व्हीपीएन VPN काय आहे व ते कसे काम करते ? VPN FULL FORM | How to Download VPN in Marathi

आजकालच्या काळात इंटरनेट वापरणे खूपच सोपे झाले. प्रत्येक जण काहींना काही कारणास्तव इंटरनेटशी जोडला गेला आहे. अश्या परिस्थितीत तुम्हाला इंटरनेट बद्दलची पुरेपूर माहिती असणे गरजेचे आहे.

तुम्ही इंटरनेट वापरण्यात पारंगत असाल तर तुम्हाला व्हीपीएन (VPN) बद्दल चांगले माहीत असेल किंवा व्हीपीएन (VPN) बद्दल ऐकण्यात तरी आलेच असेलच. आज आपण याच विषयाबद्दल माहिती देणार आहोत.
व्हीपीएन (VPN) काय आहे ? ते का महत्वाचे असते ? ते कश्या प्रकारे काम करते, त्याचे फायदे काय ? तोटे काय ?

चला तर मग, व्हीपीएन (VPN) बद्दल सविस्तरपणें चर्चा करू…

व्हीपीएन VPN काय आहे व ते कसे काम करते ? VPN FULL FORM | How to Download VPN

 

व्हीपीएन VPN चे पूर्ण नाव  (VPN Full Form in Marathi) :

व्हीपीएनचा पूर्ण नाव व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (Virtual Private Network) असे आहे. हे तंत्रज्ञान प्रायव्हसीच्या दृष्टीने खाजगी संगणक आणि मोबाईल मध्ये अधिक प्रमाणत वापरले जाते. हे एक प्रकारचे खाजगी नेटवर्क सर्व्हर आहे.

व्हीपीएन (VPN) द्वारे आपली वैयक्तिक माहिती हॅकर्सपासून संरक्षित ठेवण्याचा आणि आपले नेटवर्क अधिक सुरक्षित ठेवण्याचा एक उत्तम मार्ग असु शकतो.

व्हीपीएन (VPN) एक नेटवर्क आहे. जे आपणास ब्लॉक वेबसाइटमध्ये प्रवेश करण्यास मदत करते. आपण ह्या व्हीपीएन (VPN) च्या सहाय्याने आपल्या डिव्हाईस वरून कोणत्याही वेबसाईट वर कोणत्याही Restriction शिवाय प्रवेश (Access मिळवू) करू शकता.

एक उदाहरण घ्या, तुम्ही भारतीय आहेत. परंतु कामानिमित्त अथवा इतर कारणास्तव तुम्ही इतर कुठल्या देशात गेलात, जिथे आधीपासूनच त्या देशाकडून Social Accounts Site किंवा काही अँप वापरण्यावर बंदी घातली आहे. अश्या वेळी तुम्ही VPN चा पर्याय निवडून सहजपणे Access मिळवू शकता तेही कोणत्या Restrictions शिवाय..

Read More : वेब होस्टिंग म्हणजे काय | What is Web Hosting in Marathi

 

व्हीपीएन VPN काय आहे व ते कसे काम करते ? VPN FULL FORM | How to Download VPN

 

व्हीपीएन VPN कसे काम करते ? (How Does a VPN Works in Marathi) :

व्हीपीएन (VPN) हे एक असे नेटवर्क आहे. जे आपणास ब्लॉक वेबसाईट मध्ये प्रवेश करण्यास मदत करते. आपण व्हीपीएन (VPN) वापरून एका ठिकाणी राहुन जगातील कोणत्याही दुसऱ्या ठिकाणच्या नेटवर्क च्या सहाय्यानं आपणास हव्या असलेल्या वेबसाईटवर प्रवेश करू शकता.

व्हीपीएन (VPN) कोणत्याही वापरकर्त्यास कधीही कोठूनही त्याच्या नेटवर्क मध्ये प्रवेश करण्याची परवानगी देते. यासाठी, आपल्याला आपल्या व्हीपीएन प्रदात्याकडील IP Address तसेच लॉगिन वापरकर्ता नाव आणि पासवर्ड द्वारे आपण या नेटवर्कमधून कोठूनही प्रवेश करू शकतो.

जेव्हा आपण एखादी वेबसाईट गूगल सारख्या सर्च इंजिनवर काही सर्च करता, तेव्हा सर्वप्रथम त्या वेबसाईट सर्च करण्याची विनंती ISP (Internet Service Provider) कडे केली जाते आणि मग आयएसपी (ISP) द्वारे आपणास हव्या असलेल्या वेबसाईटची पडताळणी होवून ती वेबसाईट आपल्या समोर येते.

जर आपल्या देशातील सरकारने आयएसपी (ISP) द्वारे एखादी वेबसाईट ब्लॉक किंवा बॅन केले असतील तर, अश्या परिस्थितीत कोणत्याही या प्रकारच्या वेबसाईटसाठी विनंती प्राप्त झाल्यास तर, अश्यावेळी आयएसपी (ISP) त्या वापरकर्त्यास ती वेबसाईट उघडण्याची अनुमती देत नाही.

व्हीपीएन (व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क) चे मुख्य उद्दिष्टे असे असते की, आयएसपी (ISP) पासुन आपल्या डिव्हाईसचा IP Address , Device Location आपली इत्यादी माहिती गोपनीय ठेवण्यात मदत करते.

व्हीपीएन (VPN) मार्फत ज्या देशामध्ये वेबसाईट बॅन नाही, अश्या देशाच्या IP Address वरून त्यांचे लोकेशन वापरून वेबसाईट उघडण्यास मदत करते. अश्या रितीने आपण कोणत्याही वेबसाईट वरती सहजपणे Access करू शकता.

व्हीपीएन (VPN) सेवा सुरक्षितेच्या दृष्टिने जास्त करून शाळा, महाविद्यालय,  सरकारी व खाजगी ऑफिसेस, ऑनलाईन करणारे बिझनेस या मध्ये वापरली जातात.

Read More : डोमेन नेम म्हणजे काय | What is Domain Name in Marathi

 

व्हीपीएन VPN कसे डाऊनलोड करावे ? (How to Download VPN in Marathi) :

व्हीपीएन (VPN) मध्ये दोन प्रकार आहेत. एक (Paid) Premium VPN खुप साऱ्या अँटी व्हायरस व सॉफ्टवेअर कंपन्या Monthly व Annual बेसिस वरती व्हीपीएन (VPN) सर्व्हिस Provide करतात व दुसरे फ्री VPN त्यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे मोजावे लागत नाही.

  • फ्री व्हीपीएन (VPN) डाऊनलोड करण्यासाठी Google Play Store मध्ये जाऊन VPN सर्च करा. तुम्हाला अशी Application ची लिस्ट समोर दिसेल. Ratings चेक करून तुम्ही त्यातील कोणतेही ही एक अँप इंस्टॉल करा.

व्हीपीएन VPN काय आहे व ते कसे काम करते ? VPN FULL FORM | How to Download VPN

 

  • अँप इंस्टॉल झाल्यावर तुम्हाला Connect नावाच Options दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्ही व्हीपीएन (VPN) Activate करू शकता.

व्हीपीएन VPN काय आहे व ते कसे काम करते ? VPN FULL FORM | How to Download VPN

 

  • व्हीपीएन (VPN) ऍक्टिव्हिट झाल्यावर तुम्ही इतर देशांतील नेटवर्क सर्व्हर सुद्धा Manually सिलेक्ट करू शकता. सर्व्हर Successfully Connect झाल्यावर डिव्हाईस वर VPN असे नाव दिसेल.

व्हीपीएन VPN काय आहे व ते कसे काम करते ? VPN FULL FORM | How to Download VPN

 

व्हीपीएन VPN चे फायदे (Benefits of Using VPN In Marathi) :

  • फ्री व्हीपीएन (VPN) मध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे मोजावे लागत नाही.
  • व्हीपीएन (VPN) द्वारे तुमचा Confidential Data तुम्ही अधिक Securely बनवु शकता. परंतु ते Paid व्हीपीएन (VPN) असावे.
  • व्हीपीएन (VPN) द्वारे तुम्ही सार्वजनिक स्थळांचा (उदा. रेल्वे स्टेशन,कॅफे, हॉस्पिटल ई.) अश्या पब्लिक वायफायांचा वापर करून तुम्ही प्रायव्हेट वायफाय मध्ये रुपांतरीत करू शकता. त्यामुळे तुमचं कनेक्शन अधिक सेक्युर बनते.
  • लोकल नेटवर्क तसेच आयएसपी (ISP) मध्ये तुमची ब्राउझिंग ऍक्टिव्हिटी हाईड (Hide) केली जाते.

 

व्हीपीएन VPN चे तोटे (Disadvantages of VPN in Marathi) :

  • जसे व्हीपीएन (VPN) चे फायदे तसेच त्याचे तोटे सुद्धा आहेत परंतु ते फ्री व्हीपीएन (VPN) चे आहेत. जर तुम्ही फ्री व्हीपीएन (VPN) वापरत असल्यास तुम्हाला खुप साऱ्या जाहिरातींना सामोरे जावे लागेल. परिणामी तुमच्या ब्राउझिंगचा (नेटचा) स्पीड कमी होईल.
  • फ्री व्हीपीएन (VPN) मध्ये तुम्हाला मोजकेच ठराविक सर्व्हर निवडण्याची अनुमती असते. विविध देशातील सर्व्हर निवडून त्यांचा वापर करता येणार नाही.
  • फ्री व्हीपीएन (VPN) मध्ये तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागते. तुमचा डाटा हॅक व लीक होण्याचा धोका अधिक असतो. म्हणुन ऑनलाईन बँकिंग व्यवहार करताना किंवा खाजगी अकाउंट हाताळताना फ्री व्हीपीएन (VPN) चा पर्याय टाळावा.

 

व्हीपीएन VPN illegal (बेकायदेशीर) आहे का ?

आज व्हीपीएन (VPN) चे जगभरात लाखो वापरकर्ते आहेत. व्हीपीएन (VPN) चा उद्देश वापरकर्त्याचं डेटा हॅकर पासून सेफ आणि सुरक्षित ठेवणे. जर तुम्ही सुद्धा व्हीपीएन (VPN) चा वापर चांगल्या व सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून केला तर, अर्थातच त्या शिवाय उत्तम पर्याय असू शकत नाही.

अजून वाचा : चुकूनही करू नका ह्या चुका, इंटरनेट बँकिंग करताना घेण्याची काळजी


आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

शेयर करा: