लवंग खाण्याचे फायदे | Benefits of Eating Cloves in Marathi

लवंग खाण्याचे फायदे (Benefits of Cloves in Marathi) :

हिवाळ्यात लवंग खाण्याचे फायदे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत. शतकानुशतके लवंग आयुर्वेदात एक औषध गुणधर्मामुळे वापरले जात आहे. लवंग हे बर्‍याच गंभीर आजारांमध्ये प्रभावी असल्याचे मानले जाते. जसे की दातदुखी, तोंडाची दुर्गंधी, घसा खवखवणे इत्यादी. अश्या समस्यामध्ये महत्वाची भुमिका बजावते. लवंगाचे योग्य प्रकारे सेवन केल्यास आपल्याला बर्‍याच आजारांपासून मुक्ती मिळेल.

लवंग खाण्याचे फायदे (Benefits of eating Cloves in Marathi)

लवंगामध्ये प्रथिने, लोह, कार्बोहायड्रेट्स, कॅल्शियम आणि सोडियम असिड असतात. म्हणुन या लेखात आपणास सांगु इच्छितो की, लवंग बर्‍याच रोगांचे निवारण करण्यासाठी प्रभावी आहेत. चला तर मग लवंगाच्या गुणधर्मांबद्दल (Lavang Upay in Marathi) म्हणजेच लवंग खाण्याचे फायदे (Benefits of Cloves in Marathi) आणि नुकसान (Side Effects of Cloves in Marathi) याबद्दल जाणून घेऊया.

 

लवंग खाण्याचे फायदे (Benefits of Eating Cloves in Marathi)

खोकला सर्दीचा त्रास कमी करते :

बहुतेक वेळा बदलत्या हवामानामुळे बहुतेक लोकांना खोकला सर्दीचा त्रास होतो. अशा परिस्थितीत लवंगाचे सेवन करणे फायदेशीर ठरते. सर्दी आणि खोकला यासारख्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी लवांगाचे अँटीइन्फ्लेमेटरी गुणधर्म मदत करतात. याशिवाय लवंग, तुळस आणि काळी मिरीचा यांचे मिश्रण बनवून त्यांचा काढा तयार करून तुम्ही हे सेवन करू शकता. अथवा चहा मध्ये लवंगाची पावडर मिसळून पिऊ शकता.

अजून वाचा : आले खाण्याचे फायदे आणि नुकसान 

 

रक्तदाब नियंत्रित करते :

कमी रक्तदाब बाबतीत लवंग हा एक प्रभावी उपाय असल्याचे सिद्ध होते. हे रक्तदाब नियंत्रित करण्याबाबत महत्वाची भुमिका बजावते. हे रक्त पुरवठा सुरळीत करून हे शरीराचे तापमान स्थिर ठेवते. म्हणूनच हे शुगरने पीडित लोकांसाठी खूप उपयुक्त आहे. तसेच, एकाग्रता वाढविण्यासाठी देखील वापरले जाते.

अजून वाचा : आहारात सोडियमचे (मिठाचे) प्रमाण कमी केल्याचे 20 फायदे

 

कमी भूक लागण्याचा समस्येला आळा घालते :

जर आपल्याला कमी भूक लागत असेल तर लवंग आपल्यासाठी रामबाण औषध असू शकतो. नियमित लवंग खाल्ल्याने तुम्हाला भूक लागेल. यासाठी आपल्याला दररोज एक लवंग मधामध्ये मिसळून सकाळी रिकाम्या पोटी खावे लागेल.

 

दातदुखी सारखी समस्या दूर करते :

लवंगाचे फायदे दंत रोगांमध्ये देखील प्रभावी असल्याचे मानले जाते.  लवंग तेल कापसाच्या बोल्यावर लावुन ते दाताखाली दाबून ठेवल्याने दातदुखीपासून आराम मिळतो. तसेच दात किडण्यापासून संरक्षण होते.

 

कानदुखी कमी करते :

लवंगाच्या तेलाचा उपयोग कानदुखीसाठी केला जातो. कारण त्यामध्ये असलेलं एनेस्थेटिक नेचर गुणधर्म कानाची वेदना कमी करते. यामुळे थोड्या काळासाठी वेदना दूर करता येते. यासह, वेदना कमी होण्यासह कानाच्या संसर्गापासून बचाव करते.

 

त्वचा निरोगी ठेवते :

लवंग तेलात सर्वाधिक अँटीऑक्सिडेंट गुणधर्म असतात, जे त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. याचा वापर केल्याने त्वचा सॉफ्ट राहते आणि तेजस्वी राहते. या तेलात पोटॅशियम, सोडियम, लोह, फॉस्फरस, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी याचे प्रमाण अधिक असते.

अजून वाचा : कोरफड खाण्याचे फायदे | Benefits of Eating Aloe Vera in Marathi

 

यकृताचे संरक्षण करते :

हे यकृत निरोगी बनविण्यासाठी उत्तम प्रकारे कार्य करते. लवंगामध्ये उपस्थित असलेलं अँटीऑक्सिडंट्स हे यकृतचे मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करतात. आम्ही सांगु इच्छितो की, आपल्या शरीरात उपस्थित मुक्त रॅडिकल्स अनेक आजारांना कारणीभूत असतात. तसेच, लवंग पोटाच्या विकारांवर सुद्धा फायदेशीर ठरते. त्याचे सेवन केल्याने पोटातील जळजळ, पित्त, अपचन, असिडिटी, मळमळ, अतिसार आणि उलट्या यांना प्रतिबंधित करण्यासाठी कार्य करते.

अजून वाचा : अ‍ॅसिडिटी आणि गॅस समस्येवर घरगुती उपचार

 

संधिवाताची समस्येत फायदेशीर ठरते :

आयुर्वेदात लवंगाचे तेल सांधेदुखीसाठी वापरले जाते. लवंगमध्ये असलेल्या दाहक-विरोधी आणि वेदनशामक गुणधर्मांमुळे हे सांधेदुखी, सूज आणि हात आणि पाय जड होणे यांसारख्या समस्या दूर करते. लवंगाच्या तेलाने मालिश केल्याने सांधेदुखी, संधिवात, स्नायूंना सूज येणे इत्यादी बरे होतात. लवंग तेलाची मालिश केल्याने सांध्यातील स्नायू आणि हाडे मजबूत होतात.

 

लवंग खाण्याचे नुकसान (Lavang Side Effects in Marathi) :

  • लवंगाचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने मूत्रपिंड आणि आतड्यांचे नुकसान होऊ शकते.
  • लवंगामुळे शरीरात रक्तातील शुगरची पातळी कमी होते. म्हणून, जर आपल्या रक्तातील शुगरची पातळी कमी असेल तर लवंगांचे अधिक सेवन टाळावे. म्हणुन मधुमेह असलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घेतली पाहिजे.
  • लवंग खाण्याचे फायदे जरी असले तरीही लवंगाच्या अधिक वापरामुळे ऍलर्जी सारख्या समस्या उद्भवू शकतात.
  • लवंगाच्या अतिसेवनामुळे डोळ्यांमध्ये जळजळ होऊ शकते. त्यामुळे त्याचे अधिक सेवन करणे टाळावे.
  • लवंगाच्या अधिक सेवनामुळे आपल्या शरीरात जळजळ होते.
  • लवंगाचे तेल आपले रक्त पातळ करते, म्हणून आपण त्याचा जास्त वापर करणे टाळावे.

 

लक्षात ठेवा :

लवंग खाण्याचे फायदे व तोटे या लेखात आम्हीं सामान्य माहिती सादर केली गेली आहे. कृपया अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा किंवा वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घ्यावा.


आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

शेयर करा: