केस वाढवण्यासाठी घरगुती उपाय | Hair Growth Tips in Marathi

केस वाढवण्यासाठी उपाय | Hair Growth Tips in Marathi :

आजच्या व्यस्त जीवनात, संतुलित आहाराचा अभाव, प्रदूषित वातावरण, अतिप्रमाणात केसांच्या उत्पादनांचा वापर करणे, केस गळणे किंवा खराब होणे यासारख्या अनेक कारणांमुळे समस्या सुरू होतात.

केस हे सर्वांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक आकर्षणाचा भाग आहे. प्रत्येकाची इच्छा असते की त्यांचे केस घनदाट, लांब आणि मजबूत असावेत. यासह त्यांचे केस चमकदार आणि रेशमी असावेत अशी सर्वांची इच्छा असते. म्हणुन केस हे प्रत्येक मानवासाठी खूप महत्वाचे असतात.

विशेषत: महिला त्यांच्या केसांबद्दल खूप जागरूक असतात आणि वेगवेगळ्या प्रकारच्या टिप्स वापरुन केस वाढविण्याचा प्रयत्न करीत असतात.

आज आम्ही तुम्हाला काही केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय बद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही थोड्या वेळात आपले केस वाढवू शकता.

 

केस विरळ होण्याची कारणे (Causes of Thin Hair in Marathi) :

केस घनदाट आणि काळे कसे करता येतील हे जाणून घेण्यापूर्वी केस विरळ कशामुळे होतात हे माहित असणे फार गरजेचे आहे. केस गळण्याची कारणे खालील प्रमाणे आहेत.

  • प्रथिने आणि पोषक तत्वांचा अभाव
  • ताण तणाव
  • हार्मोन्सचे असंतुलन
  • प्रदूषित वातावरण
  • केसांकडेझालेले दुर्लक्ष.
  • आनुवंशिकतापणा
  • अशक्तपणा
  • हानिकारकउत्पादने वापरणे
  • केसांच्या स्टाईलिंग उत्पादनांचा वापर

या अनेक कारणांमुळे केस पातळ म्हणजेच विरळ होतात, म्हणून जर आपले केस कमकुवत झाले असतील तर त्यांना घनदाट आणि मजबूत बनविण्यासाठी कोणतेही महाग किंवा बाजारपेठयाच्या महागड्या उत्पादनाचा वापर करू नका. काही केस दाट होण्यासाठी घरगुती उपाय करून ही आपण ह्या समस्या टाळू शकतो.

 

केस वाढवण्यासाठी उपाय (Hair Growth Tips in Marathi) :

अंडे (Eggs) :

अंडे (Eggs) केसांसाठीही खूप उपयुक्त आहे. अंड्यांमध्ये प्रथिने, लोह, सल्फर फॅट्स यांसारखे आवश्यक पोषक घटक असतात. ज्यामुळे केस गळती होण्यास प्रतिबंध होते. अंड्याच्या पांढऱ्या बलक मध्ये थोडेसे ऑलिव्ह तेल मिसळून मिश्रण तयार करून दर आठवड्यातून एकदा तरी हलके हातांनी मालिश करा. यानंतर शैम्पूने केस स्वच्छ धुवा. केस गळण्याची समस्या थांबेल आणि केसांचीची वाढ होण्यास आणि केस दाट होण्यासाठी मदत होईल.

 

बदाम तेल :

बदाम तेलात व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात असते, जे केसांना निरोगी ठेवण्यास उपयुक्त ठरते. हे केसांच्या मुळांपर्यंत पोहोचते आणि त्यांचे पोषण करते, जे त्यांना लांब आणि मजबूत बनवते.

अजून वाचा : सर्वोत्कृष्ट 5 ड्राय फ्रूट्स आणि त्यांचे फायदे | Top 5 Dry Fruits Benefits in Marathi

 

नारळाचे तेल :

बहुतेक लोक टाळूच्या मालिशसाठी नारळाचे तेल वापरतात आणि ते फायदेशीरही आहे. हे तेल कोरड्या व खराब झालेल्या केसांनी त्रस्त असलेल्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरते. केसांना चकाकी येण्यासाठी नारळ तेल प्रभावी आहे. तसेच, याच्या वापरामुळे केस गळण्याची समस्याही कमी होते. तेल नियमितपणे गरम करून ते केसांवर लावा.

 

आवळा :

आवळा केसांसाठी अनेक प्रकारे वापरता येतो. आपण हे सेवन करू शकता किंवा आपल्या केसांवर लावू शकता. आवळामध्ये कॅरोटीनोइड्स सारख्या पोषक तत्वांचा उपस्थिती केसांच्या वाढीस मदत करते. जर आपले केस काळे नसतील तर आवळा आणि रीठाचा पावडर लावा, केस काळे होतील. आठवड्यातून एकदा आंवलाचा रस केसांना लावल्याने केसांची वाढ जलद होते.

अजून वाचा : आवळा खाण्याचे फायदे | (आमला) Amla Top Benefits in Marathi

 

दही आणि लिंबू मिश्रण :

दही आणि लिंबू दोन्ही केसांसाठी खूप उपयुक्त आहेत आणि हिवाळ्यात त्याचा वापर केल्याने कोंडापासून मुक्तता होईल. दोन लिंबू दही मध्ये पिळून पेस्ट बनवा. ही पेस्ट केसांच्या मुळांवर लावा आणि 15 मिनिटांसाठी मालिश करा. पेस्ट एक ते दीड तास केसांवर ठेवा आणि त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा. हे केसांची कोरडेपणा आणि कोंडा दूर करते.

 

शिकिकाई :

शिकिकाईमध्ये भरपूर अँटीफंगल गुणधर्म देखील असतात. ज्यामुळे कोंडा यांसारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. हे मृत त्वचा आणि केसांच्या मुळाशी खरुज यासारख्या समस्या देखील प्रतिबंधित करते. त्यामुळे केसांची वाढ चांगली होण्यास मदत होते. म्हणुनच खुप साऱ्या केसांच्या उत्पादनात याचा वापर केला जातो. केसांतील कोरडेपणा, उवा, खाज सुटणे अश्या अनेक समस्या दूर करते.

 

कांद्याचा रस :

कांद्याचा रस केसांना लावणे ही जी अत्यंत प्रभावी कृती असल्याचे दिसुन आले आहे. कांद्याचा रस केसांवर आणि त्यांच्या मुळांवर लावून सुमारे अर्धा तास केसांवर ठेवा आणि त्यानंतर केस शैम्पूने स्वच्छ धुवा. असे केल्याने केस लांब होण्याबरोबरच ते जाड देखील होते. तसेच, हे केस गळती समस्या यामध्ये देखील हे फायदेशीर आहे.

 

आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

You cannot copy content of this page
Copy link
Powered by Social Snap