आणू शकता.

परंतु पहिले आपल्याला कीवर्ड काय आहे हे आधी समजून घ्यावे लागेल. कीवर्ड हा एक शब्द, Phrase किंवा Small Sentence आहे ज्याद्वारे आपण शोध इंजिनवर विशिष्ट Related विषयावर शोध घेतो.

उदाहरणार्थ : जर मी Google मध्ये Best Laptop किंवा फक्त Top SEO Tools असे Search केले असतात. खूप साऱ्या वेबसाईट प्रथम पेज वर येतात. कारण हे दोन्ही एक कीवर्ड आहेत आणि लोक त्या Words वर शोध घेत असतात. त्याचप्रमाणे, इतर लाखो कीवर्ड्स आहेत, जे लोक दररोज Google किंवा इतर सर्च इंजिनच्या मदतीने शोधतात. त्यापैकी काही लोकप्रिय कीवर्ड आहेत जे लोक अधिक शोधतात. कीवर्ड रिसर्च (Keyword Research) ही एक अशी प्रक्रिया आहे. ज्याद्वारे आपल्यास असे खूप सारे फायदेशीर कीवर्ड सापडतात आणि त्या द्वारे पोस्ट सहज रँक करू शकता.

 

कीवर्ड डेन्सिटी म्हणजे काय ? (What is Keywords Density in Marathi)

आपण आर्टिकल मध्ये कीवर्ड कुठे आणि किती वेळा वापरता याला कीवर्ड डेन्सिटी (Keywords Density) म्हणतात. प्रत्येक 100 शब्दाच्या मागे Keywords किती वेळा वापरला जातो ह्याचे अनुमान केले जाते.

जर एखादा Phrase 100 शब्दांमध्ये 2 वेळा वापरला गेला तर ती Density 2 % म्हटले जाईल. जर लेख 1000 शब्दांचा असेल आणि Density 2% असेल तर याचा अर्थ असा की त्यात शब्द 20 वेळा लिहिला आहे.

कीवर्ड डेन्सिटी (Keywords Density) पूर्ण नियंत्रणात ठेवणे खूप महत्वाचे आहे. कारण जर घनता (Density) जास्त असेल तर कीवर्ड स्टफिंगची समस्या असेल आणि यामुळे पोस्टला रँकिंग करण्याऐवजी शोध परिणामात ते दूरवरही दिसणार नाही.

जेव्हा शोध इंजिन म्हणजे Search Engine हे Boat द्वारे Post Crawl करतात तेव्हा ते घनता (Keywords Density) तपासतात. जर Keywords Density चांगली असेल तर पोस्ट रँक करेल आणि जरी घनता खूप कमी किंवा खूप जास्त असली तर पोस्ट रँक होणार नाही.


आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

शेयर करा: