डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची माहिती (Information of Dr. APJ Abdul Kalam) :
डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी झाला. त्याचे पूर्ण नाव अवुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम होते. त्यांचा जन्म तामिळनाडूच्या रामेश्वरम येथील धनुष्कोडी येथे झाला. त्यांची जयंती हा “जागतिक विद्यार्थी दिन” म्हणून साजरा केला जातो. त्यांनी भौतिकशास्त्र आणि एरोस्पेस अभियांत्रिकीचा अभ्यास केला. 2002 ते 2007 या काळात त्यांनी भारतीय प्रजासत्ताकाचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. सन 1997 मध्ये त्यांना भारतरत्न म्हणजेच भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला. यासह इतर अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले.
डॉ. अब्दुल कलाम यांनी राष्ट्रीय अण्वस्त्र (न्यूक्लियर परमाणु) कार्यक्रमांच्या प्रगतीस प्रोत्साहन दिले. डॉ. कलाम यांनी भारतातील तंत्रज्ञानाच्या विकासाद्वारे आर्थिक विकास साधण्यासाठी 20 वर्षांची कृती योजना तयार केली. क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण काम केल्यामुळे त्याला मिसाईल मॅन म्हणूनही ओळखले जाते.
आम्हाला आशा आहे की डॉ ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे हे अनमोल विचार आपल्या सर्वांना जागृत करत यशाकडे वाटचाल करण्यात तुम्हाला मदत करतील आणि नवीन मार्ग आणि धैर्य देण्यात मदत करेल. म्हणुन आज आम्ही डॉ ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या विचारांचा संपूर्ण संग्रह घेऊन आलो आहोत. आम्हाला आशा आहे की, आपणास हे डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे विचार (Dr. APJ Abdul Kalam Thoughts in Marathi) नक्की आवडतील.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार | Dr. APJ Abdul Kalam Quotes in Marathi
शिखरावर पोहोचण्यासाठी फक्त शक्ती आवश्यक आहे. मग तो माउंट एव्हरेस्टचा शिखर असो किंवा आपला व्यवसाय असो. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम
देशात सर्वाधिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्ती शक्यतो वर्गातील शेवटच्या बाकावरचं सापडतात. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम
तरुणांनी जॉब सीकर्सच्या ऐवजी जॉब जनरेटर्स होण्यासाठी अधिक सक्षम बनले पाहिजे. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम
Read More : लोकमान्य टिळक यांचे प्रेरणादायी विचार | Lokmanya Tilak Quotes in Marathi
जगात जर का सर्वात चांगला विचार करायचा असेल, तर सर्वप्रथम दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करणे बंद करावे लागेल. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम
यश हा असा वाईट शिक्षक आहे जो यशस्वी माणसांना असा विचार करण्यास भाग पाडतो कि ते कधीच हारू शकत नाही. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम
मला खात्री आहे की, जोपर्यंत एखाद्याने अपयशाची कडवट गोळी चाखली नाही तोपर्यंत त्याला यशाच्या महत्वाकांक्षा समजू शकत नाही. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम
स्वप्न ती नसतात जी झोपल्यावर पडतात स्वप्न ती असतात जी तुम्हांला झोपू देत नाहीत. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम
Read More : चाणक्य नीति सुविचार मराठी | Best Chanakya Niti Suvichar in Marathi
ज्या धर्मातील देवता सदैव शस्त्रधारी, त्या हिंदू धर्मात अहिंसेचे स्तोम माजविण्यात यावे हे मोठे नवलच होय. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम
वाट पाहणाऱ्यांना तितके मिळते जितके प्रयत्न करणाऱ्यांनी मागे शिल्लक ठेवलेले असते. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम
आत्मविश्वास आणि मेहनत हे अपयश नावाच्या रोगाचा नाश करण्याचे सर्वोत्तम औषध आहे. हे आपल्याला एक यशस्वी व्यक्ती बनवते. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम
Read More : स्वामी विवेकानंद यांचे अनमोल विचार | Swami Vivekananda Quotes in Marathi
दहा लाख लोकसंख्येचा देश नव्हे तर एक अब्ज लोकांच्या देशाप्रमाणे आपण विचार केला पाहिजे आणि तसेच कार्य केले पाहिजे. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम
जोपर्यंत तुम्ही जगासमोर उभे राहत नाही, तोपर्यंत तुमचा कोणीही आदर करणार नाही या जगात भीतीला स्थान नाही केवळ सामर्थ्य हेच सामर्थ्याचा आदर करते. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम
जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर प्रथम सूर्यासारखे प्रखर व्हावें लागेल. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम
तुमच्या नौकरीवर (कामावर) प्रेम करा पण कंपनीवर करू नका कारण तुम्हाला कधीच कळणार नाही तुमची कंपनी कधीही तुमच्यावर प्रेम करणे सोडून देईल. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम
चला आजचे बलिदान देऊ जेणेकरून आपल्या मुलांचे उद्याचे भविष्य अधिक उजवलीत होऊ शकेल. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम
अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम हे जगातील सर्वात गुणकारी औषधे आहेत. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम
विज्ञान हे मानवतासाठी एक सुंदर बक्षीस (तोहफा) आहे त्याला आपण बिघडवले नाही पाहिजे. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम
आकाशा कडे बघा आपण एकटे अजिबात नाही. ससर्व भ्रमंड तुमचं मित्र आहे पण ते भरभरून त्यालाच देते जो स्वप्न बघतो आणि त्यावर काम करतो. – डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम