पुदिन्याचे फायदे आणि नुकसान | Pudina Benefits in Marathi

पुदिना म्हणजे काय (What is Mint in Marathi) :

पुदिना (Mint Leaf) ही एक अशी वनस्पती आहे, जी प्रामुख्याने आपल्या प्रत्येक भारतीयाच्या स्वयंपाकघरात चटणी म्हणून वापरली जाते.पुदिना मध्ये अनेक गुण आहेत. हे केवळ अन्न पचवण्यासाठीच प्रभावी ठरत नाही, तर पोटात होणाऱ्या बर्‍याच रोगांच्या उपचारांमध्ये देखील उपयुक्त (Pudina Benefits in Marathi) ठरते.

पुदिन्याचे फायदे आणि नुकसान Pudina Benefits in Marathi

पुदिना ही सर्वात जुनी औषधी वनस्पती आहे. यात भरपूर औषधी गुणधर्म आहेत आणि पॉलीफेनोल्सचे समृद्ध स्रोत आहे. यात वायुनाशक यांसारखे गुणधर्म देखील आहेत.

पुदिनामध्ये मेन्थॉल, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन-ए, राइबोफ्लेविन, तांबे, लोह इत्यादी घटक आढळतात. पुदीनाची पाने खाल्ल्यास उलट्या थांबवता येतात आणि पोटातील गॅस, ऍसिडिटी सारख्या समस्या सोडवते. हे निसर्गात गरम असल्या कारणाने त्याच्या तीव्र प्रभावामुळे अनेक शारिरीक व्याधीवर ते प्रभावी ठरते.

 

पुदिन्याचे फायदे (Pudina Benefits in Marathi)

वजन कमी करण्यात उपयोगी :

पुदिना वजन कमी करण्यासाठीचा रामबाण उपाय आहे. हे विविध प्रकारच्या पाचन एंजाइमांना प्रवृत्त करते. जे अन्नामध्ये स्थित असलेल्या पोषक तत्त्वांचे शोषण करण्यास खूप उपयुक्त आहे, म्हणजे त्याचे गुणधर्म सहजपणे शरीरात शोषतात. हे ओटीपोटात साठवलेल्या फॅट्स म्हणजे जास्त फॅट्सला उर्जेमध्ये रूपांतरित करून आळा घालते. ज्यामुळे वजन वाढण्याच्या समस्येपासून मुक्त होते. वजन कमी करण्यासाठी आपण आपल्या नियमित आहारात पुदिनाचा समाविष्ट करू शकता.

अजून वाचा : वजन कमी करण्याचे घरगुती उपाय | Weight Loss Tips in Marathi

 

तोंडाची दुर्गंधी दुर करते :

पुदिना मधील औषधी गुणधर्म श्वासामध्ये ताजेपणा आणतो. तोंडातील जीवाणू पूर्णपणे काढून टाकण्या व्यतिरिक्त पुदीना दात आणि जीभेचा दुर्गंध देखील दूर करते. म्हणूनच टॉफी, च्युइंगम, टूथपेस्ट इत्यादी उत्पादनामध्ये पुदिनाचा हमखास वापर केला जातो. याशिवाय दररोज त्याची पाने चघळण्यामुळे श्वासोच्छवासाची दुर्गंधी दूर होते आणि श्वासोच्छवासामध्ये ताजेपणा येतो.

अजून वाचा : लवंग खाण्याचे फायदे | Benefits of eating Cloves in Marathi

 

पोटाचे विकार दूर करते :

पोटाशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या दूर करण्यासाठी पुदीना हा सर्वोत्तम मानले जाते. हल्ली खाण्या-पिण्यामुळे पोटात विविध प्रकारच्या समस्या उद्भवतात. जंक फूड खाणे किंवा मसालेदार अन्न खाल्ल्याने अपचन आणि पोटदुखी यासारखे समस्या येतात. पुदीनामध्ये एंटीऑक्सिडंट्स, मेन्थॉल आणि फायटोन्यूट्रिएंट्स भरपूर असतात, जे एंजाइमांना अन्न पचन करण्यास मदत करतात. ज्यामुळे पोटात गोळा येणे, अँसिदिटी होणे आणि आम्लता यांसारख्या समस्याना प्रतिबंधित करते.

अजून वाचा : अ‍ॅसिडिटी आणि गॅस समस्येवर घरगुती उपचार

 

ताण कमी करते :

जर तुम्हाला कोणताही प्रकारचा ताण तणाव येत असेल तर पुदीनाच्या पानाचे सेवन करा, त्यात ताण कमी करण्याचे सर्व गुणधर्म आहेत. पुदीनामध्ये असलेले मेन्थॉल आणि नैसर्गिक अँटी-स्पास्मोडिक शरीराच्या स्नायूंना आराम देते. जेव्हा तुम्हाला ताणतणाव किंवा चिंताग्रस्त वाटत असेल तेव्हा पुदीना चहा सेवन करावे कारण त्याचा शीतलपणा तुमचे मन शांत करेल आणि मानसिक ताणतणावातून मुक्त होण्यासाठी मदत करेल.

 

सौंदर्य वाढवते :

पुदिनाचे चमत्कारीक गुणधर्म सौंदर्य संबंधित अनेक समस्यांचे निदान करण्यात उपयुक्त आहेत. पुदिनामध्ये असलेले अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म मुरुमांपासून मुक्त होण्यासाठी तसेच त्वचेचे खड्डे भरण्यासाठी कार्य करतात, यामुळे त्वचेचे संरक्षण होते. हे अँटी सेप्टिक असल्याने याचा साबण आणि बॉडी वॉश यांसारख्या उत्पादनांमध्ये वापर केला जातो. आपण नियमितपणे उपयोग केल्यास मुरुमांपासून मुक्त होऊ शकता. तसेच बुरशीजन्य संसर्गासारख्या त्वचेच्या समस्यांपासून देखील मुक्तता होते.

अजून वाचा : कोरफड खाण्याचे फायदे | Benefits of Eating Aloe Vera in Marathi

 

रोग प्रतिकारशक्ती वाढवते :

पुदीना रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी देखील उत्तम कार्य करते. हे पाचन तंत्र शुद्ध करून शरीरातील हानिकारक जीवाणू काढून टाकते. खराब झालेल्या पेशी दुरुस्त करण्यात मदत करते. त्याचबरोबर पुदिना मध्ये स्थित असलेले फॉस्फरस, कॅल्शियम, जीवनसत्त्वे बी, सी आणि डी यांसारख्या पोषक घटकांमुळे आपल्या शरीरातील जळजळ कमी करण्यास तसेच आपल्या शरीरात रक्ताचा प्रवाह वाढविण्यात मदत करते.

अजून वाचा : रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी ?

 

उलट्या व मळमळ थांबवते :

उलट्या थांबविण्यासाठी पुदीना हे सर्वोत्तम उपाय आहे. जर आपण कोणत्याही कारणास्तव वारंवार उलट्यानी किंवा मळमळ होण्यानी ग्रस्त झाले असाल तर पुदीनाचा रस अथवा चहा घेतल्यास उलट्या त्वरित थांबवण्यास मदत होते.

 

पुदीना तेलाचे फायदे (Benefits of Peppermint Oil in Marathi) :

पुदिन्याचे तेल आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. इजा किंवा वेदना होत असलेल्या भागास पुदिन्याचे तेल लावल्यास आराम मिळतो. जर डोकेदुखी किंवा शरीरावर कोणत्याही प्रकारची सतत वेदना होत असतील तर पुदिनाच्या तेलाचा देखील या समस्येमध्ये फायदा होतो. फक्त इतकेच नव्हे तर दातांशी संबंधित वेदनापासून मुक्त होण्यासाठी ही त्याचे तेल वापरले जाते. हे नसा आणि मांसपेशीना शांत करते. ज्यामुळे आराम मिळतो.

पुदिन्याचे फायदे आणि नुकसान Pudina Benefits in Marathi

 

पुदिन्याचे नुकसान (Pudina Side Effects in Marathi) :

  • पुदिन्याचे तेल थेट तोंडावर लावू नये. यामुळे आपल्याला त्वचेची ॲलर्जी देखील होऊ शकते.
  • पुदिनांचा अति प्रमाणात सेवन आपल्या मूत्रपिंड आणि आतड्यांसाठी हानिकारक होऊ शकते.
  • गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनीही पुदीनाचे सेवन करु नये ते त्यांच्या आरोगयासाठी हानिकारक ठरू शकते.
  • पुदिनांचे अति प्रमाणात सेवन हे आपल्या मूत्रपिंड आणि आतड्यांसाठी हानिकारक असल्याचे सिद्ध होते.
  • जर आपण कोणत्याही आजारांनी ग्रस्त असुन औषधे घेत असल्यास तत्पूर्वी पुदिनाचा चहा अथवा सेवन करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

 

लक्षात ठेवा :

पुदिन्याचे फायदे आणि नुकसान या लेखात आम्हीं सामान्य माहिती सादर केली गेली आहे. जर आपल्याला कोणत्याही आजारचे निदान करण्यापूर्वी किंवा कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास कृपया प्रथम आपल्या डॉक्टरांचा किंवा विशेष तज्ञांचा सल्ला घेऊन सेवन करावे.


आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

शेयर करा: