हळदीच्या दुधाचे फायदे आणि नुकसान | Turmeric Milk Benefits in Marathi

हळदीच्या दुधाचे फायदे सांगा (Turmeric Milk Benefits in Marathi) :

प्राचीन भारतीय आरोग्य संस्कृतीपासुन हळदीच्या दुधाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतातील आज घराघरात त्याचे सेवन केले जाते. हळदीच्या दुधाचे फायदे मोठ्या प्रमाणावर दिसून आले आहेत. म्हणून आज जगभरात हळदीचे दूध गोल्डन मिल्क (Golden Milk) या नावांनी लोकप्रिय आहे आणि आवडते पेय बनले आहे. हळदीचे दूध आता त्याच्या औषधी गुणधर्मांमुळे पाश्चात्य संस्कृतींने सुद्धा मान्य केले आहे.

हळदीच्या दुधाचे फायदे आणि नुकसान | Turmeric Milk Benefits in Marathi

वास्तविकपणे, हळदीचे आयुर्वेदिक फायदे खूप आहेत. जेव्हा हळद आणि दूध यांचे मिश्रण एकत्र केले जाते, तेव्हा हे मिश्रण अँटी-व्हायरल, एंटी-बैक्टीरियल आणि एंटी-फंगल एजेंट म्हणून काम करते. याच विशेष गुणधर्मांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. यामुळे आपल्या शरीराला विविध रोगांशी लढण्यास मदत होते आणि हे आपल्याला अनेक प्रकारच्या संसर्गजन्य रोगांपासून देखील बचाव करते.

म्हणून या लेखात आपण हळदीचे दूध पिण्याचे फायदे आणि हळदीचे दूध पिण्यापासून होणारे नुकसान पाहणार आहोत.

 

हळदीच्या दुधाचे फायदे (Turmeric Milk Benefits in Marathi)

सर्दी आणि खोकलासाठी प्रभावी :

सर्दी आणि खोकला दूर करण्यासाठी हळदीच्या दुधाचे फायदे देखील प्रभावी ठरू शकतात. कारण वास्तविकपणे हळदी युक्त दूध हे सर्दी आणि खोकला बरे करण्यासाठी उपयुक्त मानले जाते. कारण यामध्ये अँटी-व्हायरल आणि बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आढळतात. जे घसा खवखवणे, खोकला आणि सर्दीपासून यांपासून आराम देऊ शकते.

अजून वाचा : गुळवेलचे फायदे | Top 8 Benefits of Giloy in Marathi

 

जखम बरी करते :

पूर्वी पासून आपल्याकडे जखम झाल्यावर औषधी स्वरूपात ताबडतोप जखमेवर हळद लावणे फायदेशीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण हळदीमध्ये बॅक्टेरियाविरोधी आणि अँटी-सेप्टिक गुणधर्म असतात, जे जखमेवर बॅक्टेरिया वाढू देत नाहीत आणि जखम लवकर भरण्यास सुरुवात करते. शरीरात कोणतीही अंतर्गत किंवा बाह्य दुखापत झाल्यास सर्वप्रथम हळदीचे दूध पिण्याची शिफारस करतात. जर दुखापत अंतर्गत असेल तर हळदीच्या दुधाच्या सेवनाने वेदनांपासून लगेच आराम मिळतो.

अजून वाचा : रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी ?

 

श्वसनाचे विकार दूर करते :

हळदीचे दूध श्वसनाचे आजार शरीरापासून दूर ठेवण्यापासून मदत करते. हळदीच्या दुधाचे नियमित सेवन केल्याने श्वसन प्रणाली मजबूत होते आणि त्याचबरोबर श्वसनाचे इतर समस्या सोडवते. हळदीच्या दुधातील अँटी-माइक्रोबिएल या गुणधर्मांमुळे हे किरकोळ संक्रमण आणि विषाणूजन्य संसर्ग पासून दूर ठेवते.

 

रोग प्रतिकारशक्ती वाढवते :

हळदीच्या दुधात असलेले करक्यूमिन इम्यूनोमॉड्यूलेटरी एजंट म्हणून काम करतात. हे टी पेशी आणि बी पेशींसह शरीरातील सर्व निरोगी पेशींना प्रोत्साहन देण्यास मदत करतात. या सर्व पेशींच्या मदतीनेच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती अधिक मजबूत होते. तसेच करक्यूमिन शरीरात अँटीबॉडी तयार करून वायरल इन्फेक्शन, ताप, सर्दी खोकला इत्यादींपासून बचाव करतात.

अजून वाचा : रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी ?

 

कर्करोग रोग प्रतिबंधित करते :

कर्करोगामध्ये हळदीचे दूध फायदेशीर मानले जाते, सर्वात धोकादायक आजारांपैकी एक. हळद-दुधात दाहक-विरोधी गुणधर्म असतात. हळदीचे दूध प्रोस्टेट आणि कोलन कर्करोगाचा धोका कमी करू शकते किंवा त्यांना वाढण्यापासून रोखू शकते. या व्यतिरिक्त, हळदीमध्ये असलेले करक्यूमिन कर्करोगाच्या रुग्णांना बरे होण्यास खूप मदत करते.

 

निद्रानाशची समस्या सोडवते :

चांगली झोप घेणे हे निरोगी आरोग्याचे पहिले लक्षण मानले जाते. हल्ली प्रत्येक जण ताणतणाव मध्ये वावरत असतो ह्याचा परिणाम तुमच्या झोपेवर सुद्धा दिसुन येतो. हेच कारण आहे की झोपेच्या आधी एक ग्लास हळद दुधाचे सेवन करणे. जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास हळदीचे दुधाचे सेवन केले तर तुम्हाला रात्री चांगले झोप लागण्यास मदत होईल. स्वाभाविक पणे तुमच्या शरीरात दिवसभर ऊर्जा कायम राहील.

अजून वाचा : जास्त झोप येण्याच्या सवयीला आळा कसा घालाल ?

 

हाडे मजबूत होतात :

दुधात कॅल्शियम असल्यामुळे हाडे मजबूत होतात आणि हळदीच्या गुणधर्मांमुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते. हे हाडांशी संबंधित असलेल्या इतर समस्यांपासून मुक्त करते आणि गुडघे दुखी पासून आराम मिळतो त्याचबरोबर ऑस्टियोपोरोसिस देखील कमी करते.

 

पचनसंस्था सुरळीत ठेवते :

रात्री दुधात हळद मिसळून प्यायल्याने शरीरातील विषारी टॉक्सिक पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. ज्यामुळे तुमची पचनसंस्था योग्य राहते आणि तुम्ही पोटाच्या इतर आजारांपासून मुक्त होतात. जसे की गॅस, पित्त, बद्धकोष्ठता यांसारखी समस्या. म्हणून, तुम्ही हळदीच्या दुधाचे सेवन अवश्य करा.

अजून वाचा : अ‍ॅसिडिटी आणि गॅस समस्येवर घरगुती उपचार

 

त्वचा ताजीतवान राहते :

हळदीचे दूध प्यायल्याने त्वचेमध्ये नैसर्गिक चमक निर्माण होते. कारण दुधाबरोबर हळदीचे सेवन हे जंतुनाशक आणि बॅक्टेरिया विरोधी असल्याने हळूहळू त्वचेच्या समस्या सोडवते. जसे की इन्फेक्शन, खाज, पुरळ इत्यादी बॅक्टेरियाना मज्जाव करतात. यामुळे तुमची त्वचा स्वच्छ आणि निरोगी आणि चमकदार दिसते.

 

वजन कमी करते :

जर तुम्ही पण अतिरिक्त वजन वाढण्यामुळे त्रस्त असाल तर हळदीच्या दुधाच्या साहाय्याने तूम्ही वजन नियंत्रित करू शकता. हळदी मधील काही पोषक घटक फॅट्स कमी करू शकते, जे वजन नियंत्रण करण्यास मदत करते. त्याच वेळी, दुधात असलेले प्रोटीन हे भूक नियंत्रित करून वजन कमी करण्यास मदत करतात.

अजून वाचा : वजन कमी करण्याचे घरगुती उपाय | Weight Loss Tips in Marathi

 

हळदीचे दूध रेसिपी (Turmeric Milk Recipe in Marathi)

सामग्री :

  • 2 कप दूध
  • 3/4 टीस्पून हळद
  • 1/2 टीस्पून काळी मिरी
  • 1/2 इंच दालचिनी
  • 1 इंच आले
  • 1 टीस्पून मध

 

कृती :

  • सर्वप्रथम, एका भांड्यात 2 कप दूध घ्या.
    3/4 टीस्पून हळद, 1/2 टीस्पून काळी मिरी, 1/2 इंच दालचिनी, 1 इंच आले घाला.
  • सर्वकाही व्यवस्थित एकत्रित करुन चांगले मिक्स करून दूध मंद आचेवर ठेवा आणि दुधाला चांगली उकळी येऊ द्या.
  • आता जर तुम्ही मध घालत असाल तर दूध थोडे थंड होऊ द्या. 1 चमचा मध घालून चांगले मिक्स करावे. आपण गोडपणासाठी आपण साखरेचा देखील वापरू शकता.
  • शेवटी, दुध गाळून घ्या आणि अश्या रीतीने हळदीच्या दुधाचा आस्वाद घ्या.

 

हळद दूध पिण्याचे नुकसान (Side Effects of Turmeric Milk in Marathi)

  • मधुमेही रुग्णांनी हळदीचे दूध जास्त प्रमाणात पिऊ नये. कारण हळदीमध्ये असलेले करक्युमिन घटक हे रक्तातील साखरेची पातळी वाढवते. रक्तातील साखरेची पातळी जास्त असल्यास हळदीचे दूध न पिणे केव्हाही चांगले.
  • हळद ही नैसर्गिकच गरम घटक आहे ज्या लोकांना ॲलर्जीच्या समस्या आहेत अश्या व्यक्तींनी हळदीच्या दुधाचे सेवन केल्यास ॲलर्जी यांसारखी समस्या उद्भवू शकते.
  • ज्या लोकांच्या शरीरात लोहाची (Iron) कमतरता आहे. अश्या व्यक्तींनी हळदीच्या दुधाचे अजिबात सेवन करू नये. कारण हळदीच्या दुधाचे सेवन केल्याने शरीरात लोहाची कमतरता होऊ शकते.
  • गर्भवती महिलांनी हळदीचे दूध पिणे टाळावे. कारण हळदीचे दूध पोटातील उष्णता वाढवते. अशा परिस्थितीत गर्भाशयात रक्तस्त्राव होणे किंवा गर्भाशयात क्रॅम्प येण्याची समस्या उद्भवू शकते.

 

लक्षात ठेवा :

हळदीचे दुधाचे फायदे व तोटे या लेखात आम्हीं सामान्य माहिती सादर केली गेली आहे. कृपया अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा किंवा वैद्यकीय तज्ञांचा सल्ला घ्यावा.


आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram

शेयर करा: